Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
आपल्या पोर्टलवरील लोकप्रिय सदर “मनातील कविता” चा या आठवड्यात समारोप झाला. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक, योग प्रशिक्षक असलेल्या अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या डॉ गौरी जोशी कंसारा यांनी हे सदर अतिशय तन्मयतेने, आवडीने आणि अभ्यासपूर्वक लिहिले. रसिक, काव्यप्रेमी वाचकांना ते खूपच भावले.एक वेगळा प्रयोग यशस्वी झाला. आजच्या “वाचक लिहितात” या सदरात त्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसेलच. डॉ गौरी यांना आणि सर्व वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद.
पुढच्या आठवड्यापासून लेखिका प्रतिभा चांदोरकर यांची प्रदीर्घ कथा दररोज प्रकाशित करण्याचा प्रयोग आपण करणार आहोत.
आशा आहे की, या प्रयोगाला आपला भरभरून प्रतिसाद लाभेल.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
देवेंद्र भुजबळ. संपादक.

तुम्हीच सांगावं..
मला पण नेहमी हा प्रश्न पडतो. कस वागावे ते कळत नाही त्यामुळे कविता मनाला खुप भावली. अगदी “खर्रखुर्र” सांगते आहे हं भारती. लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटू दे.
– लीना फाटक. यु.के.

मनातील कविता : निरोप
मनातील कविता
किती छान सदर
आठवणीत राहील सदैव
गौरीताईंच्या शब्दांचं झुंबर

खूप जड जातंय
निरोप देताना
गौरी ताईंना
आणि रसिक वाचकांना

कशी व्यक्त करणार
कधी न संपणारी हुरहुर
या मौल्यवान सदरातून भेटले
माय मराठीचे कोहिनूर

प्रत्येक कविसाठी गुंफला
गौरी ताईंनी सुरेख शब्दांचा हार
सर्व वाचकांतर्फे मानतो मी
कवयित्री गौरी ताईचे आभार
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹

गौरी, तुझे लेख अत्यंत माहितीपूर्ण तर होतेच पण तू ते अतिशय रंजकही केलेस. तुझ्या पुढच्या लेखनासाठी खूप शुभेच्छा.
– डॅा सुलोचना गवांदे. अमेरिका

मनातली कविता हे सदर फारच वाचनीय होते…
– राधिका भांडारकर

आपण माझे लेखन जीव लावून वाचले, इतकी सुंदर निरोपाची कविता लिहिलीत…मी भरुन पावले 🙏🏻
आपल्या सारख्या रसिक वाचकांचे प्रेम असेच मिळत राहो हीच प्रार्थना.
आपले खूप खूप आभार 🙏🏻
– गौरी जोशी-कंसारा. अमेरिका

“आणि मी पोलिस अधिकारी झाले !” भाग – ८
सुनता नाशिककर यांचे सर्वच लेख वाचनीय आहेत.
आजच्या लेखात गुन्हे कसे घडतात व गुन्ह्यच्या बाबतीत
लोकांनी कसे सावध रहावे हे छान सांगितले आहे…
– राधिका भांडारकर

असे असेल ‘तेजायन’!
शिल्पा, अजेय संस्थेच्या कार्याचा आणि कार्यक्रमांचा खूपच छान आढावा घेतलास आणि परिचय करुन दिलास… धन्यवाद 🙏
– विकास मधुसूदन भावे

खूप छान तेजायन संकल्पना. नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण कार्यक्रम. 💐💐 हार्दिक शुभेच्छा !
– सौ नूतन बांदेकर

ओठावरलं गाणं…
मनी माऊचं बाळ अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभं केलंस, विकास.
असंच रसग्रहण करणं जा, गीतांचं. खूप छान अनुभूती देऊन जातं.
– जामखांडिकर

