नमस्कार, मंडळी.
बोलता बोलता पुढच्या आठवड्यात हे वर्ष संपेल आणि नवीन वर्ष सुरू होईल.नवे वर्ष,नवी उमेद ! गेल्या वर्षापेक्षा नवे वर्ष अधिक चांगले जाईल अशी आशा करू या ! असो…
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपल्या पैकी कुणाला नवीन वर्षासाठी काही नवीन सदरं सुचवायची असल्यास आपण ती अवश्य सुचवावीत. नवीन कल्पनांचं स्वागत आहे.
आपली
– टीम एनएसटी. 9869484800
गाडगे बाबांना विनम्र अभिवादन 🙏🏻
गाडगे बाबांनी लोक प्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांच्या अनेक कीर्तनातून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत राहिले.त्यावर अशोक अंकुश यांनी खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
सकारात्मक विचार आणि कृतीत शांतता आहे तसेच नद्यांचे महत्व सांगणारा डॉ जॉन चेल्लादुराई यांचा लेख मस्त👍
ची सान्वी चा वाढदिवस अगदी वेगळ्या प्रकारे साजरा केला अनाथाश्रमात तेथील मुलांसोबत साजरा झाला खूप छान ग्रेट👍
याबाबत एक गोष्ट सांगावीशी वाटते माझा पन्नसावा वाढदिवस ही असाच वेगळ्या प्रकारे साजरा झाला होता.
माझे हे म्हणजे माझा नवरा त्यावेळी घरी नव्हते म्हणून मी नाराज होते केक कापून झाला आणि माझा मोबाईल वाजू लागला त्या वेळी मझ्या मोबाईल वर लहान मुलांचा आवाज येऊ लागला अगदी तालासुरात ती मुलं मला Happy birthday to you असं गाणं गात होती नंतर जोरात ओरडली Happy birthday आजी मला खूप आश्चर्य वाटलं मग माझे यजमान फोन वर आले आणि म्हणाले अग काम होत बोरिवली ला मग वेळ काढून इथल्या स्नेहसदन आश्रमात आलो माझ्या सोबत भाऊ पण आहेत.म्हणजे मझ्या बहिणीचे यजमान आम्ही भरपूर खाऊ आणि केक आणला या मुलांसाठी देणगी पण दिली आणि तुझा वाढदिवस साजरा केला. मला पण खूप खूप आनंद झाला हे ऐकून तर माझा पण अशाप्रकारे सांनवी सारखा वाढदिवस साजरा झाला आहे.
केरळ मधील पंचवाद्य बद्दलची माहिती खूप छान. मनीषा पाटील यांचे आभार
वंदनीय गाडगे बाबांवर केलेली विजय कस्तुरे यांची कविता सुंदर👌🏻
मेरा नाम जोकर अतिशय सुंदर चित्रपट होता जोकरला इतरांना हसविण्यासाठी स्वतःच दुःख बाजूला सारव लागतं .काही झालं तरी शो सुरू च ठेवावा लागतो असा संदेश या चित्रपटात दिला होता.या चित्रपटाला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिलीप ठाकूर यांनी लिहिलेलं सदर उत्तम👍
युवकांना सेनादलात संधी मिळण्या बाबत ची माहिती टीम एन एस टी ने दिली धन्यवाद👍
श्याम टरके टुरिस्ट गाईड ची माहिती खूप उपयुक्त 👍
वाचक लिहितात मधील सर्वच अभिप्राय खूप छान मी लिहिलेले अभिप्राय नमूद केल्याबद्दल भुजबळ सर खूप खूप धन्यवाद🙏🏻
न्यूज स्टोरी टूडे 👍👍👍
पवन नव्हाडे यांचा स्पर्धा परिक्षा वरील लेख खूप प्रेरणादायी आहे. किती मेहनत घ्यावी लागते करियर घडवताना हे दर्शविणारा लेख 👍अभिनंदन 💐
Media controls the masses अगदी खरं आहे . शिल्पा सरदेसाई यांनी लिहिलेला समाज मध्यामा वरील लेख विचार करायला लावणारा आहे.समाज माध्यमांचा सामान्य माणसाला मात्र खूप उपयोग होतो. अतिशय सुंदर लेख.
शब्द सेल्फी बद्दल ची माहिती सुरेख.
तूच कर्ता आणि करविता या गाण्याचे विकास भावे यांनी केलेले विश्लेषण अप्रतिम👌🏻
पोशिंद्याचे जीवन ही रामदास आण्णा यांची कविता खूप सुंदर शेतकरी खरचं काबाड कष्ट करतो पण लाखांचा पोशिंदा अर्धपोटी च रहातो मनाला स्पर्श करून गेली कविता.
खूप छान न्यूज स्टोरी धन्यवाद भुजबळ साहेब 🙏🏻
साने गुरुजी खूप मोठं व्यक्तिमत्त्व मी पण साने गुरुजींच्या गोष्टी वाचल्या आहेत. शामची आई चित्रपट पण बरेच वेळा पाहिला आहे. त्यांची शिक्षा द्यायची पद्धत विलक्षण होती त्यांच्या जयंती निमित्त छान लेख वाचनात आला. धन्यवाद भुजबळ साहेब.
महकोल्ड स्टोरेज बैठक संपन्न झाली. कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची माहिती मिळाली धन्यवाद मिलिंद चवंडके सर
डॉ किरण ठाकूर यांचा बातमीदारी करताना हा लेख अफलातून खूप मज्जा आली वाचताना आणि अंगावर कांटा आला. केवढी मोठी गफलत झाली होती. *INDIA DECLARES WAR* बाप रे केवढी मोठी बातमी काय परिस्थिती झाली असेल सर्वांची तेव्हा विचारच करू शकत नाही😄 पण व्ही पी आर सरांनी सर्व निभावून नेले. ग्रेट👍
सुनिता नाशिककर यांचा आणि मी पोलिस झाले लेख छान मदर तेरेसा यांची भेट झाल्याने त्या सुखवल्या वाचून बरे वाटले.
साधना आठल्ये यांची मनी तार छेडली कविता खूप सुंदर
न्यूज स्टोरी टू डे मस्त धन्यवाद देवेंद्र भुजबळ साहेब आणि माझी प्रिय मैत्रीण अलका भुजबळ🙏🏻
कवी वसंत बापट यांचे जन्म शताब्दी वर्षा बद्दल स्मरण लेख उत्तम राधिका भांडारकर यांनी काव्य अगदी हळुवार उलगडून दाखवले आहे खूप सुंदर
डॉ राणी खेडिकर यांचा लालीवल्या आईचं बाळ हा लेख वाचून अंगावर काटा आला.
Wowwww छोट्या स्पर्श ची छोटी कविता मस्त👌🏻👍 थॅन्क्स भुजबळ सर 🙏🏻
– सुप्रिया सावंत
‘मेरा नाम जोकर’ @55
मेरा नाम जोकर हा खरोखरच आठवणीतला चित्रपट..
राजकपूर आणि सीमी गेरेवाल यांचा अभिनय संस्मरणीय..
जीना यहाँ मरना यहाँ
जाने कहाँ गये वो दिन
ही गाणी एकताना आजही मनाला चीर पडते…
चित्रपट जरी आपटला तरीही लक्षात राहिला..
– राधिका भांडारकर
बोलकी लेखणी
वाह क्या बात है
अमलझरीचा अरविंद
ग्रेट, चांगले कार्य
– Vilas kulkarni
गाडगेबाबा : किर्तन सार
अतिशय सुंदर.अंधश्रद्धा दूर करणारी कीर्तने.
खरोखरच प्रबोधन करणारे विचार…
– राधिका भांडारकर
बातमीदारी करताना
नावातील साधर्म्य यामुळे होणारे गमतीदार प्रसंग
वाचताना खूप मनोरंजन झाले.
प्रा.(डॉ) किरण कन्हैयालाल ठाकूर यांना धन्यवाद !!
– Vijay Kulkarni
Such an interesting read !
– Mayuresh
ओठावरलं गाणं
आकाशवाणीने बासनात गुंडाळून ठेवलेली गाणी आपण रसग्रहणासाठी घेऊन आपण आम्हाला जुन्या गाण्यांची आठवण आपल्या या रसग्रहणातून करून देत आहात. पी.सावळाराम, वसंत प्रभू व लता मंगेशकर या त्रयीने अनेक गाणी अजरामर केली त्यातील हे एक गाणं. रसग्रहण नेहमीप्रमाणे उत्तम.
– विवेक भावे
पोशिंद्याचे जीवन
खूप ह्रदयस्पर्शी!!
बळीराजाचं दु:ख ना कळे कुणा
– राधिका भांडारकर
समाज माध्यमं : दुधारी तलवार
Kharay ,aaj social media dware jati bhed,hatrate aani kattarta pasaravinyacha prayatna hotoy tarun pithila chukicha marg aani vichar dakhvila jatoy…he sujan nagrik,lekhak aani samajsudharkanni hanun padla pahije .
– Jaya Chandorkar
उत्तम लेख..सुंदर वैचारिक टिपण.खरोखरच माध्यमे म्हणजे बाटलीतला राक्षस.त्याचा वापर सावधानतेनेच करावा.
शिलापा सरदेसाईंनी अगदी नेमकं आणि उपयुक्त लिहीलं आहे
– राधिका भांडारकर
साने गुरुजींची शाळा
साने गुरुजी म्हणजे मूर्तीमंत दिव्यत्व..त्यांच्या संस्कारात अनेक मुले घडली..आजच्या,तशी निराशाजनकच..पार्श्वभूमीवर मनात सहज प्रश्न ऊभा राहतो, कुठे गेली ही माणसे…??
खूप सुंदर लेख
– राधिका भांडारकर
दिव्यत्वाची जेथे प्रचिती… तेथे कर माझे जुळती। अश्या संस्कारक्षम, विनयशील आणि उच्च नीतिमत्ता असलेल्या व्यक्तीची समाजाला गरज आहे.
कवी वसंत बापट
सुंदर शब्दांत रसग्रहण राधिका ताई
– प्रीती भिसे, बेंगलोर
साने गुरुजींची शाळा
फार सुंदर सविस्तर वर्णन. साने गुरूजींबद्दल आदर नाही असे कोणीच सापडणार नाही. शामची आई पुस्तक, सिनेमाला मनांत उच्च स्थान कायम राहिल. इतके प्रांजळ, संवेदनाशिल लेखक आता मिळणे कठिणच. त्यांना मनापासून अभिवादन करते. धुळ्यालाच वाढल्याने जास्त आत्मियतेने लेख वाचला. अंमळनेरला पण खुप जायचो. सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. भाभे/भावे यांच्या शाळेत “श्रीगणेशा” झाला. प्रतापशेट, धुळ्याचे बाबूशेट, डाॅ. म्हसकर कुटुंबीय सगळे माहितीचे, ओळखीचे. वाचून खुप आनंद मिळाला. खुप खुप धन्यवाद.
क्रॅक्स
स्पर्श, वाह्, एकदम मस्तच हं. असेच लिहीत रहा.
– Mrs Lina Phatak, U. K.
स्पर्शची क्रॅक्स मस्त !!
एकदम क्रॅकी..
– राधिका भांडारकर
स्पर्धा परीक्षा : प्रेरणादायी मनोगत
पवन नव्हाडे ह्यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास खरोखरीच अनुकरणीय आहे. फार सुंदर शब्दात त्यानी त्या प्रवासाच वर्णन केलं आहे. अभिनंदन…
– सुनंदा पानसे
जिद्द व चिकाटीने आपले ध्येय गाठतां येते हे पवन नव्हाडे यांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे. समाजातील सर्वांना हे एक खुप छान उदाहरण आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
– Mrs Lina Phatak, U. K
लोकसेवेची संधी मिळण्यात खरे यश मानणार्या पवन नव्हाडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास वाचनीय..
वाचताना भिंतीवरुन एकसारखा पडणारा आणि पुन्हा पुन्हा हार न मानता चढणार्या कोळ्याची आठवण झाली.. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम म्हणजेच अंतीम यश…हाच संदेश पवनजींच्या वाटचालीतून मिळतो..
पवनजी तुम्हाला खूप शुभेच्छा
– राधिका भांडारकर
अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात ☺️
अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात नाव मला खूप आवडले,लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकासाठी आपले खूप खूप अभिनंदन
– प्रज्ञा हुल्याळकर