Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
आपला प्रजासत्ताक दिन आपण या आठवड्यात साजरा केला. त्या निमित्ताने तसेच थोर लेखक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल अवचट यांच्या निधनाच्या निमित्ताने आपण काही विशेष लेख प्रसिद्ध केले. या लेखांमुळे प्रजासत्ताकाचं महत्त्व आणि डॉ अवचट यांचे योगदान समजण्यास वाचकांना, विशेषतः तरुणांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
परदेशात असलेले आपले बंधू, भगिनी, तिकडे कितीही वर्षे झाली तरी, त्यांचं हृदय मात्र मायदेशीच असतं, हे ही यानिमित्ताने दिसून आले.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
लवकरच फेब्रुवारी महिना सुरू होत आहे.
त्याचं स्वागत करू या.
– देवेंद्र भुजबळ. संपादक

प्रजासत्ताकाचा अर्थ
देश उभारणी ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
देशापुढे अनेक आव्हाने जरूर आहेत पण गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात पाच युध्द झाली त्यात आपला देश राष्ट्र म्हणून कसोटीला उतरला.
अन्नधान्य टंचाईचा देश म्हणून ओळख असलेला देश आज त्याबाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार यातील आपली प्रगती लक्षणीय आहे.
लेख छान आहे. आव्हानांची मांडणी सुसंगत आहे
– हिरालाल पगडाल

डॉ. संजय गोर्डे यांचा लेख प्रासंगिक व लोकशाहीच्या वास्तवतेचा अचुक वेध घेणारा, अप्रतिम आहे.
– श्री. गणेश पाचोरे, कोपरगाव

जीवन प्रवास : भाग १९
भाबल मॅडम ने आपल्या जीवन प्रवासातील रम्य आठवणी फार सुंदररित्या सांगितल्या त्याबद्दल त्यांना खुप धन्यवाद. 🙏 असेच लिहीत चला. सर्व भाग लिहून झाल्यावर सर्व भाग एकत्र करून पुस्तक रुपी प्रकाशित करा. ऑल दि बेस्ट 🌹
– मोहन बा. आरोटे

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ : 13
उत्तमातलं उत्तम काव्य थोरांपासून शालेय मुलांपर्यंत, अगदी आदीवासी आश्रम शाळेतल्या मुलांनाही ते ऐकवण्यासाठी विसुभाऊंची कुटुंब रंगलंय् काव्यात या कार्यक्रमाद्वारे चाललेली धडपड प्रशंसनीय आहे. काव्यांतून ते समाजावर संस्कारही घडवत आहेत. खूप चांगला ऊपक्रम आहे हा !!
– राधिका भांडारकर

स्वप्नरंग स्वप्नीच्या
अरे वाह ! आता आमच्या प्रतिभा चांदूरकर मॅडम चे लिखाणही वाचायला मिळणार का ?
देवेंद्रजी तुम्हाला खरोखर धन्यवाद ! तुम्ही आमच्यातील किती लोकांना लिहिते केले आहे. आणि एकदा लिहिले की मग ते लिहीतच राहतात. कारण तुमचे प्रोत्साहन, वाचकांचे कौतुक त्यांना मिळते. या सारख्या नोंदी ठेवणे सोपे नाही.
देशोदेशीच्या गोष्टी येथे वाचायला मिळतात. किती देशांशी तुमचे संपर्क सुरू आहेत हे पाहून नवल वाटते.
खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला.
– मेघना साने

नेताजी सुभाषचंद्र बोस
आदरणीय हिरालालजींनी केला सार्थ
पराक्रम दिन आजचा
सुंदर लेखणीतून साकारला रोमांचकारी
इतिहास लाडक्या नेताजींचा

जीवावर उदार होऊन केले नेताजींनी
पाणबुडीतून जपानला प्रयाण
आझाद हिंद सेनेची स्थापना करून
केले दुष्ट इंग्रजांचे शिरकाण

शत्रूच्या शत्रूला मित्र बनवून
दिला चलो दिल्लीचा नारा
सुभाषचंद्र बोस यांच्या शौर्याने
अवाक झाला भारत सारा

मोठ्या पराक्रमाने धाडसाने त्यांनी
अंदमान निकोबार ताब्यात घेतले
स्वतंत्र आझाद हिंद सरकारचे
नेताजी राष्ट्रपती पंतप्रधान व युद्धमंत्री बनले

नेताजींच्या आझाद हिंद सेनेने
इंग्रजांशी घनघोर युद्ध केले
तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुॅंगा
या वेद मंत्राने भारतीय सैनिकही भारावून गेले

राष्ट्रभक्तिने नाविक दल पेटून उठले
इंग्रज सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरले
गांधिजी आणि नेताजी हे दोन महापुरुष
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर झाले

हिरालालजी आपल्या सुंदर लेखातून
हे काव्य साकारले
वाचून अभिमानाने मन भरून आले
नेताजींच्या आठवणीने डोळे पाणावले
जय हिंद 🙏
– राजेंद्र वाणी, मुंबई.

हिरालाल पगडाल यांचा नेताजी सूभाषचंद्र बोस यांच्यावर लिहीलेला लेख अप्रतीम आहे.. घडलेला इतिहास त्यांनी सुंदर आणि संयमित शब्दांत लिहीला आहे.
गांधीजींची आणि सुभाषजींची वैचारिक भूमिका वेगळी असली तरी त्यांची दिशा एकच होती…स्वतंत्र भारताची…
या लेखात पंडीत नेहरु, गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्या कार्यप्रणाली सुंदर अभ्यास पूर्ण आढावा घेतला गेला आहे.
लेख अतिशय वाचनीय आणि घडून गेलेल्या इतिहासाला समजून लिहीला आहे….
– राधिका भांडारकर, पुणे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस भावपूर्ण आदरांजली ! वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना संघटनेची प्रखर ज्योत आहे. ही अखंडीत तेवत ठेवली पाहिजे.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

“बातमीदारी करताना” भाग – २१
आणीबाणीतील घडामोडींचे वर्णन वाचून चित्र उभे राहिले !!
लेखक प्रा.किरण ठाकूर यांना धन्यवाद.
– विजय कुलकर्णी.

वाचक लिहितात…
आदरणीय गौरी ताईंच्या लेखांचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं मला मनापासून वाटतय. मराठी भाषा पंधरवडा निमित्त त्यासाठी गौरी ताईंना मनापासून शुभेच्छा.

आदरणीय देवेन्द्रजी मनापासून धन्यवाद. आपण माझ्या कवितांना भरभरून पसंती दिलीत व वाचक सदरातूनही मोठं स्थान दिलंय.
पाहून व वाचून खूपच आनंद झाला.
अगदी अल्पावधीतच आपल्या मेहनतीमुळे
न्यूज स्टोरी टुडेला खूप चांगली लोकप्रियता लाभली आहे. एन.एस.टी. मधून लिहिणारे सर्व लेखक, कवि, विचारवंत, कलावंत, प्रतिभावंत या सर्वांनाही माझा मानाचा मुजरा 🙏🌹
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹

डाॅ.अनिल अवचट : तेजस्वी तारा
या व इतर सर्वांच्या लेखातून डाॅ अनिल अवचट यांच्या जीवनाचा, लिखाणाचा सुंदर आढावा वाचायला मिळाला. साहित्यिक, कलावंत, समाजसेवक असं त्यांच अष्टपैलू जिवन होतं. या माध्यमातून ते सर्वांच्या मनांत, जिवनांत अजरामर राहातील. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– लीना फाटक. यु.के.

थोडक्यात राधिकाताईने डाॅ.अनिल अवचट यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व वाचकांसमोर उभे केले.
या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
– अरूणा मुल्हेरकर. अमेरिका

अनिल अवचट यांचे निरीक्षण सूक्ष्म होते. त्यांनी वंचितांच्या, उपेक्षितांच्या वेदनांना शब्दबध्द केले, त्यांच्या समवेत मी विडी कामगारांच्या कारखान्यात, घरात गेलो. 80 ते 85 च्या समता आंदोलनात आम्ही एकत्र होतो.
लेखक, कार्यकर्ता, कलाकार या सगळ्या अंगाने डॉ. अवचट खूप मोठे होते. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
– हिरालाल पगडाल

‘सैनिक’ : २ कविता
अरुणा मुल्हेरकर यांची वंदन सैनिकास ही कविता सैनिकाप्रती मनस्वी कृतज्ञता भाव व्यक्त करते…
तसेच रामदास आण्णा यांच्या रचनेतलं सैनिकाचं मनोगत मनाला फार भिडलं..सलाम त्यांच्या कर्तव्य परायणतेला…
सलाम त्यांच्या देशभक्तीला…
– राधिका भांडारकर.

कृषितज्ञ डॉ ज्ञानदेव कासार : ऋषितुल्य व्यक्तिमत्व.
👌🏻छान माहिती व चांगल्या समाज रत्नाचा परिचय करुन दिला. धन्यवाद 🙏🏻
– प्रदीप बारस्कर. औरंगाबाद

प्रा पद्मा हुशिंग मॅडम यांनी विजयाताई वाड यांच्या जीवन प्रवासावर लिहिलेला लेख खरंच अप्रतिम आहे. विजयाताई यांना वाढदिवसाच्या मनापासून अनंत शुभेच्छा. मला देखील विजया ताईचं खूप प्रेम आणि भरभरून आशीर्वाद वेळोवेळी मिळाला आहे. माझे लेख, पुस्तकं याचं नेहेमीच त्या कौतुक करत आल्या. प्रेमाच्या ओलाव्याने ओथंबून वाहणारी ही गागार अशीच वाहत रहावी. परमेश्वर कृपेने विजया ताईंना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे हीच प्रार्थना.
– डॉ राणी दुष्यंत खेडीकर

सा. प्रतोद, साहित्यिक चळवळीचे केंद्र, नागेश शेवाळकर यांचे मोजक्या शब्दांत मांडलेले चित्र आवडले.

जीवनगाणे, नूतन बांदेकर मनाला स्पर्शून गेले, त्यांचे लेखन मला आमच्या समूहावर नियमित वाचायला मिळत असते आणि मी आवर्जून दखल घेत असते.

साधना आठल्ये यांची कविता अल्पाक्षरी तरीही मोठा आशय दर्शवणारी आहे 📋✒️
– सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार.
बोरीवली. मुंबई

तुमचे खूप धन्यवाद सर…पोस्टला तुम्ही दिलेल्या प्रसिद्धीमुळे हे शक्य झाले…
राणी खेडीकरना माझे आभार कळवा…
त्या आम्ही सिध्द लेखिका ग्रुपवर आहेत
– मानसी जोशी.

गझलगायक सुरेश दंडे हे किती असामान्य व्यक्तिमत्त्व आणि तरीही मला त्याच्याविषयी काही माहिती नव्हती हे प्रांजळपणे कबूल करते त्याचवेळी आता एकदा तरी त्यांची भेट व्हावी, त्यांचे गायन प्रत्यक्ष ऐकावे असे तीव्रतेने वाटले आणि अशा महान व्यक्तिची माहिती सांगितल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार !🙏
– नीला बर्वे. सिंगापूर

रामदास कामत यांच्यावर लेख व शाकंभरी कविता… आवडली
– पद्मजा नेसरीकर. पुणे

शाळांची “शाळा” !
आदरणीय रश्मीताई हेडे
माता मुलांवर संस्कार घडवते तर खर्या अर्थाने शाळेतील शिक्षक वर्ग मुलांना बाहेरच्या
जगात यशस्वी जीवन जगता यावे म्हणून अथक परिश्रम घेऊन अक्षरशः प्रत्येक विद्यार्थी ज्ञानसम्पन्न होईल यासाठी पराकाष्ठा करतात. पालक, पाल्य आणि गुरुजन असा हा त्रिकोण असतो. ताई तुमचा लेख अतिशय पोटतिडकीने लिहिला आहे. त्रिकोणाच्या या
तिन्ही बाजू खर तर जवळजवळ उद्वस्त झाल्या आहेत. लाटा ओसरल्यावर पुन्हा एकडाव नव्याने पत्त्यांचा बंगला बांधायचा.
लेख परखड मार्मिक व सत्याचा आरसा दाखवणारा. तरुणाईने योग्य मार्गाने जगाला कसे सामोरे जावे यासाठीचे मार्गदर्शन ज्याला जसे जमेल तसे पण प्रामाणिकपणे केले तर आणि तरच सगळ्यांचाच
भविष्यकाळ उजळून निघेल.
अतिशय मेहनत घेऊन लिहिलेल्या लेखाला १०० ℅ गुण.
– प्रकाश पळशीकर. गाझियाबाद.

शाळांची शाळा… अतिशय विचार करायला लावणारा लेख…
– लक्ष्मीकांत विभूते. नवी मुंबई

फार सुंदर लेखन विशेषतः आधुनिक सरस्वती👌👌👌🙏
– प्रिती भिसे. बेंगलोर

“अलौकिक” खूप सुंदर लेख.
शब्द चांदण्याचे..फारच छान
सर्वच सदर सुरेख🌹
– प्रणाली म्हात्रे. मुंबई

पवार यांची भावस्पर्शी कविता छान आहे.
– सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.

प्रा. विसुभाऊ माझा जुना मित्र. कोल्हापूरला प्राध्यापकी करताना, म्हणजे आजपासून ३५ एक वर्षांपूर्वी
*डोळे भरूssन आssले,*
*झाssले अथांssग पाणी;*
*शब्दांत काssय सांssगू,*
*माझी अssडेल वाणी*
ही माझी सह्याद्रि दि.अंकातील गझल वाचून त्याने पोस्ट- कार्डावर आपली हृद्य प्रतिक्रिया कळवली होती. मग ही उद् गमीत मैत्री रुंदावत गेली. पुढे तीच गझल पं. वसंतराव देशपांडे इंदूर मुक्कामी असताना मी त्यांना राग मारव्यात गाऊन दाखवली व त्यांनी स्वत:च्या हाताने मला चहा बनवून देत माझ्याकडून ७-८ कविता म्हणवून घेतल्या होत्या हे सहज आठवले.
– श्रीकृष्ण बेडेकर. इंदोर

महाराष्ट्राचा चित्ररथ अप्रतिम
– सुनिता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई.

प्रतिभा ताईंची स्वप्नरंग स्वप्नीच्या दीर्घ कथा क्रमशः वाचायला मिळणार आहे. आता रोज प्रतीक्षा असणार न्यूज टूडेची.

अंजू निमसकर यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा विषयी छान माहिती दिली.

केरळ: निल्यामपथी बद्दल मनिषा पाटील यांनी छान माहिती दिली आहे. 👍👍

वा वर्षा किती सुंदर लिहिते. वर्षा भाबल यांचा जीवन प्रवास भाग १९ खूप छान👌🏻

नयना निगळ्ये यांची ‘आता इथे’ कविता सुंदर👌🏻
देवेंद्र सर आणि अलका ताई, धन्यवाद🙏🏻
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई.

डॉ. संजय गोर्डे ह्यांचा लेख अप्रतिम.
सर्जेराव पाटील ह्यांची कविता देशासाठी तळमळ व्यक्त करणारी👌सैनिक च्या दोन्ही कविता उत्तम.
– सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया.

अनिल अवचट सर यांचेवरील लेख अप्रतीम.
– डॉ उमेशचंद्र मोरे. मुंबई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments