Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

लिनाताई,
अतिशय सुंदर लेख, मंदा ला अर्पण केलात त्यावरून तुमची मैत्री किती सुंदर होती ह्याची कल्पना आली.
पहिलं लिखाण बालपणाकडे घेऊन गेलं. असच वातावरण होतं तेव्हा. आता मुलांना काहीच महत्त्व वाटत नाही.
मानवतेची गुढी ही कल्पना तर फारच आवडली. पूर्ण लेख अगदी आदर्श ठेवावा असा झालाय..
– सुनंदा पानसे. पुणे

सर्व सदरे सुंदर आहेत, घाट अंबोलीचा, कविता आवडली. अगदी घाटात फिरुन आल्यासारख वाटल. बालकाव्यधारा 2, विजया वाड विशेष आभार, लहान मुलांसाठी त्या एवढ करतात जीवनशैली सुधारा, ब्रह्मकुमारी संस्थेचेही काम आज काळाची गरज आहे. आपल्या या वेबमुळे आमच्या ज्ञानात सतत भर पडते, आण्णांनसारखी माणस समाजीक बांधीलिकीची जाणीव करून देतात. यासाऱ्यांसाठी भूजबळ सर तुमचे मनापासून धन्यवाद । 🙏🙏🙏
– आशा दळवी, फलटण, सातारा 💐💐

मा. देवेंद्र जी भुजबळ सर,
सप्रेम नमस्कार, जय कालिका.
आपली मुलाखत पाहिली. आपण संघर्षमय जीवनातून वाट काढत प्रथितयश व्यक्तिमत्व झालात. खरोखरच आपले जीवन इतरांसाठी प्रेरणादायी आहे विशेष म्हणजे आपण आपल्या सोबतच समाजातील रंजले गांजलेल्या तून हिरे शोधले ते पारखले आणि नावारूपास आणले हे फार मोठे दैवी काम आपण केले आहे. सोबतच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांच्या जीवनातील माहित नसलेले पैलू आपण जगाला दाखवून दिले यात आपलं नाविन्यपूर्ण वेगळेपण आहे.
मी सामाजिक समरसता मंचाचा कार्यकर्ता आहे सामाजिक समरसता मंच आपल्याच सारख्याच विचारावर कार्य करतो. म्हणुनच त्यामुळे मला आपला जीवनपट या छोट्याशा मुलाखतीतून अतिशय भावलेला आहे. आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटना व गोष्टी या प्रेरणादायी आहेत. आपण समाजभूषण आहात याचा मला अभिमान आहे.
आपल्या विचार माध्यमातून समाजातील युवकांनी प्रेरणा घ्यावी.
आपणास मनापासून शुभेच्छा व धन्यवाद. 🙏🏻
– प्रदीप जनार्दन बारसकर.
संभाजी नगर (औरंगाबाद)
https://youtu.be/l0jnD1Gd4z4

नमस्कार मंडळी मधील आपली मुलाखत ऐकली आणि धन्य झालो. अप्रतिम 👍🙏
– सुनील पाटील. निगडी, पुणे.

सगळी सदरे छान आहेत. बिलपेड कथा फार भावली. महिलांच्या सामाजीक बांधीलकीचे कौतुक करुन पुरस्कार देने ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे महिलांना 🏆 प्रेरणा मिळते.
बापलेक ही छान मित्र बनू शकतात, पुस्तक परिचय छान.
कविता ही छान आहे.
मुक्तछंद कवितेवर अनिलांचच शिक्कामोर्तब
विसूभाऊनीही केले.
सर्व सुंदर धन्यवाद। 🙏
– आशा दळवी. फलटण

सर तुमची डीडी सह्याद्री वाहिनीवर झालेली मुलाखत बघितली अतिशय प्रेरणादायक मुलाखत तुम्ही दिलीत खरच तुमच्या जीवनातील अनुभवांकडे बघता माझ्या सारख्या किंवा अन्य कुणी शिकणाऱ्या पुढे जाऊ पहाणाऱ्या अथवा नव्या पिढीला बहुमोल मार्गदर्शन आहे 🙏👍👌💐💐
– माधवी ढवळे. राजापूर

