Thursday, July 3, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात

वाचक लिहितात

नमस्कार, मंडळी.
वर्ष भर आपण वाट पहात असतो,तो दिवाळीचा सण या आठवड्यात साजरा झाला.कोरोना मुळे गेली दिवाळी तशीच गेली.त्या पार्श्वभूमीवर या दिवाळी विषयी थोडी साशंकता होती.तरी दिवाळी आनंदात साजरी झाली.
या दिवाळीचं यथार्थ प्रतिबिंब आपल्या पोर्टलवर आपल्याला दिसलं असेलच.
या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे सौ नयना निगळये यांनी अनोख्या पद्धतीने सादर केलेली  “नवा श्वास” ही कविता. त्यांनी नुसतीच कविता न लिहिता, कवितेच्या मागची पार्श्वभूमी, भूमिका, अनुभव, मनस्थिती हे सर्व वाचताना आपलं मन निश्चितच हेलावून गेलं असणार. यापुढेही त्या सातत्याने लिहीत राहतील, अशी आशा करू या.
आता पाहू या, या आठवड्यातील प्रतिक्रिया.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

आठवणीतील दिवाळी
फटाक्यांच्या माळेसारखीच आठवणींची लड उलगडली आहे…… खूप छान
– विकास मधुसूदन भावे

दैदीप्यमान
अप्रतिम कविता. ओसाड तीच काया उद्यान होत आहे, किती सुंदर कल्पना. कितीही वाचली तरी पुन्हा वाचाविशी वाटावी अशी…
– सुनंदा पानसे

रश्मी हेडे, यांचा ” डॉ सुनील अंदुरे, नौसेना ते समाजसेवा ” हा व्यक्ती रेखात्मक लेख उत्कृष्ट झाला आहे. डॉ. सुनीलजी यांच्या नौसेना सेवेच्या कारकिर्दीत वैयक्तिक पातळीवर नवनवीन तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम पूर्ण केलेच, परंतू आपली सामाजिक जबाबदारी व दायित्व ओळखून व ती जागृत ठेवून कार्यरत राहिले. त्यामुळे त्यांच्या या यशोगाथेतून आजच्या तरूणांना प्रेरणा व प्रोत्साहन नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.

“उजळू दे दिवाळी काळोखाच्या रात्री ” हा डॉ. राणी खेडीकर यांनी रेडलाईट एरीयातील काम करणाऱ्या बायांच्या व त्यांच्या मुला – मुलींच्या व्यथांवरं आधारित लिहीलेला लेख म्हणजे समाजातील वास्तव आणि प्रत्यक्ष दोन समाज – आहेरे आणि नाहीरे जगातील जगण्याचं चित्रण मांडले आहे .या बायांची होणारी धरपकड , कोठे चालवणा-यांची दादागिरी, जबरदस्ती, त्या वस्तीतले अंधारमय जीवन, दिवाळी असो वा कोणतेही उत्सव असो, तिथे चालणारे धंदे, त्यातूनच लहान मुलांचे होणारे शोषण , या सर्व वास्तववादी घटनांचा लेखाजोखा या लेखातून मांडला असून, श्री भुजबळ साहेब यांच्या सुक्ष्म नजरेने संपादित केले आहे. एक बाल मानस तज्ञ म्हणून डॉ . खेडीकर यांनी या लेखातून समाजातील एक वास्तव समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!
– राजाराम जाधव, सहसचिव सेवानिवृत्त,
महाराष्ट्र शासन

गर्भित अर्थाने जीवनास नवीन विचार, नवीन प्रेरणा, नवीन उर्जा देणारी आशादायी आणि प्रेरणादायी कविता… आत्मसन्मान, स्वावलंबन आणि जीवनाचे सोने करण्याची हिम्मत देणारी कविता…
डॉ गौरी जोशी मॅडम खूप छान रचना
हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅडम
– श्री. अंकुशराव तानाजी

दिवाळी : जैन धर्मीयांची
खुप छान माहिती मिळाली व ती पण वेगळ्या शैलीत. 👌👌
– Mrs Lina Phatak

‘आठवणीतील दिवाळी’ बालपणीच्या या रम्य आठवणीत मन मस्तच रमले, कारण आम्ही भावंडं देखील ते दिवस अनुभवले आहेत. धन्यवाद.
– Prakash Malewadkar

खीर आम्हा शाकाहारी लोकांचा आवडता पटकन होणारा पदार्थ छान माहिती नक्कीच येऊ ताई
गोड केरळ

श्री आरोग्यनीती
उत्कृष्ठ लेख अनुभव उपयोगी
– वर्षा धुमाळ

ओठावरलं गाणं…
कवीच्या मनातील भावनांचे शब्दांकन अचूक केले आहे व गण्यची चाल व आवाज यांना पण योग्य शब्दात दाद दिली आहे. फारच छान.
– नारायण लक्ष्मण वैद्य

दिवाळीच्या मुहूर्तावर पाठवलेलं हे गाणं ….. नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांची दिवाळी मस्त जाणार …. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा …..
– Veena Raravikar

छान आहे गाणे. लिखाण ही चांगले
– गौरव

अष्टविनायक या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांपैकी हे एक गाणं. दिवाळीच्या निमित्ताने या गाण्याची रसग्रहणासाठी आपण केलेली निवड योग्यच आहे. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले गीत, अनिल अरुण यांचं संगीत व अनुराधा पौडवाल यांचा आवाज तसेच आपण केलेले रसग्रहण सारेच उत्तम झाले आहे. पुन्हा एकदा आपणास व भुजबळ यांना हे सदर चालू केल्याबद्दल धन्यवाद.
– विवेक भावे

