नमस्कार मंडळी.
आपल्या प्रेमामध्ये, प्रतिसादामुळे खूप प्रतिक्रिया मिळत असतात, या बद्दल आपले मन:पूर्वक आभार. पण वेळे अभावी सर्व प्रतिक्रिया ईच्छा असूनही देता येत नाही, याबद्दल दिलगीर आहे.
काही निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
www.newsstorytoday.com
“मी एक युद्धकैदी”
या पुस्तकाचा छान परिचय करून दिला आहे . लिहिण्या-बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची! ते काम लेखकाने करून दाखवले आहे. मलाही हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. धन्यवाद आणि शुभेच्छा !
श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
Dear Vilasji by this evaluation of book u have appraised the dedication of a soldier towards his British employer n peeped into the life of a war prisoner. A novel information for the reader enabling him to have a glimpse of pre-independence day history. Praise worthy attempt.
– Ranjitsinh Chandel
महानुभवांचे योगदान हा डाॅ. विजया राऊत यांचा लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय.
अजुनही समाजातल्या शिवाशिवीच्या कल्पना मावळल्यात असे म्हणता येणार नाही. चक्रधर स्वामींनी त्या काळात दिलेला वैज्ञानिक दृष्टीकोन आजही समजून घेण्यासारखाच आहे.
स्त्रियांना निर्भीड आणि धीट बनवण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण ही कालातीत आहे. विजयाताई आपल्यामुळे मिळणारी माहिती खूप मौल्यवान आहे.
“तो” ही राधा गर्दे यांची कथा ह्रदयाला भिडली. फारच टचींग..
– राधिका भांडारकर. अमेरिका.
कथा “तो” वेदना दायी.. 🙏🙏पितृपक्ष कविता 😊हास्य रस! धन्यवाद. लेखिका आणि कवयित्री🙏🙏
– अनुजा साळवी
“अभिनव श्राद्ध ”
खरोखर स्तुत्य उपक्रम……असा वेगळा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट आहे 🙏
– सौ वासंती पाठक. नाशिक
सुनील देशपांडे यांचा अभिनव श्राद्ध हा लेख खुपच भावला. अवयव दानाचा प्रचार पुस्तिका विकत घेऊन, मोफत वाटणे. जनजागृती करणे हे पुण्याचे काम आहे. अशोक घैसास यांचे अभिनंदन.. … ही कथा नाही सत्यकथा आहे… 🌹
– सुधाकर धारव
नमस्कार.
दिनांक १२/९ /२२
न्यूज स्टोरी टुडे ची सर्व सदरे अप्रतिम आहेत.
“अभिनव श्राद्ध”
काळजाला स्पर्शुन गेले.
साहित्यश्री सुमेध वडावाला यांची साहित्य सेवा वाखनण्याजोगी आहे. खऱ्या अर्थाने ते पुरस्काराचे मानकरी आहेत.
माझी बाग –
मनिषा ताईंची कोरफड धीर धरायला शिकवून गेली.
“भावलेली गाणी” मधील सबकुछ सिखा हमने…. अनाडी. खुप आवडले.
कविता – मी फुलांचि जन्म घेते सुंदर..
साऱ्यांसाठी धन्यवाद
– आशा, फलटण, सातारा
‘ पितृपक्ष’ कविता….झकास. 🌹
सैनिकांना सलाम…..सुन्दर लेख.
– डॉ किरण चित्रे. दूरदर्शन निर्माती
ह.मु.अमेरिका
सैनिकांना सलाम 🙏🏻
अप्रतिम लेख आहे.
– प्रिया मोडक
सैनिकांना सलाम स्वाती दामले यांचा लेख खूप छान वाटला. मी पण नुकतीच लेह लडाख ला जाऊन आले. तिथे सैनिकांशी गप्पाही मारल्या. कारगिल मध्ये पण खूप छान वाटले. शहीद जवानांना मानवंदना देताना डोळ्यात अश्रू दाटून आले. आमच्या एका शारदा नावाच्या मैत्रिणीने त्यांच्यासाठी राख्या आणि खाऊ आणला होता. तो त्यांना दिला. त्यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला. आणि त्यांनी पण ज्यूस आणि चॉकलेट्स आम्हाला दिले. तुमचा लेख फार आवडला. धन्यवाद ताई.🙏🏻
लालबत्ती डॉ राणी खेडिकर यांचा क्रमशः लेख मी नेहमी वाचते.पुढच्या भागाची प्रतीक्षा असते.
आत्म्याला जिवंतपणीच सुख द्यावे. ही ओळ खूप आवडली.माधवी ढवळे यांची कावळा कविता सुंदर👌🏻👌🏻👌🏻👍👍
हंपी बद्दल ऐकले होते.आज प्रत्यक्ष सफर करून आल्यासारखे वाटले. मस्त वाटले. हंपी ला सहल काढायला पाहिजे. धन्यवाद चैतन्य सरोदे आणि भुजबळ सर.
सिलसिला ची चित्र सफर मस्तच ठाकूर सर.
शोभा कोठवदे यांची आभाळ कविता मनाला भावली.
थोर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. यांची माहिती सांगणारा दिलीप गडकरी यांचा लेख छान वाटला.
ऋतुजा ताई यांच्या बद्दल खूप छान माहिती मिळाली. ऋतुजा ताईंना पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.
टोरांटा फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झालेल्या उड जा नन्हे दिल या सिनेमा वरील माहितीपूर्ण लेख. सिनेमाला आणि निर्मात्यांना शुभेच्छा. धन्यवाद टीम एन एस टी.
हिंदी दिवस दोन्ही कविता छान .
गणेश पुराणिक यांचा लेख म्हणजे छोटी कथाच वाटली. थ्रील ने भरलेली. खरचं तुम्ही आणि फारुख ने खूप मोठं काम केलंत छोट्या कृष्णाला आई ची भेट घालून दिलीत. फारुख ने तर त्याचा जीव वाचवला. असे देवदूत कधी कधी भेटतात.कोणाच्या ना कोणाच्या रूपाने. छान अनुभव सांगितला.
सासू सून किचन मध्ये एवढे पदार्थ मिळतात हे वाचून आश्चर्य वाटले.
गम्मत म्हणजे सासू सून हे विरोधी पक्ष एकत्र येऊन छान पदार्थ बनवून अगदी विलायते पर्यंत पाठवतात. उद्योजग सासू सून यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद मनीषा ताई.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या मोहिमअंतर्गत सागरी किनारे स्वच्छ करण्याच्या उपक्रमाला सलाम.
नवरात्र उत्सव यावरील प्रिया ताईंचा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. धन्यवाद प्रिया.
यशवंत पगारे यांची बाकी आहे. कविता खूप छान.
वर्षा भाबाल यांची खास मालवणी ढंगातील म्हाळ कविता अप्रतिम.
अमेरिकेत मराठी च्या प्राध्यापिका असलेल्या आणि शिकागो मराठी मंडळात उपक्रमात सहभागी असणाऱ्या सुजाता महाजन यांच्या विषयी सुंदर. माहिती मिळाली. धन्यवाद मेघना ताई.
– सुप्रिया सावंत. पनवेल
अंक छान आहे
ऋतुजाताईंचे व्यक्तित्व खरोखरच चतुरस्त्र आहे ..वाचून आनंद झाला आपल्या मातीतील एक स्त्री अमेरिकेत नाव करीत आहे
महानुभावांचे योगदान मध्ये जुन्या काळातील या स्त्रियांचे योगदान दिपवणारे आहे .त्या काळातही अशी कार्य करायला त्या कचरल्या नाहीत ..कमाल आहे.
उड जा नन्हे दिल…ची उडी बघून चांगले वाटले. अभिनंदन व शुभेच्छा त्याच्यासाठी.
हिंदी दिवस ..कविता छान आहेत …पण काही टंकन चुका आहेत त्या व्हायला नको होत्या .
बहुत …शब्द तर हमखास …आपण चुकून …बहोत ..लिहीतो.. वाईट वाटते.
– स्वाती वर्तक. मुंबई
आजचे न्यूज स्टोरी टुडे सुंदर आहे.
ऋतूजा यांचे हार्दिक अभिनंदन
महानुभावांचे योगदान, विजयाताई चार लेख सुरेख लेख त्या काळात स्त्री पुरुष भेद नष्ट करण्यासाठी महिला झगडत, संन्यास घेत हेच किती महान कार्य आहे.
सर्व हिंदी कविता सुंदर.
सगळ्या साठी धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
– आशा दळवी. फलटण
अप्रतिम हंपी सफर आणि ईतर प्रबोधनकारी लेख 🖕👌🌺🙏
– सुनील नेत्रगावकर. कला शिक्षक. नांदेड
वर्षा भाबळ यांची “म्हाळ” ही चांगली मालवणी कविता.
– श्रीकृष्ण बेडेकर. ज्येष्ठ संपादक. इंदूर
डाॅ.मीना बर्दापूरकर यांची “मी एक शून्य”
ही कविता मनाला स्पर्शून गेली.
तुझ्या असण्यातच सामावलं होतं माझं अख्ख विश्व
शब्द अगदी मन कोरुन गेले.
कविता काहीशी नकारात्मक असली तरी वास्तविक भावनेची..
– राधिका भांडारकर. अमेरिका
“मी एक शून्य” कविता मनापासून भावली.
– प्रकाश पळशीकर
अतिशय उत्तम कोश. आणि तो दिल्याबद्दल धन्यवाद.
– अरविंद गोखले. संपादक, लेखक. पुणे
“मराठी शुद्ध लेखन”
सुंदर लेख 👌🏻👌🏻
– सौ.मनिषा पाटील. केरळ
नमस्कार सर.
“मराठी शुद्ध लेखन”.. माझ्या साठी खूप उपयोगी पडेल. धन्यवाद.
– स्वाती शार्दुल. औरंगाबाद.
तुम्हाला तुषार गांधी सह संवाद साधता आला ..वाह..छान
बाकी आहे ..गझल उत्तम जमली आहे..अभिनंदन.
शिकागोच्या सुजाता यांच्याबद्दल वाचून अभिमान वाटला. उत्तम व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
फारूक शेख ला खरोखर मानाचा मुजरा ..असे अकस्मात कुठूनतरी देवदूत येतात आणि मुंबईचे नाव उज्वल करतात. आनंद होतो.
कीर्ति कॉलेज ने सागरी किनाऱ्यावर केलेले काम अतिशय स्तुत्य ..अशा मुलांची फळी वाढवणे अतिशय आवश्यक. म्हाळ.. कविता छान
विसुभाऊंचा लेख आवडला..पाडाच दत्तक घेऊन त्यासाठी झटणारे रावसाहेब वंदनीय.
मराठी शुद्ध लेखन …हा लेख अतिशय उपयोगी आहे. सांभाळून ठेवायला हवा . देहांत ..देहान्त.. त्यातील भेद वगैरे सारे फार उपयुक्त आहे.
भाऊराव पाटील यांच्यासारखे कर्मयोगी आता होणे नाही . ही पूर्वीची पिढी जितकी प्रामाणिकपणे , निष्ठेने समाजसेवेसाठी झटली तसे आता दिसणे दुर्मिळ .
दत्तात्रय जाधवांसारखे लोक प्रेरणास्पद असतात. त्यांची माहिती दिल्याबद्दल आनंद
ओठावरलं गाणं आणि ..
“मी एक शून्य”..कविता छान.
– स्वाती वर्तक. मुंबई.
लोकोत्तर कर्मवीर भाऊराव पाटील या
प्रा डॉ अजित मगदूम सरांच्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१. अजित, डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वर तु लिहीलेला लेख👆🏻 अतिशय तपशीलवार असुन अप्रतीम झालाय. नव्या पीढीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक पण. धन्यवाद.
– चंद्रकांत कुंभार. माजी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस (DIG)
२. आदरणीय अण्णांची रयत शिक्षण संस्था मैलाचा दगड आहे, आज जो तो स्वतःला शिक्षण सम्राट म्हणवतो, पण खरे महर्षी आण्णा आहेत, त्यांच्या कार्याची महती तुम्ही नेमक्या शब्दात मांडली, छान, तेथे कर माझे जुळती🙏🏽🙏🏽
– लता पाटील, सांगली.
३. हे एक महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल पण दुर्दैवानी त्यांची म्हणावी तितकी माहिती आपल्या बहूसंख्य जनतेला नाही. शिक्षण क्षेत्रातील त्यांच बहुमुल्य योगदान व अनेक ठिकाणी त्यानी उभारलेल्या वसतीगृहातून किती तरी गोरगरीब मुलाना शिक्षणाचा लाभ घेता आला. अशा ऋषितुल्य कर्मवीर भाऊरावाना भावपूर्ण आदरांजली. 🌸🌸🌸
– अमरजा चव्हाण. वाशी