Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
गानकोकिळा,भारताचा स्वर, भारतरत्न लता मंगेशकर यांचं जाणं म्हणजे सर्व रसिकांवर कोसळलेली वीजच होती आणि आहे.याचा प्रत्यय जसा सर्वत्र आला तसा तो आपल्या न्यूजस्टोरीटुडे मधूनही व्यक्त झाला.

रविवारी आपल्या पोर्टलला सुट्टी असते. पण लताजींच्या जाण्याने सुट्टी सुद्धा नकोशी झाली. त्यातच सहजपणे, उस्फूर्तपणे भावपूर्ण मजकूर येत होता. त्यामुळे आपण रविवारी विशेषांक प्रसिद्ध केला. तरी दर्जेदार मजकूर येतच राहिल्याने सोमवारचा नियमित अंक बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी ही विशेषांक प्रसिद्ध केला. जागे अभावी विविध मान्यवरांच्या भावना व कविता एकत्रच संकलित करून त्या प्रसिद्ध कराव्या लागल्या.
या वेळच्या “वाचक लिहितात” मध्येही लताजींचे प्रतिबिंब आपल्याला दिसेल.
असो….पुन्हा एकदा त्यांना आपल्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ. संपादक

सुलभाताई, कविता खूप आवडली, तुम्ही जो अनमोल अनुभव सांगितला त्याबद्दल आभार. स्व. लतादीदींना सैनिकांबद्दल खूप आदर आणि आत्मीयता होती हे आम्ही ऐकले होते परंतु असे अनुभव आजपर्यंत
कोणाकडूनही ऐकले नव्हते किंवा वाचण्यात आले नव्हते. आदरणीय भाईंना आम्ही खूप जवळून पाहिले आहे.
डोंबिवलीला आणि पुण्यालाही त्यांच्या सहवासाचा आम्हाला थोडा फार लाभ झाला. त्यांचे उच्च विचार, बोलण्यातील, वागण्यातील नम्रता आणि विनयशीलता आम्हाला जाणवली होती. जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय सैन्यदलात सेवा केल्याबद्दल वाटणारा अभिमान त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत असे. अश्या भाईंनी आपले आयुष्य देशाच्या रक्षणासाठी वेचले, त्या आदरणीय भाईंना लतादीदींसारख्या असामान्य महान व्यक्तीकडून प्रेम आदर आणि छान आदरातिथ्याचा लाभ झाला हे वाचून खूप आनंद झाला. भारत रत्न
लतादीदी आणि आदरणीय भाई या दोघांनाही आमचे
नमस्कार !
– अजित शोभा

लतादिदी : काही कविता – एकाहून एक सरस कविता.
९२ आठवणी दिल्यात – ऋणी आहे.
एक वैयक्तिक : देवेंद्रजी गेल्या दोन दिवसातील निवड/संकलन खूप छान केले आहे. (मी नुकतीच join झाल्याने पूर्वीचे पब्लिकेशन वाचलेले नाही.)
– सुलभा गुप्ते

समाजभूषण सुभाष साळवी
श्री साळवी यांच्या जीवनाचा प्रेरणादायी लेखाजोखा…

नेदरलँड आधुनिक रामराज्य ..एक छान लेख
– राधिका भांडारकर

‘जीवन प्रवास’ ( २० )
खूपच छान लिहिले आहेस वर्षा. अलकाचे पण मला खूप कौतुक वाटते.एवढ्या मोठ्या व्याधी वर मात करून अलका चे जे कार्य करत आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा
– वृंदा आदटराव

कांद्याची रडकथा !
डाॅ. किरण ठाकूर यांनी कांद्याची रडकथा या पुस्तकाच्या परिचयाच्या निमित्ताने शेतकर्‍यांच्या महत्वाच्या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे हे नक्कीच..सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून
हे पुस्तक खरोखरच घरोघरी पोहचले पाहिजे..
असे मनापासून वाटते..
– राधिका भांडारकर

लतादीदींचं सैनिक प्रेम
खूप छान अनुभव share केलात तुम्ही सुलभाताई.
– अरूणा मुल्हेरकर

लतादीदी : ९२ आठवणी
सुंदर शब्दांकन
लिहावे तितके थोडेच आहे.
पण आठवणीतील लताजी छानच !
– सायली कस्तुरे.

ये मेरे वतन के लोगों…
लतादीदींच्या स्वरातील आणि कवी प्रदीप यांनी रचलेली भावनात्मक काव्य रचना ही भारतीय सैनिकांना श्रद्धांजली असून लतादीदींच्या या स्वरातून निघालेले शब्द हे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणादायी ठरणारे आहेत. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !
– बाळकृष्ण कासार

लतादीदी : ९२ आठवणी
असामान्य व्यक्तीमत्व…
लिहावं तितकं थोडं आहेत…
प्रत्येक संगीत प्रेमीशी त्यांनी त्यांच्या सूरांतून संवाद साधलाय..

आम्हाला भावलेल्या लतादिदी…
ह्रद्य आठववणी..
स्वरलतेचे सूर अमर आहेत…
– राधिका भांडारकर

गान कोकिळा मूक झाली…
लता दिदींना अतिशय भावपूर्ण मानवंदना !
देव लोकातला आवाज देवलोकात परत गेला.
गान कोकिळेला भावपूर्ण श्रद्धांजली
– अरूणा मुल्हेरकर

लता दीदींची ज्योत मावळली, तरी त्यांचे भावूक सूर सदा अमर राहतील.
लता दीदींना मानवंदना !
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
– सौ. वर्षा महेंद्र भाबल

गान कोकिळा, स्वर सम्रादनी, भारतरत्न कै. लताजी मंगेशकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
– मोहन अरोटे.

लता दिदींच्या, सर्व कविता छान आहेत…
गान कोकिळा मूक झाली…
लेख छान आहे
‘आठवणी स्वरसम्राज्ञीच्या’
ग्रेट आणि नशिबवान आहात
लतादीदींचं सैनिक प्रेम
एक दुर्मीळ अनुभव लतादीदी बद्दल व सैनिकां बद्दल सार्थ अभिमान वाचायला मिळाले.
ये मेरे वतन के लोगों…
खुप भावनात्मक लेख…लताचे हे गाणं…नुसतेच गाणं नाही तर ते एक अजरामर भारतीय सैनिकाप्रती विनम्र श्रद्धांजली आहे. कवी प्रदीप ना पण विनम्र अभिवादन ! जय हिंद !
– पूर्णिमा शेंडे.

लतादीदींचं सैनिक प्रेम
अत्यंत अनमोल आणि दुर्मिळ अनुभव वाचायला मिळाला आहे.. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
– विलास बाबुराव सरोदे

उत्तम लेख आणि संकलन.
– निरंजन राऊत.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक, माहिती विभाग
मंत्रालय.

DGIPR नी स्वर्गीय लतादिदींवर एक स्पे. लोकराज्यचा अंक काढला होता. आपणांस विदित असेलच.
– स्वाती कुलकर्णी. निवृत्त माहिती अधिकारी

सुलभताईंचा लेख खूपच छान. लताबाई यांचं सैनिकांविषयी आणि सैन्याविषयीचं प्रेम यातून व्यक्त होतं.
– डाॅ.सतीश शिरसाठ 👍🏻

वाह खूपच सुंदर नियोजन आपले सर. सर्व निवडक कविता लता दिदींवरील प्रेम, वाचक स्मरणात ठेवतील अशा आज त्यांच्या चरणी समर्पित करतो. त्यांचा पुनर्जन्म होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते
ॐ शांती: शांती: शांती:
– सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

स्व. लतादिदी वरील सर्वच लेख वाचनीय तर आहेतच शिवाय सन्ग्रही ठेवण्या इतके सुंदर झाले आहेत. लतादिदीना हीच खरी श्रध्दांजली ठरेल . आपले हार्दिक धन्यवाद.
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार, नांदेड.

🕉️देवेंद्र जी आपले लतादिदींवरचे सर्व. लेख, साहित्य फारच मेहनतपूर्ण.. असाधारण स्वरुपाचे तसेच आपण घेतलेल्या परिश्रमाची, अविरत कष्टाची चोखंदळ व चौकसपणाची चांगली आणि यथार्थ जाणीव झाली. आपण लतादिदींना सुयोग्य न्याय दिला. धन्यवाद.

🕉️🙏🏻”लता दिदीचं सैनिक प्रेम” हा सुलभा गुप्ते (आँस्ट्रेलिया) यांचा लेख नाविन्यपूर्ण वाटला ।अभिनंदन..।🙏🏻

🕉️धन्यवाद.👌👌
हेमंत कोठीकर, जयू भाटकर, युवराज पाटील, मिलिंद यांचे लेख अमुल्य आठवणी आणि लतादिदी वरच्या सर्व कवीमित्रांच्या कविता …फारच अप्रतिम रीत्या आपण संपादित केले आहे. कालचे देखील सर्व लेख व आपले कुशल संपादन मनापासून आवडले. धन्यवाद.

नेदरलँड : आधुनिक रामराज्य हा शलाका कुलकर्णी यांचा लेख आवडला. शेजारधर्माचा छान अविष्कार लेखनातून दिसून आला. मी आणि माझी पत्नी या सायकलीच्या देशात अँमस्टरडँम येथे तीन दिवस होतो. युरोपात सर्वात सुंदर असा हा देश आहे. शलाकाजींचा लेख खुप काही सांगून जातो. एकट्या आजोबाच चित्रणही मस्त जमलं. शलाकाजींचे या अप्रतिम लेखाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
– 🕉️🍈सुधाकर तोरणे🍈 निवृत्त माहिती संचालक. नाशिक

देवेंद्र जी तुमचे खुप खुप आभार तुम्ही खूप चांगले cavrage दिले.
– सिनेगायक उदय वाईकर

“कांद्याची रडकथा” हा ठाकूर सरांचा लेख आवडला. अशा प्रकारचा लेख “कंदर्पाची कैफियत”, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर शाळेत असताना वाचला होता. छान आहे… 🌹🌹🌹
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक.

सारे लेख वाचले. सर्वांनी खूप मनापासून भावना व्यक्त केल्या आहेत. मलाही अनुभव लिहिण्याची इच्छा झाली. पण घरात कार्पेंटरी नि रंगकाम चालू आहे. लॅपटॉप उघडण्याची सोय नाही. 🥲🙏
– स्मिता भागवत. कॅनडा

विसुभाऊ बापटांची अशी असावी शाळा कॅसेट ऐकत ऐकत मोठी झाले मी.
टिंग टिंग झाली तिसरी घंटा….
एवढशं झुलल…..
कितीदाही ऐकली तरी ऐकावी वाटेल अशीच.
माझ्या मुलासाठी इंटरनेट वर अनेक वेळा सर्च केलं परंतु मिळालं नाही.
आज त्यांचा दुसरा लेख वाचला.
देवेंद्र सर आपल्याला पण आणि विसुभाऊना पण खूप धन्यवाद !
– सायली कस्तुरे. दूरसंचार अभियंता. पुणे

लता दिदींच्या विषयीचे सर्व लेख अप्रतिम ! 👌
– समृद्धी भाळवणकर

लता दीदी काही कविता.. खूप सुंदर👌
– प्रणाली म्हात्रे. मुंबई

असा बेभान हा वारा यावर केलेलं रसग्रहण अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. असेच अनेकानेक आपणाकडून व्यक्त केले जावो व आम्हाला त्याचा आनंद मिळो ही सदिच्छा. 🙏
– अनीता पिसोळकर

नमस्कार.
कालच्या पोर्टलवर “असा बेभान हा वारा” या गीताचे श्री विकास भावे यांनी केलेले रसग्रहण अप्रतिम आहे. खूपच छान.👍👍👍
– उद्धव भईवाळ

चित्ररथ आर्टिकल छान लिहिले आहे🙏
– बिभिषण चवरे.
संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय. मुंबई

माधवी ढवळे यांची “पाकळी” मनाला स्पर्श करून गेली… छान आहे👌
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक

महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रवास गौरवास्पद आहे 👏🏻👏🏻👏🏻
– सौ मनीषा पाटील. पालकाड, केरळ.

महाराष्ट्र सरकारने चित्र रथावर आधारित कॉफी टेबल बुक काढायला हरकत नाही !
– प्रा डॉ राजन वेळूकर. जेष्ठ शिक्षणतज्ञ

चित्ररथ : महाराष्ट्राची विजयी परंपरा
हा अंजू निमसरकर यांचा माहितीपूर्ण लेख खूपच सुंदर👍
बाल शिखरवीर स्वरूप शेलार याला खूप खूप शुभेच्छा.
बातमीदारी करताना प्रा डॉ किरण ठाकूर यांचा लेख उत्तम👌🏻
आपल्या मनाचाही कोपरा बाबांसाठी हळवा असतोच. आई बाबांची जागा मनाच्या तळाशी जपून ठेवलेली असते. माधवी ढवळे यांची एक पाकळी बाबासाठी कविता खूप आवडली.👌🏻👌🏻👌🏻
ओठवरलं गाणं विकास भावे यांचं रसग्रहण उत्तम असा बेभान हा वारा या सुंदर गाण्याच्या छाटा उलगडून दाखवल्या आहेत.
डॉ. सचिन पाथरकर यांचं हार्दिक अभिनंदन💐
मनातील शालेय पुस्तक … निता देशपांडे यांनी पुस्तकां बद्दल अगदी माझ्या मनातील उभेऊभ विचार मांडले आहेत. मी पण अशाच खुणा करून पुस्तक रंगवत असे आणि मग अभ्यास सुरू व्हायचा ती पुस्तकं नंतर कोणाला देताना मात्र वाईट वाटायचं. मला पण अजूनही नवीन कोऱ्या पुस्तकाचा वाहीचा गंध खूप आवडतो. छान लेख निताताई👌🏻👍

वर्षाचा जीवनप्रवास सुंदर👌🏻
प्रियांका कुलकर्णी यांची ती… कविता
अत्युतम खरंच सकाळ पासून अगदी रात्री पर्यंत सर्वांचं करणारी गृहिणी खूप छान शब्द रचना👌🏻👌🏻👍
शलाका कुलकर्णी यांचा नेदरलँड : आधुनिक रामराज्य लेख एकदम मस्त नेदरलँड ची माहिती खूप छान सांगितली आहे.
आणि मी पोलीस अधिकारी झाले : सुनिता नाशिककर यांचा क्रमशः लेख मी आवर्जून वाचते छान वाटते वाचायला. त्यांचे अनुभव वाचायला मस्त वाटते.👍
प्रतिभा ताईं ची स्वप्नरंग स्वप्निच्या कथा क्रमशः आहे आणि छान पकड घेते आहे.
स्वराज्य जननी जिजाऊ : परवीन कौसर यांची कविता सुंदर 👌🏻👌🏻
धन्यवाद देवेंद्र भुजबळ सर आणि अलका ताई भुजबळ 🙏🏻🙏🏻🙏🏻…
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई.

💦 Great 👍
प्रियांका ताई, ती.. म्हणजेच सतत दुसऱ्यांसाठी झटत राहणारी स्त्री … ची जाणीवपूर्वक केलेली भावना.. छान शब्दात व्यक्त केली.
🙏🌹🙏 ..
💦 अभिनंदन..🎉
समाजभूषण, माननिय श्री. सुभाष जी यांचा परिचय व धावता जीवन पट … रश्मी ताईंनी…. छान शब्दात सादर केला.
🙏🌹🙏
एक पाकळी बाबांसाठी….
अतिशय सुंदर रचना.
बाबांसाठी हि एक पाकळी नव्हे… काव्य कुसुमांचा, ”पुष्पहार” जणू अर्पण केला.
सुंदर..
👌👌🙏👌👌
– सुभाष कासार.

माधवी ढवळे यांची “पाकळी” मनाला स्पर्श करून गेली… छान आहे👌
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम