नमस्कार, मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
समृध्दी निघालीय ब्राझील ला…या यशकथे विषयी पुढील कौतुक पर प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
अभिनंदन समृध्दी आणि तिच्या आई बाबाचे. 💐
– संगीता सावंत. महाड
अभिनंदन बेटा …👌🌹 प्रशंसनीय कार्य देवेंद्र भाऊचे आहे. समाजातील हिरकणी शोधून त्यांना पूढे आणण्याचे सुन्दर कार्य ते करीत आहे. धन्यवाद भाऊ.
– सौ जोस्तना शेटे. अमरावती
समृद्धीचे कौतुक करून तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल news story today चे कार्य अभिमानास्पद आहे 👏🏻
– सौ मनीषा पाटील. पालकाड, केरळ.
🏋🏻♂️🌹कु.सम्रुध्दी नितीन विभुते हिचे, तिच्या आई वडिलांसह अभिनंदन. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा रोटरीयन एक्सचेंज प्रोग्रॅम महत्वाचा आहे. पुण्यात पाच सहा तरी रोटरी क्लब एरिया नुसार असावेत,म्हणजे स्पर्धा स्पर्धक भरपूर. त्याच प्रमाणे त्यांचे झोन वैगरे मग अंतिम. या काहीशा अवघड वाटचालीतून सम्रुध्दीने हे यश मिळविले याचा अभिमान वाटतो. देवेंद्रजी व सौ अलकाजी या दांपत्यांचा गुणीजनांचे कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा देण्याचा आणि प्रत्यक्ष करण्याचा, तसेच पुरस्कार, भेटी देण्याचा उभयतांचा स्वभाव, आवड व छंद पाहून, वाचून समाधान वाटले. पुनश्च सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
.🏋🏻♂️(ही निवड होणे फारच कठीण असते याचा प्रत्यक्ष अनुभव मी त्या वयाच्या अवधीत घेतला होता. टफ फाईट दिली. पण नंबर लागला नाही. म्हणूनच कु.सम्रुध्दीचे यश मी मोलाचे मानतो. सहजच आठवले म्हणून सांगितले.)🤫
– सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
गुरू कृपादृष्टी या देशात पुज्यली जाते. त्यामुळे दिशा दृष्टी प्रकर्षाने जागृत होते. ईतर लेख नेहमी प्रमाणे वाचनीय आहेत. हल्ली अवांतर वाचनाची जागा मोबाईल ने घेतल्यामुळे आपल स्थान अढळ झाल आहे. संपादकास गुरू पौर्णिमा च्या शुभेच्छा💐
– सुधाकर धारव. यवतमाळ
अरुणा मुल्हेरकर यांचा गुरुविण दुजा नसे कोण हा लेख अप्रतीम आहे.
वळणावळणाच्या वाटेवर जीवन चालत असते. वाट कुठे जाते, कुठे संपते सारेच अज्ञात. गुरु हा वाटाड्या असतो….अगदी योग्य शब्दात त्यांनी गुरुचे महत्व सांगितले आहे…सुरेख.
– राधिका भांडारकर. पुणे.
“गुरू देवो भव” पुजा काळे यांनी लिहिलेल्या लेखावरील प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१..अतिशय मोजक्या शब्दात 🙏 गुरुमहती 🙏 आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले…. खूपच सुंदर..💐
– ञिवेणी पवार-जाधव. चिपळूण
२..आधुनिक जगात गुरूची जागा संगणकाने, मोबाईलने घेतली आहे असे वाटले तरी जीवंत मनाचा गुरूच आपलं अस्तित्व निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो हे पूजाने वर्णन केलेल्या योग्य, समर्पक शब्दांतील गुरूच्या महतीवरून लक्षात येते.
जीवनातील प्रत्येक टप्प्यावर भेटणाऱ्या गुरु बद्दल सांगताना तिची लेखणी अधिक प्रगल्भ झाल्याचे दिसून येते. गुरूची महानता व्यक्त करताना खर तर शब्दही अपुरे पडतील पण पूजाची अभिव्यक्ती वाखाणण्याजोगी आहे. पूजा काळे यांची लेखणी अशीच नवनवीन विचार प्रकाशमान करत राहो हीच शुभेच्छा.
– सुजाता घाडीगावकर (मुंबई)
३.. खरंच, मुलगी शिकली, प्रगती झाली. पूजा एवढा गहन विषय किती सुंदर शब्दात बांधून रचना केलीस. सुंदर 👌👌👌
– नंदिनी चं. मोरे (विरार)
४…पूजा मोजक्या आणि समर्पक शब्दात गुरूचे महत्त्व सांगितलेस. छान जुळून आला आहे लेख.👍
– अनिता शरद कांबळे (मुंबई)
शुभदा पंडित यांच्या “भेट” वर पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
शुभे, सगुण निर्गुणा पासून, द्वैत अद्वैतापर्यंत, भक्त भगवंता पासून, मैत्र, प्रेम, माया, ममता, समर्पण सगळ्याशी उराउरी ह्रदयस्पर्शी भेट घडवलीस 👌🌹🤝🤝🤝🌹❤️ फार छान, पुढची भेट कुठली ? या उत्सुकतेत आणि प्रतीक्षेत 🌷🌷
– कुमुद राळे
भेट, या दोनच अक्षरी शब्दाचा किती विस्तार होऊ शकतो आणि किती इंद्रधनुष्यी रंगात तो भेटू शकतो, खरंच लेखिकेचं कसब वाखाणण्याजोगं आह.
त्यांचं खूप खूप कौतुक .
– शुभदा कर्णिक
शुभदा, खूपच सुंदर देखणी प्रेमाची भेट मनापासून आवडली ग !! अभिनंदन !! 👍🤝👏👏🌹😊🙌
– रश्मी जोशी
शुभदा, विविध प्रकारच्या भेटींमधुन तु छान भेटलीस
– शामा आंबेडकर
भेट
http://newsstorytoday.com/भेट/
भेट खूप मस्त.
खरंच भेटलीस पाना पानातून.
मन व्यक्त केलंस शब्दा शब्दातून
– सुषमा जोशी.
शुभदा “भेटी” चे किती पदर उलगडलेत लेखात…अप्रतिम लेखन
– नीता जोशी
खूप छान लेख. भेटीचा विस्तृत अर्थ भेटला. सकाळी सकाळी एक प्रसन्न करणारा सुंदर सहज शब्दातून व्यक्त केलेली भेट खूपच छान वाटली. अशाच भेटत रहा. 😊
– लीना राजवाडे
भेटीची वेगवेगळी रुपे यांचे वर्णन खूप छान केले आहेस. पण परमात्म्याची भेट सर्वात आनंददायी आहे
– ज्योती जोशी
रश्मी हेडे यांची कविता मला आवडली छान आहे👌👌👍😀
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया.
रश्मीजी सुंदर, कविता वातावरणाचे ताजे वर्णन.
– बाळासाहेब झरकर. पंढरपूर.
सेवाभावी दाम्पत्य लेख छान झाला आहे.
कोणत्याही गोष्टीत आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो
– वासंती पाठक. नाशिक
‘मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा’ खूप आवडले सर. सारस्वतांची मांदियाळीच होती कार्यक्रमाला. अटेंड करता आला असता तर आणखी आनंद वाढला असता.
डॉ सचिन, डॉ जयश्री लोखंडे यांच्यावरील लेख सेवाभावी दाम्पत्यही विशेष प्रेरणादायी.
– डॉ रझाक शेख. नाशिक
छान आहे अंक.
मराठी सातासमुद्रापार साठी विशेष शुभेच्छा
राष्ट्रपती निवडणूक माहितीपूर्ण …
सेवाभावी डॉ दाम्पत्याचे अभिनंदन ..
डॉ विजया राऊत यांच्या लेखाचा पुढील भाग येण्याची वाट बघू या.
भाबल यांची कविता चांगली आहे.
– स्वाती वर्तक. मुंबई
भूतली वैकुंठ .. सुंदर अभंग 👌👌
मराठी सातासमुद्रापार.. पुस्तक नक्की वाचणार 😊
– सौ मनीषा पाटील. पालकाड, केरळ.
श्री.विजय पवार यांचा राष्ट्रपती. निवडणूक संदर्भात माहिती पूर्ण लेख आवडला..
– सुधाकर तोरणे
मला सुरेखा ताईंच्या बाल कविता खूप आवडल्या. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून छान लिहिली आहेत गाणी👌👌👍
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
गुरुपौर्णिमेच्या सर्वच कविता भावपूर्ण !!!
– डाॅ.मधुसूदन घाणेकर, पुणे
म पां भावे यांची विराणी जी माणिक वर्मा यांनी गायली.अशोक पत्की यांनी संगीत दिले…त्या सुंदर गाण्याची आठवण विकास भावे यांनी करुन दिली. सुंदर रसग्रहणासहित…
धन्यवाद विकासजी…
अरुणा मुल्हेरकर यांचा गुरुविण दुजा नसे कोण हा लेख अप्रतीम आहे.
वळणावळणाच्या वाटेवर जीवन चालत असते.वाट कुठे जाते, कुठे संपते सारेच अज्ञात. गुरु हा वाटाड्या असतो….अगदी योग्य शब्दात त्यांनी गुरुचे महत्व सांगितले आहे…सुरेख.
– राधिका भांडारकर. पुणे.
गुरुपौर्णिमा वरील सर्वच कविता अत्युत्तम 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही पण हे आपण काय अनुभवतो आहे. सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. सत्तेची लालसा एवढी वाढली आहे की माणूस सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. राधिका ताईंनी लिहिलेला लेख अतिशय सुरेख आहे. अगदी विचार करायला लावणारा. खूप छान ताई👍👌🏻👌🏻
सर्व ok मध्ये आहे मस्त कविता. खूप छान सर्व ok मध्ये आहे च छान विडंबन😄👌🏻👌🏻
समृद्धी ब्राझील ला जात आहे. तिचे खूप खूप अभिनंदन 💐आणि खूप खूप शुभेच्छा👍
गुरू शिवाय माणूस घडेलच कसा ? आई वडील आपले आद्य गुरू असतात. जे आपल्याला चालायला बोलायला जेवायला शिकवतात. पण पुढे जायला आयुष्याच्या वाटेवर गुरूचीच साथ लागते. हे सांगणारा पूजा काळे यांचा लेख खूप आवडला.
जेम्स थॉमस यांचे शतशः ऋणी आहोत. या शब्दकोश किती महत्त्वाचा आहे. विद्यार्थी पण याचा छान उपयोग करू शकतात. प्रा डॉ किरण कुलकर्णी फार मोलाची माहिती दिली आणि छान लिंक पण शेअर केली. खूप खूप धन्यवाद किरण सर🙏🏻
विरहावस्था दर्शविणाऱ्या गाण्याचे अतिशय सुंदर रसग्रहण अगदी सुंदर शब्दात मांडले आहे. नायिकेची तडफड अगदी मनाला भिडते. खूप सुंदर रसग्रहण धन्यवाद भावे सर👍
सौ सुरेखा गावंडे यांनी लिहिलेल्या संजलची दंगल सवंगडी आणि सांग सांग आई इत्यादी साहित्य बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा💐
केवळ भेट या शब्दावर किती सुंदर लिखाण किती प्रकारच्या भेटी असू शकतात हे खरचं आज मला हा लेख वाचून जाणवले. अतिशय सुंदर लेख 👌🏻👌🏻👌🏻खूप भावला किती सूक्ष्म निरीक्षण केले आहे निरनिराळया भेटींचे. केवळ ‘न्यूजस्टोरीटुडे‘ मुळे हे छान साहित्य वाचायला मिळते. खूप धन्यवाद शुभदा ताई आणि तुमच्या प्रतिभेला सलाम🙏🏻
ज्योत्स्ना तानवडे यांचा भूतली वैकुंठ अभंग छान वाटला. राष्ट्रपती निवडणुकी बद्दल खूपच सविस्तर आणि छान माहिती मिळाली.
धन्यवाद पवार सर.🙏🏻
डॉ सचिन आणि डॉ जयश्री लोखंडे या सेवाभावी दाम्पत्यांचे काम आमच्या पर्यंत पोहचवले खूप धन्यवाद भुजबळ सर. आणि डॉ सचिन आणि डॉ जयश्री यांना खूप शुभेच्छा💐
वर्षा भाबल यांची पावसावरील कविता खूप सुंदर👌🏻👌🏻
विनोद खन्ना अतिशय हँडसम हिरो त्याचे बरेच सिनेमे पण मी पाहिले आहेत मला विनोद खन्ना खूप आवडायचा. त्याची खूप छान माहिती आज वाचायला मिळाली. धन्यवाद संदीप भुजबळ सर 🙏🏻
जागतिक न्याय दिवसाची फारच छान माहिती खूप आभार प्रज्ञा पंडित मॅडम
पावसाचे सुरेख वर्णन रश्मी हेडे यांची खूप छान कविता 👌🏻👌🏻👌🏻
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई
नमस्कार .
सर्व सदरे छान आहेत. आपल्या “मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा” या भाषणाने मराठी माणसांचा आत्मविश्वास खरेच वाढणार आहे.
“मराठी सातासमुद्रापार” या पुस्तकाच्या कवर पेजवरुनच पुस्तक छानच असेल हे समजते.
कशी होते राष्ट्रपती निवडणूक ? हा लेख माहितीपूर्ण लेख आहे
महानुभावांचे मराठी योगदान छानच.
वर्षाताईंची माणूस नी पाऊस कविता छान.
या आठवड्यांतील सर्वच माहिती छान होती.
सांग सांग आई, लालबत्ती, अभंग, सगळ्या कविता गुरूपोर्णिमेच्या कविता, लेख, ओठावले गाणे, सारेचं सुरेख.
खुप खुप धन्यवाद 🙏
– आशा दळवी. फलटण, सातारा.
जागतिक न्याय दिवस लेख छान माहितीपर आहे. आशा करूया…या वर्षी.. Achieving social justice through formal employment…..थीम असल्याने जागरूकता वाढेल.
तोरणे यांनी आपल्या आठवणीत ..त्यांच्या जाहिरातीची लिंक दिली असती तर आणखी छान झाले असते.
– स्वाती वर्तक. मुंबई
चित्रसफर मधील “हँडसम विनोद खन्ना” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
चित्रसफर
….संदिप भुजबळ यांचा लेख आवडला
….विनोद खन्ना हा हिंदी चित्रपट सुष्टीतील देखना हँन्डसम हिरो फिल्म “मेरे अपने” या हिंदी चित्रपटात त्याने रेबन गाँगल लावला आहे, त्या चित्रपटातून प्रत्येक हिरोने त्यानंतर गाँगल लावण्याचा ट्रेन्डं सुरु झाला.
– चंद्रकांत कारंडे. मुंबई.
Vinod Khanna…
Best kathanak, narration ✌🏻👑
– Satish Rasne. Navi Mumbai.
सुंदर लिहिले आहेस संदिप.
विनोद खन्ना चा ‘मेरा गांव मेरा देश’ मधील डाकूचा रोल अफलातून होता … 👌👌👍👍👍
श्री सतीश मालवणकर. नट, गायक, अकोले
खूप छान असे कलाकार होते, विनोद खन्ना..आणि आपण सुंदर असे त्यांचे वर्णन केले आहे.
Keep it up. Best luck for next stories.🌹👌👌👌👌🌹🌷🙏🏿🌷
– श्री हेमचंद साखरे. डिफेन्स ऑफिसर अहमदनगर
मित्रा, तु ज्या प्रमाणे गायकांचे बाबत लिहिलं त्यानुसार, अभिनेता विनोद खन्नाच्या बाबतीत लिहिलेली माहिती खूप छान आहे.
त्याचे चित्रपट पाहण्यासाठी सर्व वयातील दर्शक मंडळी नेहमी उत्सुक असत.
तो सर्वांचा लाडका अभिनेता होता.
– श्री शाम हिंगे.
अधीक्षक जलसंपदा विभाग, औरंगाबाद
खूप छान, एक गुणी आणि दमदार अभिनेता, जो
अमिताभच्या तोडीसतोड होता.
– गायक श्री बाळासाहेब गांगरर्डे, पुणे
Great article. विनोद खन्ना आपल्या संगमनेर मधील कचेरी ग्राऊंडवर आले होते
– श्री अंबरीश रासने. संगमनेर
कशी होते राष्ट्रपती निवडणूक indeatial माहिती UPSC, MPSC च्या मुलांसाठी उपयुक्त माहिती.
– सुनंदा शिंदे. नवी मुंबई.
प्रत्येक अंक वाचनीय व उद्बोधक, भुजबळ सरांचे आभार व धन्यवाद ! सरांनी खूप चांगला व विविध विषयावरील लेख, कविता समाविष्ट असलेला न्यूज पोर्टल सादर केला आहे .