Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

  • — संपादक

१. “समाजभूषण 2”
उत्तम शब्द रचनेतून मिळणारी उत्साह वर्धक प्रेरणा या पुस्तक रुपाने समाजाला मिळालेली मोठी देणगी आहे.

  • — तृप्ती ढवण. नाशिक

२. राधिका भांडारकर यांचा “पितृपक्ष: नवा विचार” हा लेख आवडला. त्यात मांडलेले विचार सद्यस्थितीत स्वीकारायला पाहिजे.

  • — लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.

३. राधिका, “पितृपक्ष:नवा विचार” खूप छान.असा सकारात्मक विचार करायलाच हवा.माझे पण हेच मत आहे.

  • — ज्योत्स्ना तानवडे.

४. विलासराव.. आनंदीबाई शिर्के यांच्या सर्व कथा आवडल्या. थोडक्यात आपण छान परामर्ष घेतला आहे. धन्यवाद.

  • — सुधाकर तोरणे. नाशिक

५. एक वही एक पेन हा उपक्रम छान वाटला. मी नवरात्रात करते नक्की.

  • — जयश्री देशमुख.

६. पर्यावरण संवर्धन….
पर्यावरणावरील छान लेख.

  • — अनीसा शेख. दौंड

७. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करणा-या ठाणे येथील सुरंजन ट्रस्टच्या वतीने, दिनरंग वार्षिक महोत्सवात गायक निषाद बाक्रे आणि जयपूर-अंत्रोली घराण्यातील डॉ. विदुषी अश्विनी भिडे यांच्या मैफलीचा बहारदार वृतांत सिध्दी पटवर्धन यांनी सादर केलेला मनापासून आवडला..

  • — सुधाकर तोरणे, नाशिक

८. दुर्मीळ पुस्तके ११ तृणपुष्पे यावरील अभिप्राय….

७०/८० वर्षांपूर्वीची मराठी कथा कशी होती याची झलक या कथांतून पाहायला मिळते… मानवी स्वभाव फारसा बदलत नाही पण त्याच्या आविष्कारात मात्र खूपच बदल होत असतो हे समांतर कथेच्या पार्श्वभूमीवर लक्षात येते… पूर्ण कथासंग्रह वाचायची संधी मिळेल की नाही याची कल्पना नाही पण या ‘सॅम्पल-टेस्ट’ बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार.

  • — श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)

बहुत बढिया ।

  • — श्री भिक्कू महेंद्र कौसल,
    माजी संचालक (माहिती)

Trun -pushpe is the 11th book in the rare books series authored by Anandibai Shirke. After her autography “Sanjvat”was published, bacame widely popular. The book is a compilation of stories depicting miserable conditions of women harassed by their husbaands n males in society. Appreciator Vilas kudke unveils the varied shades of of these stories.
These aggrieved women are abandoned women, widows, house help, women killed their hubbies due to harassment n undergoing punishment, women whose men have extra marital relationship, women victims of dowry though theirs was a love marriage.

Story titled “Adhapat” is the climax of injustice done to women in which a man brutally beats his wife n criminal case is booked against him though his aggrieved wife struggles to save him from court sentence. As against this the husband tells to court that he beat her as she had immoral relationship. The author has ably put the pitiable conditions of women in society. Even today we experience the similar scenario in society.
Our honourable editor Bhujbal sir n Vilasji Kudke have dished out one more heart moving literary work for us through this otherwise forgotten book.I thank the duo.
— Ranjitsinh Chandel, Yavatmal.

श्री प्रमोद गावकर, श्रीमती अश्विनी नूतन नारायण महाडिक यांनीही लेखास पसंती दर्शवली आहे.

९. श्री गोविंद पाटील यांनी लिहिलेल्या “दीनमाय” कथेवर अनेक वाचकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्या पुढे देत आहे.
१. “दीनमाय कथा” निश्चितच विचार करायला लावणारी हृदय स्पर्शी कथा आहे.

  • — सुरेश पाटील. माध्यमिक शिक्षक

२. श्री.गोविंद पाटील सर यांनी लिहिलेल्या “दीनमाय” या कथेत लेखकानी नदीच्या मनातील विचार मांडल्याने, वाचकांच्या काळजात हात घातलाय. वाचताना मनात कालवाकालव होते. प्रत्यक्ष नदी समोर उभी आहे व तिच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे असे भासते. कथेत चित्रांनी अजूनच सत्याचा प्रत्यय येतो. लेखकाची प्रतिभा उच्च आहे, त्यामुळे कथा वाचतांना वाचक भारावून जातात. लेखक श्री.गोविंद पाटील सर यांना खूप खूप शुभेच्छा.

  • — सौ.सुनिता फेगडे.
    माध्यमिक जेष्ठ शिक्षिका, माध्यमिक विद्यालय, उमाळे जळगाव जिल्हा.

३. सरजी… नदीमायचं स्वगत आत्मक्लेश व्यक्त करणारं. मानवाचे डोळे उघडणारं. नेमका अनुभव मांडलाय.

  • — बी.एन.चौधरी. देवरुप परिवार, धरणगाव.

४. खूप सुंदर कथा आहे. बापूसाहेब, जुन्या आठवणींना वेग दिला तुम्ही.

  • — श्री विलास शांताराम सोनवणे.
    जामनेर, जळगाव जिल्हा

५. सुंदर कथा सांगितली गोविंद पाटील आपण. अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा पुढील साहित्य लेखनास….

  • — श्री डी.डी.पाटील सार्वजनिक वाचनालय जामनेर अध्यक्ष.

६. कथा वास्तवावर आधारित आहे. सारासार सर्व गोष्टींचा विचार कथेत करण्यात आला आहे. नदीचे दुःख मांडले आहे.
गरिबांचे जीवन पूर्वीचे दिवस आठवले. वाचताना भूतकाळ मन गेलें. छान सर आवडली कथा.

  • — सौ.मिनाताई सैंदाणे. जळगाव

७. कथा वाचून मला आनंद वाटला. मला ही माझे बालपण आठवले. कुरकुर नदी ला पुर आला की मी ही असाच नदीकाठी जायचो. तुम्ही केलेल्या वर्णनातून बालपण जागं झालं. ह्रदयाला भिडणारे वर्णन, मनाला भावूक करणारे वर्णन, गावाची ओढ निर्माण करणारे वर्णन. खुप छान वाटले बापू.
असंच लिखाण तुमच्या हातून निर्माण होत राहो. यासाठी मनापासून शुभेच्छा.

  • — प्रा महेंद्र पाटील.

८. अतिशय सुंदर समर्पक, हृदयस्पर्शी कथा आहे. अभिनंदन सर

  • — श्रीमती ज्योती राणे पाटील.
    प्राथमिक शिक्षिका.

९. अभिनंदन सर ! खूपच सुंदर !
‘जनावरं हीच गरीबाचे धन असते. ‘गरीबाचं जगणं अधोरेखित करून गेले.

  • — सौ जोस्ना पाटील. नाशिक

१०. छान कथा लिहिली सर.
नदी आपल्या सर्वांची काळजी घेणारी माय माउली.
अतिशय समर्पक कथा…

  • — राजू बाविस्कर.
    निवृत्त माध्यमिक शिक्षक.
  • — टीम एनएसटी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं