Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
खूप दिवसांनी वाचक लिहितात….हे सादर करीत आहे, या बद्दल दिलगीर आहे. आणि याचे खरे कारण म्हणजे, आपला वाढता प्रचंड प्रतिसाद आणि त्याला कमी पडणारे आम्ही, हेच आहे.
पूर्वी वाचकांची पत्रे मर्यादित असल्याने, दर आठवड्याला ती प्रसिध्द करता यायची. पण आता ते शक्य होत नाहीय. तथापि, ती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपला लोभ असाच कायम असू द्या.
आपला,
– देवेंद्र भुजबळ. संपादक

प्रकाश क्षीरसागर यांनी थोडक्यात पण अतिशय सुंदर आणि नेटका लेख लिहिला आहे. विष्णुशास्त्री यांनी इतक्या लहान वयात केलेले विपुल लेखन त्यांनी यथास्थित मांडले आहे.
– अरविंद गोखले. जेष्ठ संपादक, पुणे.

12 मार्च च्या आठवणी थरकाप आणणाऱ्याच आहेत .अजूनही अंगावर काटा येतो. त्याकाळी फक्त दूरदर्शन होते तेच बरे होते. नाहीतर आजच्या सारख्या सुळसुळाट झालेल्या वाहिन्यांनी हेमंत करकरे दाखवून ते गमावले आणि सामान्यांची भीती गडद झाली ..
तसे काहीसे झाले असते.
तक्षशिला माहिती अभिमानास्पद. उत्तम
कफ दोष देखील शरीरात नव निर्मिती करतो ..वाचून नवी माहिती मिळाली धन्यवाद.
राधा गर्दे यांची कविता आवडली.
– स्वाती वर्तक. मुंबई

“प्रेरणादायी वासंती वर्तक…”
साधारणतः नव्वदीच्या दशकात वासंती वर्तक या आपल्या महासंचालनालयासाठी निवेदन लिहिणे आणि वाचणे यासाठी वरचेवर सेवा देत असत. यावेळी त्या दुरदर्शन वर वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत होत्या. याच काळात फिल्म सेंटर, ताडदेव येथे आपल्या महासंचालनालयाच्या “चित्रपट विभागात” फिल्मवर निर्मिती होत असे. आता व्हिडीओवर जितके सोप्या तऱ्हेने हे कार्य होते इतके सहज सुलभ हे माध्यम नव्हते. माहितीपटाची रशेस तयार करुन ती ३५ एम् एम् फिल्म प्रोजेक्टरवर त्यांना दाखवत असू. रशेस पाहून त्यावर टिपणी लिहून मग निवेदन लिहिले जाई. ते अॕप्रुव्ह झाले की मग बॕलार्ड पिअरला ब्लेझ रेकॉर्डींग स्टुडीओत रेकॉर्डींग केले जात असे. चारपाच दिवसांनी फिल्मवर साऊंड रेकॉर्ड करुन मिळाला की मग रशेस मॕच करुन फायनल केले जाई. हे फायनल पहाण्यासाठी त्या पुन्हा फिल्मसेंटर, ताडदेवला यावे लागे. हा सर्व व्याप त्या ठाण्याहून येऊन जाऊन करीत असत. बंदच्या काळात फिल्म प्रोड्युसर मनोहर वर्पे यांच्या मोटारसायकल वरून ठाणे-मुंबई असा प्रवास करुन महासंचालनालयासाठी त्यांनी रेकॉर्डींग केले आहे. महासंचालनालयाच्या निर्मितीस जेव्हा केव्हा गरज पडली त्यावेळेस त्यांनी सेवा दिली आहे.
नंतरच्या “वृत्त चित्र” विभागासाठी व्हिडीओ माध्यमात “दिलखुलास”, “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमांसाठीही मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचे काम त्यांनी केले आहे.
विकास पाटील. निवृत्त संकलक.
माहिती विभाग, मंत्रालय, मुंबई.