बातमीदारी करताना – भाग – ११
किरण एका जागतिक महत्त्वाच्या विनोबा भावे यांच्या मायघरी जाण्याची तुमची बातमी अनेक पत्रकारांची त्यावेळी जवळपास उपस्थिती असतानाही एक्स्लूझिव्ह ठरली ही बाब आपल्या पत्रकारितेतील भूषण आहेच; पण त्यापेक्षाही आताच्या पत्रकारांच्या पिढीला मार्गदर्शकही आहे. या संदर्भातले आपले लेखन वाचण्याची उत्कंठा वाढली आहे. बर्दापूरकरांचेही योग्यते श्रेय देण्याचेभानही कौतुकास्पदच म्हणावे लागेल. हे कौतुक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावे अशी विनंती करून थांबतो.
– सुरेशचंद्र पांडये

शाळांची “शाळा”!
अतिशय चिकित्सक आणि सखोल अभ्यासपूर्ण लेख, शिक्षण व्यवस्था, शिक्षकांची गरज, शाळेची गरज आणि देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती उद्या पोहोचणार आहे त्या विद्यार्थ्याच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण लेख आहे. मॅडम आपले हार्दिक हार्दिक आभार….*****💐💐💐
– श्री. अंकुशराव तानाजी

विजयाताई : आधुनिक सरस्वती
विजयाताईंशी माझा परिचय सिद्धहस्त लेखिका आणि सखी माधवी कुंटेमुळे झाला. आणि लगेच मैत्रही जुळले.दुर्दैवाने मी कॅनडात फेकली गेले. देहात हजारो मैलांचे अंतर पडले. तरी मनाचे सामिप्य घटले नाही. माझ्या एकसष्टी समारोहावेळी माझे १६ व्य वर्षी केलेले लिखाण आणि ६१ व्या वर्षात केलेले लिखाण पर्काशित करण्यात येणार होते. त्या वेळी विजयाताई विश्वकोश तयार करण्याच्या कामात खूप व्यस्त होत्या. विरोधकांचा सामनाही होता. त्याचा त्या रणरागिणीच्या कौशल्याने पार पाडत होत्या. तरी त्यांनी या पुस्तकांच्या प्रकाशनाचे निमंत्रण आवर्जून स्वीकारले. माझ्या आईने सांभाळल्यामुळे माझे सोळाव्या वर्षी केलेले लिखाण शाळकरी मुलीचा डायरी प्रकाशित करताना त्यांनी माझ्या आईचा सुजाण माता असा उल्लेख करून त्या भरभरून बोलल्या. योगायोग असा की भरारी प्रकाशनने माझे महाराष्ट्र धर्म वाढवावा या पुस्तकाचा प्रकाशन समारोह जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या हस्ते ठेवला आहे, इतकेच मला ठाऊक होते. पण त्या दिवशी जानेवारी महिन्या पाऊण शतक पूर्ण करणाऱ्या विजयाताई आणि जुलैत पूर्ण करणारी विजया कप्तान म्हणजे स्मिता भागवत यांचा एकत्रित सत्काराचे भरारी प्रकाशनच्या लता गुठेने औचित्य साधले. असे आनंदाचे क्षण स्मृतीमंजुषेत अमर ठरतात. गाठीभेटी कमी झाल्या तरी मोजक्या भेटीतील स्मृतींचा दरवळ मन प्रसन्न करतो. या वाढदिवशी त्यांची प्रकृती बरी नसली तरी येत्या वर्षीचा वाढ दिवस आणि नंतरचे अनेकानेक वाढदिवस त्यांच्या वाचकांना उत्साहाने साजरे करण्याचे भाग्य लाभो, हिच ईशचरणी प्रार्थना.
(विजया कप्तान – स्मिता भागवत)

ओठावरलं गाणं…
मनी माऊचं बाळ अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभं केलंस, विकास.
असंच रसग्रहण करणं जा, गीतांचं. खूप छान अनुभूती देऊन जातं.
– जामखांडिकर

विकासजी, या गाण्याचे काव्य तर छान आहेच, कवीने चालही छान दिली आहे. आणि त्याचं रसग्रहण तुम्ही अगदी यथार्थपणे केलं आहे .
मनीमाऊच्या बाळाशी हळुवारपणे व मजेत खेळणा-या गोंडस मुलांचं चित्र बरोब्बर रेखाटलं आहेत. वा.
– मधुवंती दांडेकर

माझं खूपच आवडतं गाणं. लहान मूल दिसलं की मीही लहान होते आणि हे गाणं म्हणते. लहान बाळ अगदी खुष होतं आणि हाताच्या दोन बोटांनी छान छान असं म्हणून हसतं. मग तर आपली गट्टी जमलीच समजायची. असो गाणं म्हणताना ती माऊ डोळ्यासमोर उभी राहते ते रसग्रहण काकांनी अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. खूप छान.
– निलाक्षी पिसोळकर

शाकंभरी
खुपच आगळी, वेगळी कविता/शब्दरचना. शब्द बांधणे अवघड वाटते. कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. 👏👏👏
– लीना फाटक. यु.के.

रामदास कामत : भावांजली
अरूणाताईंनी रामदास कामतांच्या जिवनाचा उत्तम आढावा घेतला आहे. त्यांच्या परिवारा बरोबर सगळ्या मराठी संगीत, नाटक रसिक लोकांना त्यांची उणीव जाणवेल. पण कामतांचे संगीत, गाणी सर्वांच्या कानात, मनांत अमर असतील. माझी पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– लीना फाटक. यु.के.

अरुणा मुल्हेरकर यांनी रामदास कामत या चतुरस्त्र व्यक्तीमत्वाच्या सांगितीक आणि रंगभूमीवरील प्रवासाचा छान आढावा घेतला…
रामदास कामत यांच्या स्मृतींस आदरांजली..
– राधिका भांडारकर

ओठावरलं गाणं…
खरंच, लहानपणीचं आवडलेलं हे गाणं अजूनही पाठ आहे.
गाण्याचे बोल, चाल छान आणि डोळ्यासमोर चित्र साकारते.
आपण केलेले रसग्रहण छानच.
सध्या आमच्याकडे हे गाणे चालूच असते.
– आशा लिंगायत

लहान मनीमाऊच्या बाळाच्या लीला तंतोतंत अनुभवल्या.भावे सर सुरेख नेहमीप्रमाणे गाण्याचे/कवितेचे अंतरंग उलगडवलेत.
– शुभा खांबेकर पाणसरे

एका सुंदरशा बालगिताचे सुंदरसे वर्णन वरील गाण्यात केलेले आहे. आणि अशा ह्या गोड बालगिताचे रसग्रहण अर्थात अर्थ उलगडून सांगणे म्हणजे बालपणाचा काळ डोळ्यापुढे उभा राहतो. आणि श्री. विकास सर आपण ह्या भावनांशी समरसून सदर गाणे खूप छान उलगडून सांगितले आहे.
– राजेंद्र सोनावणे

निबंध स्पर्धा : अभूतपूर्व प्रतिसाद
फारच छान…
आमच्या महाविद्यालयाला या स्पर्धेचा एक घटक होता आले याबद्दल आपले मनस्वी आभार…
– प्रतीक आत्माराम उगले
Vivekanand College of Agriculture Business Management, Hiwara Bk.

कुटुंब रंगलंय काव्यात : लेख – १२
जशी अमृतमय आहे
प्रा.विसुभाऊंची वाणी
तितकीच गोड आहे
त्यांची सुलभ सुंदर लेखणी

आवाजातली लय आणि ताल
नाथसागरच्या सुरेख वर्णनातही आहे
विसुभाऊंच्या काव्य सादरीकरणाची जादू
त्यांच्या रसाळ मधुर लेखणीतही आहे

कुटुंब रंगलं काव्यात या बरोबरच
त्यांची लेखणीसुद्धा मनाला भावली
कोटी कोटी मराठी मने धन्य झाली
आयुष्यभर विसुभाऊंनी तळमळीने उत्साहाने
अगदी झपाटून माय मराठीची सेवा केली

मराठी भाषा पंधरवडा निमित्त
प्रा.विसुभाऊ बापट यांना मानाचा मुजरा
स्विकारावा विसुभाऊ हा प्रेमाने भारलेला
काव्य रुपी शब्द सुमनांचा गजरा

आपलं मनःपूर्वक करतो
हार्दिक अभिनंदन
देवी शारदेच्या कृपेने जीवनी आपुल्या
फुलत राहो आनंदाचं सौख्याचं नंदनवन
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹

मला हे सदर वाचायला खुप आवडते. बापटांचा त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळतेच शिवाय प्रवासातले वर्णन व त्या विभागातली माहिती/ वर्णन पण सहज सुलभतेने लिहीलेल असते. प्रकल्प बंद पडला व उद्यान ओसाड पडले हे वाचून मात्र वाईट वाटले.
– लीना फाटक. यु.के.

विजयाताई : आधुनिक सरस्वती
आदरणीय पद्मा ताईंनी दिली
विजयाताईंना भेट सुरेख शब्द फुलांची
यापेक्षा सुंदर काय असेल
भेट वाढदिवसाची

भारावून गेलं मन
विजयाताईंच्या कर्त्रुत्वाने
सर्व कला गुणांचं आकाश
उभं केलं सहज पद्माताईने

खरच विजया वाड
आहे कल्पतरुचं झाड
त्यांच्या प्रेम छायेखाली झाली
शेकडो विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ

अवघा महाराष्ट्र घडवला
विजयाताईंच्या संस्कारमय वाङमयाने
मन प्रसन्न होऊन जातं
त्यांच्या कथा कादंबरी अन् काव्याने

शैक्षणिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात
उमटवला विजयाताईंनी खास ठसा
अनाथ मुलींची माऊली होण्याचा
या गुरुमाऊलीने जपला वसा

मराठी विश्वकोशात सजवला
ताईंनी कवितांचा गाव
त्यांच्या महान कार्याने घेतला
आबालवृद्धांच्या मनाचा ठाव
विजयाताईंना सारे सारखे रंक वा राव

आदरणीय विजयाताई वाड यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
उत्तम आरोग्यासह‌ लाभो त्यांना
आनंदाचं सुखाचं दीर्घायुष्य हीच सदिच्छा
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹

डॉ विजया वाड यांचं कार्य आभाळाएवढं उत्तुंग आहे. आपण त्यांच्या कार्याचा फार सुंदर आढावा घेतला आहे. विजयाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
– विकास मधुसूदन भावे

विजयाताई वाड हे एक उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. साहित्यक्षेत्रात त्यांचं योगदान खूप मौल्यवान आहे. त्यांनी लेखक कवी आणि वाचकही घडवले.
पद्माताईंनी त्यांचे मनोगत आतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे.
विजयाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
– राधिका भांडारकर

जीवन गाणे…
लेख उत्तम आहे. खरोखर आपण छोट्या छोट्या गोष्टींचं बाऊ करतो.
– शकुंतला लांघी.

जीवन गाणे गातच रहावे. पुढे पुढे चालावे. Best story
– भारती बांदेकर.

देवमाणूस उद्योजक चंद्रकांत शेटे
गावाकडे अण्णांचे घर आमच्या घराच्या अगदी समोरच, मी स्वताला भाग्यवान समजतो की अण्णांचे समाजकार्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय… आण्णा मुंबईवरून गावी आले की कधीही न भेटता जात नाहीत. समाज्याबद्दल असलेली त्यांची तळमळ नेहमीच त्यांच्या कार्यातून बघायला मिळते. आण्णा गावाकडे आले की सगळ्यांची विचारपूस करून अडचणीत असलेल्याना नेहमीच ते दिलासा देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.. आजच्या या धावपळीच्या जीवनात कोणीच कोणासाठी वेळ देत नसताना आण्णा मात्र वयाची 70 वर्षे पार केलेली असतानाही जमेल तेवढे समाजकार्याचे पुण्य आपल्या पदरात पाढुन घेत आहेत. आण्णांच्या या कार्याला सलाम. आणि आई कालिकामाता त्यांना निरोगी आरोग्य देवो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य असेच तेवत ठेवो !! हीच इच्छा…
– जितेंद्र पाटील.

अमलझरीचा अरविंद
इतके छान वर्णन केलंय आमच्या काकांचं …… आमचे अरुकाका खरंच उमदे, हरहुन्नरी, धडपडे व संपूर्ण सकारात्मक वृत्तीचे आहेत. त्यांच्याशी थोडा वेळ जरी बोललो तरी मन उत्साहाने भरून येते. अमलझरी मंदिराचा जीर्णोध्दार करुन काकांनी येणाऱ्या पिढयांसाठी फार मोठे कार्य करुन एक नवा आदर्श घालून दिला आहे. काकांना मनापासून सलाम …..
– धनंजय पळसुळे

जीवन गाणे…
छान लेख नूतन बांदेकर. आपण आपल छोटंस दु:ख्ख कुरवाळत बसतो. इतरांची शतपटीने मोठ्ठी असलेली दु:ख्खे आपल्याला दिसतहि नाहीत. सर्वांनी हि जाणीव ठेवायला हवी.
– लीना फाटक. यु.के.

अतिशय सकारात्मक विचार देणारी आणि जीवनाकडे सजगपणे बघण्याची दृष्टी देणारी कथा.
हि सत्य कथाही असू शकते. फक्त ‘आपले लक्ष चौफेर हवे,’ हा संदेश यातून मिळतो.
लिहित राहा लिहित राहा.
शुभेच्छा 👍
– रत्नाकांत जे. नाईक.

नूतन मॅडम, खूप छान लेख….. जगण्याची आशा चिवट असते ….आपण किती क्षुल्लक गोष्टींसाठी नाराज होत असतो…. छान शिकवण मिळाली तुमच्या लेखातून
– विकास मधुसूदन भावे

शरीर अनमोल आहे. काळजी तर घ्यायलाच हवी. परंतु दुर्दैवाने आपघात होतात. तेव्हा खचून न जाता एक अपंग व्यक्ती
धडधाकट व्यक्ती पेक्षा कौतुकास्पद काम करु शकतो. खेळ उद्योग या क्षेत्रात अनेक असे लोक आहेत कि त्यांनी अपंगत्वावर मात करुन समाजाला दाखवून दिले आहे कि आम्ही कुठे कमी नाही.मानसिक खच्चीकरन होता कामा नये.
– सुनंदा यादव.

खुप वेळा असं होतं कि आपल्याला आपलंच दु:ख मोठं वाटत असतं.. पण एक क्षण येतोच जेव्हा आपले डोळे उघडतात..
खुप सुंदर लिखाण. तुमच्या लिखाणाला आता वेगळाच ग्रेस येउ लागलाय..!!
– निलेश पवार

आपण आपलच दुःख कुरवाळत बसतो पण आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्या पेक्षा जास्त दुःखी लोक असतात पण तरी धीराने आपलं आयुष्य जगतात
– किरण चौधरी

खरंय ! आपल्याला मिळालेलं धडधाकट शरीर हे बहुमोल आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
– श्रद्धा जोशी.

नयनरम्य अंदमान
🙏🙏दंडवत प्रणाम !!
अतिशय सुंदर व सखोल माहिती दिली.
पर्यटन स्थळांना आपण एकदा तरी भेट द्यावी ह्याची उच्छुकता निर्माण होते.
धन्यवाद!!
– सुभाष विश्वासराव पवार

ओ.पी. : तालेवार संगीतकार
ओ. पी नय्यर निर्विवाद संगीतक्षेत्रातलं एक जबरदस्त व्यक्तीमत्व!!
घोड्यांच्या टापांचं म्युझीक असलेली त्यांची गाणी प्रचंड गाजली, आजही ती मनात ओठांवर आहेत..
नितीन सप्रेंचा हा लेख खूप आवडला..अनेक गीतांच्या आठवणी सहजउजळल्या…
– राधिका भांडारकर

ऊत्तम लिखाण, अशाच अनेक आठवणी ंंची नितीन कडून अपेक्षा
शरद चौधरी.

ओ.पी. नय्यर माझे आवडते संगीतकार. या अजरामर संगीतकाराला भावपूर्ण आदरांजली!
– प्रीति परदेशी

घरातील एन डी. हा अप्रतिम लेख वाचला. अशी माणसं खरच दुर्मिळ. आणि माननीय सरोजिनी ताई त्यांच्या धर्मपत्नी नी दिलेली साथ, केलेला त्याग, मुलांवर केलेले संस्कार, साधेपणा अतुलनीय ! सरोजिनी ताईंनी ही तळा गाळा तल्या मुलांसाठी घेतलेला समाजशिक्षणाचा वसाआणि त्याचा झालेला वटवृक्ष. दोघांचं एकमेकांवर दिखाऊ नसलेलं प्रेम. शब्दात मांडणं कठीण. असे हे दोन महा मानव ! त्यांना महा वंदना !!! आजच्या राज्यकर्त्यांनी च नव्हे तर प्रत्येकाने नक्कीच शिकावं ह्यांच्या सारख्या देव माणसांच्या कडून !!!
 – नीता देशपांडे.

नमस्कार भुजबळ सर आणि अलका ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओ.पी. नय्यर, एका पेक्षा एक सुंदर गाण्यांचा नजराणा देणारे एक एक अजरामर संगीतकार कोणतेही संगीत प्रशिक्षण न घेता त्यांनी अलौकिक संगीत रचना केल्या. अशा थोर संगीतकारास भावपूर्ण आदरांजली🙏🏻
नितीन सप्रे यांचा लेख अप्रतिम👌🏻

डॉ ज्ञानदेव कासार यांचा प्रेरणादायी
जीवन प्रवास रश्मी ताईंनी सुरेख वर्णिला आहे.
नयनरम्य अंदमान हरिहर पांडे यांनी अंदमान निकोबारची खूप छान माहिती दिली. मी स्वतः अंदमानला जाऊन आले आहे. त्यामुळे पुन्हा आठवणी जागृत झाल्या.
परवीन कौसर यांची प्रेमऋतू कविता अप्रतिम👌🏻

एन.एस.टी. 17.01.2022.
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी त्यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली🙏🏻💐योगेश शुक्ला यांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद.

साप्ताहिक प्रतोद हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. अंबेकर परिवार आणि प्रतोद समूहातील सर्वांना खूप शुभेच्छा💐 धन्यवाद नागेश सर.
जीवन गाणे : आपण आपली दुःख कुरवाळत बसतो पण आजूबाजूला नीट पाहिल्यास आपल्यापेक्षा जास्त दुःखी लोक आपल्या नजरेस पडतील.
खूप सुंदर लिखाण नूतनताई 👌🏻👌🏻
साधनाताई आठल्ये यांची कटी पतंग कविता खूप छान👌🏻

एनएसटी १८.०१.२०२२
आधुनिक सरस्वती : विजया ताई वाड यांच्या वरील लेख अत्युतम 👍
विजया ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐खूप छान पद्मा ताई

स्वाती दगडे यांचा आपला आयुर्वेद लेख छान.
प्रा विसू बापट यांचे काव्या सोबत लेखनही खूप छान बराच प्रवास केलेला असल्यामुळे छान किस्से वाचायला मिळतात.या लेखात कोयना जलविद्युत प्रकल्प बंद पडला हे वाचून मात्र वाईट वाटले.
सांगाती गीता भगवंत ही अरविंद ढवळीकर यांची कविता खूप सुंदर👌🏻

एन.एस.टी. १९.०१.२०२२.
अरुणा मुल्हेरकर यांनी आदरणीय रामदासजी कामत यांचा संगतिक प्रवास छान मांडला, रामदासजी एक चतुरस्र व्यक्तिमत्व होते. त्यांच्या बुलंद दमदार आवाजाने त्यांनी खूप गाणी अजरामर केली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
कोरोना मुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान झाले आहे. ऑन लाईन शिक्षणाचा तितकासा फायदा होताना दिसत नाही. मुल अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेऊन बसतात.मुलांच्या बौद्धिक विकासावर प्रकाश टाकणारा सुंदर लेख. खूप छान रश्मीताई👍

Cricket 🏏 is game of chance.199 धावा झाल्या असताना आऊट झाल्यावर एका धावेची चुटपुट नक्कीच लागत असणार. 199 वर बाद हा शिल्पताईंचा अभ्यासपूर्ण लेख मस्तच👌🏻👌🏻
ओठावरलं गाणं: मनी माऊचं बाळ…
हे गाणं माझं तोंडपाठ होतं. आमच्या चाळीत खूप मांजर होती आणि मी मांजर प्रेमी छान छान गोंडस मांजरांच्या पिल्लांना खेळवताना मी हे गाणं म्हणत असे. खूप छान रसग्रहण
जुन्या आठवणी चालवल्या. धन्यवाद भावे सर.
प्रणुचाराक्षरी:शाकंभरी, शोभा कोठवदे
यांची कविता खूप छान वेगळ्याच धाटणीची वाटली

एन.एस.टी. २०.०१.२०२२.

डॉ गौरी जोशी यांची मनातील कविता हे सदर आता वाचायला मिळणार नाही याचे वाईट वाटते. त्यांच्या पुढील लेखन कारकिर्दी करिता खूप खूप शुभेच्छा.
घरातील एन डी: सरोज माई पाटील यांनी एन डी पाटील यांच्या सोबतची संसाराची गाथा खूप उत्तम प्रकारे मांडली. खूप मोठा लेख पण वाचतच रहावा असे वाटले. साधी राहणी आणि उच्च विचासरणी याचा बोध झाला. अतिशय खडतर पण यशस्वी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. सामजिक कार्यात निस्वार्थी वृत्तीने झोकून देणाऱ्या एन डी यांचा जीवनपट वाचायला मिळाला. सरोज ताईंनी एन डी बरोबर संसार करताना फार मोठी भूमिका निभावली त्यांना मानाचा मुजरा🙏🏻 एन डी पाटील यांना भावपूर्ण आदरांजली💐🙏🏻

आणि मी पोलीस झाले या लेखातून छोट्या गुन्ह्यांची खूप छान माहिती मिळाली. सुनिता ताई धन्यवाद.

तुम्हीच सांगावं : भरती ताई तुमची कविता खूप सुंदर 👍खरचं तुमच्या लिहिण्याचं सार्थक झालं ताई.

एन.एस.टी.२१.०१.२०२२.
अलौकिक प्रा. मधु दंडवते : संजीव वेलणकर यांनी मधु दंडवते यांच्या सामाजिक कार्या विषयी खूप छान माहिती दिली आहे. आमच्या कोकणात ट्रेन नेण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. ते आम्हाला आदरणीय आहेतच पण आई सोशलिस्ट पक्षाची कार्यकर्ती होती त्यामुळे मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते खूप जवळच्या परिचयाच्या होत्या. अर्थात मी तेव्हा खूप लहान होते पण त्यांना जवळून पहिल्याच आठवते. खरचं अलौकिक व्यक्तिमत्व.
त्यांच्या स्मरण दिना बद्दल विनम्र अभिवादन.🙏🏻
बातमीदारी करताना:डॉ किरण ठाकूर यांचा आणीबाणी वरील लेख विशेष खूप माहिती मिळाली. मात्र शेवटचा किस्सा गमतीशीर 👌🏻
गंधे काका गिरनार परिक्रमेच्या गोष्टी ऐकायच्या आहेत हो आम्हाला.

स्पंदन:शब्द चांदण्यांचे मानसी जोशी यांच्या कविता संग्रहाला खूप शुभेच्छा.
खूप छान लिखाण प्रतिभा ताई.

रा. वि.पवार यांची कशासाठी कविता अप्रतिम👌🏻👌🏻
धन्यवाद देवेंद्र भुजबळ सर, अलका ताई आणि टीम एन.एस.टी. 🙏🏻🙏🏻🙏🏻…..
– सुप्रिया सावंत.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदरणीय गौरी ताईंच्या लेखांचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं
    असं मला मनापासून वाटतय.मराठी भाषा पंधरवडा निमित्त
    त्यासाठी गौरी ताईंना मनापासून शुभेच्छा.
    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏🌹

  2. आदरणीय देवेन्द्रजी मनापासून धन्यवाद. आपण
    माझ्या कवितांना भरभरून पसंती दिलीत व
    वाचक सदरातूनही मोठं स्थान दिलंय.
    पाहून व वाचून खूपच आनंद झाला.
    अगदी अल्पावधीतच आपल्या मेहनतीमुळे
    न्यूज स्टोरी टुडेला खूप चांगली लोकप्रियता लाभली
    आहे.एन.एस.टी.मधून लिहिणारे सर्व लेखक कवि
    विचारवंत कलावंत प्रतिभावंत या सर्वांनाही
    माझा मानाचा मुजरा 🙏🌹
    राजेंद्र वाणी, दहिसर मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments