नमस्कार, मंडळी.
आपल्या देशात १ जुलै रोजी डॉक्टर दिन साजरा करण्यात येतो. डॉक्टरांना आपण देवच मानतो. तसेच कोरोनाच्या भयंकर काळात ते देत असलेली अमूल्य सेवा यामुळे आपण १ जुलै रोजी डॉक्टर विशेषांक प्रकाशित केला. त्याला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाला की, दुसऱ्या दिवशीही काही लेख, मजकूर, कविता प्रसिद्ध कराव्या लागल्या. त्याविषयी भरपूर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.त्यातील काही व अन्य निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.कळावे. लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक
डॉक्टर आपल्या नावातच प्रशंसा आहे !
आजारी माणसांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे, सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा करण्याचे आपण दिलेले वचन व शाश्वती आम्हा समस्थ दुधेरे करांना अभिमानास्पद आहे !कोरोना काळात मृत्युची टांगती तलवार डोक्यावर घेऊन अविश्रांत परिश्रम घेऊन लोकांचे प्राण वाचविण्यात डाॅक्टरी पेशा देवासमानच भासू लागला आहे. आपल्या लेखनाची प्रशंसा करताना शब्दच अपुरे पडतील.
आई तुळजाभवानी, ग्रामदेवतेकडे आपल्या उदंड आयुष्या करीता प्रार्थना करतो व सुयश चिंतीतो !
– चंद्रकांत गणपत दळवी
प्रथम डॉ. तात्याराव लहाने यांच्या माईंना साष्टांग दंडवत. डॉ. तात्याराव लहाने सारखा डॉक्टर होणे नाही. सरकारी हॉस्पिटल मध्ये काम असताना संपूर्ण सेवा काळात 50 लाख नेत्र रुग्णांच्या तपासण्या व 1लाख 62 हजाराच्या वर नेत्र शस्त्रक्रिया करणे म्हणजे किती यशस्वी डॉक्टर आहेत याची प्रचिती येते.
सरकारी हॉस्पिटल मध्ये यशस्वी उपचार केले जातात याचा जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेले आहे त्यास तोड नाही. सरकारी व म्युनि्सिपल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जनतेला आकर्षित करून उत्तम सेवा दिल्याबद्दल डॉ. तात्याराव लहाने यांचे हार्दिक आभार. सेवानिवृती नंतरही त्यांच्या हातून भरपूर अंध रुग्णांना दृष्टी प्राप्त होवो. त्या कार्यासाठी डॉ. तात्याराव लहाने यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
या जगात ईश्वरानंतर जर कोणाला देव मानायचे असेल तर ते म्हणजे डॉक्टर. असाध्य रोगातून जेव्हा एखादा रोगी बरा होतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो.
भुजबळ मॅडम आपण सकारात्मक विचार मनात ठेऊन कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून कॅन्सर आजारातून ही आपण बरे होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहात. ते इतर कॅन्सर रुग्णासाठी प्रेरणादायी ठरेल.
आपल्या आजारपणात आपले यजमान श्री भुजबळ साहेब तसेच आपली मुलगी यांचे खुप सहकार्य लाभले त्यांचे आभार 🙏
आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून बऱ्याच मित्र, मैत्रिणी यांनी डॉक्टर बद्दल व त्यांना आलेल्या अनुभव बाबत उत्तम मनोगत व्यक्त केले आहे ते इतर रुग्णांना प्रेरणादायी ठरावे.
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

– मोहन आरोटे, कल्याण
We are feeling proud of you Dr Prashansa
For the future strategies need to be developed in Medical science in our developing country
1 To improve patient psychology by keeping smile on patients face
2 To strengthen Health Management system
etc.
Further the sincere efforts taken by you and working day and night with Covid patients that to in PPE kit is not easy task.
It’s really proud for our family.
– Pradnya and Nitesh Dalvi
मानव रुपी देव म्हणजे डॉक्टर्स ! लेखात वाचावयास मिळालेले व प्रत्येकाने देवरूप डॉक्टर्स अनुभवातून येथे साकारले, त्या सर्व डॉक्टर्सना आजच्या “राष्ट्रीय डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने माझे कोटी कोटी प्रणाम। सर्व लेख अप्रतिम। भुजबळ उभयतांस व त्यांच्या टीमला खूप शुभेच्छा।

– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
नमस्कार.आपण न्युजस्टोरीटुडे हा उपक्रम
दररोज राबवीत आहात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोकांनपर्यंत रोज न्युजस्टोरी पोहचत असून त्याचा लाभ ही ते घेत आहेत. आपल्या या उपक्रमास माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

– शंकरराव बाविस्कर, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार.
अनुराधा पौडवाल यांचा सामाजिक पैलू समोर आला. आवडत्या गायिका.
डॉ.गौरी जोशींचा लेख आवडला.

– वर्षा फाटक, पुणे.
🏋🏻♀️डॉ गौरी जोशी कन्सारा, न्यु जर्सी अमेरिका यांनी गझल सम्राटाची गझल फारच छान शब्दात कथन केली आहे. त्याही शब्दप्रभू आहेत याची जाणीव झाली.
(सुरेश भट हे माझे चांगले मित्र होते)....

– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन
एकवचनी संबोधनामागची भावना प्रामाणिक वाटते….लेख सुंदर ..
– नंदा हडकर, पुणे👌👌👌
रसरशीत रसग्रहण….
– सुधाकर धारव, यवतमाळ 💐💐💐
नमस्कार.
पौडवाल कुटुंब चांगला. आदर्श घालून देत आहेत.
तुम्ही अशा positive गोष्टीची नोंद घेत आहात हे पाहून समाधान वाटले.
बियांपासून रोपनिर्मिती हा लेख वाचून खूप आनंद झाला. पुढील पिढीला घेऊन कोणीतरी भारतीय वनस्पती टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हा किती चांगला उपक्रम आहे. भारतीय वनस्पती या केवळ शोभेच्या नसतात त्या औषधी देखील असतात. वनस्पतींचा जास्तीत जास्त अभ्यास होणे गरजेचे आहे. निदान कोणत्या बिया कशाच्या आहेत हे तरी माहिती होईल.

– मेघना साने, ठाणे.
चहा ☕आणि कॉफी ☕ म्हणजे भारतीयांचे सर्वात आवडते पेय. उत्साह, तरतरी आणणारे पेय. पाहुण्यांचा पाहुणचार, स्वागत करावे तर याच पेयाने. मैत्रिणीं बरोबरच्या गप्पा तर या पेया शिवाय पूर्ण होत नाहीत. अश्या या सर्वांच्या लाडक्या पेयावर रश्मी तू खुप छान समर्पक कविता लिहिली आहेस. विशेष म्हणजे चहा केव्हा आणि कॉफी केव्हा घेतली जाती यातील फरकाचा जो मिश्किल बारकावा तू मांडला आहेस तो खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या सर्वच कविता आणि लेख दर्जेदार असतात. आम्हाला वाचायला खूप आवडतात. आम्ही नेहमीच तुझ्या नवीन लिखाणाच्या प्रतीक्षेत असतो..

– सौ विशाखा यतीन खुटाळे
नमस्कार आजचा आपला अंक वाचला आवडला.मा.विजय पवार यांनी लिहिलेला संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वरील लेख मनापासून वाचला.
एकूण आपला अंक वाचनीय आहे.
लेखक पवार तसेच मा.संपादक श्री देवेंद्रजी यांचें हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.शुभ रात्री