खूप प्रेरणादायी.
– Venkatesh Kulkarni

नयना निगळ्ये,
आज पहिल्यांदाच ब-याच काळानंतर आपली भेट होत आहे. तुझी कविता तुझ्या संवेदनशील मनाची आणि कुशाग्र बुद्धीची साक्ष देते. कनिता वाचून मला वालचंदमध्ये रहात असतानाचे दिवस आठवले. तुझ्या आई वडिलांना भेटता आले तसे तुलाही प्रत्यक्ष भेटता येईल असे वाटते. मी सध्या मिलपिटासमध्ये रहात आहे. तुझी ही कविता वालचंद हेरिटेज वेबसाईटवर प्रकाशित करता येईल का ते कळवावे. भावस्पर्शी कवितेबद्दल धल्नदाद
– सुरेश रानडे

तुमच्या सहज मातृत्व भावना,कमी शब्दात फार छान व्यक्त झाल्यात.इतक्या लहान मुलाला इतकं सोसावे लागले ह्यासारखं काहीच वाईट नाही,पण ही वेदना त्याला बराच काही शिकवून गेलं असणार एव्हडं नक्की..
फार छान लेख…
– Vijay sinhg

Great work
– Mukul bhatt

Very good. Anish is a brave boy rather I will say he is fighter. He fought bravely with Corona. Nayana’s poem is beautiful as always. My best wishes are with her.
– Shubhangi Bhatt

आयुष्याची झुंज, त्यातील आनंदाचे क्षण आणि त्यातून पुनर्बांधणी🙏👍
Dr. Dinesh Bhagwan Hanchate

नवा श्वास
प्रेरणादायी
हार्दिक अभिनंदन
अर्चना

नवा श्वास
अप्रतिम भावाविष्कार, मुलांच्या भावविश्वाशी आईच्या असलेल्या अतूट मनोबंधाची उत्कट अभिव्यक्ती!

निरागस “फुलबाज्या
सुंदर लेख
– सुहास

पण लक्षात कोण घेतो ?
फार सुंदर, सविस्तर, वास्तवादी लेख. सर्वांनी याचा विचार करायलाच हवा. मनापासून ज्या विषयांची आवड असेल त्यांत खुप परीश्रम करून यश मिळवतां येते. त्यात दैवाचाहि भाग आहे हे मान्य केले तरी निराश न होता कार्यरत असावे. व येणाऱ्या संधींचा फायदा घ्यावा. स्मिता भागवतांचे विचार मनापासून पटले व आवडले. धन्यवाद
– Mrs Lina Phatak

चित्रगीत
धन्यवाद साहेब
चित्रीत अतिशय सुंदर आढावा घेतला आहे.
– अशोक केरू गोरे

फौंजीची आई..
छान
– डॉ जी आर जोशी

पण लक्षात कोण घेतो ?
Wonderful. What a inspiring
Story and thought provoking. Very useful in shaping our future and thought process. Great.
– Siddharth. G Bhagwat

जीवन प्रवास – भाग – १६
खूपच सुंदर आठवणी लेखन मुद्रित केलेल्या आहेत. वरळी टेलिफोन एक्ससेंज मधील बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला
🙏धन्यवाद
– MOHAN BABURAO AROTE

नारी शक्तीचा जागर
नारी शक्तीचा जागर…हा लेख स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी (प्रियदर्शनी) यांच्या जीवनातील धाडशी निर्णय आणि एका स्त्री मध्ये असलेली हिम्मत दाखवणारा आहे… खाऱ्या अर्थाने इंदिराजी या देशाच्या रणरागिनी होत्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते देशातल्या छोट्या-मोठ्या सर्व निर्णयात त्यांचा सहभाग होता तीस विकासासाठी व देशातील एकात्मता राखण्यासाठी त्यांनी आपले बलिदान केले… देशहित देशातला गरीब माणूस आणि श्रीमंतीत श्रीमंत व्यक्ती यांचा समतोल राखण्यासाठी लढणाऱ्या रणचंडिका होत्या…
धन्यवाद सर अशा पुरोगामी विचाराच्या नारी शक्तीला मर्दांगी शिकवणाऱ्या या नेतृत्वाला सलाम…
खूप सुंदर लेख…मा.निरंजन राऊत सर खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
– श्री. अंकुशराव तानाजी

प्रथम महिला पंतप्रधान म्हणून अभिमान वाटतो.
विस्तृत माहिती मिळाली . धन्यवाद ! ! !
– Geeta nitant raut

कुटुंब रंगलंय काव्यात
उपक्रम खुप छान आहे. श्री. बापटांचे अनुभव एैकायला, नव्हे, वाचायला नक्कीच आवडेल. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष एैकला होता. व सर्वांना त्यांनी काव्यांत रंगवले होते ती आठवण आहे.
९ वी मधे शिकणाऱ्या केतनची कविता पण आवडली. आत्तापर्यंत तो एक उत्तम कवी झाला असेल.
उपक्रम एकदम छान.
– Mrs Lina Phatak

दैदिप्मान गौरी कंसारा अप्रतिम. अतिशय सुंदर लिहिली आहे. अंधारल्या क्षणांचे अस्तित्व फार नाही ..
– सुनंदा पानसे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments