खुपचं छान विशेषांक.
क्रांतीसूर्य महात्मा फुले, हा अग्रलेख आवडला👌
– आशा कुलकर्णी
प्रिय भुजबळ साहेब अशा प्रकारे नामवंतांच्या लेखांचे संकलन करून एक खास पुस्तक प्रसिद्ध झाले तर ते अनेकांना कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरेल असे वाटते थोडक्यात ते एक Documenteshan स्वरुपात कायमस्वरूपी राहील.
– निरंजन राऊत. विरार
तरुणांनो, नाउमेद होऊ नका…. फार छान🌹
– प्रा विसुभाऊ बापट.
भुजबळ साहेब,
आपले सर्वच अंक विविधतेने नटलेले असतात. आजचा अंक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलू वर प्रकाशझोत टाकणारे आहेत. सर्व लेख संग्रही ठेवण्यासारखे आहेत. राधिका भांडारकर यांच्या लेखाने संविधानासंदर्भात सामान्य माणसाला सहज समजेल अशा शब्दांत मांडणी केली आहे. उर्वरित सर्व लेख आपण स्वतः लिहिले आहेत. तुमचे व भांडारकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
– दिलीप गडकरी. कर्जत, जि-रायगड
आमच्यातुन एकतरी बाबा साहेब निर्माण व्हावे….खूप छान प्रतिभा ताई !
– सुधा गोखले
बाबासाहेबांच्या पत्रकारितेविषयी इतकी सखोल माहिती कधीच वाचली नव्हती.
खुपच छान माहिती. धन्यवाद सर 🙏
– आशा दळवी. फलटण
प्रतिभा, सुरेख कविता 🌷🌷
अजून किती दिवस भूतकाळात जगायचं ?
– जयश्री भिसे
अलकाताई जागतिक आरोग्य दिन. या दिवशीं
कर्करोगाची घेण्याची काळजी वाचली.
मन भूतकाळात गेल. काश त्यावेळी, साधारण 24 वर्ष
होऊन गेले त्या गोष्टीला. त्यावेळी अशी, एकाधीतरी
देवदूत व्यक्ती भेटली असती !!
या जर तरच्या गोष्टी, माझे सौभाग्य धोक्यात आहे
हेच खुप उशीरा कळलं. हे नावांप्रमानेच विनोदी होते.
हसतंच हि बातमी मला सांगीतली तोपर्यत मी अज्ञातच होते म्हणाले, “क्यानर म्हणजे क्यांसल !!”
अस नेहमी सांगायचे, तोपर्यत खुप उशीर झाला होता.
दोन महिणे अंथरूणावर होते फक्तं अशक्तपणा होता.
हळुहळू अंन्न खाण कमी झाल, फुफ्फुसाचा असल्याने
मला वेडीला कळलेच नाही. मी देहभान विसरून
सदैव त्यांच्या सोबत होते. आता त्या आठवणी आल्यातरी मन, डोळे अश्रुंनी भरून येते.
नको त्या आठवणी. अलका तु छान बरी झालीस
हेच आता महत्वाचं आहे.
त्यावेळीअसे देवदुत भेटलेअसते तर या कटू आठवणी आल्या नसत्या. तुला भरपुर निरोगी व आनंदी आयुष्य मीळु दे.
तुझी मावशी,
– सुरेखा तिवाटणे.
सरं योग्य वाटल्यास छापा.कटु आठवणी वाचून
कोणाचं मनं दुखवायचा माझा हेतु नाही.
क्षमस्व
माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर सुरेश भट त्यांच्या हस्तक्षरात नवीन कविता लिहून देत, त्याखाली सही करीत, अशा डायऱ्या मी जपून ठेवल्या आहेत🙏🏼
-प्रकाश कथले. पत्रकार. वर्धा
गझलसम्राटाची गझल,
👌👌 छान लेख.
श्रीकृष्ण बेडेकर नेहमीच छान लिहितात.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,
सुरेश भट – लता मंगेशकर, उंबरठा !
तरुण आहे रात्र अजुनी, सुरेश भट-आशा भोसले
प्रासंगिक म्हणून ही गाणी, अन्यथा तुम्ही ही अनेकदा ऐकली असणारच !
– विजय दळवी. नवी मुंबई.
न्युज स्टोरी टुडेने,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, देवेन्द्रजी भुजबळ यांच्या अभ्यासपूर्ण माहितीचे प्रसारण म्हणजे एक पर्वणीच होती. भुजबळ यांना प्रत्येक घटनेचा किती सखोल अभ्यास आहे याची प्रचिती येते. बाबासाहेबांची प्रेरक पत्रकारिता आजच्या काळात किती दिशादर्शक आहे याची नोंद भुजबळ सरांनी घेतली आहे.स, संविधानाचा हा लेख राधिका भांडारकर यांनी अगदी नेमका आणि महत्व पटवून देणारा लिहीला आहे .ज्ञानपुन्ज बाबासाहेब आणि कविता हे सगळेच अतिशय अभ्यासपूर्ण लेख आवडले.
मी व्यक्तीश: देवेन्द्रजी भुजबळ यांचे आणि त्यांच्या टिमचे हार्दिक अभिनंदन करतो .
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार. नांदेड
“माहिती”तील आठवणी….
सर आपले कार्य खूप थोर आहे. 🌹🌹🙏
– अशोक साबळे
👌🏻 छानच प्रतिभा 🌹🙏. जनमानसात डॉ. आंबेडकर यांची शिकवण खऱ्या अर्थाने रुजावी असे वाटते.
– कवयित्री पुष्पा कोल्हे
Wah ! Those old Mumbai Doordarshan day’ z 👏👏👌👌💐
– Sangita Satoskar. Mumbai.
“माहिती”तील आठवणी…
मी पण तुझा ऋणी आहे
विसरला नाहीस म्हणून.
– अजित नाईक. जेष्ठ कॅमेरामन, मुंबई.
मी असा हा…
ही दीपक शेडगे यांची कविता खूप आवडली.
– प्रा अजित मगदूम. नवी मुंबई.
भुजबळ सर, माहिती तील आठवणी या सदरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरण प्रसंगाच्या आठवणी चे शब्दांकन आवडले. आपण आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकालात किती महत्त्वाच्या पदांवर काम केलेत, आणि उल्लेखनीय उपक्रम, योजना राबवल्या आहेत, हे खरंच फार मोठे योगदान आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के.पी.सोनावणे होते, त्यांच्या कार्यकाळात माझ्या वडीलांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून १०० हून अधिक जाणीव जागृती चे कार्यक्रम यशस्वी केले. मी १० वर्षे औरंगाबाद येथील सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अदवंत सरांच्या सहकार्याने आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. बक्षिस वितरण समारंभ कुलगुरूंच्या हस्ते होत असे. पण दुर्दैवाने आता पुर्वी सारखें सहकार्य महाविद्यालयांकडून मिळत नाही. मिलींद महाविद्यालयात तर एका वर्षी पथनाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गेले सहकार्याचे दिवस.
– आशा कुलकर्णी
महासचिव, हुंडा विरोधी चळवळ. मुंबई.
“माहिती”तील आठवणी
हा लेख फार छान आहे.
– वंदन कुलकर्णी. निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे.
नमस्कार .
सगळी सदरे सुंदर आहेत. “गझल सम्राटाची गझल” हे ही खुपच छान होतं.
माहितीतील आठवणी हा तुमचा लेख ही आवडला. मराठवाडा विद्यापीठाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण करतानाही तूमचा सहभाग लाभल्याचा आनंद लेखातून व्यक्त झाला .तसंही तुमचे सर्व कार्य महानच आहे . तुमचे लेख वाचुन तुमच्या विषयीचा अभिमान आणखी वाढत जातो .
धन्यवाद सर .
– कवयित्री आशा दळवी फलटण, सातारा .🙏
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ला किती जागरूक वाचक आहेत याचा एक नमुना आज अनुभवायला मिळाला. माझ्या बातमीदारी करताना या लेखात असलेला एक उल्लेख बरोबर नाही असं ज्येष्ठ पत्रकार डॉ मिलिंद कोकजे यांनी पोर्टल आज प्रकाशित होताच फोन करून मला कळवल. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात लोकसत्ता हे दैनिक त्यावेळी प्रकाशित होत नव्हतं असं मी लिहिलं होतं. ते बरोबर नाही कारण त्यावेळी लोकसत्तेचा पहिला अंक चौदा जानेवारी १९४८ रोजी प्रकाशित झाला. त्याच्या रात्रपाळीवर डॉ मिलिंद कोकजे यांचे पिताजी श्री तुकाराम कोकजे उपसंपादक म्हणून काम करत होते असं त्यांनी आस्थापूर्वक कळवलं आहे. त्यांचे मनापासून आभार.
– प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे
:डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता हा लेख अभ्यासपूर्ण वाटला. बरीच माहिती मिळाली आंबेडकरांच्या कार्या बद्दल त्यांना त्रिवार वंदन🙏🏻
स संविधानाचा या लेखात किती छान सखोल माहिती दिली आहे राधिका ताईंनी.🙏🏻
1942 ते 1946 या चार वर्षात बाबासाहेब यांनी कामगारांसाठी अनेक योजना आणल्या स्त्री पुरुष कामगारांना समान वेतन केले. स्त्रियांना बाळंतपणाची रजा लागू केली. कामाचे तास 12 वरून 8 वर आणले अनेक विमा योजना आणल्या कामगार कल्याणा अनेक योजना राबवल्या.खूप उपकार आहेत आम्हा कामगारांवर. कामगारांसाठी भरीव योगदान हा देवेंद्र भुजबळ सर यांचा लेख खूप छान वाटला.
बाबासाहेबांबद्दल खूप छान माहिती पूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारा सुंदर लेख भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट. थॅन्क्स भुजबळ सर.
बाबासाहेब काही कविता या सदरातील सर्वच कविता अत्त्यूतम👌🏻
तरुणांनो कधीही नाउमेद होऊ नका ही देवेंद्र भुजबळ सरांनी कळकळीने घातलेली साद आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा माहीती संचालक पदावरून ते निवृत्त झाले. समाज प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शनपर बरीच पुस्तके पण लिहिली आहेत. तरुणांनी असफल झाल्यावर आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये.असे ते सांगतात. आजच्या काळात असे आदर्श असणे गरजेचे आहे. धन्यवाद भुजबळ सर.
असामान्य शिक्षक श्री खंडेराव राऊत यांच्या कार्यावर आधारित खूप छान लेख वाचनात आला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन धन्यवाद शंकर मोदगेकर सर.
गोल असे ही दुनिया…. या गाण्याचे खूप सुंदर रसग्रहण ओठावरील गाणे या सदरात विकास भावे यांनी केले आहे.
खूप छान कविता नेहा ताई आणि मुलगा मुलगी अशा जुळ्यांच तुमच्या कडे पदार्पण झालं त्याने तुम्ही हरखून जाणे साहजिकच आहे. प्रितूच आणि तुमचं खूप खूप अभिनंदन.
सेतू चॅरिटेबल ट्रस्ट वंचित मुले मुलींसाठी खूप छान काम करत आहे. त्यांना पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
पद्मश्री आणि इन्फोसिस च्या चेअरमन सुधा मूर्ती या सर्व श्रुत आहेत. त्यांची साधी राहणी आणि सरळ साधी सुंदर लेखन शैली मानाचा ठाव घेते. सुधाकर तोरणे यांनी आयुष्याचे धडे गिरवताना या सुधा मूर्तींच्या पुस्तकाचे खूप छान परिक्षण केले आहे.पुस्तक वाचावेसे वाटते आहे.
लेखिका, कलाकार मेघना साने यांच्या विषयी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद भुजबळ सर. मेघना ताईंना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
मंजुषा किवडे यांनी मैत्री या नात्याची खूप सुंदर व्याख्या सांगितली आहे. खरच आपली सुख दुःख शेअर करण्यासाठी आपल्यावर प्रेम करणारी आपल्याला तिची ओढ लागावी अशी छान मैत्रीण प्रत्येकाला असावी. सावळ्याच्या राधेवानी हे वाक्य खूप भावले.खूप आवडली मैत्री कविता धन्यवाद मंजुषा ताई.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील सुंदर लेख, महात्मा फुले यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा लेख .अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेख वाचायला मिळाला धन्यवाद भुजबळ सर.
सूर्याची कथा सतीश शिरसाठ यांचा महात्मा फुले यांच्या वरील उत्तम लेख.
महात्मा फुले यांच्या १९५व्या जयंती निमित्त खूप सुंदर लेख वाचायला मिळाले.
स्त्री स्वातंत्र्य बद्दल सांगणारा सुमती पवार यांचा लेख अप्रतिम खरचं महात्मा सावित्री बाईंच्या पाठी ठाम उभे होते म्हणून त्या खूप काही करू शकल्या. पण आज स्त्री शिकली कमवती झाली तरीही पुरुषांची मक्तेदारी कायम आहे. हे अतिशय छान शब्दात सांगितले आहे.
महात्मा फुले यांच्या वरील सर्वच कविता अत्युत्तम आहेत .
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई.
“ओठावरलं गाणं”
मस्तच रसग्रहण. माझे आवडते गाणे
– सुमेधा साठे.
‘बातमीदारी करताना’ ( ३० )
नानांना श्रध्दांजली वाहण्याच्या निमित्ताने ठाकूर सरांनी पुर्वी लिहिलेला लेख नानांचे सविस्तर कार्य डोळ्यासमोर उभे करतो.
सुमतीताई पवार यांचा, सर्व जोतिबा कधी होतील ?’ हा लेख जोतिराव विचारांच्या कृतीची आज किती नितांत गरज आहे हे सांगणारा आहे. सुमतीताई या प्रतिथयश कवयित्री आहेतच त्यांची लेखक म्हणूनही ही मांडणी प्रभावी आहे.
क्रांतीसूर्य महात्मा फुले
म.फुले हे आपल्या देशातील समाजपरिवर्तनाचे जनक. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे कार्य अजोड आहे. क्रांतिसूर्य म.फुले हा देवेंद्र भुजबळ सरांनी लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण आहे. जोतीरावांच्या जीवनकार्याचा परिमाणकारकपणे त्यांनी आढावा घेतला आहे. हा लेख संदर्भासाठी उपयुक्त आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ
सूर्याची कथा
🌹खूप विचारपूर्वक लेख लिहिला आहे 🌹
अप्रतिम सर 🌹🌹
क्रांतीसूर्य महात्मा फुले
🌹अभिनंदन भुजबळ सर, प्रत्येक शब्द नं शब्द प्रेरणा देणारा आहे. नवीन पिढीला या बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. असं लिखाण पोहचवीन खूप गरजेचे आहे.🌹
ज्योतिबा : काही कविता
🌹कधीही नं वाचलेल्या कविता, आपण खूप प्रभाविपणे मांडल्या आहेत.🌹खूप सुंदर 🌹
– अशोक बी साबळे. Ex. Indian Navy
🪟खिडकी🪟
खूप सुंदर कवी कल्पना
– विलास कुलकर्णी.
सूर्याची कथा
कर्जतची साहित्यिक कामगिरी, भौगोलिक स्थान व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे पुस्तकांचे गाव असणे योग्य ठरेल.
– डाॅ.सतीश शिरसाठ
समस्त मालुसरेंचा होणार सन्मान
🌹proud to be 🌹
Vice Admiral मुरलीधर पवार साहेब हे माझ्या खूप जवळचे ओळखीचे आहेत. 🌹
The Real Hero of Indian Navy 🌹
– अशोक साबळे.Ex. Indian Navy
“ओठावरलं गाणं”
मधुकर जोशी यांनी त्यांच्या या गीतांमध्ये गरीबांची वेदना उत्तम पद्धतीने मांडली आहे. रोजच्या जीवनातील अनुभवांची सुरेख शब्दात मांडणी केली आहे. गोविंद पोवळे यांनी संगीत देऊन ते गायले आहे. अनेक मराठी गाण्यांपैकी माझं हे एक आवडत गाण. नेहमीप्रमाणेच रसग्रहण उत्तम झाले आहे.
– विवेक भावे.
चतुरस्त्र मेघना साने
मेघना ताई साने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांनी लिहलेला लेख खूप आवडला. त्यांची यशस्वी कारकीर्द वाचून नक्कीच खूप काही गुण घेण्यासारखे आहेत.
इतक्या यशस्वी आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाची आज लेखाच्या रूपाने ओळख झाली.
ताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..
– प्रकाश फसाटे. मोरोको
मैत्रीण
🌹खूप सुंदर कविता. मैत्री च्या नात्याची आठवण करून देणारी. 🌹
🌹अप्रतिम 🌹
🌹धन्यवाद सौ. मंजुषा किवडे 🌹
– अशोक साबळे. Ex. Indian Navy
अजेय : “ऋतूआरोह”
संस्था खूप चांगले कलाकार घडवत आहे. तिला मी देखील आर्थिक मदत देणार आहे.
– विलास कुलकर्णी.
मैत्रीण कविता भावली.
आयुष्याचे धडे गिरवताना हा तोरणे यांचा लेख वाचनीय आहे.
सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके वाचली. त्या जशा संवेदनशील मनाच्या समाजसेविका आहेत तशाच उत्तम लेखिकाही आहेत. योग्य शब्दांच्या वापरातून त्या संपूर्ण प्रसंग पुढे उभा करतात.
मेघना साने यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या लेखात त्यांच्या कार्याचा नेटका आढावा घेतला आहे
– डाॅ.सतीश शिरसाठ.
बाबासाहेब : काही कविता..
आजच्या NST मधून क्रांतीसूर्य महामानव आंबेडकरांना अतिशय उचीत, आदरपूर्वक, प्रेमादराने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्वच लेख उल्लेखनीय.
भारतातील हे अनमोल रत्न ! परमपूज्य..!!
– राधिका भांडारकर.
“ओठावरलं गाणं”
सुंदर. विषयावर लिहीले आहे तो रुपया मोलाचा
त्याची साथ फिरवते आणि आपणही त्याची फिरत बघून हरखतो
– सुरेश सदाशिव परांजपे.
काही असले तरी हे जग रुपयाभवती फिरते हे भावे सरांनी या गाण्यातून सुंदर शब्दांत रसग्रहण केले आहे.
– निलाक्षी पिसोळकर
तरुणांनो, कधीही नाउमेद होऊ नका ! – देवेंद्र भुजबळ
प्रेरणादायी मुलाखत भुजबळ सर! आवडली.
– प्रतिभा सराफ.
खूपच प्रेरणादायी मुलाखत, धन्यवाद सर
– अशोक साबळे.
नमस्कार, खुपच प्रेरणादायी मुलाखत. शाळेतील मुलांना, तसेच तरूणांना ही उपयोगी. धन्यवाद सर.
– सोमनाथ साखरे.
ज्ञात अज्ञात
जीवनातील आनंदाला सुरेख शब्दांत गुंफले आहे. अभिनंदन
महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ हे आपल्या अनुभवांतून तरूणांना जो संदेश देतात तो निस्चितच प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द न सोडता कष्ट, सतत शिकण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि समाजप्रबोधनाची इच्छा यातून त्यांनी सतत विविध माध्यमांतून तरूणांना प्रेरणा दिली आहे. विविध मुलाखती, विविध पुस्तके, पोर्टलवरून ते अव्याहतपणे हे कार्य करीत आहेत हे स्तुत्य आहे.
अ.भा.म.सा.प.च्या मुंबई शाखेतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले संमेलनाचा नेटका आढावा. या संमेलनातून महिलांच्या जीवनासंबंधी विविध विषयांवर चर्चा, कवितांचे सादरीकरण झाले हे अभिनंदनीय.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ‘ हा देवेंद्र भुजबळ सरांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. अस्पृश्य समाजघटकांच्या सामाजिक न्याय, प्रबोधन अशा समाजाभिमुख तत्त्वांसाठी बाबासाहेबांनी सुरु केलेल्या विविध नियतकालिकांतून केलेल्या लिखाणाचा वाटा मोठा आहे. व्यक्तिपूजेचा धिक्कार, निर्भीड पत्रकारिता आणि त्याला त्यांनी सामाजिक चळवळींची दिलेली जोड ही बाब खूप निर्णायक ठरली.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
चतुरस्त्र मेघना साने
चतुरस्त्र लेखिका मेघना ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारा खूप छान लेख. मेघना ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐🎂🎂
– राजेंद्र ठाकूर.
प्रा डॉ किरण ठाकुर: वांग्मय शोभा फारच उत्तम. मी ही हा अंक लहानपणी वाचत असे पण त्यमागे एव्हढी देदीप्यमान कामगिरी असेल ह्याची अजिबात कल्पना नव्हती. या लेखामुळे विस्तृत माहिती मिळाली. 👏👏
– नितीन सप्रे. नवी दिल्ली
प्रा डॉ किरण ठाकुर: भल्या माणसांच्या भल्या आठवणी।
ग वा बेहरे वर टीका, बाळ गांगलावर पण केली असेल!
आपल्या कामाशी प्रामाणिक राहून, तथा झोकून देऊन काम करणारी माणसे अशी कमीच असतात।
मस्त लिहल, अभिनन्दन।
👏👏 – अमर पांडे, सांगली
प्रा डॉ किरण ठाकुर: म.म.केळकरांची सय मनाला भावली.असे विक्षण व ज्ञानी संपादक आता विरळाच.धन्यवाद.
– सुरेशचंद्र पाध्ये, सकाळ pune che सेवानिवृत स्थानीय संपादक.