Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
बोलता बोलता नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिना चालू झाला. जनजीवन सुरळीत होत आहे, असे वाटत असतानाच ओमीक्रोन विषाणूने भितीचे वातावरण निर्माण केले आहे. असो… आपण याही परिस्थितीला धीराने तोंड देऊ या.

या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक

अलका, मी खूष झाले, आणिक एक मैत्रीण तुमच्या ग्रूपमध्ये समाविष्ट झाली. Thank you, तुझ्यामुळे आज एक वेगळ जग माझ्यापुढे उभ आहे. हवंहवंसं, मनाला उभारी देणार, विविध विषयांचा परिचय करून देणार, देखणं आणि उत्तम साहित्यिकांचा गौरव करणारं. कित्येक लोकांच्या लेखणीला न्याय मिळाला आहे तो केवळ तुम्हा दोघा मुळे, नाहीतर बंदिस्त स्वरूपात तशीच पडून राहिली असती वहीतच..
– सुनंदा पानसे.

अलका मॅडम..नमस्कार !
आपण माझ्या लेखाला अगदी immediate प्रसिद्धी दिलीत. खूप आनंद झाला. सुनंदाताईंनी सुचविल्यामुळे मी माझे लेखन पहिल्यांदाच बाहेर पाठविले तुमच्याकडे.. त्यामुळे हा नवीन अनुभव पहिल्यांदाच घेत आहे. तुम्ही माझ्या लेखासोबत फोटो आपणहून टाकले आहेत.. किती छान ! धन्यवाद !🙏🙏
खूप खूप धन्यवाद..🙏
– अनुराधा जोगदेव. 

॥ ओ ओमिक्रॉन ॥
खरोखर जगणं कठीण होऊन बसलंय नि मरण मात्र स्वस्त झालंय.
– अरूणा मुल्हेरकर

लालबत्ती
एक भयंकर वास्तव ….. ज्या कडे कोणीही मानवतेच्या दृष्टिकोनातून पहात नाही किंवा..एक क्षणभर कोणी दखल घेत नाहीत…
सर्व भयानक….

डॉ. खेडिकर मॅडम या अनामिक अंधकारमय अल्पायुषी जीवाचे वास्तव मांडत आहात
धन्यवाद मॅडम.

नाती, जपू या !
ए दुनिया एक नाटक है,
ऊस नाटकमें हम सब काम करते है,
परदा गिरते ही हम सब को सलाम करते है…

वक्त रहतेही रिस्ते निभाना सीखो…

खूप छान लेख आणि त्यातून दिलेला संदेश… धन्यवाद सौ. हेडे मॅडम.
– श्री. अंकुशराव तानाजी

महत्त्व जात पडताळणी प्रमाणपत्राचं
सुंदर मुद्दा मांडला आहे. अशी मार्गदर्शन शिबिर होणे आवश्यक आहे. धन्यवाद.
– Mahendra Shridhar Bhabal

गाव पालाटलो
अतिशय सुंदर आणि मार्मिक विषय मांडला आहे. कोकणची माणसे साधी भोळी, कधी भरेल त्यांची झोळी.👌
– Mahendra Shridhar Bhabal

गाव पालाटलो
कोकणाचे सुंदर वर्णन, तेहि तिथल्या बोली भाषेत. चित्र डोळ्यांसमोर उभे केले वर्षाताईॅनी. कविता मनाला भावली.

