नमस्कार, मंडळी.
गेली दोन आठवडे काही अपरिहार्य कारणांमुळे
“वाचक लिहितात…..”
हे सदर प्रसिध्द करता आले नाही,या बद्दल दिलगीर आहे. असो…..
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
काही निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा, ही विनंती.
देवेंद्र भुजबळ.
संपादक
परवीन कौस, बंगलोर
यांची कविता प्रखर राष्ट्राभिनाची….अंतर्मुख करायला लावणारी, प्रगल्भ आशयघन असलेली, नक्कीच शाश्वत कार्याकडे झुकण्याचे सहज सामर्थ्य असलेली आहे !
– डाॅ.मधुसूदन घाणेकर, पुणे .
महानुभवांचे योगदान हा डॉ. विजया राउत यांचा अभ्यासपूर्ण लेख आवडला. स्त्रीपुरुषसमानतेविषयी दिलेली उदाहरणे महत्वपूर्ण आहेत.
बाईसा आणि स्वामी यांचे गुरु भक्तीचे नाते अलौकिक वाटले.
– राधिका भांडारकर. अमेरिका
“पाहुणी” फार छान लेख आहे.
– डॉ किरण चित्रे. दूरदर्शन निर्माती. मुंबई.
ह. मु .अमेरिका.
नेदरलँडचा अमृत महोत्सव 🇮🇳👌🏻.
– सौ मनीषा पाटील. पालकाड, केरळ.
खूप छान लेख सगळे.
– प्रिया मोडक. ठाणे
सुलभा गुप्ते यांनी ईजिप्तमधला आझादीका अमृतमहोत्सवचा वृत्तांत प्रेरणादायी. त्यांनी सादर केलेली कविताही छान.
अभिनंदन सुलभाताई…
– राधिका भांडारकर. ह. मु. अमेरिका.
डॉ भास्कर धाटावकर यांचे अमेरीकेतील प्रवासवर्णन एकदम झक्कास आहे.अगदी थोडक्यात, महत्वपूर्ण आणि तेही अगदी प्रभावीपणे मांडणी असणारे असे हे प्रवासवर्णन एकदम 🔥झक्कास आहे.वर्णणस्थळांचे फोटो वापरुन ते अधिक प्रभावी झाले असते हेही मात्र नक्की खरे.
– राम खाकाळ. माजी निर्माता दिग्दर्शक मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक मिशन एक गाव एक परिवार. आणि संकल्पक मिशन विषमुक्त शेती -शेतकऱ्यांची आणि देशाची शक्ती. ठाणे (पश्चिम.)
विविध ठिकाणचा स्वातंत्र्योत्सव 👌👌
– आशा कुलकर्णी. मुंबई.
श्री रामदास अण्णा खूपच सुंदर रचना आहे मी तिरंगाच बोलतोय👌
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
दोन्ही अंक वाचले. छान आहेत.
स्वातंत्र्य दिनाचा अंक सर्वांगसुंदर झालाय.
– स्वाती वर्तक. मुंबई.
ब्राझील डायरी… समृद्धीने छान शब्दात व्यक्त केली.. अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…💐💐
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.
संपदा पंडितचा मन हेलावून टाकणारा अप्रतिम लेख वाचला, हिंगोलीच्या आपल्या जवानाच्या हृदयद्रावक प्रसंगाचं संपदाने केलेलं वर्णनही तितकचं चटका लावणारं वाटलं. लिखाणाची कला तिच्यात दिसतेयं, सतीशचं लिखाणाचं स्वप्न ती नक्कीच पूर्ण करील असं वाटतं, आपणही जमेल तशी तिला मदत करूया. आज तुम्ही तिला प्रसिध्दीचा एक मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. 👍😊
– वीणा गावडे. मुंबई.
नवयुगाचा अश्वत्थामा ही लीना फाटक यांची काव्यरचना मनाला भिडली. प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारा आहे. कणाकणाचे मरण नकोच…अखेर मृत्यु हेच सुखधाम आहे ..याची शाश्वती देणारी ही कविता आहे..आणि खरोखरच याचा गंभीरपणे विचार व्हावा…तशी कृतीही व्हावी..
– राधिका भांडारकर. ह मु. अमेरिका.
प्रांजली बारस्कर ह्यांच्या जिद्दीच कौतुक करावं तेवढं थोड आहे .बारस्कर कुटुंबाची कमाल आहे, सुनेला अशी जोड देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे..
डॉ विद्या मंत्री ह्यांचा शेवट गोड व्हावा हा लेख फारच आवडला. अगदी सहजपणे त्यांनी आपला जीवन प्रवास त्यांनी अलगदपणे सुंदर शब्दात उलगडला आहे. त्यांचं अभिनंदन…
दिलीप चावरे आणि डॉक्टर किरण ठाकूर दोघांचेही लेख वाचनीय व उत्तम माहिती देणारे आहेत..
परावलंबी जीवन झाल्यावर काय वाटत असेल ते ह्या शब्दान मधून उमजत आहे कवितेतून लीनाताई ..
– सुनंदा पानसे (पुणे)