सुंदर लेख आहे, जीवनाचे सत्य चित्रण उभे केलेले आहे, सर 🙏🙏🙏
– डी सी राठोड. कल्याण
नमस्कार सर मी आपल्या पोर्टलमधील सर्वच्या सर्व लेख मला वेळ मिळेल तसे वाचते. खुपच माहितीपूर्ण लेख लिहिले असतात. खुपसे लेख प्रेरणादायी असतात. तुम्हीं सांगीतल्या प्रमाने मी ज्या त्या लेखा खाली प्रतिक्रिया लिहिते .तुमच्यामुळे आम्हांला इथे शेताच्या बांधावर बसून साऱ्या जगभरचे ज्ञान मिळते याचा मला खुप आनंद वाटतो.आले आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावेत हेच सुचत नाही .सर मी तुमच्या सदैव ऋणात राहिण .तुमच्या मुळे आम्हां सर्वांनाच हे व्यासपीठ उपलब्द झाले. धन्यवाद। सर
🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांशी खेळणारे असलो जरी कवी
शब्दही तोडके पाडणारी
आणली तुंम्ही जीवनी ही घडी
शतशः प्रनाम तुम्हांस माझे
अजन्मे राहेन ऋणी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– कवियित्री आशा दळवी, फलटण, सातारा.
आजची स्त्री मुक्त आहे का ?
विचार करायला लावणारा लेख 👌🏻
– मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
आपलं राजभवन : सुंदर लेखन, वाचनीय, परिसराचा फेरफटका मारत असल्याचा जणू भासच झाला 🙏. धन्यवाद टीम एन एस टी.
– साहेबराव पुंड. निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,
अमरावती.
सर जसा वेळ मिळतोय तसे तुम्ही पाठवलेले पोर्टलवरील सदर वाचत राहते. खरच एक नवी दिशा व उर्जा मिळतेय वाचताना खरच न्यूज स्टोरी टुडेला मनापासून नमस्कार असच छान दर्जेदार वाचन वाचायला मिळेल या सदिच्छा 💐 💐 🙏🙏
– माधवी ढवळे. राजापूर
पुस्तकांचा चौकार आणि आपल राजभवन वाचनीय आहेत. उदबोधक साहित्य प्रकाशित केल्याबद्दल भुजबल यांना धन्यवाद…. 👌🏻👌🏻👌🏻
– सुधाकरराव धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
साहसी नेहा..अप्रतिम लेख👌👌सलाम नेहाच्या जिद्दीला👏👏
सर्वच सदर सुंदर आणि वाचनीय👍👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई
खूपचं सुंदर मांडणी केली आहे.
साहित्यिक प्रेमाने हे सर्व आपण आपुलकीने करता हे महत्वाचे आहे.
आपले मनःपूर्वक खूप, खूप आभार.
– अशोक मुळे. डिंपल पब्लिकेशन. मुंबई
नमस्कार सर
साहसी नेहा हा लेख खूप आवडला..
नेहा यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
त्यांच्या जीवन प्रवासातून खूप काही शिकण्यासारखे आहे..
शोभा ताईंनी खूप सविस्तर लेख लिहला..
दोघींचे खूप अभिनंदन 💐💐🙏🙏👍👍
– प्रकाश फासाटे. मोरोक्को
🕉️🏋🏻♂️आपण लिहिलेल्या ‘गगनभरारी‘ पुस्तकातील प्रत्येक महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. आपण त्यातील अनेकांना प्रथमतः सादर केले त्या़ंच्या यशोगाथा आदर्श घेण्यासारख्या आहेत. या पुस्तकलेखनाद्वारे आपली झेप देखील तशी गगणाला भेदणारी आहे असे म्हटल्यास अनाठायी ठरणार नाही. देवेंद्रजी, आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच प्रकारे पुढील पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
डॉ. सतीशजी शिरसाठ यांनी लिहिलेले परिक्षण देखील उद्बोधक आहे. त्यांचेहि अभिनंदन….
– 📕सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक.
नाशिक
श्री देवेंद्रजी भुजबळसाहेब,
“मीपणा सोडा आनंदी व्हा”
२५.०४.२०२२
या लेखास वाचकांचा भरपूर प्रतिसाद / लाईक मिळाले.
वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया पाठवीत आहे .
आपले मनःपूर्वक आभार
🌹🙏🙏🌹
– दीपक जवकर, डोंबिवली.
नमस्कार, श्री. जवकर साहेब,
अतिशय सुंदर शब्दात आपण मनोगत व्यक्त केले आहे. खरे तर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, दुःख, मान सन्मान घडत असतात. परंतु लोकांनी आपल्यामुळे इतरांना आनंद देण्याचे ठरविले तर आणि तरच सगळ्यांचे जगणे सुकर होऊन जगण्याची उमेद निर्माण होईल…..
आपण व्यक्त केलेले विचार प्रबोधक आहेत. आपल्या विचारांना माझा सलाम 🙏
-सौ. शोभना अकर्ते, मराठी भाषा अभ्यासक, ठाणे
श्री. जवकर साहेब खुप सुंदर व चांगला विचार करायला लावणारी पोस्ट आहे, सत्य परिस्थिती मांडली आहे तुम्ही. अगदी योग्य आहेत तुमचे विचार आणि तुम्ही नेहमीच हे विचार आचरणात आणलेले आम्ही बघितले आहेत अनुभवले आहेत.
HATSOFF JAVKAR SAHEB👍👍✅
– सौ वैशाली तरे. विरार
Superb writeup Mr. Javkar. 👌👌👍👍🌹🌹🙏🙏.
– Mrs. Shenoy Borivali
हेमंत साने सर,
अगदीच खरे आहे. वयात मुले आल्यावर निर्णय त्यांना घेऊ देणे आवश्य आहे वडिलधारे वा जेष्ट असलो तरी काही गोष्टी बघत राहणेच योग्य आहे.
– शोभा कोठावदे. नवी मुंबई.
अंक खूप छान आहे. आवडला. पुस्तक परीक्षण वाचून तुमचे पुस्तक विकत घ्यावेसे वाटतेय. कुठे मिळेल ?
संध्याछाया एक अनोखा लेख सुंदर छायाचित्रांनी, मोहकशब्दात रंगलेला आहे.
लालबत्ती ठाव घेणारी कथा / कादंबरी / दीर्घ कथा आहे.. .पण त्यात हिंदी शब्दांच्या काही मानक वर्तनी च्या चुका आढळतात…त्या मुद्दाम तशा लिहिल्या आहेत की टंकन दोष ?
होनराज यांचे कौतुक..माझे ही अभिनंदन
सुट्टी कविता छान, सेवाग्राम च्या लेखामुळे चांगली उजळणी झाली
‘मी महाराष्ट्र’ कविता आवडली
– स्वाती वर्तक मुंबई.
जेवणाच्या खूप तऱ्हा समजल्या 😀
– मनिषा पाटील. केरळ
दि.२९.४.२०२२ रोजीचे सर्वच विषय घरगुती असल्याने जिव्हाळ्याचे आहेत. संपादकास धन्यवाद..
– सुधाकरराव धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
यवतमाळ🌹🙏🌹
जेवणाच्या नाना तऱ्हा …अतिशय मजेशीर लेख👌👌 खूप आवडला.
सर्वच लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय👍👍🌹
– प्रणाली म्हात्रे. मुंबई
सामंत यांचे ग्रीन फार्म…. छान खूप जवळचे स्वप्न.
विलास कुडके यांचे उत्तम निरीक्षण लेख. पण त्यांनी वापरलेला अन्न हे (परब्रह्म) हा शब्द बरोबर आहे की अन्न हे पूर्णब्रम्ह हे बरोबर ?
– श्रीकांत चव्हाण. आर्कीटेक्ट, मुंबई.
🕉️डॉ किरणजी, आपण इतक्यातच निव्रुत होऊन चालणार नाही. आपण माझे मार्गदर्शक मित्र आहेत. आपण बातमीदरीच्या क्षेत्रात असतांना जे सर्वच स्थानिक पत्रकारांना हितोपदेश केलेला मला आठवतो. सर्व प्रथम आपली बातमी लागली पाहिजे हे आपले ध्येय मला माहित होते. माजी लष्कर प्रमुख वैद्य यांच्या पुण्यात झालेल्या हत्येची बातमी सर्व प्रथम आपणच देशाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतरच त्यावेळचे मुख्यमंत्री कै शंकरराव चव्हाण तांतडीने पुण्यात दाखल झाले. या सर्व प्रकरणाचा मी साक्षिदार आहे. इतरही अनेकदा आपण महत्वाच्या सर्व स्तरावरच्या बातम्या सादर करण्यात कमालीची आघाडी घेतली .हे मी जवळून पाहिले आहे.अशाच सर्वप्रकारच्या बातम्या, सोर्सेस यांचा मागोवा घेऊन एक पुस्तक आपण लिहावे असे मला प्रकर्षाने वाटते ते भावी पत्रकारांना निश्चित उपयोगी पडेल. श्री देवेंद्रजी कुठलाही पाठपुरावा करण्यात अग्रेसर असतात. त्यांनी डॉ. किरणजींच्या थोडे मागे लागावे. माझ्या पुण्यातील वास्तव्यात PTI आणि UNI यांच्यातील काँम्पिटिशनमध्ये UNI चे प्रमुख म्हणून आपण सदैव आघाडीवर होता याची माहिती मला होती व आपण त्यावर अनेकदा चर्चा देखील केली होती. शांत, संयमी, सात्विक संस्कारशील, मानवतावादी व्यक्तीमत्वामुळे आपण सर्वांनाच प्रेरणास्थानी होता आणि अजूनही आहात तरी एका सामान्य शिष्याची या विषयावर पुस्तक लिहिण्याची मागणी सत्वर पुर्ण करावी. आपले मनःपूर्वक अभिनंदन..
– 🏋🏻♂️सुधाकर तोरणे🏋🏻♂️
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
👌👌 अभ्यासपूर्ण लेखन. व कमी शब्दात ऋषि कपूर यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
धन्यवाद संदिपजी .
– डॉ. अविनाश टाकुर. राहुरी.
ज्येष्ठाची तरुणाई… वयागणिक बदलत आणि स्वीकारत जाणारी मानसिकता… कुटुंबाबद्दलची लवचिकता… वृद्धाश्रमाबाबत उगाच उहापोह न करता साकारलेलं सकारात्मक माझ्याही मनातील मनोगत 👌👍🙏🌸
– निशिकांत महाकाळ.
आज आपण अशा विषयाला स्पर्श केला की रोज दोन वेळा जेवण करीत असुनही, त्या च्या वर चवदार, लिहीण्याचा प्रयत्न केला. छान. अन्न हेच परब्रह्म समजून ताट धुऊन ते पाणी पिणारे, महाभाग मी पाहिले आहेत…… 🌹🙏🌹
सर्वच विषय घरगुती असल्याने जिव्हाळ्याचे आहेत. संपादकास धन्यवाद.. 🌹🙏🌹
– श्री सुधाकर धारव, माजी उपसंचालक (माहिती)
Quite interesting. I noticed in it ur faculty of minute observation of human behaviour. 👍🌹
– श्री रणजितसिंग चंदेल.
खूप छान, निरीक्षण,
अन्नाचा मान राखायला हवा,
सर तसेच चहा पितांना चे पण निरीक्षण करा ! काही अगदी फुरक्या मारून चहा पितात तर काहींना ओठाची विशिष्ठ हालचाल करताना बघून मजा येते, अनुभव घ्या ।।
– श्री रघु पाटील
👌🏻👌🏻👌🏻
– श्री अजय ध. अंबेकर, माजी संचालक (प्रशासन), माहिती व जनसंपर्क.
लेख उत्तम लिहिला आहे.
उत्तम निरीक्षण
– श्री प्रशांत पंडित.
जेवणाच्या नाना तऱ्हा,
सामंत यांचे ग्रीन फार्म…. छान खूप जवळचे स्वप्न. विलास कुडके यांचे उत्तम निरीक्षण लेख. पण त्यांनी वापरलेला अन्न हे (परब्रह्म ) हा शब्द बरोबर आहे की अन्न हे पूर्णब्रम्ह हे बरोबर ?
– श्रीकांत चव्हाण. आर्कीटेक्ट, मुंबई.
नोकरीच्या काळातील खूप छान आठवणी लिहिल्या आहेत. कामात सहकार्य करणारे सहकारी ही नोकरी मधील जमेची बाजू ! जी तुम्हाला लाभली ! (सद्यस्थितीत ही अतिशय दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे ) सर्वांचा आदर तुम्ही तुमच्या लिखाणात दाखवला आहे. इथून पुढचे निवृत्तीनंतर चे जीवन खूप आनंदात व निरामय जीवनात जावो ही देवाजवळ प्रार्थना !!
जेवणातील नाना तऱ्हा खूपच छान ! जेव्हा जेव्हा जेवायला जाईन (मी फार क्वचितच जाते ) तेव्हा या लेखाची आठवण होईल आणि नवीन काय दिसते याचा शोध सुरू होईल.
– सौ. नीता कुवळेकर.
फारच निरीक्षणातून आलेले चपखल बसणारे शब्द आहेत. मीही अशा अनेक ”भोजनभाऊं” ची निरीक्षणे केली आहेत. फुकट किंवा पार्टीला जायला मिळालेल्या बर्याच (विशेषत:अधिकाऱ्यांना) पहाण्याचं भाग्य मला लाभलं आहे. स्टार्टर्स मधील पदार्थ आणि मद्यपान या “सात्विक पेय” ही ”भोजनप्रिय” मंडळी आस्वाद (?) साॅरी.. साॅरी.. साॅरी.. वसुलीप्रमाणे ”सेव्ह” करतात ना तेव्हा मला गालात फुटाणे साठवत गालाची त्वचा फाटेल की नाही याची तमा न बाळगता साठवणुकीचा यज्ञ अव्याहतपणे सुरु ठेवणारे ते माकड, ह्या भोजनसम्राटांच्या पुढे अगदी कसपट भासते” हे झालं फक्त ”स्टार्टर्स” संदर्भात… मssssग अर्ध्या पाऊण तासाने जेव्हा मुख्य जेवणाला सुरुवात होणार अशा हालचाली सुरु होतात तेव्हा प्रश्न पडतो की आता हा बघुयात कशी खिंड लढवतो ते !! पण ते हो..!! अगदी उताराच्या रस्त्यावरुन गाडीचे इंजिन बंद केले तरी चालकाला जो अनुभव येतो ना.. तस्साच अनुभव.. मग मनात प्रश्न पडतो, इतका वेळ जे चाललं होतं ते काय होत ? अधिकारीच तो. अन्नावरही अधिकार गाजवणार.. असो खूप लिहिण्यासारखं आहे. सर आपण फार मार्मिकपणे शब्दचित्र रंगविलंत..!
माझ्याही निरीक्षणांमधील बारकावे आपल्या लेखात वाचायला मिळाल्यामुळे ”दोन मद्यापिंची बैठक रंगल्यावर त्यांना जो आनंद मिळतो”, त्याहून अधिक आनंद मी आपला लेख वाचतांना घेतला. फारच छान.
– डाॅ. गजानन सिताराम शेपाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता, सर ज.जी.उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई.
जेवणाच्या नाना तऱ्हा !
खुप छान ललीत लेखन करु शकता सर तुम्ही. खुप सुक्ष्म अभ्यासपूर्ण व चोखंदळ निरीक्षणातुन अस लेखन होत असत. अन्नदाता सुखी भव ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळे अन्नाचे सेवन व त्यापासुन होणारे प्रभाव मानवी जीवनावर खुप परीणाम करतात.
– उध्दवराव काळे, नाशिक
छान लेख जेवण जीवनावश्यक तसाच लेखही खुमासदार जमला आहे
– पद्माकर देशपांडे.
अप्रतिम लेख चौरस आहारची खूप आठवण आली प्रत्येकाच्या जेवणाच्या तऱ्हा अगदी बारकाईने मांडल्या खूप खूप धन्यवाद
– अनिल साळुंके.
‘बातमीदारी करताना’ ( ३३ )
अरेरे ! कधीतरी थांबायचे असतेच. योग्य म्हणजे यशस्वितेच्या ऐन भरात असताना थांबतो; तो चतुर. पण हे चातुर्य माझ्यासारख्या भुकेल्यांच्या मानसिक समाधानावरही आघात करते. असो…निर्णय स्वीकारून आजवर जे आपल्यामुळे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मीही हे लांबलेले पुराण लांबलेच असे वाटेल, या भयापोटी इथेच थांबतो.
सरग हे खुप मनस्वी व पत्रकारांच्या कामावर बारकाईने व प्रेमाने लक्ष ठेवणीरे दुर्मीळ शासकीय अधिकारी होते. त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर कायमच त्यांचे स्मरण करून देत राहील. त्याच्या आत्म्याला नक्कीच सद्गती मिळाली असेल. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली.
– सुरेशचंद्र पाध्ये.
अशी आई हवी…
🌹आई या नावातच सर्व काही आलं.
किती सोप्या भाषेत वर्णन केलं आहे. परंतु अर्थ खूप खोल आहे. आजच्या जगात वेळ नाही बाकी सर्व आहे.
कुटुंबातील संवाद कमी झालेत 🌹 सौं वर्षा भाबल धन्यवाद 🌹🌹
– अशोक साबळे.
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका
छंद, समाजकार्यात मन लावणे अशा अनेक गोष्टींचा सहजपणे उहापोह केलेला हा लेख फार आवडला.
हेमंत सानेजी अभिनंदन
– प्रतिभा सराफ.
‘क्रांतीवीरांच्या कथा’ ( ४ )
वाह स्मिताताई…! तुम्ही चंद्रशेखर आझाद यांचं प्रत्यक्ष चित्र , चरित्र आणि चारित्र्य डोळ्यांसमोर उभं केलंत…!
‘बातमीदारी करताना’ ( ३३ )
वाह, सर…! फक्त दहा दिवसांमध्ये एवढं महत्त्वाचं पुस्तक लिहिणं, आणि केवळ एका आठवड्यात त्याची छपाई करणं… दोन्ही चमत्कारच आहेत… तेसुद्धा आपापत: घडलेले नसून अंतिम तारीख डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक आणलेले आहेत. तुमचं आणि संजय नहार यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे…!
तुमचं ‘बातमीदारी करताना’ हे सदर गेले 32 आठवडे चालू होतं, ते आता बंद होणार, हे कळाल्याने रुखरुख लागली आहे. मनापासून धन्यवाद..!
– प्रशांत थोरात, पुणे
“माहिती” तील आठवणी ( ४ )
अतिशय सुंदर…!
माहिती व जनसंपर्क हे एक कुटुंबच आहे. या कुटुंबात अनेक अनुभव संपन्न अशी मंडळी होती आणि आहेत. प्रत्येका कडून काही ना काही शिकायला मिळलेच. मी तांत्रीक विभागात तर कुडके साहेब आस्थापना… कुडकेंना जो अनुभव या महासंचालनायात आला थोड्याफार फरकाने मीही अनुभवला आहे. व्यक्त होणं गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या जोडीने सर्वांनाच आनंद घेता आला. धन्यवाद.
जेवणाच्या नाना तऱ्हा !
छान..!
पोटाला आधार देणारी ही मंत्रालयातील अतीशय सुसज्ज अशी खानावळ. कढी असली की महिलांची त्या दिवशी होणारी गर्दी… “घरी काय आपणच रांधायचं आणि आपणच वाढून घ्यायचं.. इथं कसं पुरुषच जेवण बनवतात आणि पुरुषच वाढतात. आपण काय नुसतं ताटावर जाऊन बसायचं. ऊष्ट ताटही पुरुषच ऊचलतात.” असं म्हणत जेवणाचा आनंद घेणाऱ्या महिला पहायला मिळतात. नोकरी निमित्ताने जिल्ह्यामधून आलेल्या आणि आमदार निवासात तर कुणी पाहुण्याकडे राहणाऱ्या मंडळींची एका वेळेच्या जेवणाची ही ऊत्तम सोय आहे. फिल्म सेंटर, ताडदेवच्या कार्यालयात आम्हाला अशी सुविधा नव्हती. परंतू मी २००२ पासून मंत्रालयात रुजू झाल्यापासून या भोजनालयाचा आनंद निवृत्त होईपर्यंत घेतला आहे. मी केळव्याहून ६.३० ला घर सोडत असे. त्यामुळे माझ्यासाठी पहाटे ५ वाजता जेवण तयार करावे लागे. या खानावळीमुळे माझा डबा बंद झाल्याने माझी मिसेस मात्र खूष होती.
एक मात्र नक्की आहे हे जेवण कधीच कुणाला बाधलं नाही. ही खासीयत आहे या भोजनालयाची….
– विकास पाटील. फिल्म एडीटर .
खुप सुंदर लिखाण मॅडम. या लेखातून आपण आजच्या स्त्री चे वास्तव दर्शी चित्र उभे केले. जे सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही. पण घडत मात्र बहुतांशी घरात असत.
– पूजा सावंतदेसाई
खूप छान लिहिलं आहे.. आजची परिस्तिथी अशीच आहे.. ☺️🥰
– पायल माने.
“आनंद यात्री योगेशजी कासार नाशिक” हा सौ रश्मी उल्हासशेठ हेडे सातारा यांनी लिखानबद्ध केलेले जीवन संघर्षाचे लिखाण आताच वाचले अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा न डगमगता खास करून त्यांच्या पत्नीने व आई वडिलानी जे त्यांना संघर्षातून यश मिळविण्याकरिता धैर्य दिले तेही वाखाणण्यासारखे आहे खास करून या लिखाण करीता, आत्मकथानाकरिता स्वतः व्यक्त होण्याकरिता लेखिका जी युक्ती वापरते तीच वाखाणण्यासारखी आहे, लिखाण उत्तम आहे असेच उत्तमलिखाण होवो एवढीच आमची महाकालिका माते कडे प्रार्थना
– अशोक कुंदप.
“माहिती” तील आठवणी ( ४ )
Bhari..👌👌
सर आपण सदैव सकारात्मक आणि मदतीला सदैव तत्पर असणारे अधिकारी होता. नेहमी हसतमुख असणार व्यक्तिमत्व. आपले अनेक लेख ‘आपलं मंत्रालय‘ मध्ये प्रकाशित झाले आहेत. ते प्रकाशित करताना आम्हालाही आनंद वाटत असे. Keep it up Sir..👍💐💐🙏🙏
– डॉ वृषाली बर्गे.
बोलकी लेखणी : अनोखा उपक्रम
अतिशय चांगला उपक्रम…!
मराठी भाषा ही सर्वसामान्य मराठी माणसांच्या व्यवहारातून आणि विशेषतः नवीन पिढीच्या बोलण्यामधून खळाळत राहायला हवी.
त्यादृष्टीने या उपक्रमाचं मोल फार मोठं आहे…
– प्रशांत थोरात, पुणे
आजची स्त्री मुक्त आहे का ?
🌹खूप सुंदर, स्पष्ट शब्दात आपण हा लेख लिहिला आहे. मोठा गहन विषयाला आपण हात घातला आहे. खरं तर स्त्री चा आदर करण हे आपले कर्तव्य आहे पण सहसा असं घडत नाही.
आज नारिशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे पण दोन शब्द स्तुती चे सोडले तर तिच्या नशिबी चूल नं मुलं पाचीला पूजलं आहे.
जितके उच्चशिक्षित तितके मोठे प्रॉब्लेम असतात. जगाकडे एक नजर टाकली तर ही अडचण फक्त आशिया खंडात जास्त आहे.
आपण कितीही पुरोगामी म्हटलो तरी अजून स्त्री बंदिस्त आहे हे खेदान म्हणावं लागते. समान अधिकार अजून दिले काय समाजानं??? तर नाही पुरुष काही करुद्या त्यावर पांघरून घातलं जात पण स्त्री अजूनही घुंगट घालून आहे
आपण आपल्या घरातून सुरवात नाही करत तो पर्यंत अडचण अशीच राहणार.
अलका ताई खूप सुंदर लिहिले आपण. मत प्रदर्शन करावं एवढा अभ्यास नाही माझा
🌹अभिनंदन 🌹
– अशोक साबळे.
साहसी नेहा..
नेहाची साहसकथा आणि यशोगाथा दोन्हीही प्रेरक.
कम्माल…!!
पंगूं लंघयते गिरीम् …हे खरे करुन दाखवले.
– राधिका भांडारकर.
प्रेमांकुर..
खुपच छान रचना, प्रेम ह्या भावनेचे समर्पक वर्णन केले आहे.
– क्षिप्रा.
🌹अभिनंदन श्री. विनय सामंत जी 🌹
खूप छान प्रकारे उपक्रम राबविला. आज मुंबई पासून जवळ अशा सुविधा उपलब्ध झाली. एक तर मराठी माणूस असं धाडस करीत नाही. त्यामुळे आपल्याला विशेष धन्यवाद. 🌹
माननीय भुजबळ साहेबांनी योग्य प्रकारे माहिती दिली. कारण लवकर अश्या गोष्टी समजून येत नाहीत.
धन्यवाद साहेब.
ओठावरलं गाणं…
🌹श्री. विकास भावे खूप सुंदर कवितेच विवेचन केलंत आपण. धन्यवाद 🌹
डोळ्यातील हावभाव, प्रेम, राग सर्व खूप नयनरम्य प्रकारे व्यक्त केलं.
🌹अभिनंदन 🌹
प्रेमांकुर
🌹खूप छान कविता. विशेष गावरान भाषेमुळे अधिक प्रभावशाली वाटते 🌹
अभिनंदन सौं अंजली देशपांडे
🌹🌹🌹
– अशोक साबळे.
आपलं राजभवन…
एकदिवसीय सहल असेच म्हणावे लागेल. खूप छान वर्णन केलेलं आहे. असेच फिरत रहा. तुमची सहल डोळ्यासमोर उभी केलीत. धन्यवाद. वर्षा मॅडम, लोखंडे, शुभदा मॅडम. मस्त माहिती दिली आहे. Hats of young ladies.
– महेंद्र भाबल.
आनंदयात्री योगेश कासार
योगेश यांचा लेख खुप प्रेरणादायी आहे, आजचा युवा वर्गासाठी हे खुप गरजेचे आहे हे समजुन घेणे आवश्यक आहे,
रश्मी जी पुन्हा एकदा उत्तम लिखाण आणि चोख मांडणी बद्दल मनस्वी अभिनंदनास आपण पात्र आहात,,,💐💐
– निशिकांत.
आजची स्त्री मुक्त आहे का ?
Alka Mane apratim Lekh, true story, real situation all working women experience. Neatly draft and well said.
Thank you
– वीणा आपटे.
🌹साहसी नेहा 🌹
🌹नेहाच अभिनंदन 🌹
पूर्ण लेख वाचून झाला नं मन सुन्न झालं. एकाच व्यक्तीला नियतीन इतकं दुःख द्यावं ही कल्पना च करवत नाही.
तरीपण जिद्दीने मात करून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमठवला. कौतुकास्पद. 🌹
🌹लेखिका शोभा नाखरे, आपले खूप अभिनंदन 🌹
हरवलेले हिरे आपण दाखवून दिलेत.
उच्चप्रतीचे लिखाण केलं आपण.
माननीय. भुजबळ साहेब खूप चांगले विषय घेतात.
धन्यवाद सर 🌹
महाराष्ट्र माझा
🌹 सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🌹
खूप छान वर्णन केले आपण. अभिमान आहे मराठी पणाचा.
🌹धन्यवाद प्रियांका देशपांडे 🌹
– अशोक साबळे.
डोळस आणि सुदृढ लोकांनाही करता येणार नाहीत असे पराक्रम या नेहाने करून दाखविले.
ही भारताची खरी शान. ही ऊर्जा, ही प्रेरणा!
नेहाला माझा मानाचा मुजरा.
– अरूणा मुल्हेरकर.
नेहाच्या जिद्दीला सलाम. डोळस व्यक्तीलाही लाजवेल अशी दैदीप्यमान कामगिरी. नेहास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
– मोहन आरोटे
शोभा कोठावदे यांची कविता- उन्हाळ्याची सुट्टी एक सुरेख बालगीत आहे. शहरातील मुलं आपल्या गावी गेल्यावर तिथल्या माणसांकडून आणि निसर्गाकडून भरभरून मिळणा-या आनंदाचे सुरेख वर्णन या कवितेत आढळून येते.
शूर नेहाताईची जिद्द आणि कठोर परिश्रमातून मिळवलेल्या यशाची कथा प्रेरणादायी आहे. शुभेच्छा
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका
ठाण्यातील एका निबंधस्पर्धेतील पारितोषिक विजेत्या लेखातून हेमंत साने यांनी सध्याच्या समाजव्यवस्थेत विविध कुटुंबांतून ज्येष्ठ नागरिकांची भूमिका किती महत्वाची असते हे सविस्तरपणे सांगितली आहे
विनय सामंत यांनी हाती घेतलेला प्रकल्प स्तुत्य आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
तरुणांनो, कधीही नाउमेद होऊ नका ! – देवेंद्र
खूपच प्रेरणादायी मुलाखत! आपला सर्व प्रवास अनेक निराश लोकांना प्रेरणा देईल ही आशा .
– शिल्पा कुलकर्णी.
ओठावरलं गाणं…
दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेल्या व सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अनेक सुंदर गीतांपैकी रमेश अणावकर यांचं हे एक गीत. बोलके डोळे व त्यातून निर्माण होणारे भाव यांचं वर्णन आपण रसग्रहणामध्ये फारच सुंदर केले आहे.
– विवेक भावे
कविवर्य रमेश आणावकर यांचे हे गीत भावे सरांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून रसग्रहण केले आहे. नयन बोलके, जादुगार इ. शब्दांत सहजतेने उद्धृत केले आहे.
– निलाक्षी पिसोळकर.
“माहिती” तील आठवणी ( ४ )
लिखाणाची शैली अत्यंत सोपी व सर्व घटनाक्रम स्पष्ट करणारी आहे. दोन वर्षांच्या सहवासात श्री.कुकडे साहेबांच्या कार्यालयीन कामकाजाची अंशतः ओळख झाली. परंतु सदर लेखाद्वारे संपूर्ण सेवापट चित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून गेला. असेच लिहित रहा. आपल्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाची शिदोरी इतरांना मार्गदर्शक ठरेल.
पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा.!!
– पी बी सुर्वे.
आठवणीतील पी जी दस्तूरकर सर,
तत्वनिष्ठ, लढवैय्ये दस्तुरकरसरांच्या खूप छान आठवणी जागवल्या आहेत.
– अजित मगदूम.
सेवाग्राम : अविरत सेवेची ८६ वर्षे !
वर्धा, शहरा नजिकच्या “सेवाग्राम” बाबत मा.प्रकाश कथले साहेबांनी संक्षिप्त स्वरुपात खूप छान माहिती दिली. प्रकाश कथले साहेबांचा, वर्धा जिल्ह्यातील, ज्येष्ठ, अतिशय अभ्यासू आणि निर्भिड पत्रकार म्हणून लौकिक आहे.
कृषि विभागात असताना 2005-07 या कालावधीतO मी वर्धा जिल्ह्यात, अधीक्षक कृषि अधिकारी, म्हणून काम केले, त्या कालावधीत सेवाग्राम येथे अनेकदा जायचा योग आला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची, कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, तत्कालीन कृषि मंत्री शरद पवार, इत्यादी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यातील, काही गावांना भेट देवून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. या सगळ्या नेते मंडळींनी दुपारचे अगदी साधे जेवण आणि विश्रांती सेवाग्राम मध्ये घेतली होती, हे मला लख्ख आठवते.
या भेटीच्या वेळी, मी शरद पवार साहेबांचा, संपर्क अधिकारी होतो, ही भेट शेती प्रश्र्ना संदर्भात असल्याने, पवार साहेबांनी माझ्याकडून, या जिल्ह्यातली पीक पद्धती, प्रमुख पिकांची उत्पादकता आणि दर हेक्टरी निव्वळ उत्पन्नाची, माहिती माझ्याकडून घेतली होती, या प्रसंगी डॉ.मनमोहन सिंग साहेबांनी मला दुपारच्या जेवणानंतर,”टूथ पिक” मागितली होती, ती दिल्यानंतर, आवर्जून त्यांनी Thank you म्हटल्याचेही आठवते,,
– अशोक लोखंडे.
Ex Director, Agri.M.S
महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक, निसर्गविषयक, विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प, पर्यावरणविषयक, जनसंपर्क माध्यमांविषयक, साक्षरताविषयक आदि कार्याचा माहितीपूर्ण आढावा प्रियंका देशपांडे यांनी घेतला आहे. अभिनंदन.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची राजधानी अशी ज्याची ओळख आहे, त्या वर्ध्याच्या अनेक महत्त्वपूर्ण आठवणींना उजाळा प्रकाश कथले यांनी घेतला आहे. हार्दिक अभिनंदन.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
मिस यू, ऋषी…
आपण माझा लेख प्रकाशित करून मला सन्मान दिला मी आपला व न्युज टुडे टीम चा आभारी आहे.
– संदीप भुजबळ.
संदीप, ऋषी कपूर विषयीखूपच छान लिहिलंस.
– नितिन देऊसकर. पुणे
Great hero.🌹🙏🏻
– सुनील उंडे. राहुरी
खूपच छान
– वाकचोरे. संगमनेर
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका
लेख आवडला. सत्य परिस्थीती लिहीली आहे. पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. जेष्ठांना दिलेल्या सूचना पटण्यासारखा आहेत.
– सीमा मरबाल्ली.
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका..
Very nice analysis of old age. Breaking it into three parts is engineering brain. Letting go and no more dominating is the main idea.
– झिहमद कुरेशी.
– टीम एनएसटी. ९८६९४८४८००.