Sunday, July 6, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी. गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
– संपादक

सप्रेम नमस्कार,
आज खर तर प्रतिक्रिया द्यायला फारच उशीर झालाय. पण वाचणं एकदा मागे पडल्यावर ते आणखीनच मागे पडत गेलं. ‘बातमीदारी करताना’ चे सगळेच लेख खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण होते.
खरतर होते म्हणण्यापेक्षा आहेत म्हणण जास्त संयुक्तिक ठरेल.
पण त्याचबरोबर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तेव्हाची पत्रकारिता आणि आजची चाटूकारिता यातली प्रचंड दरी.
सर्वांगीण आणि तटस्थ पत्रकारिता आज जवळ जवळ लुप्त झाली आहे.
आज आहे ते फक्त एकांगी वृत्तांकन.
अशा पार्श्वभूमीवर या लेखांचे महत्त्व खूपच आहे.
निदान लेख वाचून तरी कोणाला सुबुद्धी व्हावी ही सदिच्छा !
कोणताही प्रवास हा कधीतरी संपणारच आहे.
पण ही लेखमाला संपली ही गोष्ट नक्कीच हुरहूर लावणारी आहे.
पण ही ‘लेखनसीमा’ नक्कीच नाही. पुन्हा एखाद्या वेगळ्या स्वरूपात भेटायला नक्की आवडेल. त्याची वाट बघतोय !!
– मिलिंद आठवले. पुणे

“पत्रकारितेतील प्रकाश” ला पुढील प्रकाश पर्वासाठी, आरोग्य संपन्न जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !….
– डॉ नारायण मेहरे आणि कुटुंबिय

Journalist Prakash Kathale is one of the few journalists who scrupulously follow the ethics in this sacred profession n dedicate their pen for the betterment of society. His writings on Tukdoji Maharaj, M Gandhi, Vinoba n the like icons have had always been widely acclaimed. Recently i had an opportunity to read his studious article on Gandhiji’s stay at Sewagram n the freedom movements he conducted while his stay at Bapu kuti was was highly informative n has historical value. He is good friend of mine. Our honorable Bhujbal saheb is very selective n appropriate in giving space on the portal he is conducting n hence whatever he publishes attract the attention of inquisitive readers so i must thank him for selecting Prakashji kathale for this.

Congratulations dear kathalesaheb. 💐
– Ranjit Chandel. Former DIO, Yavatmal.

Congratulations Prakash.
Good Evening Devendra…
– Sudhakar Dharav.
Retd.Dy. Director, I &PR

सलाम आदरणीय दिलीप महादेव जाधव साहेब यांच्या कार्याला.
– सुनीता नाशिककर. निवृत्त पोलिस उपअधीक्षक
मुंबई.

सर खूप खूप धन्यवाद. समस्त पौडवाल कुटुंबियानी आपले आभार मानले आहे.
प्रत्यक्ष अनुराधाताईंनी आपले आभार मानले असून मला तसे आपणांस कळविण्यास सांगितले आहे.
– सौ. शोभा पौडवाल. मुंबई.

सर्व सदर छान आहेत.
अशोक कुमावतला सलाम. खरोखरचं डोळसांना लाजविनारी कामगिरी आहे.
रिकामी खुर्ची … खरखरच सुंदर उपक्रम, रक्तदान श्रेष्ठदान.
ओठावरीलं गाणं मधुकर जोशींचें, जात्यामधील रडती सुरेख क्षणभंगुर कविता ही सुरेख आहे.
– कवयित्री आशा दळवी फलटण, सातारा.

– Simply great to be emulated not only blind and other disabled but by well bodied youth particularly those who feel disappointed for their own reasons. May God bless Ashok.
– Sheshrav Chavhan. Author, Aurangabad.

It’s very difficult to write on a abstract thing like laziness, that ro in satirical language. Compliments to devendra ji for editing such a difficult subject. 🌹👌🏻👌🏻👌🏻🌹
– Sudhakar Dharav
Retd.Dy.Director. I & PR.

अंक आवडला
एक वेगळेच संपादन कौशल्य जाणवले.
कष्टाचे जिद्दीचे महत्व विशद करणारे प्रथम दोन लेख अतिशय प्रेरक.
त्यानंतर आळशी लोकांचे कौतुक करणारे व्यंगात्मक स्फुट आणि पुढे कोणाच्या ही व्यंगावर हसू नका असे सांगणारे सुंदर गीत. ..
सर्व चांगले

पुढे हे सगळेच क्षणभंगुर असल्याचे सत्य कथन करणारे काव्य उत्तम.
– स्वाती वर्तक. मुंबई

विलास कुडके सरांचा लेख खूपच छान. कोणीतरी पोटातंल ओठात आणल्या सारखे वाटले.😀😃😄

 

Your book on Veer Sawarkar is really great & inspiring. Regards 👍👌👏🙏💐🌺🌹🇮🇳
– Chandrashekhar Oak.
Retierd IAS officer. Mumbai.

नमस्कार.
“विचारांची पेरणी करतं ते खरं साहित्य” हा
डॉ. भैरप्पा यांचा लेख वाचला.
पुराण कथांची वर्तमानाशी जोडली गेलेली नाळ सर्वार्थाने योग्य वाटते.

द्युतात हरणाऱ्याच्या हाती राज्य सोपवण्यापेक्षा इथ जन्मलेल्याच्या हाती ते सोपवा ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
– सायली कस्तुरे. दूरसंचार अभियंता, पुणे.

डॉक्टर अनंत देशमुख यांचेवरील लेख वाचला. दोन वर्षापूर्वी मी देखील त्यांच्यावर लेख लिहिला होता आणि तो थिंक महाराष्ट्र डॉट. कॉम. मध्ये प्रसिद्ध झाला होता परंतु त्यानंतरही त्यांनी काही पुस्तके लिहिली ज्याचा उल्लेख या लेखामधे आलेला आहे हे पाहून बरे वाटले .
डॉ. अनंत देशमुख हे सातत्याने लिखाण करीत असतात खरोखरीच आदर्श आहेत. त्यांचे भाषणही अतिशय मुद्देसूद आणि सखोल विचारांचे असते. सीकेपी संमेलनाला त्यांचे भाषा ऐकण्यासाठी मी खास जाणार आहे.
–  मेघना साने

Heartiest congratulations ! Bhujbal Sir.
– Aasha Kulkarni. Mumbai.

चौथास्तंभ पुरस्कार…
मित्रा , मनःपूर्वक अभिनंदन !
💐🌹💐🌹💐🌹
– संतोष गोरे. नगर

चौथा स्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देवेंद्रजी 👌👌🌹🌹😊😊🙏🙏
–  गंधेकाका. मुंबई.

Congratulations Devendraji Bhujbal.You have deserve it.
– Ashok Borkar.. Ahmedabad.

“चित्र सफर” मध्ये प्रसिद्ध झालेल्या बप्पी लहरी यांच्या लेखावर पुढीप्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

खूप छान संदीप.
तुझी आवड गायनाची आणि तुझ्या आवडत्या गायका बद्दल खूपच छान तू लिहिले आहेस👍👍👌
– सौ वैशाली नितीन मावळे, ओझर

फारच सुंदर लेखन केले आहे. छान माहिती मिळाली. सुंदर लिखाण केले..👍👍अभिनंदन
– डॉ उमेश जोशी. संगमनेर

संदीपजी,
आपणं बप्पी लहरींबद्दल खूप मोजक्या शब्दात
भावना व्यक्त केल्या. या अभ्यासपूर्ण लेखातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
खरेच गायनाबरोबर आपण वाचनाचा छंद ही जोपासला आहे, हे या लेखातून अधोरेखित होते.
पुनश्च धन्यवाद संदीपजी.
– अविनाश ठाकूर, राहुरी

चित्र सफर अतिशय सुंदर. खूप छान.
– महेश अस्वले. संगमनेर

मस्त कलेक्शन
– सौ कल्पना अशोक जवकर, मुंबई.

🌹👍🌹👌🌹छान माहिती, सुंदर लेखन🌹         – गोरख सोमनाथ रासने. संगमनेर

👌सुरेख, सुपर
– किरण चिंचे, संगमनेर, – अमोल पोटे, पुणे

मित्रा, तु बप्पीदा बाबत जे लिखान केलस् ते अप्रतिम आहे. बप्पीदाच्या कार्यकीर्दचं एवढं सुक्ष्म निरिक्षण करून सुंदर पद्धतीने लेखन केल्याबाबत तुझे आभार.
तसा पाहता तु स्वत: गायक आहेस. तुझ्याबाबत केलेलं लिखान” ते म्हणतातना कधी कधी आपबीती पण मांडलेली बरी” त्यातून तु कोण आहेस हे या माध्यमातून करोडो लोकांना माहित होईल.
असो…. सेलिब्रिटी बाबतचं लेखन पत्रकार करतातचं तेव्हा आपण पण सेलिब्रिटी पेक्षा कमी आहोत का ?
पुन्हा एकदा तुझ्या लेखनाला ✒️🙏🏻सलाम
मनस्वी आभार💐💐
– शाम हिंगे. जलसंपदा विभाग. औरंगाबाद

अतिशय सुंदर लिखाण आणि स्व.बप्पीदा यांची माहिती जी बऱ्याच रसिकांना कधी ऐकायला नाही मिळाली. 👌👌👌🙏💐
– केशव कुंभकर्ण. स्वरभक्ती ग्रुप, औरंगाबाद

गाण्यावरच्या प्रभुत्वा इतकेच लेखनावर ही तुझे प्रभुत्व आहे,छानच लिहिलंस👌😊👌
नितिन देऊसकर सर. मुक्तांगण, पुणे

👌👌..लेख फारच सुंदर लिहिला आहे…त्याबद्दल तुझे अभिनंदन 💐💐…संगीत व गायन क्षेत्रात काहीतरी नवीन करशील अशी आशा बाळगतो…. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…
all the best…👍🏼👍🏼
– निशिकांत पाटसकर. पुणे

All time favourite Bappa da
– मनोज भूमकर, संगमनेर

👌👌👌👌 सुंदर विचार. सुंदर संकलन.
– महेश रासने. संगमनेर

छान👌
– सुनील वाकचौरे. उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग. अकोले
– आभाळे प्रकाश. जलसंपदा विभाग, संगमनेर
– श्री भोई. जलसंपदा विभाग, संगमनेर

👌मायकल जॅक्सनने पण बप्पीदांच्या गाण्याचे कौतुक केले होते
– उत्कर्ष रासने. संगमनेर

स्टोरी अतिशय सुरेख 👌🏽👌🏽🌹🙏🏿
– सौ मेहेर मॅडम, राहुरी

Nice Story👌
– श्री पानमंद. जलसंपदा विभाग, नारायणगाव

खूपच छान माहिती मिळाली.
– सौ सविता राजेश मावळे, संगमनेर

खूप छान लिहिले आहेस. अभ्यास पूर्ण लेखन. अभिनंदन 👌👌👍👍
– सौ राखी विजय लोखंडे. सोलापूर

Khup chhan mahiti apan jopasata Sangit kshetra baddal hi far vakhananya sarkhi gost ahe.apali gayaki hi far uttam ahe.keep it up.Have a nice Sunday n enjoy.
– हेमंत साखरे. डिफेन्स अधिकारी, अहमदनगर

संदीप, तु चित्रपट सृष्टीतील, संगीतकार, गायक यांच्यावर खुप सखोल अभ्यास करून केलेले लिखाण वाचताना सर्वांना माहिती मिळाली 👌
– सौ सुरेखा गोरख रासने. संगमनेर

👌🏻👌🏻
– संजय बोत्रे. जलसंपदा विभाग, राहुरी

Very nice💐💐
– सौ मनीषा प्रदीप कोळपकर. राहुरी

१ नंबर स्टोरी
– प्रफुल भुजबळ. मुंबई 🙏🏻🙏🏻🙏🏻

Excellent writing
सौ राणी संदीप भुजबळ. संगमनेर

सागर ची गरुड भरारी
सागर ने माझ्या बरोबर अतिशय कठीण लिंगाणा सुळका सर केला होता. सागर खूप खूप शुभेच्छा
– दत्तात्रय रोकडे.

सागरची गरुड भरारी
🌹अभिनंदन 🌹
खूपच कमाल
आपण मुद्दा लिहिला धन्यवाद सर
असे लवकर कळतं नाही.
माननीय. श्री. भुजबळ साहेब धन्यवाद.

“ओठावरलं गाणं”( ३९ )
🌹खूप छान कविता🌹
सुंदर वर्णन केलं आपण
🌹धन्यवाद श्री. विकास भावे सर 🌹
– अशोक साबळे.

आळस माणसाचा मित्र
”आळस राक्षस घातक मोठा, मारु त्याच्या पाठीत सोटा” असा सुविचार लिहून घेतला जायचा पण नंतर लक्षात आलं घातक गोष्टींपासून दूर पळण्यापेक्षा त्याची नीट ओळख करुन घ्यायला हवी, तरच त्या गोष्टीची भिती दूर पळते आणि तो एकदा का तो मानेवरचा राक्षस खाली उतरला आपला दोस्त झाला की विश्रांती नावाची राजकन्या गळ्यात हार घालतेच.
– अभय बापट.

“ओठावरलं गाणं”( ३९ )
रसग्रहण खूपच छान. सुपातले दाणे आणि आपले जीवन याचा सुरेख संगम या गाण्यातून उलगडून दाखवला आहे.
मरणाचे स्मरण असावे. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणारच आहेत. पण असं कोणालाही वाटत नाही.
सर्व जण स्वतःला अमर समजूनच जणू जगत असतात.
जीवनात सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. मृत्यु ही त्याला अपवाद नाही. गाण्यातला सार लेखकाने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केल आहे.
कर्माचा अटळ सिद्धान्त कोणालाही चुकलेला नाही हेच खरं.
– डाॕ. अंजुषा पाटील.

रिकामी खुर्ची, प्रेरणेची !
प्रशांत थोरात यांची स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची समाजाभिमुख कल्पना अतिशय आदर्शवत!
सागरची गरुड भरारी
सागरच्या जिद्दीला शतश: सलाम ! आणि भविष्यात त्याची सगळी स्वप्ने पुरी व्हावीत, यासाठी खूपखूप शुभेच्छा !!
– राधिका भांडारकर.

सावरकरांच्या पत्रकारितेचा यथार्थ आढावा घेतला आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.

पुस्तक परीक्षण
देवेंद्र सर, अगदी सविस्तरपणे परीक्षण लिहिलं आहे… स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वंदनीय क्रांतीसूर्यावर आपण पुस्तक लिहिलं याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन …. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.
– विकास भावे.

लालबत्ती ( 27 )
राणी जी, लालबत्ती मधील हकिकती वाचतांना मन विदीर्ण होतं. का या अश्राप मुलींच्या भाळी हे आले या विचारांनी जीव कासावीस होतो, त्यांना फसवणाऱ्यांचा संताप येतो आणि सुशिक्षित धडधाकट आपण या विरुद्ध काही करू शकत नाही म्हणून स्वत:चा ही राग येतो नि पुढच्या क्षणाला असहाय्य वाटते. मन नंतर कशातच स्थिर होणे कठीण जाते.
– नीला बर्वे.

सर तुम्ही १४ मेला झालेल्या परदेशस्थ दुसर्‍या काव्यसंमेलनाचा साद्यंत वृत्तांत देणार असे आपल्या मनोगतात जाहीर केल्यावर खूप हुरूप आला. मनोबल मिळाले.
– अरूणा मुल्हेरकर.

“माहिती”तील आठवणी (६)
खरचं अंजू तशी धडाडीचीच आहे. आणि धडाडीच्या माणसाला रिकामपण पचत नाही. म्हणूनच तर तीने परिस्थितीचा फायदा घेतला नाही. याही परिस्थितीत कार्यरत राहीली. अंजू मंत्रालयात असतांना कधीतरी कामानिमित्ताने एडीटींग मधे आली की बोलणे होत असे. वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी फोनवर बोलणे झाले असता अंजूने वडीलांच्या निधनाची आणि लॉकडाऊनमुळे अडकल्याची आमची चर्चा झाली होती.
अंजू फेसबूकवरही कायम लिहीत असते. दिल्लीला महाराष्ट्राच्या चित्ररथाची वेगवेगळी चित्रे आणि बाईटस् रेकाॕर्ड असलेला मोबाईल पावसाच्या चिखलात तीच्या हातून पडला नंतर तो चांगला सुकवून चालू करुन निवेदिता मॕडमच्या सोबतीने पाठवलेल्या फोटोंची आठवणही स्मरणात राहणारी अशीच आहे. अंजू ही आठवण पून्हा “न्यूज स्टोरी” मधून प्रसारीत करायला हरकत नाही.
अंजूला पूढील वाटचाली साठी शुभेच्छा..!
– विकास पाटील. फिल्म एडीटर.

चित्र सफर ( ३ )
अंगातल्या सोन्यासारखे बप्पीदांचे म्युजिक पण बावनकशी सोने आहे.
– उत्कर्ष रासने.

अभिनंदन प्रकाश कथले साहेब ! पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !
– वर्षा भाबल.

सासूआई यांच्यावरील उत्तम कविता.
चित्र सफर ( ३ )
भप्पी लहरी यांच्या जीवनकार्याचा योग्य आढावा.
पत्रकारितेतील दीपस्तंभ.
– डाॅ.सतीश शिरसाठ.

“माहिती”तील आठवणी (६)
कोरोना काळात घरात नुसते बसून राहण्याऐवजी आपण घरुनच कामाची आस धरली ही गोष्ट प्रेरक आहे. कोणतेही संकट असो त्याची संधी करणे आणि स्वतःला कामात झोकून देणे हा विशेषत्वाने अंगीकारावा असा आपला गुण आहे. सुंदर लेखाबद्दल आपले तसेच आदरणीय मा. श्री भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार !
– विलास कुडके.

प्रामाणिक भंगारवाले
माणुसकी खरंच जिवंत आहे.
धन्यवाद त्या लोकांचे.
– अशोक साबळे.

उभय पक्षी !
बरोबर आहे. विजयजी..
निसर्गातल्या चराचरांची काळजी घेणं हे मानवाचं कर्तव्य आहे…
– राधिका भांडारकर.

– टीम एनएसटी.  9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments