नमस्कार, मंडळी
थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती या आठवड्यात साजरी झाली. या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित, स्वानुभवावर आधारित २ विशेष लेख आपण प्रसिद्ध केले. तसेच गेल्या आठवडय़ात आपल्या गावाविषयी लिहिलेले, इंग्लंड मधील वॉरिंगटन येथील सौ लीना फाटक यांच्या सुंदर लेखानंतर, या आठवड्यात अमेरिकेतील लुईव्हील येथील सौ शिल्पा कुलकर्णी यांचा लेख आपण प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे वाचकांना हा देखील लेख खूपच आवडला. सुंदर लेखनाबद्दल या दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन.
या आठवड्यात, आपले मित्र निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेल्या “अंधारयात्रीचे स्वप्न” व स्वतः च्या जीवन संघर्षावर लिहिलेल्या “अजिंक्यवीर” या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचा वृतांत ही वाचकांना आवडला. या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक
नमस्कार मित्रांनो,
”जीवन कोडं” रस्त्यावरचं जीवन जगणाऱ्या आणि आपल्या कलागुणांनी रस्त्यावर ढोलकी वाजवत लोकांचं लक्ष वेधून घेणा-या लहान मुले व त्यांच्या बेफीकीरं आईचे रस्त्यावरील वास्तववादी जगण्याचं चित्रण सुनंदा पानसे यांच्या सकस लेखणीतून चितारलेले आहे. समाजातील विदारक परिस्थितीचे हे चित्रण आपल्याला विचार करायला लावणारे आहे.
मित्रांनो,
“आम्ही लुईव्हीलकर” हे अप्रतिम विचारांची आणि वाचनीय सदर शिल्पा कुलकर्णी यांनी ”मराठी न्यूज स्टोरी टुडेच्या” ब्लॉग मध्ये लिहिलेल्या आणि श्री देवेंद्र भुजबळ साहेबांनी संपादित केलेले सदर उत्कृष्ट विचारांची व नैसर्गिक वातावरणातील शहरांची नवीन ओळख करून दिली त्याबद्दल लेखकांचे आणि संपादकांचे मनापासून अभिनंदन व पुढील चांगल्या लिखाण उपक्रमासाठी शुभेच्छा !!
– राजाराम जाधव, सहसचिव (सेवानिवृत्त),
महाराष्ट्र शासन
जीवन कोडं
छान लेख. सगळं चित्र डोळ्यांसमोर उभे करणारा व शेवटी वास्तवाची जाणीव करून देणारा. हार्दिक अभिनंदन
– Mrs Lina Phatak
डॉक्टर, आपण गेलात ? फार सुंदर लेख.मनाला भिडणारा. काही कारणांनी भेटणारी माणसं कधी मनात घर करून बसतात कळत नाही..
– सुनंदा पानसे
चला केरळला…
केरळ नवीन माहिती मिळाली
लेखन छान
– दिलीप खन्ना
“अंधारयात्रीचे स्वप्न”, “अजिंक्यवीर” चे शानदार प्रकाशन
आदरणीय देवेंद्र जी भुजबळ साहेब धन्यवाद.
आपण नेमक्या शब्दात वस्तुनिष्ठ पणे आम्हाच्या नोंदी घेतल्या.
डॉ अशोक पवार लोहरेकर,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
सन्माननीय भुजबळ साहेब,
नमस्कार,
आपण मराठी न्यूज स्टोरी टुडे च्या माध्यमातून ”अंधार यात्रिचे स्वप्न” आणि ‘अजिंक्यवीरच्या’ प्रकाशन कार्यक्रमाचे – सोहळ्याचे वास्तववादी समिक्षण तसेच सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मांडलेल्या विचारांचे अतिशय उत्तमपणे समाचार घेतला. या सर्व मान्यवरांचे विचार व भावना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. त्यामुळे आपण, भरारी प्रकाशन आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. माझ्याप्रती आपण सर्वांनी असाच स्नेहभाव ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला सर्वांचा स्नेहांकित,
राजाराम जाधव आणि परिवार
लेखक आदरणीय राजाराम जाधव यांचे दोन्ही पुस्तके प्रकाशित केल्या बद्दल प्रथम अभिनंदन जीवनातील संघर्ष मानसाला घडवतो.त्यांनी जो प्रवास केला तो
इतरांना प्रेरणा देणारा ठरावा.
– अशोक केरू गोरे
आम्ही लुईव्हीलकर….
सुरेख शब्दात वर्णन केलं आहे. नेहेमीच्या पर्यटन स्थळांपेक्षा वेगळ अस वाचायला जास्त छान वाटत. मनापासून अभिनंदन.
– Mrs Lina Phatk
कर्मवीर आणि आम्ही या लेखातील मला भावलेला प़संग म्हणजे सासवडे सरांच्या वडीलांचे शैक्षणिक कार्यातील अत्युच्च योगदान. स्वतः निर्धन असूनही शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून स्वतः च्या घराची जागा शाळेला दिलेल्या दानातून त्यांची औदार्यता आणि तळागाळातील वंचित बहुजन समाजाविषयी तळमळ दिसते. हाच वारसा सरांनी आपल्या परीने चालू ठेवला. त्यांच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा.
– श्री नामदेव जाधव
माननीय श्री कृष्णकांतजी सासवडे सर यांचे वडील कै.ज्ञानेश्वर सासवडे (भाऊ) यांनी आपली स्वतःची गरिबी असतानाही अनेक प्रकारचा संघर्ष करतात खेडोपाडीच्या गावी जाऊन कधी सायकलवर तर कधी घोड्यावर जाऊन बांगड्या विकण्याचे काम केले. त्या काळात बहुजनांच्या शिक्षणाची व दारिद्र्याची दुरावस्था त्यांनी जवळून पाहिली होती. ज्यावेळी भाऊंना समजले की आपल्या चास सारख्या दुर्गम आदिवासी भागात रयत शिक्षण संस्था हायस्कूल काढू इच्छित आहे त्यावेळी त्यांना जागेची उपलब्धता नसल्याने त्यांचा बेत मागे घेण्याच्या तयारीत संस्था होती. अशावेळी गावातील दानशूर श्रीमंत लोकांच्या बरोबर भाऊंनी ही स्वतःच्या घरबांधनी साठी घेतलेली जागा रयत शिक्षण संस्थेला दान दिली. महान कार्य फक्त एक दूरदृष्टीचा अभ्यासू माणूसच करू शकतो. यावरून सासवडे घराण्याची सामाजिक जाणीव किती प्रबळ आहे हे पाहायला मिळते. भाऊंनी त्याकाळात ओळखले कि बहुजनांच्या दीनदलित गरिबांच्या उद्धाराचा एकच मार्ग तो म्हणजे शिक्षण. हे ओळखून त्यांनी आपली जागा बहुजनांच्या शिक्षणासाठी उभा राहणाऱ्या माध्यमिक शाळेला दान दिली… भाऊ आपल्या उदारतेला, दूरदृष्टीला आणि आपल्या घराण्याच्या या औदार्याला लाख लाख सलाम.
– श्री. अंकुशराव तानाजी
डॉक्टर, आपण गेलात ?
जीवन वस्तू स्थिती….उत्तम लेखन.एक उत्तम व्यक्तिमत्व डॉ…… अप्रतिम लेख.अचूक जीवनाचा वेध…….
– Yogesh Balasaheb Yadav
स्पर्श……
अप्रतिम! 💖
– Samrudhi
शेवटचे पान
सुंदर लेख. वास्तवता दाखवणारा. धन्यवाद
– Lina Phatak, Warrinton, UK
ओठावरलं गाणं…
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. मधुकर जोशी यांची एक सुरेख रचना. गोविंद पोवळे यांचे संगीत व गायन. ह्या अजरामर गीताची आपण रसग्रहणासाठी निवड केली त्याबद्दल धन्यवाद. आपण प्रत्येक कडव्याचा अर्थ उत्तम रित्या उलगडून दाखवला आहे. गाजलेल्या गाण्याचे रसग्रहण हा आपला हातखंडा आहे.
– विवेक भावे
रसग्रहण सुंदर. मातीशी असलेलं नातं किती छान पद्धतीने सांगितले आहे.
– निलाक्षी पिसोळकर
शरणपूर वृध्दाश्रमासाठी थाटलेला खूप सुंदर उपक्रम, भुजबळ सरांच्या प्रेरणेने जागृत होणे, सर्व माननीय व्यक्तींनी साथ देणे, सारेच कौतुकास्पद आहे. आपल्या सामाजिक कार्य भावनेस मानाचा मुजरा! सर.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
छा गये बादल……
खुप छान लिहिलय सौ.अलका. अत्यंत प्रवाही तरलता आपल्या लेखनातील उत्कटता भावून गेली. आम्हा उभयतांकडून मनःपुर्वक अभिनंदनासह हार्दिक शुभेच्छा.
– Shrikant Manohar Paranjpe
गरीब मुलांना संधी
नमस्कार सर,
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. संचालकांचे अभिनंदन.
धन्यवाद सर.
– अशोक केरू गोरे
नाशिकची खाद्यसंस्कृती
वाह्, छान वर्णन केलय. आईचे माहेर. खानदेशी १०० डिग्री मधून नाशिकचा गारवा सुखावह वाटायचा. प्रत्येक उन्हाळयात सुट्टीसाठी नाशिकला यायचो. मामे, मावस भावंडांची मोठ्ठी गॅंग असायची. बाहेरच खाण नव्हतच. फक्त तिखट, मिठ, मसाला लावून कैऱ्या, ऊसाचा रस, व अजुनहि जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा सुप्रसिद्ध चिवडा. लहानपणची मजा काही औरच.
– Lina Phatak, Warrinton, UK
चित्रगीत
हृदय स्पर्शी गीते, अपंगत्वावर भाष्यकरणारे भावना प्रधान प्रसंग तसेच जादूई संगीत उत्कृष्ट अभिनय उत्तम दिग्दर्शन यामुळे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून
बसलेले चित्रपट आणि आपली ओखवती लेखन शैली
आपण मांडलेल्या संवेदनाक्षम प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते. सामाजिक जाणिवेतून सतर्कता वाढीस लागते
प्रेरक, प्रेरणादायी भाष्य. धन्यवाद साहेब आभारी आहे.
– अशोक केरू गोरे
आम्ही “युकेकर”
आशाताई कुंदप, बंडू दाते, व दिलीप खन्ना तुम्हासर्वांना खुप खुप धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे देवेंद्रजी यांनी मला ही संधी तर दिलीच पण लिहिण्यास लागणारे प्रोत्साहन दिले. मला ते फार महत्त्वाचे वाटले. खुप आभार देवेंद्रजी. असाच लोभ असू दे.
– Mrs Lina Phatak
ओघवती भाषा. मन यु.के.त पोचलं. छान, सुंदर सुरेख
– Dilip Khanna
घट्ट आवरण : नाजूक मन
Teen age मध्ये घ्यायची मुलां_मुलीची काळजी, चितां व जबाबदारी योग्य शब्दातला लेख.
– पूर्णिमा शेंडे
दिर्घोद्यगी पोपटलाल डोर्ले
Mr Dharmanuragi Popatrao Dorle having pleasant personality, non egotistical person having social senses. I wish him long healthy life.All the best sir.
– B. R. Patil
लुईव्हिल फारच छान वर्णन आणि फाँलचे फोटो पाहुन मन प्रसन्न झाले.
– वर्षा फाटक, पुणे
जाधव साहेबांची प्रेरणादायी वाटचाल आम्हाला वाचायला मिळणार… साहेबांचे अभिनंदन🌹
– प्रा के ए शिंदे, सातारा
लुईव्हील मस्तच ….
– प्रा डाँ सुमती पवार, नाशिक
जीवन खरंच कोडं आहे ..
पण आपल्यासाठी..
ते दु:ख्खात ही सुखात आहेत …
– प्रा डॉ सुमती पवार, नाशिक
कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या जीवनगाथा कृष्णकांत सासवडे ह्यांनी अतिशय उत्तम पध्दतीने लिहिली आहे. स्पर्श आई, डॉक्टर आपण गेलात, मनातील कविता, हे सारे लेख, कविता मनाला भिडणार आहे. आईच वर्णन..घराचे घरपण राखलेली
अंगणी तुळस सजवलेली
गंगेसम पवित्र अशी तू
हे फारच भावल.
स्पर्श ..स्वतः अनाथ असण्याची पोकळी अन्नपूर्णा ने अनाथ मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला कुशीत घेऊन भरून काढली, तिची नी स्वतः ची पण ..
हृदयस्पर्शी लिखाण
एकूण लेखनाचा दर्जा उत्तम वाटला प्रत्येकावर लिहिण कठीण आहे पण पोच द्यावीशी वाटली …
– सुनंदा पानसे