एक वही, एक पेन !
खुप छान उपक्रम. असे उपक्रम सगळ्या बाबतीत राबवतां यावेत. मा. झणके यांचे अभिनंदन व मा. देवेंद्रजींनी माहिती दिली म्हणून त्यांचे आभार.
– Mrs Lina Phatak

ओठावरलं गाणं
अशोक बागवे यांच हे गाणं संगमेश्वरी मराठी बोलीभाषेतील असल्याने सहज समजण्यासारखी आहे आपण केलेले रसग्रहण उत्तम झाले आहे.
– विवेक भावे

आज पाऊस आला आणि तुम्ही हे गाणं आमच्यासमोर ठेवलंय! किती सुंदर आहे ही कविता! जग सुंदर असतच पण कवी ते अधिक सुंदर करतो.आणि तुमच्यासारखे रसिक त्याचा मनमुराद आनंद घेतात आणि देतात.
विकास जी, तुमच्या या सदरच्या रूपाने एक अनोखा आनंदाचा झरा आम्हाला लाभला आहे.
खूप खूप धन्यवाद !
– Meghana Sane

ओठावरलं गाणं
आजच पाऊस पडतोय आणि हे गाणं बरोबर वर्णन लागू पडतंय. मृदगंध किती सुंदर उपमा. खूप छान रसग्रहण केले आहे. आवडले.
– निलाक्षी पिसोळकर

जीवन प्रवास – भाग – १७
सुंदर आठवणी सांगितल्या आहेत वर्षा भाबल. खर तर मीच साक्षीदार आहे. मुलांमध्ये रमण, त्यांचे हावभाव टिपणे, त्यांचे अंतरंग समजून घेणे, फारच विलक्षण अनुभव होता. विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल, त्यासाठी केलेली उपाययोजना, सगळ मनःपूर्वक केले. असो. वर्षा असेच लिहीत रहा. पुन्हा एकदा वर्षा तुला, आणि NST team ला धन्यवाद 🙏🙏
– mahendra Shridhar Bhabal

जीवन प्रवास चा हा लेख वाचला खूप छान आहे………..क्लास चे ते दिवस डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहिले. मॅडम/सर (मावशी /काका )तुम्ही लिहिलेला हा लेख वाचून अंतःकरण भरून आले. सर /मॅडम तुमचे खूप खूप आभार आणि हो पुढील जीवन -प्रवास -भागाची आवजून वाट पाहतो……..😊
– Nitin Dhurat

Khup chan madam….we r very proud to have both of u in our life as our teachers well wishers and guardians…
We love u a lot….
– Bhakti Sawant

खूप छान मॅडम, आम्हाला जुने दिवस आठवले.. तुमच्या या लेखणीतून आम्ही सोनाली क्लासेस मधील जगलेलो प्रत्येक दिवस अनुभवतोय… असच लिहत रहा आणि आमचे लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत रहा… खूप खूप शुभेच्छा…
– प्रकाश गायकवाड, अमोल साळुंखे, विकी शिंदे, तेजस पाटील.

अरुणा मुल्हेरकर यांची स्मृतीगंध ही काव्यरचना फार आवडली..
हळुवार आणि भावुक..तितकीच लडीवाळ..
शब्दांची नाजुक गुंफण…
– राधिका भांडारकर

एक वही, एक पेन !
एक स्तूत्य उपक्रम…. कर्मकांडात अडकण्यापेक्षा आणि शिक्षणासाठीच गुंतवणूक करा हा संदेश या कार्यामुळे लोकांना मिळेल….व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तो म्हणजे “शिकेल तोच टिकेल” व “वाचाल तर वाचाल” ”शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” या विचारांचे पालन होईल.

धन्यवाद मा.राजु झनके सर आणि संपादक साहेब मा. देवेंद्रजी भुजबळ आपले हार्दिक हार्दिक आभार
– श्री. अंकुशराव तानाजी

झनके साहेब आम्ही आपले आभारी आहोत.
आम्ही आपल्या संकल्पनेचे मनःपूर्वक स्वागत करतो.
अभिनंदन करतो. “एक वही, एक पेन” आम्ही आमचा सहभाग नोंदवतो. धन्यवाद साहेब.
– अशोक केरू गोरे

भारताच्या संविधानाचा इतिहास
Kolhe’s article is very nice.
– Ajit Magdum

चौकटीच्या पलिकडे !
घटनाक्रम वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले. गडकरी सर, अनिल सर आणि सुनील सर patrkaritemadhil बाप माणसे. या निमित्ताने त्यांनी आमच्यासाठी एक आदर्श वास्तूपाठच घालून दिला आहे. ग्रेट. कुठल्या शब्दात वर्णन करावे ते समजत नाही. सलाम. 11 हजाराचा चेक देणाऱ्या विधवा आजी पण ग्रेटच.
– रमेश वत्रे, सकाळ बातमीदार, केडगाव, ता.दौंड

चौकटीच्या पलिकडे !
सर, सलाम पत्रकारितेला
– अशोक बालगुडे

चौकटीच्या पलिकडे !
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा समाजातील इतरांच्या जीवाची पर्वा करणारे माणस अस्तित्वात असतात याचे खरोखरच एक उदाहरण आहे. यातून समाजातील व्यक्तींना सुद्धा इतरांसाठी जीवन जगण्याची सतत प्रेरणा मिळत राहील
– आशिष अशोक चव्हाण

चौकटीच्या पलिकडे !
टाकळकर, कडुसकर व गडकरी साहेब यांचे आम्ही ऋणी आहोत. समाजात अशा माणुसकी जपणाऱ्या लोकांची खुप गरज आहे.या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आज सुखकर जीवन जगत आहोत .कडुसकर साहेब स्वत: फोन करून आज ही तितक्याच तप्तरतेने आमची विचारपुस करतात. या सर्वाचे खुप खुप आभार व सर्वाना विनंती की जेव्हा अशाप्रकारे कोणावरही संकट येईल तेव्हा छोटीशी जमेल तशी मदत करा. धन्यवाद !
– दिपक किसन कदम

चौकटीच्या पलिकडे !
फार अभिमानास्पद कार्य. समाजात असे लोक फार थोडे दिसतात पण त्यांच्यामुळे माणुसकी वरील डळमळणारा विश्वास परत स्थिर होतो. टाकळकर, कडूसकर व गडकरी यांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. समाजानी पण साथ दिली हि सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. 👏👏👏
– Mrs Lina Phatak

शाळेची ओढ
Khup sundar Kavita ahe.
– Roopali Deshpande

वाचक लिहितात….
वाचक लिहितात या सदराखाली आपण सर्व वाचकांनी दिलेल्या वेगवेगळ्या लेखावरील आणि काव्यावरील प्रतिक्रिया यांना आपल्या वेब पोर्टलवर स्थान दिले. आम्हा वाचकांचे विचार प्रसिद्ध करून सन्मानित केले. त्याबद्दल आदरणीय विचारवंत, लेखक व संपादक मा.देवेंद्रजी भुजबळ साहेब यांचे हार्दिक हार्दिक आभार
– श्री. अंकुशराव तानाजी

चला,माळशेज घाटात
Madam khup chahan mahiti dili tya baddal aabhar.
– Hari Vaidya.

संगीताची साथ
संगीतातील सर्व बारकावे सांगून संगीत आयुष्यात किती आवश्यक आहे हे या लेखातून अधोरेखित केलं आहे.
– विकास मधुसूदन भावे.

चित्रगीत
१९७८ ते १९९६ ह्या तब्बल अठरा वर्षांमधील हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतांचे सुंदर समालोचन श्री सुधाकर तोरणे सरांच्या लेखणीतून साकार झाले आहे. अत्यंत समर्पक शब्दांत दर वर्षी नावाजलेले चित्रपट व त्यामधील चित्रपट गीत व्यवस्थितपणे मांडले आहे.
– ओमप्रकाश.

चित्रगीत
खूप सुंदर लेख। संगीताचे जीवनातील अनन्यसाधारण महत्व स्वाती गोखले यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे. संगीत प्रेमीला आपण तानसेनाची उपमा देतो आणि संगीत द्वेष्ट्याला औरंगजेबाची उपमा देतो। ते उगाच नाही आपले संपादन देखील उत्तम झाले आहे
– विजय अनंत गोखले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४