Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक


खूपच छान वर्णन केले आहे सुप्रियाजी. आम्हाला युरोप पाहिल्याचे फिलिंग आले. तुम्ही प्रवास वर्णन खूपच चांगल्या प्रकारे शब्द बद्ध केले आहे. पुन्हा एकदा तुमचे मन:पुर्वक सुरेल अभिनंदन.
सिने गायक उदय वाईकर.


सौ चित्रा मेहेंदळे यांनी ‘श्रावणी सोमवार’ या विषयावर अतिशय तरल आणि प्रत्ययकारी लेख लिहिला आहे. लहान मुलाच्या भावविश्वात श्रावणी सोमवारचे स्थान काय याचा उलगडा तर या लेखातून होतोच पण उर्वरित आयुष्यात अशा घटना आपल्या सोबत कोणत्या स्मृती/संदर्भ घेऊन येतात त्याचेही दर्शन या छोटेखानी लेखातून घडते. सौ.मेहेंदळे मुळच्या मुंबईतील विलेपार्लेच्या. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने ही आठवण लिहिताना त्या कोणत्या भावविश्वातून गेल्या असतील याचा अंदाज आपण करू शकतो… खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा .

  • प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक, मुंबई.


सुधाकर तोरणे यांनी लिहीलेले परीक्षण आवडले. जीवनात आत्मबल आणि आत्मविश्वास अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. जीवनभर अन्तर्गत आणि बाह्य आनंद यान्चा ताळमेळ अधिक महत्त्वपूर्ण आहे …हे पुस्तक खरेच प्रेरणादायी आहे …..

वन्चित वर्गातील महिलांसाठी शिबिर … चांगला उपक्रम.
आपले हार्दिक स्वागत.

  • माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.


श्री. सुधाकर तोरणे नेहमीच विविध आणि उत्तम पुस्तकांचा परिचय करुन देतात. त्यामुळे सहजच काय वाचावे हा प्रश्न उरत नाही..
खूप धन्यवाद सुधाकरजी..

ज्योत्स्ना तानवडे यांनी नंदनवनाची सफर छानच घडवली. वाचताना काश्मीरची थंडी, सौंदर्य खरोखरच अनुभवलं..

  • राधिका भांडारकर. पुणे.
  • फारच सुंदर कार्य आपले, खरोखरच खूप कौतुकास्पद .
  • सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.


नमस्कार, फारच छान मॅडम.
मुलांच्या सुप्त गुणांना वाव देवून शिबिराद्वारे त्यांच्यातील सृजनशीलतेला न्याय दिल्या बद्दल तुमचं कौतुक करावे तितके कमीच आहे.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • – अनिल चाळके. बदलापूर.


दुर्मीळ पुस्तके : ७ ‘स्वाधीन की दैवाधीन’ या लेखावरील अभिप्राय…..

मी हे पुस्तक शाळेत असताना वाचलं आहे. दुर्मिळ शीर्षक – वाचनीय पुस्तक !
श्री प्रमोद नलावडे, माजी सचिव तथा महासंचालक (माहिती व जनसंपर्क)

सलाम.
श्री अच्युत पंधारे

Super
-श्री मधुकरराव धाकड

खूपच छान पुस्तक आहे. शालेय जीवनात हे पुस्तक वाचूनच सैनिकी जीवनाचे आकर्षण वाटू लागले
श्री मंगेश बरबडे

Super
श्री स्वप्नील वर्पे

छान विश्लेषण केलेत, आवडलं. हे पुस्तक मी पस्तीस वर्षे आधी वाचले आहे, यातील “वाळवंटातील हिरवळ” हे प्रकरण मला इयत्ता सातवी मध्ये होता. आता परत वाचण्याची इच्छा आहे, कृपया कोठे मिळेल ते कळवा…
श्री नरेंद्र वानखेडे

मी लहानपणी हे पुस्तक वाचले होते, भितीने एका रात्रीत केस पिकल्याचा उल्लेख याच पुस्तकात आहे बहुतेक. याची हिंदी आवृत्ती पिडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे
– श्री अभय बापट

खूप छान विश्लेषण
श्रीमती उमा वर्डे.

मेजर रा गो साळवी यांचे हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचनात आले होते. आमच्या रत्नागिरी जवळील फणासोप गावच्या या भारतीय आर्मी ऑफिसर चे हे आत्मचरित्र मनाला खूप भावले होते. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. अप्रतिम पुस्तक.
श्री सहादेव पाटोळे

हे पुस्तक अभ्यासक्रमात होते.
– श्रीमती श्रध्दा बेलसरे, माजी संचालक (माहिती)

अतिशय छान व सुंदर आणि चिरस्मंरणीय असे सत्य घटना व अनुभवाचे पुस्तक आहे.वाचतांना अंगावर रोमांचित वीरश्री संचारते.मी लहानपणी इयत्ता ६ वी कीवां ७ वी ला असतांना हे पुस्तक सलग वाचलेले आहे.
– श्री मधुकर निकम

ह्या पुस्तक परीक्षण वाचले खूप छान
आत्ताच्या परिस्थिती एका गावाने एकदाच जेवण्याचा निर्णय घेतला आहे
– श्रीमती शुभदा बापट

35 वर्षांपूर्वी हे पुस्तक माझ्याकडे होते. ते फार पूर्वीच गहाळ झाले. मला त्याची नेहमी आठवण येते.
– श्री सुधीर पेठकर

आपण इतकं सुंदर विश्लेषण केले आहे की कसेही पैदा करुन पुस्तक वाचावेच लागेल. आत्ताच “वालाँग एका युध्द कैद्याची बखर” हे पुस्तक वाचले. या पुस्तकातील विषयावरुन लक्षात आले.
“मला निसटलंच पाहिजे !” या नावाचे अनुवादित पुस्तक आहे जे दुस-या महायुद्धातील युध्दकैदी सैबेरियाच्या तुरुंगातुन पलायन करतात. चार हजार मैलाचा पायी प्रवास करत भारतात येतात. अप्रतिम अशी सत्य घटनेवरची कहाणी वाचण्याजोगी आहे.
या पुस्तकातील घटनेवर चित्रपट ही आला आहे.
श्री विनय चोपदार

आज दुर्मिळ पुस्तके.. ग्रुप मधून.. दुस-या महायुद्धाचा हृदयस्पर्शी प्रसंग वाचला..आपली पुस्तक शोधायची तळमळ विशेष वाटली….धन्यवाद
श्री चंद्रकांत माळवदे

छान !
श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)

Excellent presentation

  • Shri Bhikku Kausal, Ex Director of Information

Awesome 👍
हे पुस्तक मी शाळेत असतांनाच वाचले। माझे आवडते पुस्तक।आमच्या घरी बहुतेक अजूनही असावे। माझ्या अंदाजाप्रमाणे मेजर साळवी औरंगाबाद लाच रहात होते।
– श्री अजय भगवंत देशमुख

In the seventh apisode of rare books series, Vilas kudke dished out to us his most favourite book,”Swadhin ki Daiwadhin written by Major Ramchandra Salvi. During his school days Kudke had an opportunity to read one of the master piece story in this book included in his text book,” Walwantatil Hirwal” This story haunted him n later he secures this book from Panji after a long wait , The masterpiece story made him more eager to know about the Life of the author. Story reveals that major Salvi during the war against Germany is made war prisoner. Any how he escapes from there to Italy. As army was chasing him he hides himself. As a result he had to go without food. In such critical times one Italian poor woman Adlina comes to his rescue. She spares half of her bread for him keeping herself hungry. Other people from Italy also extend great help defying army fear. Adalina gives him shelter .
All this leaves ineligible imprints on author’s mind. He recounts this experience in this book . Thus the book is a combo of varied experiences in one go. It has humanism, romanticism n it is drenched in pathos. We could know about this wonderful book because of the efforts of our honourable editor Bhujbal sir n Vilasji Kudke. I am as a reader highly obliged to them.
– Shri Ranjitsinh Chandel Yavatmal

सुंदर.. प्रिय कुडके सर.. मला तर शोध घेऊन ही कुठेच मिळालेले नाहीये.. १९६८-६९ ची
– श्री मधुकर धाकराव

That’s Great !
श्री संजय वारुळे

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments