नमस्कार, मंडळी.
सर्वांचा आवडता गणेशोत्सव हा आठवडाभर साजरा होत आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या पोर्टलवर सुध्दा आपल्याला दिसून आले असेलच.
आम्ही ……कर ही वेगवेगळ्या गावांवरची मालिका सुरू करताना मी असे म्हटले होते की, मराठी माणूस आता महाराष्ट्राबाहेरच नव्हे तर देशाबाहेर सुध्दा वास्तव्य करीत आहे. म्हणून कुणी आम्ही लंडनकर, सिंगापूरकर, सिडनिकर असे लिहिले तर नवल वाटायला नको आणि याची प्रचिती या आठवड्यात आली. इंग्लंड मधील सौ लीना फाटक यांनी
“आम्ही युकेकर ” हे सुंदर कथन लिहिले. व्यक्तिगत अनुभव या बरोबरच तेथील निसर्ग, संस्कृती, इतिहास, समाज जीवन, चाली रिती याचे त्यांनी सुरेख दर्शन घडवले. अशा प्रकारे जग आणखी जवळ येईल असा विश्वास वाटतो.
या आठवड्यात प्राप्त प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक
👌🏻👌🏻आम्ही युकेकर..
छान शब्दांकन ! परदेशी भारतीयांच्या भावनाही सुंदर व्यक्त केल्या आहेत. आमचा इथला अनुभव ही तसाच आहे.
– शिल्पा कुलकर्णी, लुईव्हील, केंटकी, अमेरिका.
Hearty congratulations. Keep it up. ❤️🙏
– Smita Bhagwat, Canada
संपादक आदरणीय देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी न्यूज स्टोरी टुडे मध्ये “यशस्वी उद्योजक आदरणीय पोपटलाल डोर्ले यांच्या प्रेरणादायी कार्याचा लेख” वाचनात आला.
मा.डोर्ले साहेब यांचा परिचय चिंचवड मोहननगर येथील श्री कालिका देवी मंदिरात झाला त्यावेळी प्रा. सुभाष दगडे सर त्यांच्या समवेत होते त्यावेळी त्यांचा सो.क्ष.कासार समाज सेवामंडळ पिंपरी चिंचवडच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे मान्यवर विलास वीर सर, दिलीपशेठ रासने, गोविंदराव कंदलकर, मोतीलाल वनकुद्रे आणि मी (श्री कृष्णकांत सासवडे) उपस्थित होतो.
त्यानंतर सामाजिक कार्यातून भेट होत राहिली, त्या भेटीतून त्यांच्या कार्याची महती समजली.
ते शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ कष्टाळू आहेत.
मा.पोपटलाल डोर्ले साहेब यांचे कार्य खरोखरच महान आहे. नोकरी ते व्यवसाय (औषधाची कंपनी) असा त्यांचा दीर्घ प्रवास आहे. नोकरीत डोर्ले रममाण झाले नाहीत तर व्यवसायात रममाण झाल्याचे दिसून येते कारण त्यांचे कुटुंब च हाडाचे व्यवसायिक होते आणि आहेत तेच गुण त्याच्याच उतरले.
त्यांना इंजिनिअर व्हायचे होते परंतु परमेश्वराने त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी बी फार्म होण्यास आणि औषधाचा कारखाना काढण्यासाठी बुध्दी दिली.
आज त्यांची औषध उत्पादने २२ देशात आहेत, एवढेच काय तर कोरानावर मात करण्यासाठी औषधे निर्मिती केल्याचे दिसून येते. त्यांनी quantity पेक्षा quality (संख्यात्मका पेक्षा गुणात्मकाला ) विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येते आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाला चि.निलेश यास सुध्दा बी फार्मसी चे शिक्षण दिले, व्यवसायात गोडी निर्माण करून आपल्या व्यवसायातील व्याप्ती वाढवली
.
मा.डोर्ले साहेब यांनी आपले मानव सेवेचे कार्य फक्त व्यवसायातून सिध्द केले नाही तर, त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याला झालर रुपी यशाची किनार जोडली.
तसेच त्यांचे योगदान आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दिसून येते.
गरीब, प्रामाणिक,होतकरु विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती सुरु केली.
तरुणांनी आपला व्यवसायात प्रामाणिकपणा, जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवले पाहिजे.
खरोखरच ते मार्गदर्शक तर आहेतच परंतु त्यांचे महान कार्य तरुणांना प्रेरणादायी आहे !!
👏👏👏👏👏
आदरणीय श्री देवेंद्र जी भुजबळ साहेब यांनी त्यांच्या मुलाखतीतून मा. पोपटलाल डोर्ले यांचा वास्तवादी जीवनपट किमान शब्दात महान कार्याचे लेखन केले त्याबद्दल मा.देवेंद्र जी भुजबळ साहेबांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन !
मा.पोपटलाल डोर्ले साहेबांना आणि त्यांच्या कार्याला सलाम !🙏🏻
पुढील कार्यास मनापासून खूप खूप शुभेच्छा !
🌹🌹🌹🌹🌹
– श्री कृष्णकांत सासवडे
सो.क्ष.कासार समाज सेवा मंडळ पिंपरी चिंचवड
डॉ राणी खेडीकरांचा लेख वाचून काटा आला अंगावर. खूप भयंकर आहे हे सगळं.
– साधना ठाकूर, अलिबाग
राणी मँडमचा लेख अप्रतिमच होता.👏✌️🙏👍💐💐
– प्रा डॉ सतीश पावडे
महात्मा गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यापीठ
सौ. माधुरी काकडे यांना मिळालेला सन्मान योग्यच आहे. त्या माझ्या गुरुस्थानी आहेत. मी त्यांचे कडून “मधूसिंधु” हा काव्य प्रकार शिकलो आहे. त्यांची मधूदीप ही रचना मी थोडीफार शिकलो आहे. माझ्या “पाऊलवाट” ह्या काव्यसंग्रहात ती रचना मी शेवटी घेतली आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…..🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
– अरुण पुराणिक, पुणे