नमस्कार, मंडळी.
बोलता बोलता सप्टेंबर महिना गेला आणि ऑक्टोबर महिना सुरू झाला. पावसाळा संपण्याचे हे दिवस. आता ऑक्टोबर महिन्यापासून आपले सण सुरू होणार. त्यांचे आपण स्वागत करू या. नव्या जोमाने जीवनाला सुरुवात करू या.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला,
देवेंद्र भुजबळ, संपादक
का नसत ?
उत्तरार्धात दिलेला प्रश्न इतका मोठा आणि गंभीर आहे की काय बोलावे हेच सुचत नाही, लहागीनं (अर्थात तुम्हीच )हा प्रश्न समाजासमोर मांडून निशब्द केलं आहे
– काशिनाथ भारंबे
शोध भगवंताचा…..
भगवंत शोधातित भाव भावना ! उत्सुकता ! कुतुहल !
– सुरेंद्र दाजी खरात
शाश्वत जीवन
नमस्कार,
नैसर्गिक संतुलन साधण्यासाठी वृक्ष लागवडीची आवश्यकता,व महत्व सांगणारा लेख अप्रतिम आहे. तसेच ‘सह्याद्री देवराई’ या संस्थे मार्फत सामाजिक कार्य करणारे , जेष्ठ अभिनेते, सयाजी शिंदे यांच्या
अतिशय मोलाच्या कार्याची माहिती देणारे आदरणीय संपादक लेखक यांचे हार्दिक अभिनंदन.
– अशोक केरू गोरे
निसर्गाच जतन करण्यासाठी मानसाला जाग करणारा जेष्ठ पत्रकार शेषराव वानखेडे यांचा शाश्वत जीवन हा लघुलेख वास्तव सत्य सांगणारा ! खुपच च्छान !
सन्माननीय अभिनेते सयाजी शिंदे यांचा निसर्गजागर प्रशंसनीय ! प्रेरणादायी 🙏
– सुरेंद्र दाजी खरात
कर्मवीर आणि आम्ही..
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श शिक्षक मा. कृष्णकांत सासवडे सर यांचे दिवंगत पिताश्री स्व.ज्ञानेश्वर केशव सासवडे यांची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही चासकमान या आपल्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतःची वडिलोपार्जित जागा शाळेसाठी बक्षिस दिली त्यामुळे गांव व समाज याप्रती दातृत्व, शिक्षणाबद्दलची अस्था व प्रेम दिसून येते. शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये योगदान देऊन त्यांनी सेवा व समर्पणभाव दाखवून एक आदर्श निर्माण केला होता… त्यांच्या या अलौकिक कृती आणि विचारांना शतशः नमन करतो.
— नरेंद्र बंड सर
माननीय श्री कृष्णकांत सासवडे सर यांनी अतिशय छान प्रकारे शब्दांकित करून मांडलेला जीवनपट डोळ्यापुढे उभा राहतो.
सरांचे वडील स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वरजी केशव सासवडे यांनी स्वमालकीची जमीन शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी रयत शिक्षण संस्थेला दिली ही खरोखरच समाजासाठी उपयोगी आणि सर्वांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. सरांच्या वडिलांची शिक्षणाप्रती दूरदृष्टी या मधून दिसून येते त्याच प्रमाणे सरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून स्वतःचे आणि कुटुंबाचे पर्यायाने समाजाची प्रगती करण्याचं काम सरांनी केलेला आहे धन्यवाद सर आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा……
– श्री. प्रमोद राठोड
आदरणीय सासवडे सर
आपण शालेय जीवनातील सोनेरी गतस्मृतीना ऊजाळा दिला. मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेतून शालेय शिक्षण व महाविदखालीयन शिक्षण शिखळ ता खंडाळा जि सातारा येथे घेतले.
आपल्या पिताश्रीनी शाळेला स्वतःची जागा देऊन फार मोठा त्याग केला आहे. संबधीत जागेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले यांचा मला अभिमान आहे.
आपले व आपल्या वडिलाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. स्वावलंबी शिक्षण हेच आपले ब्रिद्र आहे.
– श्री. संदिप रांगोळे
गदिमा वरील सुंदर लेख वाचला. त्यांच्या काव्यातील शब्द, ताकद जबरदस्त.
सुंदर कविता ! ध्यास..
लेखिका रश्मी हेडे, तुम्हाला मिळालेला सन्मान पाहून व वाचून खूप अभिमान वाटला. खूप खूप अभिनंदन !
– वर्षा भाबल.
आमच्या सर्वांच्या आवडत्या लेखिका सौ. रश्मी हेडे यांना स्वयमसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन… यापुढे आपणाकडून अशीच अभिमानास्पद कामगिरी होणार आहे…
– विलास बाबुराव सरोदे
हार्दिक अभिनंदन श्री देवेंद्र भुजबळजी
– अरूणा मुल्हेरकर
अभिनंदन ! भुजबळ सर. असेच तुमच्या यशाचे कौतुक होत राहो. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल
कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या वरील लेख अतिशय भावला.
– Ajit Magdum
सौ. अलका, सौ. सुनंदाचा,
स्नेहपूर्वक सप्रेम नमस्कार
अलका यू पी एस सी च्या निकालाची अगदी पोस्ट सहित इत्यंभूत माहिती दिली. धन्यवाद .
– Sunanda Nabaji Shinde
“अंधारयात्रीचे स्वप्न”, “अजिंक्यवीर” चे शानदार प्रकाशन..
महत्वाचे योगदान दिले आहे. अशा व्यक्तींना नमन
कर्मवीर आणि आम्ही..
महत्वाचे योगदान दिले आहे
– विमल शिंदे
ओठावरलं गाणं…
अतिशय सुंदर रसग्रहण झाले आहे.
– Raju Athawale
अप्रतिम चित्रीत : सुहाना सफर,
– अशोक केरू गोरे
सर
आपला अंक म्हणजे माहितीचा खजिना आहे .प्रत्येक दिन विशेष संदर्भात बहुमोलाची माहिती मिळते .दिवाळीत आपण दिवाळी अंक काढावा व विविध विषयांवरील लेख प्रकाशित करावेत .आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा.