गेल्या आठवड्यात, म्हणजेच १६ ते २२ मे २०२२ या दरम्यान प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
उद्बोधक विरार संमेलनातील वैद्यकीय माहितीचा खजानाच वाटला..डॉ. जोशी दांपत्यानी स्नेहसंमेलनात उपस्थितांना सर्व प्रकारच्या पाहुणचाराबरोबरच लोखंडी कढाई भेट दिल्याचे वाचून समाधान वाटले.भुजबळ दांपत्यांचा NST माध्यमातून ठिक ठिकाणी स्नेहमिलनाची कल्पना मला अप्रुप वाटली.
गरजे शिवाय माणसं एकमेकांना भेटत नाही व जीवनातील सहजपणा हरवत चालला असल्याने या परिस्थितीला सामोरे जाण्याचे शिवधनुष्य भुजबळ दांपत्यानी उचलेले दिसते व काही शहरात प्रत्यक्ष क्रुतीचा उत्तम प्रकारचा अनुभव संग्रहित केलेला दिसतो.या कार्याला माझ्या शुभेच्छा. डॉ जोशींनी उभ्याने प्रसुती करता येते हा अनुभव विशद केला आहे तो तर मला नवीनच वाटला. असो…. असे स्नेहमिलनाची आजतरी नितांत आवश्यकता आहे त्यातून नवनवीन माहिती देखील लक्षात येते. भुजबळ यांच्या सपत्नीक उपक्रमाला अनेक शुभेच्छा💐💐
– 🏋🏻♂️🌹सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
विरार संमेलनाचे वाचून आनंद वाटला आपण व आपल्या पत्नी त्यांची कल्पकता यामुळे ही अशी संमेलने किती यशस्वी होतात याचा अनुभव पुण्यामध्ये मी घेतला होताच. विरारचे वाचून आपण किती पल्ला गाठला आहे याची जाणीव झाली. Online journalism चे नवीन स्वरूप तुम्ही यशस्वीपणे हे दाखवून दिले आहे. त्याबद्दल तुमचे दोघांचे खूप अभिनंदन आणि आभार.
– प्रा डॉ किरण आणि शलाका ठाकूर. पुणे
स्नेह मिलन एक सुंदर उपक्रम 👍
काव्य संमेलन ही उत्कृष्ट, आयुष्य्यावरच्या दोन्ही कविता आवडल्या, धन्यवाद🙏
– श्रीकांत चव्हाण. आर्किटेक्ट, मुंबई
gathering is good initiative
– Sukhdeve. Amravati
१३ मेंला प्रकाशित झालेल्या न्युज स्टोरी मधील विठ्ठल ममताबादे यांनी लिहीलेली, प्रमाणिक भंगारवाले, ही स्टोरी फारच आवडली. हल्ली सर्वत्र बेइमानी, जातीवाद आणि तु तु मैं मैं ने वातावरण प्रदुषण केले जात असताना विश्वास कोणावर, कसा ठेवावा हा गंभीर प्रश्न पडला आहे परंतु अशाही प्रतिकुल परिस्थिती ला लाथाडून इमान जागणारे भंगारवाले खरोखरच प्रेरणादायी ठरले आहेत. लाखात एक अशी घटना घडते याचा प्रत्यय आला. न्यूज स्टोरी द्वारे केवळ न्युज नव्हे तर जगण्याची दिशा सुध्दा दिली जाते हेच प्रामाणिक भंगारवाले यांनी दाखवून दिले आहे. विठ्ठल ममताबादे यांनी लेखणी केले आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेन्द्रजी भुजबळ सर यान्चे लाख लाख आभार ………
– माधव अटकोरे. नांदेड
समाजभूषण पुरस्कार अभिनंदन भुजबळ साहेब आणि संपूर्ण टीम 💐💐
– अरविंद जक्कल. मुंबई
माधवी पाटील यांच्या चित्रकला प्रवासाची गोष्ट वाचनीय व प्रोत्साहन ात्मक आहे. महिला करिता विषेश बाब आहे. धन्यवाद देवा.. 🌹🙏
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती संचालक. यवतमाळ
पक्षीतीर्थ नांदुर. मधमेश्वर हा सचित्र लेख खूपच आवडला. पक्षांची बौलकी छायाचित्र पाहून मन टवटवीत झाले. लेखक राऊत यांनी बरीच मेहनत घेतली आहे. पक्षांची शास्त्रीय नावे देऊन वाचकांच्या ज्ञानात भर घातली. तरीपण ही नाव लक्षात ठेवणे कठीण आहे. उत्तम संपादनाबद्दल देवेंद्र जीचे अभिनंदन…
– सुधाकर. अ. धारव…. 🌹🙏
“वाफाळणारा एकच प्याला” सुंदर कविता…
चित्रकला प्रवासाची गोष्ट वाचनीय व प्रोत्साहनात्मक 🙏अभिनंदन.
“वाफाळणारा एकच प्याला” सुंदर कविता…
चित्रकला प्रवासाची गोष्ट वाचनीय व प्रोत्साहनात्मक 🙏अभिनंदन
पक्षी तीर्थ: नांदूर_मधमेश्वर हा सचित्र लेख खूपच छान व वाचनीय असाच आहे. वाचत असताना आपण अभयारण्यात वावरत आहोत, असेच वाटले.
यावेळी आमच्या मेळघाटातील वनश्री ची प्रकर्षाने जाणीव झाली. याचबरोबर विविध पक्षांची छायाचित्रे, लेख वाचताना बघितली त्यावेळी आमचे मित्र
श्री प्र. सु. हिरुरकर यांची प्रकर्षाने आठवण झाली. उत्कृष्ट वनविहार व विविध पक्षांचे दर्शन घडविल्या बद्दल लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार. त्याच बरोबर उमदे संपादन करून लेख सादरीकरण केला, त्यासाठी श्री. देवेंद्र भुजबळ सरांचे देखील मन:पूर्वक अभिनंदन व आभार 🙏 💕
आयुष्यावर बोलू काही ही कविता देखील छान, तद्वतच विसूभाऊ चे परिक्षण उत्तमच.
– साहेबराव पुंड,
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती
पक्षी तीर्थ….
छान माहिती 👌👌
– संगीता सातोस्कर. मुंबई.
सर, नमस्कार.
लेख वाचून आनंद झाला. न्युज स्टोरी टुडे चा मी आभारी आहे. धन्यवाद सर🙏
– राजेंद्र मोहिते. पेण, जि. रायगड.
मोहितेजी, समोर येईल ते काम करायची तयारी असली की सर्व कामाच्या तऱ्हा शिकता येतात. सन्मा. मोहिते साहेब यांनी कुठलेही काम सकारात्मक केल्याने त्यांचा अनुभव वाढत गेला. अनायसे अधिकाऱ्यांशी संमंध चांगले राहीले. कामे काय होतचं राहतात. सर्वाशी नाते संबंध चांगले असले तर जीवन आनंददायी होते…
मोहितेजी सृजनांसह नवा आनंद निर्माण करीत रहा. आपला आनंद नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी शतगुणित व्हावा. सदैव असेच आनंदी, ऊत्साही रहा.
– विकास पाटील. निवृत्त संकलक माहिती विभाग
श्री मोहिते म्हणजे कोकण विभागातील माहिती कार्यालयातील सर्व बाबतीतील जाणकार कोष. मी त्यांच्याशी आस्थापना शाखेतील कामांकरिता नेहमी संपर्कात असायचो. अगदी ते रजेवर असले तरी ते मोबाईलवर कार्यालयीन कामांसाठी तत्पर असायचे. काही वेळा रजेवर असतानांच आॅफीसमध्ये कोणता संदर्भ कोठे ठेवला आहे हे सांगून वेळेत पूर्तता करायचे. कोणत्याही कारणाने काम खोळंबता कामा नये यासाठी त्यांची तत्परता अगदी वाखाणण्याजोगी होती. खूपच छान लेख 🙏🙏🙏💐💐💐
– विलास कुडके
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
माहिती विभाग. मंत्रालय, मुंबई.
देवेंद्रजी, अविनाश पाठकांवरील लेख आवडला. माझा व त्यांचाही जुना परिचय. हल्ली बरेच वर्षात गाठभेट नाही. क्रुपया त्यांचा फोन क्र. पाठवा ना.
– राजीव गोखले
निवृत्त दूरदर्शन संचालक. पुणे
तुमचे स्टार बुलंद आहेत.
मित्र, मैत्री क्वचितच अशी मिळते ! 🙏🌹
– डॉ प्रवीण जोशी. अंकली, बेळगाव
अविनाश पाठक माझे लहान भाऊ आहेत. त्यांचे कर्तृत्व माझ्या डोळ्यासमोर आहे. मी कुठेही असलो तरी सरळ वहिनी वहिनी करत घरात येणार. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
तसेच अविनाश पाठक यांची यशकथा सविस्तर लिहिल्याबद्दल संपादक भुजबळ यांना धन्यवाद…. 🌹🌹🌹
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ
अविनाश पाठक आणि परिवारास अनंत आशीर्वाद. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो..
– मंगला धारव, यवतमाळ.
आपला हक्काचा माणूस म्हणून आपण श्री अविनाश पाठकांचा उत्तम प्रकारे परिचय करून.दिला.त्यांच्या अनेक वार्तापत्रांचा मी एक वाचक आहे. विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी मी उपसंचालक व्रुत्त असतांना व संचालक असतांना नागपुरात प्रदीर्घकाळ वास्तव्य झाले. त्यात्या वेळी अविनाशजींचे सहकार्य केलेले मला आठवते.आता कदाचित ते मला विसरले असतील.असो पण आपला त्यांच्या
व्यक्तीमत्वाचा धावता पट मनापासून आवडला.आपणास व पाठकजींना हार्दिक शुभेच्छा.
– सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
अविनाश पाठक, एक अलौकिक व्यक्तीमत्व मनाला भावले !
– विलास प्रधान. मुंबई.
Always all Pathak’s are great 👍😀
– Vasanti Pathak. Nasik.
🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार मंडळी…
काल २१ मे रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या सर्व सुहृदांनी मला फोनवर, समाजमाध्यमांवरुन आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. सर्व सुहृदांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल आणि दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे…
आपले प्रेम असेच कायम राहील हा विश्वास आहे…
धन्यवाद…..
आपला
– अविनाश पाठक. नागपूर
काही अभिप्राय ‘रे ऑफ लाईट’ या लेखाबद्दल
👌👍🙂🌹🌷❤️
खूप सुंदर लेख आणि रे ऑफ लाईट संस्थेचा अभिमानास्पद उपक्रम।
मनःपूर्वक अभिनंदन।
– डॉ. सुभाष पवार
तुमची फोटोग्राफी मला माहित होतीच…परंतु सामाजिक भान ठेऊन केलेलं कार्य अतुलनीय आहे त्यास शब्द अपुरे पडतील…कदाचित माझ्याकडे शब्द नसतील….आपल्या कार्याला त्रिवार मुजरा🙏🙏🙏 – संतोष संसारे, समाजसेवक
वा फारच छान लिहीलय.
– प्रकाश जोशी, चित्रकार व पत्रकार
Great proud of your passion and Dedication 🌹🌹🌹🌹🌹
– Dr. Sadanand Raut
अभिनंदन नितीन. रे ऑफ लाईट या तुझ्या संस्थेचे कार्य खुपच छान. 👌💐
– विलास सोनावणे, एल. आय. सी. सेवानिवृत्त अधिकारी.
अकल्पनीय पाठवल्याबद्दल धन्यवाद.
– डॉ. हेमंत बेलसरे
अत्यंत बिकट परिस्थिती असताना सुद्धा खूप मेहनत करून तुम्ही हे यश संपादन केले तुमचे मनःपूर्वक अभिनंदन साहेब 💐🙏 सतत कार्यरत रहा तळागालातील लोकांना सतत मदतीचा हात पुढे करा. स्वतःबरोबर संस्था ही खुप नावारूपाला आना तिला खूप मोठी करा. तुमच्या संस्थेत उत्तम विद्यार्थी तयार करण्यात तुम्हाला यश प्राप्त होओ ही शुभेच्छा.💐👌👍🙏
शुभरात्री जय गुरुदेव 🚩
– मिलिंद मोरे, फोटोग्राफर
👌💐शुभ सकाळ💐
💐डाॅ. नितीन सर, तुम्हाला माझ्या कडून मनापासून कडक सुॅलूट, शिवाय तुमचे अभिनंदन. बोलण्यासाठी शब्द अपूरे पडतील. खरोखर तुमच्या अंगी जिद्द आणि चिकाटी कुठून येते, हे ईश्वराला ठाऊक.💐
– सुभाष शिंदे, सेवानिवृत्त इन्स्पेक्टर, मुंबई पोलिस
डॉक्टर सोनावणे यांच्या कार्याची अद्भुत कहाणी अतिशय उद्बोधक आणि प्रेरणादायी.
मनापासून हार्दिक अभिनंदन.
– कमलाकर सोनटक्के, लोककला अभ्यासक
नितिनजी, आपल्या लेखात आपला संपूर्ण परिचय वाचला. आपले कार्य उलेखनिय आहे. आपल्या या महत्वपूर्ण कार्यास माझा प्रणाम.
– महेंद्रा मोरे, आयकर विभाग कर्मचारी.
नितीन, खुप छान तुमच्या कलेला आणि कर्तुत्वाला मानाचा मुजरा. तुमची वाटचाल अशीच सुरु राहू देत, आणि गरजूंना त्याचा जास्तीत जास्त उपयोग होवू देत अशीच बुद्धांन चरणी प्रार्थना तुमच्या व तुमच्या कले साठी करतो. 🙏🙏🌹🌹
– राजेश दाभाडे, जनसंपर्क अधिकारी
सुपरस्टार राजेश खन्ना, या लेखाला मिळालेल्या
प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत….
👌👌👌👌खुपच छान..– मस्त
– सुभाष सोनवणे जलसंपदा विभाग अहमदनगर.
The Best
– Manoj Bhumkar
खूप छान व माहितीपूर्ण लेख👌👌👏👏
– सौ राखी लोखंडे, सोलापूर
👍👌 छान 👌
– श्री गोवर्धने
कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग. नाशिक
खुप छान माहिती.
लेखक झाला तू 👌
– महेश रासने. संगमनेर
Best writting 👌
– मनोज, संगमनेर
सुंदर लेख संदीपजी. राजेश खन्ना आणि किशोर कुमार आवडले. सुरेख लिहिले आहे संदीपजी तुम्ही .
– हर्षल मोटेगावकर. संगमनेर
Very nice 👍
– उमेश रासने. संगमनेर
Khupach chan😊
– कु. गायत्री लोखंडे. सोलापूर 😊
मस्त🙏🙏
– भाऊसाहेब शेटे. जलसंपदा विभाग. संगमनेर
संदीप तु, तुझा गायनाबरोबरच लेखनाचा छंद मस्त जोपासलाय. आरोग्याची काळजी घे. 💐💐
Keep it up. 👌👍👍👍👍👍
– प्रा सुशीलकुमार दुसाने. मुंबई
Good story
– डॉ हेलसकर, मुंबई
सुंदर शब्दांत लिहिले👌
– महेश सराफ, संगमनेर
खुपच छान लिहिलेस
– सौ वनिता शित्रे. अहमदनगर
एकदम सुपर 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🕉️🕉️🕉️🙏🏻🙏🏻
– कासार. से नि उपविभागीय अधियकारी, श्रीरामपूर
Great Writing 👌mala adhi ase vatle ki dusryani lihile ahe, pan Tu chan lihile
– राम पाटसकर, संगमनेर
👌👌सुरेख
– असद शेख. जलसंपदा विभाग संगमनेर
Good
– निलिमा मेहता, नाशिक
खूप छान राव साहेब 💐👍T
– वैभव नवले. अभियंता जलसंपदा विभाग, संगमनेर
My Friend, तुझ्या चित्रपट व चित्रपटातील कलाकार यांचे विषयीची माहिती असण्याच्या छंदाला मनापासून सलाम…
जर गायकामुळे सुपरस्टार होतात,हे सत्य लपवूचं शकत नाही, त्याबद्दल किशोरदा यांचे देखिल आभार मानले पाहिजे या सुपरस्टार कलाकारांनी त्यात काही अतिशोक्ती वाटू नये,तुझं लेखन अप्रतिम आहे.तुझे पण अभिनंदन💐👍🏻🙏🏻
– शाम हिंगे. प्रथम लिपिक जलसंपदा विभाग. औरंगाबाद
👍 खुप छान
– राजेंद्र सुतार. जलसंपदा विभाग संगमनेर
एक नंबर
– आकाश ठोबरे. जलसंपदा विभाग. अहमदनगर
राजेश खन्ना उर्फ काकाची कहानी फारच रसाळ आणि ओघवत्या शब्दात लिहिली आहेस.तुझ्या मम्मी आणि पप्पांच्या तसेच आमच्या तरूणाईतील आवडता सुपरस्टार राजेश खन्ना! त्याचे बरेच सुपरहिट चित्रपट पहाण्याचे भाग्य आम्हांला लाभले. काकासारखीच माहिती आम्हांला किशोरदांची हवी आहे.लवकर लिही. तुला शुभेच्छा.
– श्रीमती रजनी टिभे. राजुर
👌👌धन्यवाद रावसाहेब.
सुपरस्टारची छान माहिती मिळाली.
– फिरोज शेख जलसंपदा विभाग. अहमदनगर
सुपर्ब
– अशोक कोळी. जलसंपदा विभाग. राजगुरू
छान 👌👌
👍🏻
मेडिकल स्टोअर्स. संगमनेर
‘जीवन प्रवास’ ( २३ )
Writing is your passion it seems. You are such a natural article writer. Belapur call center staff must save it and read it once in a year to keep memories of retirement day fresh in their minds.
Finally, i can only say that i am really impressed with your writing skill. Keep it up. We love it.
– PRABHAT kumar pandey.
तू बुद्ध आहे…
ताई, आपली प्रत्येक कविता प्रसंगानुरुप अर्थपूर्ण असते . 🙏🙏
– अलका दराडे.
🌹तू बुद्ध आहेस 🌹
आपण पामर काय वर्णन करणार.
ताई छान कविता लिहिली
प्राध्यापक सौ. सुमती पवार धन्यवाद🌹🌹
– अशोक साबळे.
फार छान प्रवास वर्णन राधिका ताई…डॊगर
चला, आसाम मेघालयाला ( ३ )
फार छान प्रवास वर्णन
राधिका ताई…डॊगर दऱ्यातून वाहणाऱ्या शुभ्र झऱ्यांसारखे तुमचे शब्दझरे.
सुंदर मनाने आसाम मधे जाऊन आले
– प्रीती भिसे, बेंगलोर
‘जीवन प्रवास’ ( २३ )
स्वेच्छानिवृत्तीचा योग्य इतिहास कथन केलाय.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
समाजभूषण : २ पुरस्कार
संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !
लेखक श्री.देवेंद्र भुजबळ सरांच्या सहज समजून येणाऱ्या लेखनातून मिळणारा प्रेरणादायी यशाचा मूलमंत्र, उद्याच्या व आजच्या पिढीला खूप काही देणारा आहे. आज ‘समाजभूषण’ पुस्तकाला, मिळालेला दुसरा पुरस्कार यशाच्या शिखरावर आहे.
अभिनंदन ! भुजबळ सर.
– सौ.वर्षा भाबल.
‘जीवन प्रवास’ ( २३ )
Varsha…kiti chan ihil ahes… Mtnl cha Sampoorn jeevan pravas dolyan samor aale
– अमृता बोरकर.
चला, कृषी पर्यटनाला !
कृषी पर्यटन दिनानिमित्त चा लेख आवडला.
– श्रीकांत चव्हाण.
असे रंगले परदेशस्थ मराठी कवी संमेलन….
साकव्य परदेशस्थ परिवाराच्या द्वितीय काव्यसंमेलनाचा साद्यंत अहवाल अतिशय सुरेख दिला आहे. ह्या कार्यक्रमाच्या समन्वयक सौ. तनुजा प्रधान आणि संयोजक डाॅ.गौरी जोशी कंसारा ह्या दोघी खरोखर इतकी मेहनत घेत आहेत, त्यांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.
– अरूणा मुल्हेरकर.
‘जीवन प्रवास’ ( २३ )
वर्षा खूप सुंदर आठवणी 👌👌 कविता कितीही वेळा वाचा रडू येतेच
– कांचन बोइर.
समाजभूषण : २ पुरस्कार
समाजभूषण हे पुस्तक अतिशय वाचनीय सुंदर आहेच.
दोन नामांकीत पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन !
– राधिका भांडारकर. पुणे
“ओठावरलं गाणं” ( ५० )
वसंत प्रभू यांनी अनेक गाणी अजरामर केली, त्यातील हे भा.रा.तांबे यांचे एक गीत. आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. सातत्याने ५० प्रसिद्ध गाण्यांचे रसग्रहण करुन आपण अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन.
– विवेक भावे.
“आयुष्य”…
डाॅ. कल्याणी मसादे यांची आयुष्य ही कविता सुंदरच आहे.
पण ती स्वरचित नक्कीच नाही.
मीडीयावर ती अनेकवेळा वाचलेली आहे
– राधिका भांडारकर. पुणे
वाफाळणारा एकच प्याला…
🌹दोन पिढ्यातील अंतर 🌹खूप छान वर्णन केलंत आपण, आता खरी तीच वेळ आली आहे. दोन्ही पिढ्या समजून घ्या.
जुनं ते सोनं असं ठणकावून सांगणारे आहेत अजून.
मन जुळून घ्या.
अभिनंदन नीला बर्वे जी.
– अशोक साबळे. 🌹🌹
“ओठावरलं गाणं” ( ५० )
रसग्रहण छान झाले आहे. बघता बघता 50 गाण्यांचे रसग्रहण केलेस याबद्द्ल तुझे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– विराग भावें.
“माहिती”तील आठवणी ( ७ )
श्री मोहिते म्हणजे कोकण विभागातील माहिती कार्यालयातील सर्व बाबतीतील जाणकार कोष. मी त्यांच्याशी आस्थापना शाखेतील कामांकरिता नेहमी संपर्कात असायचो. अगदी ते रजेवर असले तरी ते मोबाईलवर कार्यालयीन कामांसाठी तत्पर असायचे. काही वेळा रजेवर असतानांच आॅफीसमध्ये कोणता संदर्भ कोठे ठेवला आहे हे सांगून वेळेत पूर्तता करायचे. कोणत्याही कारणाने काम खोळंबता कामा नये यासाठी त्यांची तत्परता अगदी वाखाणण्याजोगी होती. खूपच छान लेख
– विलास कुडके.
खुपच रम्य पर्यटनस्थळ आहे विविध प्रकारच्या पक्षाचे योग्य ठिकाण आहे.
– विक्रांत मिस्त्री.
“माहिती”तील आठवणी ( ७ )
श्री. अविनाशजी पाठक यांस वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा !
देवेंद्र सर, आज तुम्ही एका अष्टपैलू न्यूज पोर्टल संपादकाची ओळख घडवून आणलीत.आणि तेही तुमचे मैत्रीस्पर्धक ! पण तुमच्या ठायी त्यांच्या विषयी असलेला आदर, व तुमचे मैत्रीप्रेम वाचून वाचकांस प्रेरणा मिळाली.
श्री.अविनाशजी यांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
– सौ.वर्षा भाबल.
“चित्र सफर” ( ४ )
मित्रा संदीप खुप छान लेखन केलंस,
गायनाबरोबर लेखणाचाही छंद असाच जोपासत रहा.
भावी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. 💐💐
– सुशीलकुमार दुसाने.
पं. शिवकुमार शर्मा यांच्याविषयी सविस्तर माहिती वाचून त्यांच्या विषयी आदर आणखिन वाढला. त्यांच्या नम्रतेला त्रिवार अभिवादन. खरोखरचं ते अमर आहेत
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🌹🌹
हिरवळी
निसर्गाचे, पर्यावरणाचे जतन करण्यांचा बोध देनारी छान कविता. सुंदर धन्यवाद🙏
‘माहिती’तील आठवणी
छान 👌👌. एकमेकि साह्य करू, अवघे धरु सुपंथे 👍👍
“चित्र सफर” ( ४ )
सुपरस्टार राजेश खन्ना यांची सचित्र खूप सुंदर माहिती
वाचताना जून्या जमानात घेवून गेली .खरोखर असा सुपरस्टार पुन्हा होने नाही. आजही त्यांची गाणी ऐकत राहवेसे वाटते. धन्यवाद।
अविनाश पाठक : हक्काचा माणूस
बहुविध व्यक्तिमत्वाच्या अविनाशजींना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹💐💐
– आशा दळवी. फलटण, सातारा.
“रे ऑफ लाईट”
Excellent write up for person who is great photographer, teacher n working for social cause. He has inspired so many young people by imparting knowledge about photography in his lectures. All the best for his future endeavors.
– ज्योती राऊत.
“रे ऑफ लाईट”
डॉक्टर नितीन सोनवणे यांची सर्व छायाचित्रे बोलकी आहेत. त्यांच्या चित्राततूनच त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याचे जाणवते. धन्यवाद
– आशा दळवी. फलटण, सातारा.
‘लालबत्ती’ ( २९ )
या कथेतून लेखिकेने एका सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले आहे.
“नवी दृष्टी”: रघुनाथ नेत्रालय
तात्याराव लहाने ह्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कार्य मौलिक आहे. त्यांनी सुरू केलेल्या नेत्र रूग्णालयाच्या उद्घाटनाचा वृत्तांत निस्चितच वाचनीय आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
“ओठावरलं गाणं” ( ५० )
50 शी करता अभिनंदन। गाण्यांचे रसग्रहण समर्थक झाले आहे।
– स्नेहा साळुंके.
जिद्दी चित्रकार माधवी पाटील
माधवीताईंचे मनापासून अभिनंदन तसेच त्यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिद्द असली की वय कधीच आडवे येत नाही आणि वाटेतले अडसरही सहज नाहीसे करता येतात हे वर्षाताईंनी सिद्ध केले आहे.
– अरूणा मुल्हेरकर.
विश्वास…
अरुणाताई मुल्हेरकर यांची शामलाक्षरी खूपच छान. सुरेख लयबद्ध अर्थपूर्ण शब्दरचना. भाषेचा सुंदर लहेजा.
विश्वास या कवितेचे विसुभाउंनी केलेलं रसग्रहणही खूप सुंदर आणि शब्दसंपन्न!
– राधिका भांडारकर. पुणे
“नवी दृष्टी”: रघुनाथ नेत्रालय
🌹डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्याबद्दल काय बोलाव ??? 🌹
एक अनमोल रत्न
– अशोक साबळे.
– टीम एनएसटी. 9869484800.