वासन्ती वर्तक यांच्यावरील लिखाण हृदयस्पर्शी आहे देवेंद्र अभिनंदन.
– अशोक डुंबरे. निवृत्त संचालक, दूरदर्शन.

प्रेरणादायी वासंती वर्तक👌👌👌👌👌
– शिवानी गोंडळ. मेकप आर्टिस्ट, दूरदर्शन, मुंबई

वासंती ताईंवरला लेख खूपच भावला. त्या वृत्तनिवेदिका असताना मी बातम्यांचे भाषांतर करीत असे तेव्हा त्यांना पाहिले आहे. अत्यंत सय्यम आणि तितक्याच प्रभावीपणे त्या वृत्त निवेदन करीत असत. त्या आणि प्रदीप भिडे यांच्या वृत्त निवेदनाने मी त्यावेळी प्रभावित होत असे. परवा अच्युत गोडबोले माझ्याकडे आले होते त्यावेळी आमच्या चर्चेत वासंती ताईंचा उल्लेख आला. वासंती ताईंनी दोन तीन वेळा गोडबोले यांची मुलाखत घेतली होती, असे त्यांनी मला सांगितले.
तुमच्या न्यूज पोर्टल वर अनेक व्यक्तींचे अज्ञात पैलू आम्हाला कळतात.
धन्यवाद.
– सुधीर ब्रह्मे. जेष्ठ पत्रकार

दूरदर्शनच्या सुवर्ण युगाचे, साक्षीदार बघे (प्रेक्षक), आणि सहभागिदार सर्वचजण नशीबवान. कलाकार, निर्माते, लेखक, कार्यक्रम संकल्पक, साहित्यिक, गायक, संगीतकार, नृत्य, नाट्य कलावंत, मुलाखतकार, निवेदक, सुत्रसंचलन, विशेषतः वृत्तनिवेदक, संपादक निर्माते, सहनिर्माते, अभियंते, आणि अनेक प्रकारचे पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंत या सर्वांच्या सहभागामुळे आणि मुंबई दूरदर्शनच्या सुवर्णयुगिन काळामुळे जी काही मंडळी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील त्यांपैकी वासंती वर्तक सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या इतके भाग्यवान तेच. सध्याच्या काळात अनेक चॅनलवर अनेकविध कार्यक्रम चमचमत्या सेटने सजवले जातात. काही आकर्षकही असतात पण या सर्वांच्या वाट्याला येणार्या प्रेक्षकांची संख्या एकूण प्रेक्षकांपैकी अतिशय कमी म्हणजे 0.001 % तरीअसते की नाही याबद्दल शंकाच आहे. कारण सध्याच्या काळात शेकडो / हजारो चॅनल, मोबाईल, लॅपटॉप ई.मुळे कार्यक्रम बघणारे चॅनलच्या वाट्याला अतिशय कमीच येतात.
त्यामानाने त्याकाळातील एकमेव दूरदर्शनच्या वाट्याला १००%प्रेक्षक होते. दूरदर्शनवर त्याकाळात कार्यक्रम निर्मितीचे असंख्य प्रयोग त्याकाळचे निर्माते करत. त्यातील एखाद्या चॅनलवर एखादा प्रयोग करतांना दिसतो.
वासंती वर्तक सारख्या असंख्य कलाकारांना/कलावंतांना, निवेदकांना त्यावेळी दूरदर्शनचे १००% प्रेक्षक लाभत.त्यामुळे त्याकाळातील १००% प्रेक्षक लाभलेले कलावंत कायमचे स्मरणात राहिले आहेत. बिनचुक निवेदन म्हणजे वासंती वर्तक यांच निवेदन समोर येतं. त्याकाळात मुंबई दूरदर्शन च्या मराठी बातम्या खरोखर लाईव्ह होत्या. आताच्या सारख्या अचाट बातम्या, बातम्यांचे निबंध, की निबंधाच्या, त्याच त्या रटरट ब्रोकन बातम्या त्यावेळी नव्हत्या आणि मुंबई दूरदर्शनच्या बातम्या अजुनही वेगळेपण सिद्ध करतात. वासंती वर्तक या एक अभ्यासू, विद्वान सतर्क, जबाबदार, रुबाबदार, जागरूक, तज्ञ निवेदिका म्हणून कायमच्या स्मरणात राहतील.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, दूरदर्शन, मुंबई.

🔔 देवेंद्रजी, वासंती वर्तक यांच्या विषयाचा लेख मनाला भावला. आपल्या लेखन कौशल्याला दाद दिलीच पाहिजे…..
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक. नाशिक.

देवेंद्रजी, १७ मार्च रोजी सुरेखाताईं दुग्गे यांनी लिहिलेली कविता हातात पडली. त्याच रात्री मनोगत लिहिण्यास सुरुवात केली. थोडं लिहिले, दम लागला की थांबायचं, असं करत आज रविवारी लेखन पूर्ण केले.

मी तर तुमचा आभारी आहे अशासाठी की दिवसभर शारीरिक मानसिक वेदनांचा विसर पडतो. नवीन नवीन विषय सुचतात. खुर्चीत बसायचे. डायरीत लिहायचे. जमल्यास सुरेखाताईंचा नंबर शेअर करता आला तर आनन्द या साठी की माझा मुलगा स्व प्रसाद १९८९ ते १९९६- या कालावधीत राज्य राखीव पोलीस दल या विभागात रेडिओ मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. नन्तर राजीनामा देऊन मोबाईल कंपनीत रुजू झाला. ठेवतो लेखणी.
– प्रकाश पळशीकर. पुणे

लेखिका प्रतिभा चांदुरकर यांचा अमेरिका माझ्या दृष्टीकोनातून हा लेख भारतीयांमधील माणुसकीच्या, इतरांना मदत करण्याच्या अद्वितीय भावनेमुळे कट्टर वृत्तीच्या माणसातील माणुसकी जागृत करणारा अदभुत गुण म्हणजे हे विश्वची माझे घर निर्माण करणार्या सदगुणांच्या खाणीतील अनेक उत्तमोत्तम गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण आहे हे नक्की. शुभेच्छा आणि शुभचिंतन.
सुरेखा दुग्गे यांची मुलाला विसरण्यासाठी औषध पाहिजे, ही आईला विसरलेल्या अत्यंत विदारक, खंत व्यक्त करणारी कविता सज्जनांच्या अंतकरणाला भिडणारी आहे.

सामान्य माणसातील असामान्य गुणवंत संगीतकार रवी यांच्या 1950–1980 या हिंदी सिनेमाच्या अदभुत काळाचा आढावा उत्तमपणे घेतला आहे.
संगीतकार रवी आणि त्यांच्या दीर्घकालीन परिणाम करणार्या उत्तमोत्तम गाण्याचा उत्तम आढावा घेणारा अबुधाबी च्या प्रशांत कुलकर्णी चार लेख कौतुकास्पद.

चित्रकार दाम्पत्य, हर्षद आणि अरविंद कोळपकर यांना शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, दूरदर्शन, मुंबई

20 मार्च हा आनंद दिवसा निमित्ताने माझे गुरू आदरणीय भुजबळ सरांनी लिहिलेला लेख आनंदी रहाण्यासाठी दिलेला संदेश ईतका साधासोपा व सर्वानी तो ग्रणकरून करून त्या पध्दतीने वागले तर खरोखर आपले आयुष्य आनंदी होईल.
विशेषतः जे पालक पाल्यावर आपल्या आवडीचे करियर साठी दबाव आणतात त्यांनी आवर्जुन वाचावा व पाल्यासाठी कसाही पैसा कमावणे सोडून स्वत:ही आनंदी व्हावे व पाल्याचे आवडीचे क्षेत्रात करियर करण्याची संधी देवून त्याचे आयुष्य आनंदी व्हावे याबाबत विचार करावा.
मग “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” आहे हे दिवस दूर राहणार नाहीत.
– सुनिता नाशिककर. निवृत्त पोलीस उपअधिक्षक,
मुंबई.

चला आनंदाने जगू या- अप्रतिम सुंदर लेखन. सकारात्मक ऊर्जा देणार लेखन👍🙏🏻
– संगीता मालकर. कोपरगाव

आनंद दिनाच्या शुभेच्छा देतांना संपादक ह्या नात्याने खूपच छान विचार मांडलेत देवेंद्रजींनी.आनंद कुठे कसा किती शोधावा ह्याचं साधं सोपं गणित मांडलंत.तुमचा लेख वाचून आनंदाचे डोही, आनंद तरंग उमटले 🤗🤗 तुम्हांला शतःशा धन्यवाद .🙏
– दशरथ पाटील, नगर

अमेरीकेच्या स्प्रिंग च वर्णन अगदी तंतोतंत केल आहेस. जागे व्हा, वसंत ऋतू आला ! 🌻🥀🌼💮🌷🌺 खूपच छान शिल्पा !! 👏🏼👏🏼
– सौ.सीमा गुप्ते.  अमेरिका

शिल्पा, लेख फारच सुंदर लिहिला आहेस. तुझं “इतके दिवस दाबुन ……मासोळिगत पाण्यातुन सुर्र्कन् वर येतात” हें वाक्य तर अगदि काव्यमय वाटलं ! 👌👌👌👏👏👍
– सौ.अनिला रगाडे, अमेरिका

खूपच छान लेख..
– सौ.रिता आपटे , पुणे

Hey dear I have read your It’s spring, (article:)
I absolutely enjoyed reading it . You have such great talent in sahitya 🥰
Looking forward to read more Poems and articles from you ! Live your passion!!💕
– Sau Shubhangi Chitre. USA.

प्रथमतः मी अभिनव नगर महिला मंडळातर्फे न्यूज स्टोरी टुडे या परिवाराचे मनापासून आभार मानते आठ मार्च महिला दिनानिमित्त आम्ही एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतला आणि आपल्या परिवाराने या कार्यक्रमाची स्टोरी प्रसिद्ध केली आजपर्यंत आमचे मंडळ हे आमच्या संगमनेर शहरापुरते प्रसिद्ध होते परंतु आपल्या परिवाराने आमच्या मंडळाला एक नवीन ओळख दिली आणि आमचे मंडळ आता बऱ्याच ठिकाणी ओळखले जाऊ लागले त्यामुळे अभिनव नगर महिला मंडळ आपले मनापासून आभार मानते धन्यवाद.
– सौ योगिता पवार नगरसेविका, संगमनेर

हैलो सुनीलराव,
तुमचा “माझा आनंद” हा
लघुलेख वाचला… सकारात्मक विचारांचा हा खजिना खूप भावला….२५ मार्चला या खजिनदाराचे प्रत्यक्ष दर्शन होणार आहे….६ मार्चला ५९ साठ वर्षे मला सुख-दुःखांत साथ देणारी गृहस्वामिनी/हृदयेश्वरी पत्नी लता मला सोडून गेली…. काव्यधुंदी समूहातील सुहृदांनी मला कटलेला पतःग होऊन दिले नाही व मन घट्ट करुन मी शैलेश/स्वातीचे घरी काव्यधुंदी मेळाव्याला हजर राहण्याचा बेत कळवला!प्रत्यक्ष सुरेशभाई मला भेटून गेले तेव्हा खास विचार देवून गेले., “हसाल तर चारजण साथ देतील, दुःख/खंत उगाळत एकटेच राहाल ! “मला आनंदाचा खजिना भरत चालल्याची जाणीव झाली !
– मधुकर रेळेकर

सुनील आनंदाचा खजिना तुम्हाला स्वानुभवातून गवसलेला आहे जो तुम्ही जतन केलाय. छान सकारात्मक पोस्ट👍
– सौ अलका वढावकर

खूप सुंदर लेख.
वास्तव समोर आणलेत.
खरा आनंदाचा शोध
👌👌👍👍🙏🙏
– विजय फडणीस, ठाणे .

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?