नमस्कार मंडळी.
जवळपास दोन महिन्यांच्या खंडानंतर आपले पोर्टल सुरू झाले आहे, याचा आनंद होतो आहे. या दोन महिन्यात खुप काही घडून गेले आहे, त्याची उजळणी करण्यात वेळ न घालवता गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
१
वृद्धत्व : शाप नव्हे या लेखात श्री.अरुण पुराणिक यांनी खूप छान लिहिले आहे. वृद्धत्व ही समस्या होऊ नये म्हणून काय करायला हवे,कसे जगायला हवे याविषयी खूप सुंदर विचार मांडले आहेत.🙏👌🏼🌹
– राधिका भांडारकर, पुणे
२
राजाराम जाधव यांची पर्जन्यधारा ला केलेली बळी राजाची विनवणी आवडली.
भारतीय संस्कृती व ईजिप्शियन संस्कृती ची साम्यस्थळे, पूजेसाठी श्रद्धास्थान इतर माहिती वाचनीय..गुप्ते ताईंना धन्यवाद.
एकदम 4 पुस्तके प्रकाशित !
वाह ..अभिनंदन
डॉ धाटावकरजी.
रश्मी हेडे यांच्या “समाजभूषण २ ” या
पुस्तकाचे परीक्षण छान आहे .त्या स्वतः प्रयोगशील लेखिका असल्याने त्यांना समाजाविषयी भान आहे हे स्तुत्यच आहे..
श्री जाधवजीं नी 7, 8 नावे दिली असती तर कोणकोणाचे चित्रण आहे तर आणखी बरे वाटले असते.
खरा इतिहास शोधून तो पुराव्यानिशी सादर करणे असे अतिशय अवघड, परिश्रमाचे कार्य करणारे बेंद्रे सर..
त्यांची माहिती आवडली.
खरेच संत सोयराबाई चे गुण गावे तेवढे थोडेच..
त्या काळात स्त्री, ती ही महार जातीतील आणि ती असे शब्द लिहीते .. अवघा रंग एकचि झाला..संगीताताई धन्यवाद..रामा चुकून टाईप झाले आहे का ? राया ..आहे न ते ?
गटारी नव्हे..दीप अमावस्या..आपल्या लोकांना कधी कळेल ..तोच दिवस सोन्याचा.अगदी गटारी ची शुभेच्छा पत्रे पण प्रसिद्ध होतात ही चिंताजनक बाब होय.
आपल्या ओंजळीत जे आहे ते इतरांना देण्याची ओढ असणाऱ्या रिना ताईंना माझा सलाम।अतिशय प्रेरणादायी..
आभार डॉ राणी.
वर्षा भाबल यांची नटखट पावसा कविता भावली.
— स्वाती वर्तक. मुंबई
३
प्रा. सौ. सुमतीताई पवार, यांचा “दोन ध्रुव” हा लेख वाचला.
त्यांच्या लेखाचे अंतिम वाक्य हे मात्र अंतिम सत्य आहे.
“लोक पोहोचवतात, आणि विसरुन जातात व कामाला लागतात”….
कारण, शो मस्ट गो ऑन….
माझ्या २१ वर्षे मुलाचे अपघाती निधन झाले. जे अग्निदाहास हजर होते, त्यातील एक जण सुमारे १५ वर्षानंतर भेटले.
त्यांनी विचारले,
“मुलगा काय करतो ?”
– अरुण पुराणिक, पुणे.
४
“ओठावरलं गाणं”,
“सोलकर सर” -अप्रतिम.
— प्रा कृष्णकांत गावंड. मुंबई.
५
रायगड जिल्ह्यातील थोर इतिहासकार वा.सी.बेंद्रे यांच्या कार्याची आपण या लेखातून खूप छान माहिती दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर प्रथम बखरकारांनी त्यानंतर नाटककार, चित्रपट निर्मात्यांनी इतिहासाची मोडतोड करून अत्यंत विकृत चित्रण करून एकप्रकारे बदनामी केली होती. त्या विकृत इतिहासाचे ऐतिहासिक कागदपत्रांचे अभ्यास, संशोधन करून त्यासाठी पोर्तुगीज, इंग्रजी, फ्रेंच, मराठीतील हजारो मोडीलिपीतील अस्सल पुरावे सादर करून त्यांनी महान पराक्रमी शिवपुत्र संभाजीना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी सर्व प्रथम केले त्यानंतर अनेक इतिहासकारांनी हेच सूत्र पकडून छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास प्रकाशित केला आहे. इतिहास लिहीताना No documents No History या मुलभूत तत्त्वानुसार समकालीन कागदपत्रे अभ्यासून त्यातील तारतम्य कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता किंवा कोणाला खूश करण्या करीता सोयीचा इतिहास न लिहीता वस्तुनिष्ठ इतिहास लिहून इतिहासाची प्रामाणिक राहावयास पाहिजे.
इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे यांनी अनेकांना मार्गदर्शक धडाच घालून दिला असून इतिहास लेखनाविषयी महान कार्य केले आहे.
अशा या थोर इतिहासकारांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केल्यास त्या पुरस्काराची उंची निश्चित वाढेल.
या इतिहासमहर्षीना माझे विनम्र अभिवादन !
– डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
६
आपले गुरू हा मा.सौ. पौर्णिमा शेंडे यांचा लेख खूप छान आहे.
प्रकाश चांदे यांचे स्मरण विस्मरण उत्तम माहिती देणारे.
डॉ. सतीश शिरसाठ, खरे आहे. खऱ्या प्रत्यक्षातील निसर्ग चित्राची सर दुसर्या कशालाच नाही.
– प्रवीण देशमुख. कल्याण
७
💐 नमस्कार.
गटारी नव्हे, तर दीप अमावस्या..ही फारच छान पोस्ट मॅडम.
मी सन 2011 पासून गटारी मानणे बंद केले. या दिवशी मांसाहार करत तर नाहीच नाही पण कांदा लसूण सुध्दा खात नाही. तोच नियम 31 डिसेंबर ला सुध्दा. हे काही ग्रुप मेंबर्सना माहिती आहे. भारतीय परंपरेतील काही नतद्रष्ट लोकांनी हा दिवस बदनाम केला. त्यांना चोख उत्तर दिलेच पाहिजे. ऑल ग्रुप मेंबर्स आपण आपल्या पासून सुरूवात करूया. मी तर 12 वर्षे अगोदरच केली आहे. पहा तुम्हाला जमतं का ? फारच कठीण बुवा. अहो सती, केशवपन, बालविवाह या माणूसकीला कलंकित करणा-या प्रथा बंद झाल्या. तेथे गटारी चे काय ?
— अनिल चाळके. सामाजिक कार्यकर्ते. बदलापूर.
८
“विविधांगी बाबा” हा अर्चना शंभरकर यांचा डॉ. अनिल अवचट यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल लेख आवडला.
अगदी थोडक्यात, मुद्देसूद आणि प्रभावीपणे लिहिलेला समर्पक लेख मा.देवेंद्र भुजबळ यांच्या न्युज स्टोरी टुडे या पोर्टलवर वाचला. शिवाय विविधांगी हे त्याचं शीर्षकही अगदी समर्पक वाटलं. १९८३ सारी मुंबई दूरदर्शनच्या “मुलखावेगळी माणसे” या कार्यक्रमासाठी डॉ.बी.एन.पुरंदरे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि विविध क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांच्या गिरगाव चौपाटीवरील घरी माहिती घेता घेता
२ पाने भरली इतकी विविधता त्यांच्या कार्यात होती. तेव्हा त्यांच्या कार्यांच्या मोठ्या यादीला अष्टपैलू, विविधांगी, किमयागार, कार्यसम्राट, कर्मवीर इ. सर्व शीर्षके पुरेशी वाटेनाशी झाली म्हणून “मुलखावेगळे डॉक्टर” हे शीर्षक दिलं गेलं. मोठमोठ्या माणसांच्या अफाट कार्याचं वर्णन थोडक्यात, मुद्देसूद आणि प्रभावी भाषेत करणं ही कला किती अवघड आहे याची जाणीव मला या लेखाच्या वाचण्याच्या निमित्ताने झाली.
अर्चना शंभरकर यांचं मन:पुर्वक अभिनंदन, शुभेच्छा आणि शुभचिंतन.
त्याच बरोबर प्रतिभावंता पासुन ते सामान्यांपर्यंत सर्वांना सात्विक साहित्य, काव्य,अनुभव वर्णन लिहिण्यासाठी उत्तम माध्यम साधन “एन एस टी” नावे उपलब्ध केले आहे. सध्याच्या काळातील राजस आणि तामस माध्यमातील विषयापेक्षा एन एस टी हा सात्विक पोर्टल सरस वाटतो, नव्हे झालाय. या पोर्टलचे संकल्पक, संशोधक, संपादक, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते माननीय देवेंद्र भुजबळ, अलका भुजबळ, देवश्री भुजबळ आणि समुहाचे करावं तेवढं कोतुक कमीच आहे. निवृत्तीनंतर चुपचाप बसण्यापेक्षा एन एस टी द्वारे १०० देशात आणि लाखो वाचकांना नादी लावण्यासाठी भ्रष्ट राजस आणि भ्रमिष्ट तामस विषयापेक्षा सात्विक विषय असतो असलेला एन एस टी पोर्टल प्रभावी भुमिका बजावत आहे. भुजबळ परिवाराच्या या सात्विक पोर्टलला शुभेच्छा आणि शुभचिंतन.
— राम खाकाळ
माजी निर्माता दिग्दर्शक मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक मिशन एक गाव एक परिवार तसेच संकल्पक मिशन विषमुक्त शेती.
९
गटारी नव्हे दीप अमावस्या हा मा. अलका माने यांचा लेख खरोखरच अप्रतिम आहे.
संत सोयराबाईंचे काव्य गुण नेटकेपणाने मा. संगीता कुलकर्णी यांनी रसिकांपुढे ठेवले आहेत. त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.
पद्मश्री उषा बारले यांचा ह्रदयंगम परिचय मा. निला बर्वे यांनी करून दिला आहे. तो इतका आत्मिय आहे की वाचक मा. उषाजींचे व्हिडीओ पाहून त्याचाही आनंद घेईल. मा. नीलाताईंचे आभार.
इच्छा असेल व कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही व्यंग आड येत नाही. हे आपल्या जीवनातून मा. रीनाताई पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांची कहाणी त्यांचे कर्तुत्व लोकांपुढे आणणाऱ्या डॉ. राणी खेडीकर यांना धन्यवाद.
नटखट पावसाच गाण मा. वर्षा भाबल यांनी छान रंगवल आहे. खूपच सुंदर.
एकूणच आजचा अंक वाचनीय झाला आहे.
– प्रवीण देशमुख. कल्याण.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सगळ्यांनी दिलेल्या कमेंटमुळे एखादी गोष्ट वाचण्यात आली नसेल तर त्याही गोष्टींबद्दलची थोडक्यात आणि अचूक माहिती मिळते, याबद्दल वाचकांच्या प्रतिक्रियेबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद!🙏
प्रतिभा सराफ
सगळ्यांनी दिलेल्या कमेंटमुळे एखादी गोष्ट वाचण्यात आली नसेल तर त्याही गोष्टींबद्दलची थोडक्यात आणि अचूक माहिती मिळते, याबद्दल वाचकांच्या प्रतिक्रियेबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद!🙏
सगळ्यांनी दिलेल्या कमेंटमुळे एखादी गोष्ट वाचण्यात आली नसेल तर त्याही गोष्टींबद्दलची थोडक्यात आणि अचूक माहिती मिळते, याबद्दल वाचकांच्या प्रतिक्रियेबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद!