नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक.
“असामान्य कचरावेचक : सुमन मोरे” या रश्मी कुळकर्णी यांनी लिहिलेल्या यश कथेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कवी अरुण पुराणिक यांनी तर त्यांच्या वर उस्फूर्तपणे कविताच लिहिली आहे. आधी ती कविता व नंतर इतर प्रतिक्रिया देत आहे.
सुमनताई मोरे यांचे कार्याला सलाम
म्हणून माझी ही अष्टाक्षरी रचना…..
जिद्द होती मनाची
कष्ट केले अपार ।
नाही थकली भागली
जीवनाचे होते सार ।।१।।
अशिक्षित होत्या जरी
कर्त्यव्याची जाण तिला ।
संगोपन अपत्यांचे ममत्वाचे भान जिला ।।२।।
कार्यक्षेत्र वाढविता
मदतीला हात आले ।
दौरा नेपाळ करता
यश कार्याला मिळाले ।।३।।
युरोपीय देश दौरा
कार्य भाषण केले ।
अशिक्षित जीवनाचे
ध्येय पूर्तीस जे गेले ।।४।।
अशा व्यक्तीमत्वाचा
मी मान सन्मान करीन ।
जीवनाच्या उद्दिष्टाला
त्यांचे चरण स्पर्शीन ।।५।।
– रचना : अरुण पुराणिक, पुणे
सुमनताई मोरे यांच्या विषयी इतर काही प्रतिक्रिया
१
सुमनताई कचरावेचक असल्या तरी स्वच्छतादूतच आहेत.
समाजात तळागाळात अशा सामन्यातील असामान्य कर्तृत्ववान सुमनताई सलाम.
- – अमरजा चव्हाण. नवी मुंबई.
२
सुमन मोरे, सुषमा चव्हाण यांच्या कार्याला सलाम💐💐💐💐 - –– प्रा अनिसा शेख. दौंड.
३
सुमनताई ची स्टोरी एकदम inspirational आहे सर.
thank you स्टोरी share केल्याबद्दल. - — डॉ मुकेश कुळकर्णी. महाबळेश्वर
४
वृक्ष लागवड करणारी प्रथमेश, सर्वेश यांची टीम बघून अत्यानंद झाला. तरुण पिढी प्रेमाने हे कार्य करतेय .स्तुत्य आहे ..कौतुक करावे तेवढे कमीच
सुमन मोरे यांनी केलेले काम शब्दात वर्णू शकत नाही एवढे प्रशंसनीय. ती माहिती देऊन रश्मीजी आणि संपादकजींनी पर्यावरण पूरक कार्यच केले आहे.
राधाजींनी प्रेझेन्ट पेक्षा प्रेझेन्स द्या हे मोलाचे मार्गदर्शन पालकांना दिले आहे. आवडले
दीडशे ज्येष्ठ नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला म्हणजे आकडा खूपच मोठा आहे ..काळाची गरज समजाविण्याचा हा प्रयत्न छान
पुस्तक मैत्री बद्दल अनुपमा पाटील यांचे शब्द पटले. तसेच वाणी, दळवी, भाबल, शेटे यांच्या ही कविता वाचनीय.
- — स्वाती वर्तक. मुंबई.
इतर लेखांविषयीच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१
रणरागिणी सुषमा चव्हाण यांना मानाचा मुजरा.
अण्णाभाऊ साठे : सांगली येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण जेमतेम झालं .तरी देखील हार न मानता त्यांनी आपले लेखन केले.त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या. रशियात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. शिवाजी महाराज यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते.
- — विलास प्रधान. मुंबई.
२
“आठवणीतील ज्यो”
हा डॉ. किरण ठाकूर यांचा स्मृतीलेख वाचून डोळे पाणावले. काही महिन्यापूर्वीच माझ्या जीवलग मैत्रीणीचे अमेरिकेत निधन झाले तेव्हा माझ्या मनाचीही अशीच तुटलेली अवस्था झाली होती. त्यामुळेच हा लेख वाचताना डॉ.किरण ठाकूर यांंच्या दु:खाची कल्पना मी करु शकते. मृत्यु हे सत्य असले तरीही प्रिय व्यक्तीचे निघून जाणे खूप वेदना देते.किरणजी मी आपल्या दु:खात सहभागी आहे. तसेच मृत व्यक्तीच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करते. - बाल संगोपनाचे आव्हान हा सुमती पवार यांचा लेख वाचनीय आहे.
– राधिका भांडारकर. पुणे.
३
खूपच प्रेरणादायी व खडतर प्रवास.
सुषमा चव्हाण मॅडम यांना व त्यांच्या कतृत्वाला मानाचा सलाम🙏💐 त्याचबरोबर पोलिस खात्यामध्ये सर्व काम करणा-या रणरागिणी आपले वैयक्तीक आयुष्य, वैयक्तीक समस्या , मुलं-कुटुंब , नातेवाईक व पोलिस विभागाची खडतर ड्युटी याचा योग्य समन्वय व समतोल राखून देशसेवा निभावत आहेत त्यांनाही माझा सलाम. 🙏💐
महिला पोलिस अधिकारी किती सक्षमपणे व उत्तम प्रकारे वरिष्ठ पदावर काम करते याबद्दल खूप सुंदर आपण लेख लिहिला आहे यासाठी डॉ राणी मॅडम आपलेही खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
— श्रीमती अश्विनी कांबळे. सहायक आयुक्त
महिला बाल विकास विभाग पुणे.
४
सुषमा mam चा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याच्या कामाला अनेकदा जवळून पाहण्याची संधी प्राप्त झाली. डॉ राणी मॅम तुम्ही हा प्रवास अतिशय बोलक्या शब्दात मांडला आहे. खुप मस्त.
— दिपाली दंडवते. वरिष्ठ समन्वयक,
FFCP – मुस्कान, पुणे
५
नमस्कार, मी काॅ अण्णाभाऊ साठे यांची फकिरा हि कादंबरी वाचली आहे. माझ्या संग्रही आहे. प्रथम जुलमी जमीनदार नंतर ब्रिटिश सत्तेला टक्कर देणारा वारणा खो-यातील तरणाबांड फकिरा अण्णाभाऊंनी चांगला रंगवला आहे. - माझी मैना गावाकडे राहिली हि छक्कड लावणी सुध्दा ऐकली. बेळगाव कारवार कर्नाटकला आणि डांग जिल्हा गुजरातला गेला. तेथील लोकांची इच्छा नसताना. नेमके हेच शल्य अण्णाभाऊंना डाचले. हिच खदखद या लावणीतून बाहेर पडली.
–– अनिल चाळके. बदलापूर.
६
Hi Supriya…read your entire detail description of travel…very well written and expressed….certainly it is very informative for people who wish to travel . congratulations.
– Vaishali Narkhede. Mumbai.
७
सर्वप्रथम न्यू स्टोरी टुडे ला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन💐.
आपला मागील तीन वर्षातील लेखाजोगा पाहिला, आपल्या या न्यूज लेटरने साहित्यिकांना अगदी भरभरून दिलं तुमची मेहनत आणि सातत्य वाखाणण्याजोगे आहे त्यामुळेच आपल्या ह्या न्यूज लेटरला अधिकाधिक वाचक लाभले तसेच लेखनिक लाभले. आपणास पुढील वाटचालीसाठी आमच्या थोरवे कुटुंबीयांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐💐💐
- — सुधीर थोरवे. नवी मुंबई.
८
‘नांगरून पडलेली जमीन’ अशी कविता वाचनात आली नाही… कदाचित ‘प्रार्थना दयाघना’ या दीर्घ कवितेतील ती असावी.
‘सर्वत्र नांगरून पडलेली जमीन’अशी एक ओळ वसंत आबाजी डहाके यांच्या ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेत आहे.