आपली मुलाखत ऐकून भारावूनं गेले, अप्रतिम मुलाखत प्रत्येक शब्द ऐकण्यासारखा होता, मला खावु नको, पुस्तकें च आणत जा, या बालहाट्टातचं तुमचें मोठेपण लपल होत. तुमचा खडतर शैक्षणीक प्रवास ऐकून वाईट वाटल, गणित विषय कुणी शोधून काढला ह्या वाक्याने हासूहि आले. आनंदी राहण्याचे दिलेले मुद्दे खुप छान आहेत.
खरेच आताशा त्याची गरज आहे. एवढ्या तेवढया कारणावरुण आत्महत्येसारखे पाऊल उचलतायेत सर तुम्हीं खरोखर महान आहात. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची धरपड तुमच्या मुलाखतीतून जाणवली. तुमची सर्व पुस्तकें पण छान वाटली. मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन. मी स्वताला भाग्यवान समजते की तुमच्या सारख्या मोठ्या माणंसाशी माझी ओळख झाली धन्यवाद । सर.
ओठावरल गाणं, कविता, व इतर सर्व छान
तुमची मुलाखत अतिशय सुंदर.🙏🙏
– आशा दळवी. फलटण, सातारा

आदरणीय सर,
“नमस्कार मंडळी” ही आपली मुलाखत अत्यंत उद्बोधक व प्रेरणादायी आहे. सहा वर्षापर्यन्त बोलता येत नसताना सुध्दा आजपर्यंतचा आपला प्रवास खरोखर खडतर. तेथून यशापर्यंत कसे जावे याचा वस्तुपाठच आहे. भाजीवाल्या कवयत्री बद्दल प्रतिकूल मत न करता त्यांचा प्रेरणादायी प्रवास जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी, त्याचप्रमाणे भांडवल नसतांना उद्योजक व ईतर प्रेरणादायी पुस्तकांचा ज्ञानसाठा खरोखर अमूल्य. वाघ मॅडम यांचा सेवाभाव जनसामान्यापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुध्दा मार्गदर्शक. आपला पूर्ण जीवनप्रवास खरोखर प्रेरणादायी. 🙏
– सुनीता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई

चंद्र शेखर आजाद यांच्या बद्दल खूप छान माहिती मिळाली स्मिता ताई👍

लालबत्ती : राणी खेडिकर यांची क्रमशः कथा फारच हृदयस्पर्शी आहे. विशेषतः शेवटची ओळ “मेरा तो निकाह होने वाला था दीदी” अंगावर आली ती ओळ. कस जीवन जगतात ही माणसं ?. हे दुष्टचक्र आई बरोबर त्यांच्या मुलांनाही गुरफटून टाकते. समाजात मान नाही. वडील नाहीत. घर, कुटुंब नाही. फक्त आणि फक्त अवहेलनाच यांच्या नशिबी.

सुनिता ताईंची मी पोलीस अधिकारी झाले ही क्रमशः कथा वाचायला खूप छान वाटते. खूप वेगळे अनुभव वाचायला मिळतात. खूप छान ताई 👌🏻
सुमती ताईंची तिसरी कविता शालेय अभ्यासक्रमात लागली आहे. खूप खूप अभिनंदन सुमती ताई.
अतिशय सुंदर कविता👌🏻.

खरंच अलका,
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून आज तू सुखरूप सुटली आहेस. मला तर माहीतच नव्हतं तुला 4 वर्षांपूर्वी कॅन्सरने गाठल होतं. तू मला पहिल्यांदा पनवेल च्या पिकनिक ला भेटली होतीस. मस्त नाचणारी, हसणारी तिथेच आपली ओळख झाली. पण तुझ्याकडे पाहून असं खरच वाटत नव्हत की तू नुकतीच आजारातून उठली आहेस. कारण पिकनिक तीन वर्षापूर्वी होती. तूच मला तुझ्या आजारा विषयी सांगितले होतेस. मी अचंबित झाले. किती एनर्जी ! दुःखाचा लवलेश नाही. मलाच का हा आजार झाला, असं विव्हळणं नाही. मस्त मज्जा करत होतीस.
तुझं पुस्तकही आले आहे कॉमा नावाचं. कॅन्सर झालेल्या रुग्णांशी तू संवाद साधतेस, त्यांना धीर देतेस. खरच तुम्ही दोघे उभयता खूप छान काम करत आहात. तुझी प्रेरणादायी वाटचाल अशीच चालत राहो. तुला खूप उदंड निरोगी आयुष्य लाभो. या आरोग्य दिनी तुला खूप खूप शुभेच्छा 💐

लीना पाठक यांची मुलखा वेगळी “मानवतेची गुढी” आपण सर्वांनी केवळ पाडव्यालाच नव्हें तर तहहयात उभारली पाहिजे. अत्यंत साध्या सोप्या भाषेत अध्यात्मिक दृष्ट्या फार महत्वाची मानसगुढी उभारली. धन्यवाद
– सुप्रिया सावंत. पनवेल

Madam Alakatai Bhujbal, liked your article on Aapale Aarogya Aapalya Hati. Also, praise your patience to overcome that tragedy. Wish you a good health and a good contribution in literature….
– D.V. Kasar.

नमस्कार, अलकाताई. “आपलं आरोग्य
आपल्या हाती !”
हा तुमचा लेख भावला. तुम्हीं कॅन्सरशी दिलेली झुंज अतिशय स्तुत्य आहे. आपल्या धैर्याला सलाम. आपली सर्व छायाचित्रे सुरेख आहेत.
आपल्या जीवन प्रवासाचं पुस्तक पण छानचं असणार.
पुढील निरोगी आयुष्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.
अश्याच हसत राहा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री उभी असते, असे म्हणतात. तुमच्यामागे एक खंबीर
पुरुष व मुलगी आहे, याची प्रचिती आली.🙏धन्यवाद. – आशा दळवी, फलटण, सातारा.

आपलं आरोग्य आपल्या हाती..अतिशय हृदयस्पर्शी लेख👌
सर्वच सदरं नेहमीप्रमाणेच सुरेख👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.

🕉️ सौ.अलकाताईंना सर्व प्रथम आयुष्यमान भव हा शुभार्शिवाद देतो. त्यांचा संपूर्ण लेख वाचला. आरोग्याचे महत्व पटवुन देण्याबरोबरच त्यांना कँन्सरच्या अनुभवातून कसे जावे लागले याचे कथन उद्बोधक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील अलकाताईंची वाटचाल प्रेरणादायी आहे। त्यांचे मूळ ‘कॉमा’ पुस्तक वाचलेच पाहिजे….अभिनंदन !.
🗾सुधाकर तोरणे🗾

माहेवाशीण 👌
– संगीता सातोस्कर. मुंबई

🕉️ उत्कृष्ट व्यक्ती लेख कसा लिहावा याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन प्रा.डॉ. किरण ठाकूर यांनी या शीर्ष लेखात उत्कटपणे केले आहे. वाड़्मयशोभा मासिक अतिशय उमेदीने गेली ५० वर्षे चालू ठेऊन वाचक रसिकांना सर्व प्रकारचे साहित्य सम्रुध्दपुर्वक उपलब्ध करुन देणारे संपादक नानासाहेब केळकर यांना या लेखानिमित भावपूर्ण आदरांजली.त्यांचा ओघवता परिचय आणि याकाळातील मासिकांची परिस्थिती याचे कथन डॉ. किरणजींनी फार उत्तम प्रकारे केले आहे.तसेच श्री देवेंद्रजी यांनी हा लेख दुर्मीळ छायाचित्रासह उत्तम रीतीने संपादित केला त्याबद्दल उभयतांना धन्यवाद.
🗾सुधाकर तोरणे🗾

👌👌👌सर्व सुंदर. बातमादारी करताना, मधून संपादकाच्या व्यथा समजल्या. क्लिक, मध्ये वेळेच विश्लेषण छान केलय. हुंडा निबंध स्पर्धा सुंदर उपक्रम. कविताही छान.
👌👌🙏🙏
– आशा दळवी, फलटण, सातारा

आर्टपेडीया कल्पना सुंदर.
– राजश्री ओक. मुंबई

वा वा फारच छान लेख
– अर्चना पटवर्धन पुणे, सीमा कामत मुंबई, सरोज देशपांडे ठाणे, दर्शना मिस्त्री ठाणे, नेहा बागवे ठाणे, सुरेखा शिंदे ठाणे.

खूप छान उपक्रम ऑल दि बेस्ट
– अनिता पालकर. मुंबई

छान माहिती आर्टीपेडिया ची
– संपदा बेहरे पनवेल, मेधा नेने नासिक.

राग आणि थाट याबदद्ल माहिती देणार… हा खूप स्तुत्य उपक्रम 👍
– पद्मजा नेसरीकर. पुणे

डॉ किरण ठाकूर यांचा लेख माहितीपूर्ण आहे.
त्या निमित्ताने केळकर आणि वाङ्ममयशोभा यांची आठवण ताजी झाली.
– प्रा डॉ अंजली रानडे. मुंबई.

सौ.अलकाताईंचा पुनर्जन्म….
कॅन्सर म्हणजे “काॅमा”
फुल स्टाॅप नव्हे !…
अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपयुक्त स्वानुभव फारच छान ! धन्यवाद.
– विश्वनाथ मोरे. मुंबई.

🪟खिडकी🪟
खिडकीला मानवी रूप दिलेले भावले.

‘माहिती’ तील आठवणी : २
सुधाकर धारव यांनी विनोबांच्या देहत्यागाचे वर्णन मन हेलावून टाकते
– डाॅ.सतीश शिरसाठ.

माहेरवाशीण
Heart touching, written so well
– श्री.महेंद्र श्रीधर भाबल

🌹खूप छान कविता. सुंदर शब्द रचना 🌹
एक खिडकी खूप काही सांगून गेली.
Nice to see more
🌹🌹
– अशोक बी साबळे

आर्टीपेडिया म्हणजे काय ?
Farah chhan , stutya upakram, khup mahiti yatun milu shakel.
– अनिता काशस्वर.

🌹खूप छान माहिती🌹
नवीन पिढीला प्रेरणादायी
🌹🌹
– अशोक साबळे

Nice,
Meetkalakar Team is a platform for all art lover..
Art a skill or something that needs skill..
Thank you
– सायली संत.

‘क्लिक’
वा ! अनुराधाताई ! वेळ या विषयावर किती सुंदर लिहीले आहे !

आपलं आरोग्य, आपल्या हाती
कॉमा हे पुस्तक नक्कीच आरोग्यासाठी आणि व्याधींशी झुंज देणार्‍यांसाठी दीपस्तंभच !
अलकाताई तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

‘बातमीदारी करताना’ ( ३० )
नाना केळकर आणि वाङमयशोभा हे एक घट्ट समीकरण.
डॉ. किरण ठाकूर यांनी त्यांच्या छान आठवणी लिहील्या आहेत.
साहित्य क्षेत्रातील ही माणसे अनमोल आहेत.

लालबत्ती ( २५ )
जन्नत या कथेचा प्रत्येक भाग वाचताना मन पिळवटून जाते.
दुनिया तो मरनेतक जिने नही देती….किती विदारक सत्य आहे हे !
राणी ताई, जीवनाचे हे अत्यंत करुण दर्शन तुमच्या लेखातून होते. तुमच्या संशोधनात्मक आणि मानवतेचा दृष्टीकोन बाळगून केलेलं हे लेखन अनमोल आहे.
– राधिका भांडारकर.

आपलं आरोग्य, आपल्या हाती
Congratulations ! 🙏🏼
Sister Alka Jee, A Great Warrior In India and Brother Devendra Jee A Great Facilitator Of India.

They Both have inspired into my life and in helping me to motivation through the stories of real life people, that has helped me to come out of my comfortable position to take uncomfortable action steps for moving forward in my life and business.

I Wish Them All The Best In Their Life and Business.
Thanks and Best Wishes 🙏🏼
– Dr. Anil Kumar Nagdev.

आरोग्य दिनानिमित्त, अलका तुझ्यावर आलेल्या आजारावर तू मात करून, विजय मिळवलास. हया तुझ्या धैर्यास, व त्यावेळी तुझे पती देवेंद्रसर, मुलगी देवेश्री, तसेच सकारात्मक तुला लाभलेले डॉक्टरस, तुझ्या पाठीशी उभा राहिलेला एमटीएनएल चा मित्र परिवार, यांस माझा त्रिवार सलाम !
सुंदर शब्दात सारी उपयुक्त माहीती लिहिली आहेस ! खूप मस्त !
अशीच सर्वांनी स्वतःची, कुटुंबाची, मित्र परिवाराची व समाजाची काळजी घ्या.

“मला वाटते”
खूप सुंदर कविता ! प्रा.सुमती मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

‘जीवन प्रवास’ ( २२ )
अतिशय छान लिहिलंय, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता ते दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत याची खंत वाटतेय 😔
– मंदाकिनी गाडे

Great piece of article. I appreciate your writing talent. All the events before the retirement has been narrated with pictures. The surprise part is that all the characters involved in the retirement process has not been forgotten. To be honest, i don’t read any large content but your article has drawn my attention to read it 2-3 times. All memories once again became fresh in mind. Thank you for your heart touching article.
– प्रभातकुमार पांडये.

पैसा धन खोटे ..सुरेख कविता.
जीपी एक बदल सुचवू का?
पैशाची नसावी ऊर्मी च्या एवजी पैशाची नसावी गुर्मी… असे घेतले तर ?
– राधिका भांडारकर.

‘जीवन प्रवास’ ( २२ )
अतिशय उत्तम लेखन आहे. थेट काळजाला भिडते. कविता खूपच अर्थापूर्ण, प्रत्येक व्यक्तीचे येथोचित् वर्णन केले आहे.👌👌👌🌹🌹
– श्री.महेंद्र श्रीधर भाबल.

“ओठावरलं गाणं”
गाणं छान निवडलं आहे. आनंद शब्द म्हटला तरी आनंद गगनात मावेनासा होतो. वर्णन खूपच छान केले आहे. धन्यवाद.
– निलाक्षी पिसोळकर.

लघु कथा : बिल पेड..
अतिशय सुंदर कथा राजेश गायकवाड यांची.
आयुष्यात निस्वार्थीपणाने केलेल्या चांगल्या कामाची परतफेड कधी ना कधी होतेच.. म्हणून संचय असावा तो सत्कर्मांचा. हेच खरे..
– राधिका भांडारकर

बालकाव्यधारा २
स्तुत्य उपक्रम आहे कविता करणार्‍यांना प्रोत्साहनकविता करणार्‍यांना प्रोत्साहन मिळेल यातून
– प्रदीप जगताप.

पुस्तक परीक्षण : रॉय आणि बॉय
छान. पुस्तक वाचायला आवडेल.
– सारिका पत्की.

झोका
मस्त
– दीपाली दातार.

आमचे अण्णा
मंजुषाताई किती भाग्यवान आहात तुम्ही की असे देवपण लाभलेल्या व्यक्तीची तुम्ही कन्या आहात! समाजाला अशा माणसांची खरोखरच खूप गरज आहे. अशी सेवाभावी, ध्येयवादी, श्रद्धावान माणसं हा मानवी जीवनाचा आधारअसतो.
माझे मन:पूर्वक वंदन !!
– राधिका भांडारकर.

देवेंद्र सर नमस्कार 🙏 मेघना साने यांनी प्रभाते मनी या चॅनल साठी घेतलेली तुमची मुलाखत पाहिली. मेघना मॅडमनी नेमके प्रश्न विचारून तुम्हाला बोलतं केलं आणि तरूण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी माहिती तुमच्या उत्तरांमधून आमच्यापर्यंत पोचवली याबद्दल मेघना मॅडम आणि तुम्हालाही धन्यवाद 🙏
– विकास मधुसूदन भावे.

घाट आंबोलीचा अतिशय सुंदर कविता लिहीली आहे वाचताना प्रत्यक्ष घाटात अनुभव घेत आहोत असं चित्र नजरेसमोर उभ राहिल 👌👌👍👍💐💐
– माधवी डहाळे.

“सखी”
किती सुंदर कल्पना, समर्पक वर्णन केल आहे. 👌👌👌
– लीना फाटक. यु.के.

प्रेरणा
खरंय सुनंदा, लिहायला कोणाचीतरी प्रेरणा लागते. मग आपोआपच शब्द मनांत सुचायला सुरूवात होते. मलाहि भुजबळ दांपत्यांमुळेच प्रेरणा मिळते. 🙏🙏🙏 त्यांचे मनापासून आभार आहेत. असच खुप लिखाण तुझ्या लेखणीतून झरझर उतरू दे.
– लीना फाटक. यु.के.

कोरोनानंतरची माझी अमेरिका वारी
मोहना अतिशय उत्तम लेख! खूप खूप कौतुक❤
– प्रतिभा सराफ.

वाह मोहनाताई कोरोना नंतरची तुझी अमेरीका वारी फार सुंदर वर्णन केले आहेस.
– धनंजय.

आमचे अण्णा
वाह ! खूप छान आणि प्रेरणादायी.
– व्यंकटेश.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं