नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
विशेष म्हणजे आपले “वाचक लिहितात” हे सदरही आपणा सर्वांमुळे लोकप्रिय ठरले असून, असे सदर असलेले, आपले पोर्टल बहुधा एकमेव आहे 😊
असाच लोभ असू द्या.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक.
www.newsstorytoday.com
डाॅ. विजया राऊत यांचा महानुभवाचे योगदान अंतर्गतचा आजचाही लेख अत्यंत वाचनीय. एका वेगळ्या काळात घेऊन जाणारा. ज्या काळात स्त्रियांना समानाने वागवत.
चक्रधर स्वामी आणि त्यांचा महानुभव पंथ यांची ओळख या लेखातून होते.
महदाईसा यांनी रचलेल्या रुक्मीणी स्वयंवर हा धवळे काव्यप्रकार कसा असेल याची ऊत्सुकता वाटते.
विधवा स्रियांना पंचरांडा न म्हणता पंचगंगा ही शब्दयोजना स्वामींनी दिली. हे किती लक्षात घेण्यासारखे आहे…
– राधिका भांडारकर. अमेरिका
नमस्कार सर🙏🏻
२०/८ ची सर्व सदरे सुंदर आहेत.
माहितीतील आठवणी.. विजय
होकरणे यांचा सचित्र लेख आवडला.
आईने दिलेल्या सातशे वाती, सांगताना त्यांचे आई-वडील प्रेम तर दिसून आलेच, पण घरातील इतर नातेवाईकांचा उल्लेखही आवर्जून केल्यामुळे त्यांच्यावरील सुसंस्कारांचेही दर्शन झाले.
“चित्रसफर” मधे शोले ने पुन्हा जून्या आठवणींना उजाळा मिळाला.
“कला सुरभी” प्रिया मोडक यांनीही बाप्पा विषयी छान लिहिले आहे.
“माणसं” ही प्रा.खिल्लव सतीश यांची कविताही खूप भावली.
सर्वांसाठी खूप धन्यवाद
– आशा ज्ञानेश्वर दळवी. फलटण, सातारा.
‘माहितीतील आठवणी ‘…त फोटो अधिकाधिक व वैविध्यपूर्ण असणे अपेक्षित होते….लेख चांगला आहे.
– डॉ किरण चित्रे. ह. मु. अमेरिका
कॅनडातील अमृत महोत्सव वाचून स्वतः सहभागी झाल्याचा आनंद मिळाला .
सौ. मोहना टिपणीस व कुटुंबियांचे अभिनंदन.
– सुलभा गुप्ते. पुणे. ह. मु.कैरो, ईजिप्त.
क्यामेरामन पांडुरंग नाईक यांचा परिचय करुन दिल्याबद्दल श्री भुजबळ यांना अनेक धन्यवाद. नेहमीचा अनुभव आहे की, पडद्याआड किंवा क्यामेर्यामागील माणसे प्रकाशात येत नाही. तेव्हाच्या काळात तर मुळीच येत नव्हती. केवळ हिरो व
हिरोईनची नावे पाठ असत.आदरांजली….
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ.
वाह, थोर कॅमेरामन श्री पांडुरंग नाईक यांची कथा वाचून आज अजितदादाची आठवण झाली. तसेही ते माझे फेसबुक मित्र यादीमध्ये आहेत. रामायणचा पिरियड डोळ्या समोर आला. 👍👍 Thanks for good info, Devendra jee .
Ajit Dada Atish n Nishi ……. triangle at Umbargaon with Jayshrhitai Gadkar and Shashikalajee… those memories..
– संगीता सातोस्कर. मुंबई.
नमस्कार 🙏🏻
२२/८/२२ ची
न्यूज स्टोरी टुडे ची सर्व सदरे सुंदर आहेत .
थोर कॅमेरामन पांडुरंग नाईक, यांच्यावरील लेखातून जून्या काळातील छायाचित्रण किती अवघड होते ते समजले. सचित्र लेख आवडला. वेगळी माहिती मिळाली.
कॅनडा मधील ओटावा येथील मोहना टिपणीस यांचा “आझादी का अमृत महोत्सव ” चार दिवस चालला हे वाचून आनंद झाला.
डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखातील, शिकागो मधील लायब्ररी, तसेच इतर ठिकाणांचे वर्णन छान आहे. तसेच परदेशात भारतीय माणूस कसा एकीने राहतो ते समजले.
“भावलेली गाणी” मधे तनुजा यांनी पारस ही स्टोरी छान लिहिलीय.
अरूणाताईंची कविता छान आहे .
सर्वच सुंदर आहे .
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
– आशा ज्ञानेश्वर दळवी, फलटण, सातारा.
अरुणा मुल्हेरकर यांची पंडीत जसराज यांच्यावर केलेली काव्यरचना रसपूर्ण आहे. प्रत्यक्ष गानभास्कराचच दर्शन घडल्यासारखे वाटले.
– राधिका भांडारकर. अमेरिका.
श्री बनसोडे सर,
अप्रतिम लिहिले आहे तुम्ही श्री गझलकार पगारे सरांविषयी. 🙏
मी त्यांची “माय माझी चूल झाली बाप झाला लाकडे” ही गझल वाचलेली आहे. त्यांनी जी हिंदीत उला आणि मराठीत सानी वापरून गझल लिहिली आहे ते ऐकून मला जेष्ठ गझलकार श्री इलाहि जमादार सरांची आठवण आली . त्यांची एखादी अशाच प्रकारे एखादी गझल इथे पोस्ट करावी अशी मी तुम्हाला विनंती करते🙏🙏धन्यवाद.
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
मनोज कुलकर्णी
यांची मायेच्या कुशीत
माय असतानाच यावे,
ही कविता फारच भावपूर्ण आहे.
क्षणोक्षणी अनेक अथक कष्ट करून आपल्या बाळाला जपणार्या आईची सेवा तिच्या अंतकाळी करणारी मुलं मोठी भाग्यवान आहेत.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन.
अनुराधा पौडवाल यांच्या समाजसेवा कार्याबद्दल शोभा पौडवाल यांनी उत्तम माहिती दिली आहे. संपादक आंनी त्यांना लिहित केल. त्याबदल्यात धन्यवाद…
💐💐💐💐💐
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ
असं जन्मलं कोळी गीत
झकास . सर्वांचे अभिनंदन !
– सुलभा गुप्ते. कैरो, ईजिप्त.
असं जन्मलं कोळी गीत ऐकलं. लाईक केलं.
छान आहे.
खोलंबे सरांनी सादर केलेली बहिणाई पण छान.
– यशवंत पगारे. बदलापूर.
“महाबळेश्वरचे इको दोस्त” छान लेख .
– प्रिया मोडक
नमस्कार ,
इको दोस्त छान उपक्रम. आपल्या मार्फत उपयुक्त माहिती मिळाली. खरं तर ह्या उपक्रमाचा प्रसार, प्रचार सर्वत्र व्हायला हवा कारण ती काळाची गरज आहे.
बहुतेक गर्दीच्या ठिकाणीच असे उपक्रम राबविले तर त्याचा प्रचार सर्वत्र होईल कारण तिथे दहा दिशेचे पर्यटक आलेले असतात. म्हणजेच ही माहिती दहा दिशांना सहज पोहोचू शकते.
सर्वांचे अभिनंदन व मा.भुजबळ सरांनी ही माहिती आपल्या पर्यंत पोहोचवली म्हणून त्यांचे आभार.
– यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
महाबळेश्वरचे ईको दोस्त हा देवेंद्र भुजबळ यांचा लेख वाचनीय आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही लोकजागृती अतिशय महत्वाची आहे. गावोगावच्या मंदीरांमध्ये असे प्रकल्प स्थानिकांनी राबवले पाहिजेत. आजच्या काळाची ही गरज आहे..
– राधिका भांडारकर, सध्या अमेरिका
तनुजा प्रधान यांचा लेख खुपच छान. सुंदर.
प्रत्त्येक शब्दात जीव ओतला आहे.
शब्दांमधील तरलता वाखाणण्यासारखी !!!
– डॉ.मधुसूदन घाणेकर. पुणे
गिरीश देशमुख यांचा रायडर वरील लेख वाचून मंत्रालयातून वरळीच्या दूरदर्शन वर उन्हापावसात न्युजचे फोटो, पेपर, फिल्म, किंवा व्हिडिओ कॅसेट, बातमी पत्र इ. मटेरियल सुरक्षितपणे आणणारे कितीतरी रायडर मी त्याकाळी मी न्युज प्रोडयुसर असताना बघितले आहेत. (१९९० ते १९९९)
दूरदर्शनच्या संध्याकाळी ७ वा.च्या बातम्या मध्ये अगदी दमछाक होईपर्यंत धावत आलेले रायडर हे एक सुसाट वेगाने बाईक वरुन मुंबई दूरदर्शनवर धावत येणारे रायडर मला आठवले.
आता मेडियाला सहाय्यीभुत असे तंत्र उपल्ब्ध झाले आहे. पुर्वी दूरदर्शनच्या स्ट्रींगर कडुन, आणि मंत्रालयातून बातमी सुरक्षितपणे आणणार्या या रायडर्सचा सहभाग फार महत्वाचा होतां. यात आमचे स्ट्रींगर बाळ जोगळेकर यांचा कॅमेरामन आणि रायडर याचा रस्त्यात अपघातात मृत्यू झाला.” भरली घडवी देश परि हा नसे देशाच्या हिशेबाला.” अशी कैक महत्वाचे काम करणारे शासकीय किंवा खाजगी कर्मचारी कोणाच्याच खिजगणतीत नसतात ही बाब खरी असली तरी गिरीश देशमुख यांच्या लेखातून न्युज रायडर हा न्युज रीडर इतकाच महत्वाचा दूवा असल्याचं स्पष्ट होतं.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन.
छायाचित्र कार गिरीश देशमुख यांनी रायडर च्या कामाचे तंतोतंत वर्णन केले आहे. हीच कसरत नागपूर ला छायाचित्र कार देवगडे करीत असे. एकदा तर रोल काढून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कोटाचे खिशात घातला.
ते छायाचित्र दुसऱ्या दिवशी मुंबई च्या वृत्तपत्रात झळकले….
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ
– टीम एनएसटी.
I loved the article titled “इट्स स्प्रिंग” by Shilpa Kulkarni. The little photos of flowers interspersed in thee article was a nice reminder of the real world spring soon to arrive in some states!
I particularly liked the metaphor comparing suppressed wishes springing out like fish jumping into the air from the ocean!
I enjoyed this article very much.
Thank you, author and editors.