नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….सदरात आपले स्वागत आहे. WhatsApp च्या नव्या कार्य पद्धतीमुळे पोर्टल आपल्यापर्यंत पहिल्यासारखे पोहोचू शकत नाही, याची खंत वाटते. अजूनही बरेच लेखक, वाचक न्यूज स्टोरी टुडे च्या समूहात सहभागी झाले नाहीत, तरी कृपया त्यांनी पुढील प्रमाणे समूहात सहभागी व्हावे, ही विनंती.
Follow the Newsstorytoday channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbApCmi6mYPMziFtQz3A
लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांनी आपले साहित्य आणि वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया पूर्वीप्रमाणेच 9869484800 याच व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवित जावे.
— आपला स्नेहांकित. देवेंद्र भुजबळ.
संपादक, न्युज स्टोरी टुडे
www.newsstorytoday.com
9869484800
1
माननीय श्री अमोलजी मोहोळकर,
एक अतिशय उत्कृष्ट अभियंता म्हणून नावलौकिक असलेले कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून आपली निवड झाली ही अतिशय सन्मानजनक बाब आहे. आपल्याला अत्यंत मनापासून खूप खूप शुभेच्छा. ईश्वर आपल्या संपूर्ण कुटुंबास देश हितार्थ कामे करण्यात सदैव सक्षम ठेवो याच खूप खूप मनापासून शुभेच्छा….
- किशोर विभुते आणि सौ संगीता विभूते… अकोला.
2
अभिनंदन इंजिनिअर अमोल साहेब.
- अनिल चाळके. बदलापूर.
3
हलकं फुलकं “बजेट बिजेट” खरंच हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे. 👌🏻👍🏻
बजेटवरची कविताही वास्तववादी आणि सुंदर आहे.
- स्नेहा मुसरीफ. पुणे
4
संकल्प सेंटर ही केवळ एक संस्था नाही तर समाजातील एका उपेक्षित, दुर्लक्षित घटकांतील आत्मविश्वास जागृत करण्याचे प्रेरणादायक स्थान आहे.अशा प्रयत्नांचा विस्तार सर्वत्र व्हावा या दृष्टीकोनातून, न्यूज स्टोरी टुडे पोर्टलची भूमिका मौलिक आहे.
- प्रा डॉ सतीश शिरसाठ, पुणे.
5
आदरणीय संपादक ,
चिंचवड, पुणेहुन प्राध्यापिका सुरेखा कटारियाचा नमस्कार.
आम्ही घेत असलेल्या उपक्रमाच्या बातम्या छापून एक चांगला हितदायी, प्रेरणादायी, समाज उद्धारणीसाठी महत्त्वाचा, विश्वची माझे घर असे मेसेज लाखो रुपयापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहात. आपण दिलेले हे कव्हरेज निश्चित सर्वांसाठी व महिलांसाठी महत्त्वाचे आहे.
आमचे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक श्री डिसूजा व सौ डिसूजा यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करत आहोत. शारीरिक अस्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवून काम करणे कठीण असते. ते काम आपण करत आहात.आपणास या नवीन वर्षामध्ये शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना..
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. त्यामध्ये दिसणारे प्रतिबिंब समाजाला दिशा देण्याचं काम करत असतं ते काम आपण करत आहात.
असेच आपले समाज हित उपयोगी राष्ट्र उभारणीचे काम सदैव आपल्या हातून घडत राहो.
– प्रा.सुरेखा कटारिया, संस्थापिका अध्यक्ष
— टीम एन एस टी. ☎️98694 84800
