Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
-संपादक

गेल्या गुरुवार पासून आपण “बातमीमागची बातमी ” हे नवे सदर सुरू केले आहे. पहिल्याच भागात आकाशवाणी,दूरदर्शन वृत्त निवेदिका, लेखिका, भाषांतरकार प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी त्यांचे अनुभव विशद केले. त्यांच्या लेखावर पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

१ प्रज्ञा जांभेकर यान्चा लेख आवडला.
बातमी मागची बातमी हे पुस्तक प्रकाशित व्हावे.
खुप बोलके अनुभव वाचायला मिळतील.

  • — माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

२. बातमीमागची बातमी लेख आवडला.👏🏻👏🏻

  • – प्रसाद माळी. मुंबई.

३ प्रज्ञाचे अनुभव छान आहेत.

  • — प्रसाद मोकाशी. मुंबई.

४. प्रज्ञा जांभेकरांचा लेख आवडला.

  • — प्रा अंजली रानडे. मुंबई.

५. प्रद्न्या, मुलाखत उत्तम झाली.अभ्यास, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याची तयारी…..यशस्वी पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली वैशिष्ट्ये तू थोडक्यात, पण सुसंबद्ध्तेने चांगली नमूद केलीस, त्यामुळे पत्रकारितेचा आवाका लक्षात येणे सोप्पं झाले.
मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
— डाॅ. किरण चित्रे. मुंबई.

राजेंद्र घरत यांचा विश्र्व मराठी संमेलन लेख वाचून आनंद झालाय. जगातील काही देशात मराठी भाषेचा प्रभाव चांगलाच आहे.

  • — प्रमोद झिंजार्डे. सामाजिक कार्यकर्ता मेळावा, सोलापूर.

नमस्कार
श्री राजेंद्र घरत ह्यांच्याशी मी सहमत आहे. मी ही ३ दिवस विश्व मराठी संमेलनात सहभागी झाले होते.

  • — चित्रा मेहेंदळे. सियाटेल, अमेरिका.

मराठी संमेलन वृतांत 👌👌👌

  • – गणेश डांगरे. नगर.

विश्व मराठी संमेलनाचा वृत्तान्त फार छान आहे.

  • — डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे.

अंजलीताईं धानोरकर यांची सगळी पुस्तकं मी अगदी पारायणासारखी वाचलेली आहेत. फारच छान लिहीतात त्या. त्यांचे अभिनंदन आणि कौतुक सुद्धा.

— प्रा सुनिता पाठक. छ. संभाजीनगर

धारव साहेबांसोबतचा गोड ,प्रेमळ सहवास बऱ्याच व्यक्तींना लाभला आहे .त्यांनी लहान, मोठ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन काम केले आहे. सर्वांना त्यांच्या चांगल्या आठवणी न विसरता येणाऱ्या आहेत.

  • — शत्रुघ्न लोणारे.
    निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. नागपूर

“आठवणीतील धारव साहेब” लेख खूप छान.

  • – अशोक डुंबरे.
    निवृत्त दूरदर्शन संचालक. पुणे
    .

राधिका भांडारकरांचं ‘बाली’ प्रवास वर्णन फारच सुरेख वाटलं. आपणच जणू काही ‘बाली’त फिरत आहोत असचं वाटलं.अगदी बारीक सारीक तपशील त्यांनी आकर्षक पध्दतीने सादर केला आहे.हे वर्णन वाचून (पहिल्याच प्रकरणानंतर) माझा नातू ध्रुव हा ‘बाली’ला परवाच १३ दिवसांसाठी रवाना झाला आहे.राधिकाजींचे अप्रतिम लेखनाबद्दल मनापासून अभिनंदन तसेच देवेंद्रजींचे देखील कुशल संपादन बद्दल मन:पुर्वक अभिनंदन.

— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.

दुर्मीळ पुस्तके २७
मन्वन्तर वाचनमाला या लेखावरील अभिप्राय…

मन्वंतर पुस्तक मालिकेसाठी ७५ वर्षांपूर्वी बाबुराव जगताप यांनी संपादित केलेले केलेल्या पुस्तकाचा गोड परिचय विलास कुडके यांनी करून दिला आहे. मान्यवरांच्या १९ कविता आणि ३० धड्यांचा या पुस्तकात समावेश आहे. या सगळ्या कवी लेखकांनी मराठी साहित्यसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले आहे हे आज लक्षात येते. डॉ झाकीर हुसेन यांनी अब्बूखाकी बकरी नावाची एक कथा लिहिली असून तिचा अनुवाद साने गुरुजी यांनी केला आहे हा केवळ उल्लेख वाचूनच त्यांच्याविषयी कुतूहल आणि आदर जागा होतो. या पुस्तकातील कवी आणि लेखकांची नावे जरी पाहिली तरी एक संवेदनशील माणूस म्हणून मन अभिमानाने आणि आनंदाने भरून येते… प्रत्येकाची कृती काही ना काही मौलिक संदेश देऊन जाते. असेच एक नवनीत नावाचे छान संपादित पुस्तक लहानपणी वाचनात आल्याचे स्मरते… न्यूज स्टोरी टुडे ने या मालिकेच्या रूपाने एक उत्तम कामगिरी केली आहे विलास कुडके यांनीही आपल्यातील उत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेवर आधारित पुस्तक प्रसिद्ध झाल्यास रसिकांसाठी, अभ्यासकांसाठी तो एक उत्तम संदर्भ म्हणून सिद्ध होईल असे वाटते. शुभेच्छा
श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)

सुंदर.. प्रिय विलासराव.

  • श्री मधुकर धाकराव
    — टीम एनएसटी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments