Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
आपण “वाचक लिहितात” या सदरात पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या आणि व्हॉट्सॲप वर प्राप्त झालेल्या अशा संमिश्र प्रतिक्रिया देत आलो आहोत.

आपणास कळविण्यास आनंद होतो आहे की, आपल्या पोर्टलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दिवसेंदिवस वाचकांचा प्रतिसाद वाढतच आहे. या बद्दल आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.

या वेळेपासून आपण आता पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या प्रतिक्रिया, या सदरात देणार नसून फक्त व्हॉट्सॲप वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रियाच देणार आहोत.

अर्थात व्हॉट्सॲपवर प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांना विनंती आहे की, त्यांनीही पोर्टलवर प्रतिक्रिया देण्याचा अवश्य प्रयत्न करावा, जेणे करून लेखक व अन्य वाचक त्यांच्या प्रतिक्रिया तत्काळ वाचू शकत जातील.
धन्यवाद.
आपला लोभ असाच कायम ठेवा.
पुढे, गेल्या आठवड्यात व्हॉट्सॲप वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया देत आहे.
आपली,
टीम एनएसटी

श्री विलास कुडके यांच्या “डुलकी”वर “डुलकी”
न घेता पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.😊

🏋🏻‍♂️🕴️डुलकी लेखाचा परमोच्च आनंद, विलासजी आपल्याप्रमाणे आम्हास देखील झाला. आपले मनःपूर्वक अभिनंदन ! देवेंद्रजींचे विविध छायाचित्रासहित संपादन तितकेच कौतुकास्पद.!
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक

रूक्ष टिपण्या आणि प्रस्तावांच्या वाळवंटातून प्रवास करता करता अखेर लेखनानंदाच्या शाश्वत सरोवराकडे तुमचा प्रवास होताना दिसत आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा🌹
– श्री प्रल्हाद जाधव, निवृत्त संचालक (माहिती)

वा छानच लिहिलंय. मजा आली वाचतांना😀
– सौ चिमोटे.

डुलकी :: डोळे तर जड झाले नाही वा जांभळी पण आली नाही, वाचता वाचता हास्य मात्र एक एक प्रसंग फुलवत गेला माझ्या चेहर् यावर. सुंदर लेख. छान फुलवलाय. खूप आवडला. लेखनशैली उत्तमच. धन्यवाद कुडके साहेब🙏साहित्य स्वाद व त्यातील मसालेदार खाद्य माझ्या सारख्या पामरास उपलब्ध करून दिले, या वयात आणि काय हवं
– श्री सा. न. पुंड 🙏

Dear Vilasji chhan. Dulki or dozing which is otherwise a matter of ridicule,u have made it interesting n also unfolded it’s necessity n importance. Congrats .🥰
– Shri Ranjitsinh Chandel.

डुलकी घेत घेत विलासची डुलकी वाचली. असेच एकदा चंद्रपूर जात असताना आपल्या दौलत नावाच्या वाहन चालकाला झपकी लागली. गाडीत पत्रकार होते. टाईम ्सच वैद्य यांनी प्रसंगावधान साधुन स्टेअरींग हाती घेतले आणि एका मोठ्या अपघातातून सर्वांना वाचविले. समोरच केटर पिलर थांबला होता. वसंत चौधरी, गाडी त होते… ते, नागपूर चे विभागीय माहिती अधिकारी होते… तेव्हा जे. सी. पी. ला केटर पिलर म्हणत असत…
– श्री सुधाकर धारव, निवृत्त उपसंचालक (माहिती)

डुलकीच यथार्थ वर्णन अगदी बारीक तपशीलासह. छान लेख. आपल्या कार्यालयातील आठवण असेलच
‘चल काहितरीच काय’.
– श्री किरण ठाकूर

याशिवाय पुढील वाचकांनी त्यांना “डुलकी” आवडल्याचे कळविले आहे.
श्री दिगंबर पालवे,
श्री राजेंद्र महाडिक
निवृत्त लघुलेखक
श्री विष्णूपुरीकर
सौ. प्रिया रामटेककर, लघुलेखक
श्री रवीप्रकाश करंबळे
श्री राजेंद्र अभोणकर
श्री भा. शं. यादव
श्री गणेश फुंदे
श्री चेतन अशोक कुडके
श्री गणपत घोरपडे, डीएड ग्रुप
प्रा. युगांत अशोक कुडके
सौ. संगिता आखाडे
श्री विलास ननावरे
डाॅ. योगिता मिस्त्री
श्री प्रकाश देशपांडे, सहायक संचालक
(जाहिरात-प्रशासन)
श्री विकास पाटील, फिल्म एडिटर
श्री विलास शिर्के
श्री अजय अंबेकर, निवृत्त संचालक (माहिती)

“चित्र सफर:५” मध्ये आपण थोर संगीतकार राहुलदेव बर्मन उर्फ पंचमदा यांचा संगीत प्रवास पाहिला.
या विषयी प्राप्त प्रतिक्रिया पुढे देत आहे.

मित्रा, तुला या पुर्वीच्या लिखानाबद्दल जे अभिप्राय दिले तेच याबाबत आहेत.मला वाटतं संगीत, गायक कलाकार,गीत लेखन करणारे कवि (शायर) यांच्या योगदानावर तु एक पुस्तक लिहावस ज्याचं नाव काहीसं असं असाव “भारताच्या फिल्मी संगीताचे स्तंभ”
पंचमदा यांच्या संगीत प्रवासाबद्दल जी माहिती तु प्रकट केली ती अप्रतिम आहे, त्याबद्दल तुझं कौतूक. आपला
– शाम अ.हिंगे. अधीक्षक, जलसंपदा विभाग, औरंगाबाद

Zakas……
श्री विजय गायकवाड पुणे

_👌👌खुपचं अभ्यासपूर्ण लेखन, बारकाव्यानिशी मांडणी केली आहे.
भुजबळजी, आपण जोपासलेल्या गायन व चित्रपट गीते समीक्षण या छंदाला १००% न्याय दिला आहे. असेच लेखन करीत जा. आपणांस खूप साऱ्या शुभेच्छा… 🙏🙏
– श्री अविनाश ठाकूर मुक्तांगण मित्र ,राहुरी

सुरेख व संक्षिप्त लेख !👌🏼आदित्य संदीप भुजबळ, पुणे

खूप छान संकलन👌
– श्री महेश रासने. संगमनेर

Great Post खूपच भारी👌
प्रा.श्री .संजय आव्हाड संगमनेर

Great 👍
श्री जी ऐल वाकचौरे से नि उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग संगमनेर

लय भारी माहिती 👌श्री केशव कुंभकर्ण स्वरभक्ती ग्रुप औरंगाबाद

Super .Very nice 👍 श्री महेश सराफ संगमनेर

पंचमदा ग्रेट.
कोई शक नही.
खुप छान लेख 💐
– श्री महेश मुर्तडक घुलेवाडी ,संगमनेर

very great musicians
As well as singer श्री राम पेठकर ,नाशिक

सुपर
सौ. सुप्रिया भुजबळ. पुणे

खूप सुंदर लेख .
वाचून मला सर्व गाणे ऐकायला येत आहे असे वाटत होते. सारे गायक गातांना डोळ्यासमोर आले .
– सौ सुरेखा गोऱख रासने संगमनेर
संदीप
तु , तुझा गायना बरोबरच लेखणाचा छंद मस्त जोपासला.
Keep it up. 👌👍👍👍👍
प्रा सुशीलकुमार दुसाने मुंबई

संदिप सर ,खुप छान. आमच्यासाठी खुप अनजान माहिती समोर ठेवलीत.👍👍
खुप बारकाव्यानीशी लेखन केले आहे.
तुमच्या लेखनीचा आणखी विस्तार झाला तर एक नवीन साहित्यिक उदयास येईल हे नक्की.🙏🏻🙏🏻 श्री विजू रोहकले मुक्तांगण मित्र अहमदनगर

Khupach Sundar ase Pancham da baddal varnan kele ahe.Apla khup gadha abhyas ahe.Ashich navnavin mahiti Sangita baddal det rahave hi vinanti.Sundar…
Khup chhan,.. keep it up.🌹🌷🙏🏿🌷🌹 श्री हेमचंद साखरे डिफेन्स अधिकारी अहमदनगर

श्री प्रवीण ,जलसंपदा विभाग, निलिमा मेहता नाशिक, आसद शेख जलसंपदा विभाग संगमनेर,श्री महेश अस्वले, संगमनेर
श्री योगेश भुजबळ मुंबई । सौ स्मिता गुणे संगमनेर। सौ संपदा रासणे डोंबिवली श्री आकाश राठी संगमनेर दीपा सिंग मुंबई ।राजेश राजपूत मुक्तांगण पुणे । संदीप आवचीते संगमनेर
सौ शिल्पा तंटक, डोंबिवली, श्री भोई, जलसंपदा विभाग संगमनेर यांनीही स्टोरी आवडली आहे, असे कळविले आहे.

गंगा आणि नितीन गडकरी लेख छान. खरोखरच श्री . नितीन गडकरींचा कामाचा आवाका, झपाटा प्रशंसनीय आहे . त्यावर प्रकाश पाडल्या बदल
श्री .विनोद देशमुख ह्यांचे अभिनंदन !लेख उत्कृष्ट
– सुलभा गुप्ते. पुणे

नमामि गंगे…
नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त
जेष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल अभिनंदन. फारच माहितीपुर्ण अन तपशीलवार असा हा दस्तऐवज झालाय.
देवेंद्रजींनी उत्तम संस्कार केले आहेत.विनोद व मी अकोला येथे सोबत काम केले आहे.
आता तर ते मा. गो. वैद्य सारखेच दिसतात !
🌹🙏🌹
– सुधाकरराव धारव
निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ

ओला मधील अनुभव..सावध राहायला हवे !
बहावा आणि डिजिटल डिटोक्सिफिकेशन… लेख छानच
– कवयत्री पद्मजा नेसरीकर. पुणे

अनुपमा मुंजे यांची “एकांत” ही रचना खुप भावली मनाला …
अप्रतिम…..
– अरुण पुराणिक. निवृत्त पर्यवेक्षक, पुणे

वरळी किल्ल्याची माहिती मिळाली. हा आमचा भाग आहे.
धन्यवाद
न्यूज स्टोरी टुडे आणि मा देवेंद्र भुजबळ.
– मोहनदास. निवृत्त दूरदर्शन निर्माता

वैजयंती आपटे यांनी लिहिलेल्या
“एक न पाठविलेले पत्र”
यास वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. प्राप्त प्रतिक्रिया पुढे देत आहे…
१. एक न पाठविलेले पत्र देण्याचा आनंद, ऋणात रहाण्यातला आनंद आणि सतत कार्यरत राहण्याकरिता वापरलेल्या ऊर्जेचा आनंद सागणारं अप्रतिम पत्र
– डॉ. हेमंत विंझे. मुंबई
२. आज मला एक उच्च आणि उत्तम असं आभारपत्र वाचायला मिळालं, त्यात व्यक्त केलेले, खोलातुन उतरवलेले …. जीवनात भेटलेल्या स्फूर्तिदायक व्यक्तीवर्णनाचे विचार लिहिलेत, की त्या स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वामुळेच , त्या मनोपरिवर्तन झालेल्या व्यक्तीने आभारात्मक असा मनोगतालेख वैजयंती आपटे हिने आपल्या लेखनातून फारच सुंदर लिहून व्यक्त केला आहे की जणू तो ‘ गॉडफादर ‘ तिला स्वतःलाच
भेटला होता की काय ! असंच मला, काही क्षण वाटलं….
– केदार केळकर. पुणे-४
३. ऋणात राहूनही ऋणनिर्देश दाखवणारे हृदयस्पर्शी पत्र.
– विभावरी केळकर, पुणे
४. “एक न पाठवलेले पत्र”
वैजयंती आपटे यांचे हे पत्र वाचनात आले. हे पत्र वाचताना मनात अनेक विचार येऊन गेले.
आपल्या आयुष्यात वाटचाल करत असताना आपल्याला एक नाणे सापडते. त्याची एक बाजू रस्ते व दूसरी बाजू नाते असते. आपण कधी कधी नाते सांभाळतांना रस्ते चुकतो. तर कधी कधी रस्त्यावर चालताना नविन नाती जोडली जातात. या तत्वाला
कोणतीही जात,धर्म, अटी नसतात. मार्गदर्शक मित्र जरी आपल्यापासून दूर असला तरी हरकत नाही कारण त्याचे नाते आपल्या मनांत , हृदयात ,आठवणीत आपण जपलेलं असतं. वैजयंतीला असेच मार्गदर्शक ,जीवनाची वाटचाल करताना मिळाले ते नाते तीने एकाद्या पिंपळपानासारखे जपले आहे. त्याची जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात जपून ठेवले आहे.
अशा या तरल मनाच्या वैजयंतीच्या मनाची होणारी
तगमग खूप सुंदर शब्दात तिने मांडली आहे. त्याबद्दल
मनापासून अभिनंदन
– कमलाकर दिवाकर
५. वैजयंती आपटे यांचे ‘एक न पाठविलेले पत्र’ हे ललित लेखन फारच आवडले .त्यांच्या मनात लपलेल्या अंधारातील खोल भावनेला ज्या अनामिक ‘गाँड फादर’ वा ‘अंधारवडा’च्या प्रकाशाचा स्पर्श झाला त्यांच्या प्रेरणेतून हे लेखन झाल्याचे वैजयंतीजींनी प्रामाणिकपणे कबूल केले आहे. ही काव्यात्मक कल्पनाच खुप भारावून जाते. अशा या मार्गदर्शक व मदतीचा हात देणाऱ्या आणि अनंत अडचणीतून निरपेक्ष मार्ग दाखविणार्याच्या ऋणातच राहून पत्र न पाठविण्याची जी मनोभावना अभिव्यक्त केली आहे ती वाचून तर मी निश्चितच प्रभावित झालो..!
‘न पाठविलेले पत्र’ हे उत्तम लेखन वैजयंतीजींनी सादर केले आणि देवेंद्रजींनी तिला सुयोग्य स्थान दिले. त्याबद्दल दोघांना धन्यवाद आणि. मनापासून शुभेच्छा.
🪷सुधाकर तोरणे🪷
– निवृत्त माहिती संचालक. नाशिक

गावाकडे जातांना….लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात👌
…….वर्षा फाटक, पुणे

भुजबळ सर, तुम्ही आणि अलका ताईंनी जी कल्पना केलीत आणि त्यात विसुभाऊंचे अप्रतिम काव्य विश्लेषण याने या उपक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले ! भविष्यातही आपण असेच सुंदर उपक्रम राबवून साहित्याची सेवा करत राहू हीच आशा आहे.

त्याबद्दल या द्वितीय आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवयित्रींच्या वतीने आणि साकव्य परदेशी परिवार समूहाच्या तर्फे मी, तनुजा प्रधान, साकाव्य परदेश परिवार समूह प्रमुख, न्यूज स्टोरी टुडे आणि विसुभाऊंचे मनापासून आभार मानते. 🙏🙏
– तनुजा प्रधान. अमेरिका.

सर्वच सदर नेहमीप्रमाणे वाचनीय👌👌
“मनाच्या गंधकोषी”
खूप सुंदर पुस्तक समीक्षण👌👌🌹🌹
विशेष आवडले.👍👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई

आदरणीय मैडमांनी ओला कंपनीच्या तक्रारी चे 100 % दखल घेतली जाईल सरजी.
– अनिल बोराडे. संपादक, धुळे.

नमस्कार,
भुजबळ सर .🙏🙏
सर मनापासून धन्यवाद पहिलाच प्रयत्न केला आहे आणि तो आपल्या सिद्ध हस्त कलेने तुम्ही पोर्टल माध्यमातून मांडलाय खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन या ललित लेखन मालेला न्याय दिल्याबद्दल 🙏 💐
– सौ माधवी ढवळे. राजापूर

“द्रोणागिरीची सफाई”
वाह, छान उपक्रम
– प्रिया मोडक. मुंबई

परदेशस्थ, म्हणजे खरंच वेगवेगळे देश आहेत. आयोजकांची आणि सहभागी होणाऱ्यांची कमाल आहे..

“ओला”त बसलात सावधान, एक न पाठवलेल पत्र, शिवकुमार शर्मा सारच आवडलं.
द्रोणागिरी सफाई, पुस्तक परीक्षण, हुंडा विरोधी लिखाण स्पर्धा सारेच विषय वाचनीय आहेत.
– सुनंदा पानसे. पुणे

उपरोक्त सर्व वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…