(चूक भूल द्यावी घ्यावी)
– प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक. मुंबई
९
ना.धों. महानोर हे माझे आवडते कवी..प्रा बापट, श्री श्रीपाद जोशी आणि डॉ पार्लेकर यांनी ना.धोंना श्रद्धांजली वाहिली, ते समयोचित..माझे ही शतशः नमन
श्री दगडेजींचा लेख माहितीपूर्ण . मार्च 1886 एवढा जुना पेपर.. औरंगाबाद समाचार तसेच इतरही वर्तमानपत्रांचे कटींग्स बघून नवल वाटले उत्तम।धांडोळा घेतला आहे .रिसला ए तबाबत, आफताब ए दख्खन ..अशी नावे सर्व नव्यानेच कळतात. रामचंद्र रावांच्या प्रबोधनपरंपरेची किमया वाचनीय
श्री चांदेजींनी शं वा कि आणि ल का कि यांचा व्यवस्थित परिचय करून दिला आहे.. यशवंतरावांनी ल. का .किंचा झालेला अव्हेर सांभाळून घेतला त्यावरून त्या काळचे राजकारणी आणि आताचे यातील ठळक फरक ही नजरेस पडला
सुलभाताईंची कविता ..खरेच आता वेळ आली आहे, नराधमाला ठेचण्याची ..चंडी होण्याची ..
छान प्रेरकात्मक कविता.
– स्वाती वर्तक. मुंबई
१०
सर्व सदरे सुंदर आहेत .
राजेंद्र वाणी यांची ‘निसर्ग कवी ‘ही कविता खूप भावली. खूप सुंदर .
– आशा दळवी. दुधेबावी.
११
रिसीटी कार्य कौतुकास्पद..त्या संपूर्ण टीम चे अभिनंदन …लवकरात लवकर हे सर्व दूर पोचायला पाहिजे
कुडकेजींनी केलेले परीक्षण उत्तमच. सरोजिनी बाबर यांचे लघु निबंध अप्रतिम असत ..त्यांचे नवे प्रिंट्स मिळाले तर आनंदच होईल.
बाल संगोपनाचे आव्हान ..दिवसेंदिवस वाढतच आहे . स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील मधली धूसर रेषा बालपणीच कळली पाहिजे . आजकालचे पालक अतिशय व्यस्त. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक . ती बोच ती सल लपविण्यासाठी ते सतत मुलांचे लाड करतात आणि येथेच चुकते.. धन्यवाद सुमती ताई. हा ज्वलंत प्रश्न आहे सध्या .
राजेंद्र जींची श्रध्दांजली योग्य शब्दांची ..
आमचे ही नमन.
- — स्वाती वर्तक. मुंबई.
- “खुणेची पाने” या परीक्षणा वरील अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत.
१
In the 5th episode of rare books series Vilas kudke has introduced Dr Sarojini Babar’s book,”Khunechi Pane”published in 1961. Dr Babar is known for her tempting short stories particularly focused on folklore.In this she has touched varied subjects in our daily life. Stories take us in new emotional world of women everytime. In a story she recollects her own maiden experience of giving a speech though she stumbles,it gives her new identity as a orator n bust her morale In another story on Haldi kumkum ,she has nicely painted the women’s feelings. This ceremony emanates the great pleasure of being together among women. In her Gharguti Manas we rejoice the joys of interacting with the family members having vivid characteristics that shapes before the inhabitants an idea of sweet home.The story Ata yethech thambu ya gives a message to restrain our desires at a specific point n get relaxed now. The author has compared the book marks with the book of life n unveils the beautiful pages for the us giving a novel experience. Kudke has beautifully introduced this book that generates inciting to go through which was otherwise forgotten. Editor Bhujbal sir’s initiative to give space to this series on his popular portal is praiseworthy , that goes without saying.
– Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal.
२
मी साहित्याचा विद्यार्थी नाही. मात्र या लेखाच्या निमित्ताने डॉ सरोजनी बाबर यांच्या साहित्य कृतींची तोंडओळख झाली. धन्यवाद !
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)
३
सुंदर लिहिले सर…. छान
-श्री प्रमोद ताले, श्री अजय भगवंत देशमुख
सर्वश्री /श्रीमती
बालाजी शिर्के, शामसुंदर पंधरकर, डी के शेख, वीणा गवाणकर, इक्बाल लाड, उमेश घेवरीकर, सिध्देश गाणार, भालचंद्र बोरकर व दादासाहेब बनकर यांनीही लेखास पसंती दर्शवली आहे.
–– टीम एनएसटी. ☎️ 9869484800