Monday, March 17, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
मागच्या आठवड्यात प्रसिध्द झालेल्या, कॅनडा स्थित लेखिका सौ स्मिता भागवत यांच्या “डॉक्टर, तुम्ही सुध्दा !” या लेखाला आणि “संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प” या उपक्रमाविषयी लिहिलेल्या लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. दोन्हीही लेख निश्चितच विचार प्रवर्तक असून त्यांचा समाजात अवलंब होणे, हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे. असो….
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक

“डॉक्टर, तुम्ही सुध्दा !”
. सुंदर बोधकथा.
असे “सुशिक्षित” नकळत काही चुका करून बसतात आणि नंतर खजील होण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्यांच्यामध्ये एक खट्याळपणाची ‘वासना’ किंवा दुर्गुण राहून गेलेला असावा आणि तो अशा रीतीने वर डोकं काढत असावा – नंतर खजील होतात म्हणून ती कृती त्या क्षणिक लहरीवर स्वार असावी.
त्या ढाबेवाल्यानं जे ठरवलं हा सर्वस्वी त्याचा निर्णय – आणि तो विक्षिप्त होता असं लेखिकेनें म्हटलंच आहे. क्षमा करावी कि न करावी हा त्याचा निर्णय.
मागे वळून पाहतांना एखाद्याला असंही जाणवेल की डॉक्टर्स असले तरी त्यांच्यात काही मानवी खट्याळपणा आहे आणि सदैव सात्त्विकता त्यांच्यात नाहीय. तेच डॉक्टर्स १०० पैकी ९९ लोकांना खूप मदत करतही असतील/असतात. पण डॉक्टर हे व्यक्तिमत्त्व अगदी देवासमान आहे असं धरून चालण्याची आपली मनोवृत्ती असते आणि त्याला कधीकधी तडा जातो. अशा दैवी गुणांची अपेक्षा दुसऱ्या सुशिक्षित व्यवसायाकडून आपण नाही करत – वकील ? पण डॉक्टर आणि शिक्षक ह्यांनी कधी चुकूच नयें ही आपली अपेक्षा झालीय.
असो, माझ्या मनात जे विचार ही सुंदर कथा वाचतां वाचतां आले ते लिहीत आहे.
– प्रशांत जेजुरीकर

२. अगदी सुयोग्य शिर्षकासह कथाही तितकीच मार्मिक. रोज रस्त्यावर अनेकदा अशा ambulance ना लोकं रस्ता मोकळा करून देण्यासाठी पराकाष्ठा करतात आणि ते तसं करणं योग्यही आहे. पण कथेतल्या डॉक्टर प्रमाणे गैरवापर करणारे महाभागही असतात हे ही खरंच. रामदेव राजाची कथा डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
– मधू शिरगावकर. पुणे

३. अंधाऱ्या रात्रीचा तो प्रवास आणि अँब्युलन्स साठी केलेला मानवतेचा थरार. क्षणभर मन स्तब्ध झाले. सुखरुप निभावलात त्यातून. ढाबेवाला मात्र मनात घर करुन गेला. त्याने त्याचे करारीपण जपले.
डाॅक्टर मंडळी मात्र  “नाव मोठं लक्षण खोटं” पठडीतली वाटली. पण त्यांनाही शेरास सव्वाशेर भेटलाच याचा आनंद झाला.
– मीना मोकाटे
टीप : काही प्रतिक्रिया थेट पोर्टलवर प्रसिध्द केल्या आहेत.

!! संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प !!
प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

. बहूतेक सर्व सरकारी अधिकारी वरुन आलेल्या ऑर्डर्सप्रमाणे काम करण्यातच आयुष्य घालवतात.
परंतु शासनातील काही अभ्यासु आणि जिद्दी अधिकारी मात्र त्यांच्या नेहमीच्या कामाच्या व्यतिरिक्त लोक कल्याणकारी प्रकल्प राबविण्यात यशस्वी होतात. जन सामान्यांना मदत करण्यासाठी गुंतुन जातात आणि लोकांना मदत करण्यासाठी आयुष्य घालवतात.
माझ्या आयुष्यात मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून महाराष्ट्रात आणि देशात फिरायला मिळाले. त्यातले काही अधिकारी चाकोरी बाहेर जाऊन इतके मोठे काम करुन गेले की त्यांच्या मुलखा वेगळ्या कामाने लाखो लोकांना फायदा झाला.
आर आर पाटील ऊर्फ आबा यांचे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, तंटामुक्त गाव, ई. सारख्या अनेक विलक्षण कल्याणकारी संकल्पना यशस्वी करण्यासाठी विशेष सहभाग असलेले प्रशासकीय अधिकारी मा. चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.

धुळ्याचे कलेक्टर दिलीप बंड यांच्यामुळे तर धुळे जिल्हा सेंद्रिय शेती मध्ये संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरला.त्यातून लाखो शेतकर्यांचा खुप मोठा आर्थिक फायदा आणि इतर अनेक फायदे झालेले मला बघायला मिळाले. अशा अनेक अधिकार्यांचं कर्तुत्व आम्हाला आदर्शवत आहे. संजिवनी प्रकल्प हाही तसाच दखल घेण्यजोगा असुन अभिनंदनीय आहे. या सर्व अधिकार्यांना जनतेच्या आणि लाभार्थ्यांच्या वतीने बहुमानाचा मुजरा. धन्य ते लाभार्थी, धन्य ते अधिकारी आणि धन्य तो महाराष्ट्र.
– राम खाकाळ.. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन

. साहेब, नमस्कार.
आपण न्यूज स्टोरी मधून आमच्या गावचे सुपुत्र संजीवन दिवे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी राहता यांच्या संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्पाचा जो सुरेख आणि सर्व साक्षी परिचय करून दिला त्यामुळे त्यांचा व् गावाचा जो आपण जो गौरव केला त्यासाठी एक दुर्गापूरकर् म्हणून आपणास मनस्वी धन्यवाद देतो व् ऋण व्यक्त करतो.ते आपणास राज्य शिक्षण परिषद निमित्ताने भेटून आभार मानतीलच् परंतु व्यक्तिशः मला भेटणे शक्य नसल्याने हा अक्षर संवाद.🙏🏻
– यशवंत पुलाटे.

३. आदरणीय संपादक श्री.देवेंद्र भुजबळ🙏
‘संजीवन इंग्रजी वाचन उपक्रम ‘हा अतिशय परिणामकारक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम आहे. इंग्रजी वाचनाचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ स्टेटस ला ठेवल्यानंतर पालक स्वतःच्या पाल्याच्या अभ्यासाबाबत जागरूक होताना दिसले. विद्यार्थी स्वतः शब्दांचा उच्चार व अर्थ पाहण्यासाठी read to app आणि dictionary चा वापर करू लागले. शोधकवृत्ती, आत्मविश्वास, सभाधीटपणा, वाचन स्पर्धा असे कितीतरी फायदे विद्यार्थ्यांना झाले. आदरणीय संजीवन दिवे यांचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आणि परिणामकारक आहे. धन्यवाद. 🙏
श्रीम.ठक्कर दीपा अनिल
जि.प.प्राथमिक शाळा रांजणखोल. ता.राहाता.

४. साहेब, नमस्कार.
आपला हा प्रकल्प प्राथमिक शिक्षणास् नवं संजीवनी देणारा असा आहे. त्यासाठी आपणास धन्यवाद व् अभिनंदन.
जीवन शिक्षण विद्या मंदिर दुर्गापूर शाळेचा विद्यार्थी ते सजग प्रयोगशिल् शिक्षण विस्तार अधिकारी हा प्रेरक प्रवास जीवन शिक्षण विद्या मंदिर दुर्गापूरचे माजी
विद्यार्थी म्हणून आम्हाला गौरवास्पद वाटतो.
आपले हार्दिक अभिनंदन व् भावी कार्यास हार्दिक सदिच्छा.
– दुर्गापूरकर् परिवार

५. भारतात इंग्रजी मातृभाषा असणारे लोक खूप कमी प्रमाणात आहेत. परंतु जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत असलेले इंग्रजीचे महत्त्व पाहता आज इंग्रजी ही ज्ञानभाषा व संभाषण भाषा बनली आहे. इंग्रजी भाषा शिकणे काळाची गरज झाली आहे. कारण ही जगातील बहुतांश ज्ञान हे मूळ इंग्रजीत लिहिल्या गेले आहे किंवा इंग्रजीत भाषांतर केल्या गेलेले आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनलेली असल्यामुळे इंग्रजी शिकणे ही काळाची गरज बनली आहे….. हे महत्व जाणूनच मा. संजीवन दिवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राहाता यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून “संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प” सुरु केला.
सुरुवातीला शाळा भेटीतून शिक्षकांचे योग्य समुपदेशन करून शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. प्रत्यक्ष अध्यापनाचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थी प्रतीसदाचा सकारात्मक स्वीकार केला. “ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही” या भावनेतून प्रत्येक शिक्षक या उपक्रमात सक्रिय योगदान देत आहे. विद्यार्थी देखील आत्मविश्वासाने इंग्रजी वाचन, लेखन संभाषण करत आहे. विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हा प्रकल्प खूपच प्रेरणादायी ठरणार आहे, त्याबद्दल मा. दिवे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद. व इंग्रजी वाचन प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा….
संजय आग्रे
उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळीगाव, ता.राहाता. 

६. 🙏 नमस्कार साहेब मी श्रीमती गावडे ज्योती केशव जि. प प्राथमिक शाळा चितळी स्टेशन या शाळेत कार्यरत आहे. साहेब, एक शिक्षक म्हणून आपण सुरू केलेला संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प
विषयी प्रतिक्रिया देऊ इच्छिते; साहेब हा उपक्रम मी माझ्या तिसरी आणि चौथी या वर्गासाठी राबवत आहे. या उपक्रमामुळे नावाप्रमाणेच इंग्रजी वाचनास संजीवनी मिळाली आहे. या अगोदर फ़क्त ठराविक मुले च इंग्रजी वाचनास पुढे यायची. स्वतः प्रयत्न करायची, परंतु आता मुलांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण होत आहे. आपल्या शिक्षकाच्या स्टेटस वर आपणही दिसावं म्हणून मुले मधल्या सुट्टीतही इंग्रजी वाचनाचा सराव करताना दिसतात. साहेब आपले खूप खूप आभार । असा अनोखा उपक्रम तुम्ही आपल्या तालुक्यात राबवला आम्ही हा उपक्रम नक्कीच राबवू अशी आपणास ग्वाही देते.

वाचकांच्या अन्य प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.

Paropakari Parsharam is great. He is no less than Danshoor karna depicted in mythological stories. I can only say “Tethe kar majhe julati”🙏
– Ranjit Chandel.
Retd Dist.Inf.Officer. Yavatmal.

नगर जिल्हा नाट्य चळवळ आवडले देवेंद्र.
– अशोक डुंबरे. निवृत्त संचालक, दूरदर्शन पुणे

पल्लवी उमरे यांची वार ही मनोरमा वृत्तीतील गझल फार आवडली.
वेदनाननी झेलले जे
ते फुलांचे हार झाले…
खूप सुंदर !
– राधिका भांडारकर. पुणे

सुलभा गुप्ते ह्यांचं ती पुन्हा विधवा होई हृदयाला भिडणारे आहे. अनेक स्त्रियांचे हे अनुभव सुंदर शब्दात त्यांनी मांडले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन..
दीपाली दातार आणि त्यांचे सहकारी ह्यांनी सादर केलेला विंदा करंदीकर ह्यांच्या कवितांचा कार्यक्रम मी ऐकलेला आहे. अतिशय उत्कटपणे ते तिघही कवितेतून विंदा पर्यंत आपल्याला पोहोचवतात. श्रुतीच्या गायनाने तर आपण त्यात अगदी एकरूप होऊन जातो. त्यांना सदैव यश मिळत राहो हीच सदिच्छा..
- सुनंदा पानसे. पुणे

नमस्कार 🙏🏻🙏🏻
दिनांक ७/११ आणि दिनांक ८/११/२०२२ ची न्यूज स्टोरी टुडे ची दोन्ही पोर्टल छान, माहितीपर आहेत.
परोपकारी परशराम खरोखरच कर्णाचा अवतार शोभतो.
तरूणांनो उद्योजक व्हा हे ही सदर छान.
या कवितांनो, वाचक लिहितात ही सदरे सुंदर.
पुस्तक परिचय मध्ये कर्करोगावर पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका डॉ सुलोचना गवांदे यांना मनापासून धन्यवाद. परदेशात या राहूनही त्या मराठी वर इतके प्रेम करतात. खुप माहितीपर पुस्तक आहे.
पु.ल.चा. पहिला परदेश दौरा हा प्रशांत कुलकर्णी यांचा लेख ही आवडला.
कुटूंब रंगलंय काव्यात विसूभाऊ बापट यांनी दाजी भाटवडेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
“वार” पल्लवी उमरे यांची गझल फार भावली.
साऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– आशा दळवी. फलटण, सातारा.

माणूस व्यसनी का होतो ? सुंदर लेख 👌🏻
थोरवे कुटुंबियांचे कार्य कौतुकास्पद आहे 👏🏻
– सौ मनीषा पाटील. केरळ.

सेवाभावी थोरवे कुटुंबास आदरपूर्वक वंदन ! अशी माणसेच एक चांगला समाज घडवतात.
– राधिका भांडारकर. पुणे

श्री व सौ थोरवे या दाम्पत्याला मनःपूर्वक शुभेच्छा🙏💐💐🌹🌹🌹🌹🤝.
– शिवानी गोंडाळ. मेकप आर्टिस्ट, मुंबई दूरदर्शन.

“गुलाबी थंडी” म्हणजे तारुण्याला आलेलं उधाण असतं. अंगात एक आगळं वेगळं चैतन्य सळसळत निसर्गाची किमया बघायचा आनंद मिळतो.
– विलास प्रधान. मुंबई.

नमस्कार. छान अप्रतिम अन् वाचनीय असा हा अंक .
विशेषत:चित्र सफर घडवून आणणारे मा.दिलीप ठाकूर लिखित “दोस्ती” सिनेमावर लिहिलेला सविस्तर वृतांत वाचनीय आहे.अभिनंदन व शुभेच्छा.
– नंदकुमार रोपळेकर. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments