नमस्कार मंडळी.
आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात नवनवीन लेखक, कवी आणि वाचक यांची भर पडत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. आपणा सर्वांमुळेच पोर्टल अधिक सकस होत आहे. असाच लोभ असू द्या. प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक
“चला, मानसिक आरोग्य जपू या” हा लेख खुप छान लिहीलाय.
– शलाका कुलकर्णी. नेदरलँड्स
“सुवर्ण सह्याद्री”….
देवेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुकेश शर्माजी व अमृता राव ह्या माझ्या फेसबुकवर आहेत व आमचे मेसेंजेर वर संभाषण सुरू असते. पुन्हा एकदा धन्यवाद.
– संजय कासार. नाशिक.
👌👌👌👌👌👌ह्या सुवर्ण काळातील काही वर्षांचे आम्हीही भाग आहोत ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दूरदर्शन नुसती संस्थानसून एक मोठं विद्यापीठ आहे, ज्याने अनेकांना घडवलं आणि आजही घडवत आहे.
– शिवानी गोंडाळ. (मेकप आर्टिस्ट) मुंबई दूरदर्शन.
“सामाजिक समतेचे क्रांतिकारक” या अतिशय ऐतिहासिक, मूल्यवान खंड स्वरूपात लिखाण करणारे लेखक श्री शत्रुघ्न लोणारे आणि निःपक्षपाती राहून या खंडाचे परीक्षण करून देणारे श्री किशोर पेटकर या उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ पेक्षाही अधिक क्रांतिकारकांची जयंती आणि पुण्यतिथी यांचाही समावेश केला आहे. खरेच खूप मेहनतीने हे लिखाण केले आहे .
तसेच आम्हा N S T च्या परिवारास हे परीक्षण उपलब्ध करून देणाऱ्या श्री देवेंद्रजी चे आभार.
अशी पुस्तके वाढदिवस साजरा करताना भेट म्हणून एकमेकांना दिली गेली तर नव्या पिढीला मागच्या पिढीने आमच्या पिढीला काय ठेवले ? या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल.
– प्रकाश पळशीकर. पुणे
दोन्हीही अंक वाचलेत, छान
मानसिक आरोग्य सध्या च्या काळात अतिशय संवेदनशील आणि गरजेचा विषय छान मांडला आहे . माझी मैत्रीण या क्षेत्रात कार्यरत आहे तिला पाठवित आहे
सामाजिक समतेचे क्रांतिकारक.. पुस्तक वाचायला पाहिजे ..असे परीक्षण वाचल्यावर जाणवते
कुटुंब रंगलय काव्यात आणि निर्मळ मन ..आवडले
शरद पोंक्षे चे व्याख्यान ऐकण्याची कितीही इच्छा असली तरी जमणे शक्य नाही. खूप छान बोलतात ते .
सह्याद्री चा वृत्तांत वाचला. व्हिडीओ निवांत पणे बघेन.
– स्वाती वर्तक. मुंबई
अमितजींच्या रांगोळ्या अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
अमितजी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.. खूप छान लेख.. मनापासून लेखन आवडले.
– सौ मनीषा पाटील. केरळ.
रश्मीजी, श्री महेश खुटाळे सर यांचे बद्दल आपण खूप खूपच सुबक वर्णन तुमच्या लेखनीतून उतरवले आहे…..महेशसर हे फार उत्साही, बोलके, प्रेमळ धाडसी व्यक्तीमत्व आहे. त्यांचे सहवासात चार दिवस घालवन्याचे भाग्य मला लाभले, महेशसरांना व रेश्माजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही श्री पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना.
– बाळासाहेब झरकर. पंढरपूर.
The Article on plantation and its protection by Anil Gharat is really very touching and emotional.
Best wishes for this team members who are doing earnest endeavour to protect the trees with public participation.
This will really inspire the other people for conservation and protection of environment in nature.
– D L Thorat. Joint Secretary (Retd)
Govt. Of Maharashtra. Mantralaya.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सन्माननीय श्री.डी.एल. थोरात साहेब (निवृत्त सहसचिव यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
खऱ्या अर्थाने जेव्हा थोरात साहेबांसारखी कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व… आमच्या ह्या छोट्याश्या कार्याची दखल घेऊन आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात तेव्हा आमच्या सारख्या सामान्य माणसांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि या पुढेही अशीच समाजहातांची आणि पर्यावरण संवर्धनाची कामे करण्या करिता अंगात नवं ऊर्जा आणि नवं बळ येतं !….
– अनिल घरत
‘ग्रॅण्ड कॅन्यन’ सफर वाचताना खूप मजा आली… लेखक/संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
विश्वास देशपांडे यांचाही लेख खूप छान, प्रसन्न वाटला… त्यांचेही अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा 👍
– प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक. मुंबई.
‘ग्रॅण्ड कॅन्यन’ सफर..
काळ्या आईच्या उदरात दडलय काय ? बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रश्न पडत असतो.
१३३७ फूट धरतीच्या पोटात जाऊन नवीन अनुभूती घेतलेल्या राधिका ताईंनी लिहिलेल्या भुगर्भातील सफर या लेखावरून फार छान माहिती मिळाली. लेख वाचतानाच रोमांचक वाटत होते तर प्रत्यक्षात त्यांना कसला भारी अनुभव आला असेल.
खूप छान 👌🏻👌🏻👍
– सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ.
MacKenna’s Gold che Shooting Ithe Zalele Aahe. That Scene of Shaking Rock is Here.
– Captain Abhyankar. Pune
मिलेनियम टाॅवर खूप सुंदर कार्य हाती घेतले. वाह, फारच समाधान झाले वाचून. मोराजमधून गडचिरोलीत अशा वस्तू पाठवण्यात आल्या. काही छोट्या खेड्यांवर पाठवतात, दिवाळीचा खाऊ सुद्धा.
स्मिता पाटील, कौतुक करावे तेवढे कमीच.
काय सुंदर कलाकृती आहे पेन्सिलच्या टोकावरील.
मनिषा पाटील, कौतुक करावे तेवढे कमीच.
– शोभा कोठावदे. कवियित्री, नवी मुंबई.
प्रशांत कुळकर्णी यांनी स्मिता पाटीलच्या आठवणी जागवल्या. आज इतकी वर्षं झाली तरी, स्मिता पाटीलच्या अभिनयाचा आणि व्यक्तीमत्वाचा ठसा कायम आहे..
खरोखरच miss u smita..
– राधिका भांडारकर. अमेरिका
“चला, खेळू या”..
लहानपणी, लगोरी, विटीदांडू, लंगडी, इत्यादी खेळ भरपूर असायचे. त्यामुळे बालपण मजामस्ती करण्यात आनंदाचे होते.
– विलास प्रधान. मुंबई.
कित्ती विविध प्रकारच्या खेळांचा आढावा घेतला आहेस. छान लिहिला आहेस. 👍
– मेधा जोगदेव, पुणे
प्रिय अलकास..
सॉरी, तुला लगेच रिप्लाय नाही करू शकले..
तुझा लेख वाचला. वाचन एन्जॉय केले.. खरोखरच भूतकाळाच्या आठवणीत रमले थोड्या वेळ..
पण तू जो तुझ्या लेखाचा शेवट केला आहेस, त्यातून मला माझ्या लेखासाठी एक मस्त विषय मिळाला..
आपल्या मुलांना हे खेळ शिकवावे असे तू म्हणाली आहेस..
पण जसे म्हणतात की स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा, याच्या उलट म्हणते.. आपले बालपण ही आपली अत्तराची कुपी आहे.. ती आपल्या मुलांसमोर तरी उघडी करावी का? का फक्त आपणच त्याचा सुगंध जपावा…
जमलं तर लिहीन कधी तरी..
एका same विषयासाठी दोन वेगवेगळ्या विचारांचे मंथन होऊ शकते ते असे..
गैरसमज नसावा.. 🙏🙏
– अनुराधा जोगदेव. पुणे
काय सुंदर लिहिलंय. मस्तच👌👌👌त्या काळात गेल्यासारखं वाटलं अगदी. Gr888
– नीता देशपांडे. पुणे
अलका, बालपणात घेऊन गेलीस तू. अगदी असंच होत सगळ. आम्ही तर चिंध्यांचा बॉल आणि फरशी, दगड ह्याची लगोरी करून तासनतास खेळत असू. विटी दांडू नि पण खूप आनंद दिला त्या काळात. बिन पैशाचे खेळ होते सगळे पण आनंद मात्र गगनाला भिडणारा होता..
– सुनंदा पानसे, पुणे
देवेंद्रजी, खरे तर अलकाताई लेखिका या नात्याने लेखाअंती त्यांचे नाव लिहिले. पण निदान ज्या ठिकाणी बालपण व्यतीत झाले त्या परिसराचा उल्लेख झाले असता तर निदान शाळेचे, महाविद्यालयाचे नाव इत्यादी कळाले असते.
७८ वर्षे मागे वळून बघायला आणि सारे काही पुन्हा अनुभवायला लावण्यात तूम्ही नक्कीच यशस्वी झालात. क्षणभर का होईना माझ्या माथ्यावरचे जड झालेले ओझे अलकाताईनी हलके केलेत.
– प्रकाश पळशीकर. पुणे
अलका भुजबळ यांच्या चला खेळूया या लेखाने पुन्हा एकदा बालपणात नेले.ती गल्ली, ते सवंगडी, आणि असेल त्या साहित्यातच तुफान रंगणारे ते सारे खेळ आठवले. तो आरडाओरडा, मोठ्यांचे रागावणे आणि मुलांचे हुंदडणे…काय मजा होती हो !
अलकाताई खूप धन्यवाद !!
काल मी चक्क नातीबरोबर गोट्या खेळले. तिलाही मजा आली.
– राधिका भांडारकर. अमेरिका
चला, खेळूया.. 👌👌
मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले👍👍
– महेश खुटाळे. राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक
तुझ्या लेखातून मी बालपणातील माझ्या मस्जिद बंदरच्या वसाहतीत गेले. सर्व खेळ नव्याने डोळ्यासमोर आले.
खूप छान लिहिले आहेस.
असेच सुंदर लेख लिहीत राहा.
👌👌👍👍
– वर्षा भाबल
अलका, खूपच सुंदर जुन्या आठवणी परत जिवंत झाल्या. चला तर मग परत एकदा नातवंडांना घेऊन सुरुवात करुया 👌👌👍
– शलाका
अलका, आमच्या बालपणीच्या विश्वाची सफर घडवून आणलीस धन्यवाद मी आणि साधना कितीतरी खेळांबद्दल बोललो.
चला परत एकदा भेटून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू
– वंजना दाभोळकर
👌👌👌👌👌
सफर सत्तरच्या दशकातील
अक्षरशः रमणीय आठवणी
अलका खूप छान., मस्तच🤝
– शशिकला
अलका, तुझ्या लेख वाचून परत बालपण आठवले आणि डोळे पाणावले. खुप सुंदर होते ते दिवस लहान पण देगा देवा असे वाटले तुझे अभिनंदन 💐
– मृणाल
वाह खूप सुंदर सजीव रांगोळी काढली आहे. अगदी हुबेहूब, प्रमोद अर्वी यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
संजय पाटील यांचा अमितजी यांच्यावरील लेख अप्रतिम खूप आवडला. मला पण अमिताभ ची खूपच क्रेझ होती. अमिताभचे जवळ जवळ सर्व सिनेमा मी पाहिले आहेत.
अमितजी अजूनही खूप आवडतात.
संजय पाटील यांचा लेख अतिशय सुंदर मनातले भाव खूप छान प्रकट केले आहेत.
झाडपट्टी रंगभूमी हे नाव प्रथमच वाचनात आलं आणि त्याबद्दल खूप छान आणि गमतीशीर माहिती हाती आली. मस्त वाटला विसुभाऊंचा लेख.
‘निर्मळ मन’ यशवंत पगारे यांची कविता खूपच छान कवितेची शेवटची ओळ “ओलावा जर झिरपाला आपुलकीचा जगण्याची तिथे हिरवळ असते”. मनाला खूप भावली.
हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांच्या वरील रश्मी हेडे यांचा लेख खूप सुंदर.
महेश सरांच्या कारकिर्दीला सलाम आणि पुढील कार्या करिता खूप खूप शुभेच्छा.
ओठावरल गाणं मध्ये विकास भावे यांनी अतिशय सुंदर आणि माझे आवडते गाणे निवडले. खूप सुंदर मराठी चित्रपट मुंबईचा जावई. मधील हे गोड गीत. अप्रतिम रसग्रहण मनाला खूप भावलं. धन्यवाद भावे सर.
शोभा कोठवदे यांची वृत्तपत्र कविता मस्तच👌🏻
‘विस्टा डोम कोच’ विषयी खूपच सुंदर माहिती मिळाली. खरचं मला ही विस्टा डोमचे खूप आकर्षण वाटते. केव्हातरी प्रवास करायचा आहे. पाहू कधी जमून येते ते. धन्यवाद टीम एनएसटी.
‘एव्हढे मात्र खरे’ कविता खूप आवडली. यंदा मात्र अगदी ऑक्टोबर महिन्यात पण मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे एक दोन वेळा अगदी ओलीचिंब भिजले मी.😄
‘साहित्य प्रेमी मैत्रिणी’ आणि त्यांचे साहित्याच्या ओढीने एकत्र येणे खूप आवडले. खरचं मैत्रिणींनी किमान महिन्यातून एकदा एकत्र भेटायलाच हवे असे मला वाटते. मग निमित्त कोणतेही असो.
‘निळी निळाई दांटली’ अनुपमा मुंजे यांची कृष्णा वरील कविता मनाला भावली. माझ्या नातवाला झोपवताना कान्हा सो जा जरा म्हणत असते ना. माझा कान्हा पण खूप मस्तीखोर आहे.
वाचन समृद्धीचे प्रकाशपर्व वाचन प्रेरणा दिना वरील लेख खूप सुंदर 👌🏻
ग्रंथांची सोबत केली की सुखाचा मार्ग अलगद सापडतो. हे सांगणारा प्रेरणादायी लेख👍.
प्रशांत कुलकर्णी यांचा विश्व नायक अमीतजींवरील लेख उत्तम 👌🏻स्वतःला व्यसनांन पासून दूर ठेवणे शिस्तीत चाकोरीबद्ध आयुष्य जगणे. हे यशाचे गमक त्यांनी जाणले आणि स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवले. खूप शुभेच्छा अमितजींना 💐
दिवाळीच्या सर्व दिवसांची खूप सुंदर माहिती मिळाली. खूप छान लेख प्रिया.👌🏻👌🏻
वैज्ञानिक उपासक आणि राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या वरील लेख, गणेश साळवी यांची कविता खूप छान.
ई वेस्ट गोळा करून गरजूंना वाटणे . मिलेनियम टॉवर्स चा स्तुत्य उपक्रम👍
स्मिता पाटील एक गुणी प्रतिभावान अभिनेत्री खूप छोटं आयुष्य लाभलं या गुणी अभिनेत्री ला. सर्वच चित्रपट हिट होते. मला जैत रे जैत मधली चिंधी खूप आवडली होती तर चक्र मधली बोल्ड स्मिता सिंप्ली ग्रेट. प्रशांत कुलकर्णी यांचा स्मिता पाटील यांच्या वरील सुंदर लेख 👌🏻👌🏻
काय सुंदर कला आहे ऐश्वर्या कडे, ऐश्वर्या पाटील यांचा आगळा छंद आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद मनीषा ताई.
लहीरी निसर्ग आणि कष्टाळू शेतकरी यांच्या द्वंद्वा विषयी खूप सुंदर कविता. खरचं खूप कष्ट करून सुध्दा हाती काहीच लागत नाही त्यावेळी बळीराजाची काय अवस्था होत असेल?
भागवत शिंदे यांची कविता मनाला भावली.
आदिवासी विकास पुनर्विचार आवश्यक श्रीकांत धर्माळे यांचा माहितीपूर्ण लेख आवडला.
समृद्धी विभुते यांची ब्राझील डायरी खूप छान. समृद्धी ला खूप शुभेच्छा.
वर्षा भाबल यांची कोकणातला चेडू कविता मस्तच. मी स्वतः कोकणातली आहे. मालवणी भाषेतील कविता वाचताना मज्जा आली.खूप छान वाटलं.
– सुप्रिया सावंत
“ब्राझील डायरी”तील
समृद्धीचा अनुभव सुंदर आहे, जो तिने आपल्या शब्दात मस्त व्यक्त केला.
विसूभाऊ बापटांना कोण जाणत नाही, असे शक्यच नाही. अतिशय सुंदर काव्यातून व्यक्त होत असतात. त्यांचे “कुटुंब रंगलय काव्यात” अप्रतिम सादरीकरण असते.
वर्षा भाबल ताईंच्या कविता तर काय सुंदर. कोकणी भाषेतील वाचतांना कळते भाषा.
– सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
क्रेटर लेक ..लेख खूप आवडला. त्यासोबतची लिंक ही
चतुर्विध, भिक्षुक, वासनिक …विशद करणारा लेख ही आवडला.
व्हाट्सऍप वर दिलेला संदेश खरा.
आली दिवाळी.. कविता आवडली
– स्वाती वर्तक. मुंबई.
माझ्या जीवनाच्या सरत्या टप्प्यात अधिकांश वेळ
हा बेडवरच व्यतीत होत असतो. अशा वेळी मोबाईल हेच टॉनिक !
त्यामुळे आज देवेंद्र कोणता प्रसाद पाठवणार ? याची आस लागून असते. दिवस अतिशय सुंदर जातो.
मागचे लेख सुद्धा पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात
आणि वाचतोही.
लता गुठे ना माझ्यावतीने शुभेच्छा.
श्री व सौ देवेंद्र भुजबळ कुटुंबीय, लेक देवश्री आणि सर्व N S T चे परिवार सदस्य (खरे तर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन रुजवलेला, संगोपन करून हळुहळु बहरलेला वृक्ष म्हणजेच N S T परिवार असे मी मानतो) समोरासमोर कधिही न येता फक्त व्हाट्सएपच्या माध्यमातून एकमेकांना साद घालणारा हा एकमेव परिवार आहे. अशा या मूलखावेगळ्या परिवाराला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली इतकी आनंदमय जाईल की प्रत्येक सभासद म्हणेल
“होय ही दीपावली आम्हाला खरेच पावली हो”
– प्रकाश पळशीकर. बावधन, पुणे
मी क्रेटर लेक लेख वाचला. अप्रतिम. दुसरा शब्दच नाही. श्री फुलसुदंरसाहेबांचे निवेदन असलेला व्हिडिओ पाहून मी स्वतःच पाहात आहे असेच वाटले. तो नजारा पाहून डोळे तृप्त झाले. धन्यवाद भुजबळसाहेब.
– डॉ भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक
श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या “अशी ही माणसं” या मानवी स्वभावाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या रचनेवर अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्या पुढे देत आहे. श्री धर्माधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन.
छान आहे कविता. Manapasun lihili ahe. Samajacha varm janun nemakya hya warmawar apan bot thevla ahe. Sarwasamanyanchya dolyat anjan ghalanari कविता.
– कथाकार, कादंबरीकार श्री चंद्रकांत करंदीकर. विलेपार्ले.
Khar Ani khupach Chan 👌👏🙏
– सौ.वर्षा पुराणिक, मुंबई
👌🏻👍🏻खूप छान. तुमच्या कविता दिवसा गणिक खूप प्रगती करतात आहेत. नवीन आणि ज्वलन्त विषय असतात कवितेचे. बॅंकेच्या मॅनेजर ते आधुनिक कवी हे तुमचे रूपांतर कौतुकास्पद आहे💐🙏🏻🙏🏻
– सौ.अंजली खरे, भंडारा.
खूप यथार्थ वर्णन आजच्या युगाचे केले आहे. जे न देखे रवी ते देखे कवी🌹👌👌👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼🌹
– श्री जगदीश पंडित, पुणे
छान आहे कविता !
– श्री गडे सर. सी.ए. पुणे
🕉️जरी दिधले सुंदर देवरुप दगडाला |
परी नसतात भावना मुळीच दगडाला ||
ढोंगी माणसाने असे मिरवण्या स्वत:ला केलेली ही लबाडी |
संधि मिळताच समजते
आहे फक्त ही नरनारीची वखवखलेली जोडी ||🌹
– प्रकाश क्षिरसागर, पुणे.
मा. धर्माधिकारी सर
अतिशय वास्तववादी चित्रण करणारी गझल !
माणसं कशी बदलतात हे आपण चित्रित केले आहे .शेवटी माणुसकीची वृत्ती जोपासली पाहिजे ही आपली संस्कृती आहे .
रचना पाठवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !
-प्रा. नागेश हुलवळे
सध्याच्या परिस्थितीचे वास्तविक वर्णन करणारी कविता .
जीवनमूल्यांची घसरण हा समाजाचा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे .
विचार करायला लावणारी कविता .
– संध्या बेडेकर.
