Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्याला पोर्टलवर दिसत असेलच. सुदैवाने कोरोना आटोक्यात असल्याने परिस्थिती सुधारत आहे. तशीच ती सुधारत रहावी, यासाठी आपण काळजी घेऊनच
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ, संपादक

नमस्कार, सर.
आपण समाजभुषण पुस्तक लिहून आपली लिखाणाची धार सतत सुरू ठेऊन एक आदर्श लोकांसमोर ठेवून उत्तम काम सुरु ठेवल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
– हिरामण भोईर, कुस्तीपटू, पेण, जिल्हा- रायगड

कुटुंबातूनचं प्रेम द्या, प्रेम घ्या, ची शिकवण देणारे आणि ती शिकवण आत्मसात करून कुठेही बडेजाव न करता त्यानुसार वाटचाल करणारे धारवसाहेबांचं यवतमाळ प्रेम त्यांना आणि वाचणाऱ्यानाही आत्मिक समाधान देणारं वाटलं. 👍👍
– वीणा गावडे

मी ठाण्याला माहिती अधिकारी असताना कोकण विभागाचे माहिती प्रमुख म्हणून धारव साहेबांनी आम्हा सर्व माहिती अधिकार्‍यांना एक कुटुंब प्रमुख म्हणुन आमच्यावर जो विश्वास दाखविला अणि मार्गदर्शन केले त्याची आठवण किवा स्मृती मला अजून दिशा दाखविते. म्हणुनच त्यांचे यवतमाळ प्रेम हे सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे वाटते
– निरंजन राऊत

…..सुधाकर धारव सुंदर यवतमाळकर यांचेसोबत काही काळ काम केल्याचं तसेच प्रशासकीय वसतीगृह येथे मी मुंबईचा असूनही एके काळी ते वसतीगृह माझ्या परमप्रिय मित्रमंडळींचं कार्यालयीन ठिकाण. त्यांतील काही हे जग सोडून पुढच्या प्रवासाला कधीच पुढे निधून गेले. कदाचित ते साऱ्यांना धारव निश्चितच परिचयाचे असतील. त्या सर्वांबरोबरच्या संध्यामग्न सायंकाळी पाहून व्यतीत केल्याचं आजही आठवतं. काही मित्र तर विदर्भ नागपूरकडचे त्यांचं ते आश्रयाचं ठिकाण. वसतीगृह व्यवस्थापक आपला मित्र बी. डी. जाधव कोणालाही मानवतेच्या भावनेनं सहकार्य करणारा त्याच्या काळापुर्वी व नंतरही आपला मुंबईबाहेरून आलेला कुठलाच मित्र जमिनीवर झोपला नाही. दूसरे व्यवस्थापक शेवाळेमास्तर कुटूंबासह तेथेच पाठीमागे कर्मचारी वसाहतीत राहात. तेथील विष्णूमाळीचं घर हे कधीकाळीचं माझच घर होतं. सर्वच माणसं जिवाभावाची.
…..धारवसरांचा फोन मिळाला तर त्यांच्याबरोबर संपर्क करणं सोप्पं जाईल…
– शरद चव्हाण, निवृत्त लघु लेखक, मुंबई

आम्ही यवतमाळकर….
वाचतांना परत माहेरी गेल्यासारखे वाटलं🙏🏻
— वर्षा फाटक, पुणे

समाजभूषण” पुस्तक मिळाले.
मनोगत छान लिहीले आहे..स्मिता दगडे आणि
हेमंत रासने यांच्यावरचे लेख आवडले.
जसे वाचेन तसे कळवेन…
– राधिका भांडारकर, जेष्ठ लेखिका, पुणे

जयंत सावरकर हे माझे आवडते कलाकार आहेत मराठी नाटकातील त्यांच्या भूमिका त्यांचा अभिनय त्याच बरोबर संवाद फेकण्याची कला सहजतेने तर असतेच परंतु प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी असते, मी त्यांची अनेक नाटके पाहिली त्यात वाहतो ही दुर्वांची जुडी, वेगळं व्हायचं मला ही नाटके तर मला खूप आवडली तसे सर्व नाट्यप्रेमी सावरकरांचे चाहते आहेतच हे सांगण्याची आवश्यकता नाही.

ते कुठलीही भूमिका सहजपणे पार पाडतात नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गुणी कलावंत जेव्हा मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी विराजमान होतो हे त्याच्या यशस्वी जीवनाचे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका यांचा सन्मान आहे असे वाटते जयंत सावरकर यांना खूप खूप शुभेच्छा   🌺🌺
– दीपक जवकर

गदिमांची गीत रचना, पुलंचं संगीत आणि माणिक वर्मा चा आवाज ..म्हणजे त्रिवेणी संगम.
मनावर कोरलेलं हे अप्रतीम भावभक्तीचं गाणं…विकास भावे यांनी सुंदर विवेचन केले आहे

दीपक जवकर यांनी आपल्या थोरल्या बंधुंच्या पंचाहत्तरी निमीत्त व्यक्त केलेला कृतज्ञता भाव मनाला भिडला.
सभोवतालच्या तोडफोडीच्या नात्यांचा विचार करता दीपकजींची ही कृती भूषणावह आहे !!
– राधिका भांडारकर, पुणे

जीवन कोडं
शेवट फार चटका लावणारा. लेख फारच आवडला.
– deepali

मनातील कविता
गौरी कंसारा the best✔️💐👏👏👏👏
– Pandurang Kulkarni

क्षण प्रीतीचा…
Very touching words
– Varsha kishor Jagtap

आम्ही यवतमाळकर
मित्रांनो,
आजच्या न्युज स्टोरी टुडे ब्लॉगच्या सुरूवातीलाच  आम्ही यवतमाळकर च्या पुनरावृत्ती बद्दल संपादकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही लेखिका – लेखकांचे आपल्या गावाबद्दल अर्थात यवतमाळ खुद्द बद्दल खूप छान विचारांची मांडणी केली आहे. मात्र शहरी भागातील विविध सांस्कृतिक व कमी जास्त औद्योगिक विकास कसा झाला याची सुंदर माहिती दिलेली आहे.

मी सुद्धा ”ग्रामीण भागातील यवतमाळकर ” असल्यामुळे तिसरे लेख लिहावे काय ? असे विचार नव्हे मोह मनात निर्माण होत आहे. परंतु काही असो ” आम्ही यवतमाळकर ” च्या दोन्ही “यवतमाळकर लेखिका – लेखकांचे मनापासून अभिनंदन !!
– राजाराम जाधव, सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन

आदर्श सा क व्य
खुप छान माहिती व “साकव्य” ची संकल्पना भावली. धन्यवाद
– Mrs Lina Phatak

आम्ही यवतमाळकर
छान अप्रतिम लेख
– विश्वनाथ मोरे

स्त्री शक्तीचा जागर
स्री शक्तीचे सुंदर वर्णन
– Mrs. Aakansha Gokhale

नवरात्रोत्सव : भान हवेच
मित्रांनो, नवरात्रोत्सव असो वा कोणतेही उत्सव असो आजच्या कोरोनाच्या काळात आपण सर्व प्रकारची दक्षता व काळजी घेऊन हे सण साजरे केल्यास कोणतीही आपत्ती येणार नाही आणि सर्वांना आनंद घेता येईल हीच आमची मनोकामना आहे. त्यासाठी विनायक बेटावदकर यांनी सदर लेखात व्यक्त केलेल्या भावना व देवेंद्र भुजबळ साहेब यांनी केलेले लेखन व संपादन अतिशय समर्पकपणे सांडलेले विचार योग्य आहेत.
आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
– राजाराम जाधव, सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन

अर्थ तुम्ही चांगला उलगडून सांगितला आहे. काव्य , चाल छान आहे आणि माणिकताईंनी ही रचना गाऊन अजरामर केली आहे.
– Madhuvanti Dandekar

दादा : नाबाद ७५
जवकर दादा, तुमच्या 75 व्या वाढदिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
– अतुल एस गरगडे

“शाश्वत जीवन” या लेखा मध्ये मानवा द्वारे होणाऱ्या
निसर्गाच्या ह्रासा मुळे मानवी जीवनावर कशी संकट येत आहेत, हेच या लेखातून वास्तविकता लेखकानं मांडली आहे. आणि हा निसर्गाचा ह्रास कमी करण्यासाठी सयाजीराव शिंदे सारखी व्यक्ती सामाजिक जाण आणि भान ठेवून ; झपाटल्ययागत वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल ठेवण्याचं कार्य करीत आहेत, ते इतरांसाठी निश्चितच प्रेरणादाई आहे. लेखकाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
– R. B. Suralkar

”समृद्ध जयंत सावरकर” हे मेघना साने यांनी केलेले लेखन आणि सन्माननीय देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून चित्रीत झालेले एक यशस्वी विविधांगी कलाकार म्हणून” जयंतराव सावरकर” या़ंची ओळख झाली. पडद्यामागील कलाकार ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष या विविध पातळ्यांवर विविध भूमिका साकारत जयंतरावजींची वयाची ८५ उलटून गेली. त्यामुळे मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक भूमिका साकारल्या आहेत. अशा विविधांगी कलाकारास आमचा मानाचा मुजरा !!
– राजाराम जाधव, सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन
धन्यवाद सर ! आपले चार कौतुकाचे शब्द नक्कीच लेखनासाठी प्रोत्साहन देतील.
जयंत सावरकर सरांशी केलेल्या संवादाची मी एक व्हिडिओ क्लिप देखील बनवली आहे.लवकरच प्रकाशित होईल
– मेघना साने.

ओठावरलं गाणं
माणिक वर्मा यांच्या सुमधुर आवाजातील, ग.दि.मा. यांनी लिहिलेल्या या गाण्याला पु.ल. देशपांडे यांनी दिलेल्या संगीतामुळे हे गाणे अजरामर झालं आहे. आपण अशी गाणी रसग्रहणाद्वारे आमच्या पर्यंत पोहोचवता त्यासाठी धन्यवाद.
– विवेक भावे

कोकणात ईमान
सौ. वर्षा महेंद्र भाबल यांच्या सकस लेखणीतून प्रसवलेल्या ”कोकणात ईमान” ही अप्रतिम काव्य रचना कोकणाच्या लाल मातीतली वास्तव स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा विकास होत आहे. कदाचित त्यावरूनच कवयत्रीच्या मनात विविध विचार रूंजी घालतांना ह्या ओळी त्यांच्या मनात चितारल्याचे दिसते. मॅडमचे मनापासून अभिनंदन !!
– राजाराम जाधव

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments