Homeसाहित्यवाचक लिहितात…..

वाचक लिहितात…..

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवडय़ात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

माननीय श्री संपादकजी तुमचे “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक वाचले. अतिशय उत्तम उपक्रम आहे. असे मौक्तिक शोधून काढणे आणि त्यांची झळाळी इतरांना दाखवून डोळे दिपवून टाकणारं कार्य शिवधनुष्य पेलण्यासारखे तुम्ही किती आनंदाने पेलले आहे.
खरेच अशा व्यक्तींच्या आयुष्यातून खूप शिकायला मिळते. प्रेरणास्पद आहेत सारेच. त्यासाठी तुम्हाला हात देणारे डॉ काठोळे, रश्मी हेडे यांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
पल्लवीच्या लेखात लिहिलेले मनाला भावते.. शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख खेळण्यास आता आसवांना वेळ नाही.. हे जणू त्या साऱ्यांचे प्रातिनिधिक वाक्य आहे.
डॉ भारुड बालपणीच बाणेदारपणे उत्तर देतात, “अभ्यास करतोय मी आता जाणार नाही चखणा आणायला”! कुठून येते ही जिद्द अशा प्रतिकूल परिस्थितीत ? किंवा घुगे मॅडम चे कल्पक, लोकोपयोगी उपक्रम म्हणा.. वा आशिषचे “ईर्ष्येने चेंडू आपटला तर तो वेगाने उसळतोच, हा अदम्य विश्वास बघा किंवा झोपडपट्टीत वाढून, भीक मागून एका पाखराची झेप अनुभवा..” वाचता वाचता डोळे देखील पाणावतात आणि असंख्य सुख सोयी असलेल्या मुलांनी असे काहीही दैदिप्यमान यश न मिळवता नुसतेच उडाणटप्पूपणा करीत उधळणे तुलना करण्यास भाग पाडते.
सर्वच लेखांचा आढावा घेणे तर शक्य नाही पण शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते.. तुमचे “डॉ हलगे” म्हणतात तसे पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमवा …हा अगदी शुद्ध , प्रामाणिक संदेश फार मोलाचा आहे ..तेवढे तरी वाचकाने शिकावे..हीच शुभेच्छा पुस्तकाला.
— सौ स्वाती वर्तक. खार
2
स्नेहाची रेसिपी लेख अभ्यासपूर्ण आणि खऱ्या अर्थाने स्वादिष्ट वाटला.👍🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
3
मोहना ताईंनी अगदी माझेच विचार बोलते केले असे वाटते..प्रत्येकाशी किती स्नेहाने, प्रेमाने बोलत असत त्या..साहित्यिक प्रवास उच्च स्तरी पोचलेला असताना सुद्धा किती ऋजुता नव कवी लेखकांशी बोलताना की आपण सहज नतमस्तक होतो….जायच्या काही दिवसांपूर्वीच मी त्यांना म्हटले होते..उद्या फोन करते सविस्तर बोलू आणि व्यग्रतेमुळे राहून गेले .ही सल मला आता कायम कुरतडत राहील..माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
माधवी ताईंनी केलेली चैत्राची कविता आवडली.
जयश्री ताईंनी लिहिलेले खरे आहे अजून सुधाकर आहेतच.. आणि राहणार!
— स्वाती वर्तक. मुंबई.
4
माधवीईंच्या आठवणींचा भावपूर्ण शब्दांत घेतलेला आढावा सुरेख वाटला.
— प्रा डॉ सतीश शिरसाट. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments