छायाचित्रकार डॉ नितीन सोनावणे झाले पीएचडी.
जेव्हा सध्या सर्व जण रुळलेल्या वाटातच धुंडाळत आपले जीवन सार्थ करू पहात आहेत अशा वेळी स्वतः कोविड च्या भयानक आजारातून जिद्दीने बाहेर पडून समाजाच्या दुर्लक्षित कला आणि त्यांना अवघे जीवन वाहिलेल्या अवलिया कलाकारांचे जीवन जवळून पाहून त्यांचे संवेदनशील मन अशा कलाकारांना आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्वांसमोर या कलाकारांचा जीवनपट मांडण्याचा ध्यास घेतला कितीही अडचणी मग स्वतःच्या आजारपणाला बाजूला ठेवून तो भयानक दर्द विसरून अगदी झपाटल्या प्रमाणे हा आगळावेगळा उपक्रम पार पाडतात हे आजच्या काळात अविश्वसनीय कामगिरी आहे तीचे मोल आज नाहीतर भविष्यात त्या गोष्टीं ची किंमत समाजाला समजेल हे नक्की. ध्येय समोर ठेवून ते साध्य करणे हे लाखात एका व्यक्तीला पण साधेल कि नाही पण हे इंद्रधनुष्य त्यांनी सहज पेलले आहे मी त्यांना त्यांच्या या कर्तृत्ववाला नमन करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो
– सुधीर धर्माधिकारी. ठाणे
Congratulations sir. I really admire your hard work and dedication to study and photograph these artists.
– ज्योती राऊत
आदरणीय डॉ नितीन सोनवणे सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
आदरणीय श्री देवेंद्र सरांचे मनपूर्वक आभार, त्यांनी डॉ नितीन सोनवणे सरांची कला वाचकांपर्यंत पोचवली.
आपला विश्वासू
– मदन लाठी. न्यू सांगवी पुणे
छायाचित्रकार डाॅ नितिन सोनवणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मावज मधील छायाचित्रकार सहकारी मित्रांना निश्चित ऊर्जा मिळेल. शुभेच्छा.
– सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
“सखी”
स्त्रीत्वाची ग्वाही देणारी आणि निसर्गाच्या नियमाशी सन्मानाने
पेश येणारी कविता!!
– राधिका भांडारकर. पुणे
आई व्हायचंय मला…..
Khup chan pustak ahe. Ani hya lekha madhe hi surekh varnan kela ahe.
– कुलकर्णी स्मितीजय
श्री.किरण ठाकूर यांनी शाब्दकथांचाही विषय प्रयत्न करून नव्याने करता येऊ शकेलसे वाटते. त्यांना मित्रवर्य श्री.अशोक, श्री.रानडे आनंदाने विषयात भरघालण्यास मदत करू शकतील असे वाटते. आजही शब्दांच्या उत्पत्तीची माहिती देणार् या कोशाचा प्रकल्प श्री.राजा दीक्षित यांच्यामार्फत प्रयत्न करून करता येईलसे वाटते.
– सुरेशचंद्र पाध्ये
🌹सर्व कविता अतिउत्तम 🌹
🌹मानवतेची गुढी 🌹
निशब्द झालो मी.
अप्रतिम
🌹🌹🙏🙏
– – अशोक बी साबळे. Ex. Indian Navy, महाड
गुढीपाडवा : काही कविता
पाडव्याच्या निमीत्ताने केलेल्या सर्वच काव्यरचना आनंद स्नेह, संस्कृती परंपरा सांगणार्या. जपणार्या.
आज खर्या अर्थाने गुडीपाडवा, नवा वर्षारंभ साजरा झाला.
– राधिका भांडारकर.
आळविते मी तुला विठ्ठला..
भावे सर, हे गाणे मी प्रत्यक्ष कधी ऐकलेले आठवत नाही.पण तुम्ही रसग्रहण करून त्याची ओळख करून दिलीत.अशी भावपूर्ण गाणी पुढील काळात लिहिली जातील का सांगता येत नाही.मात्र तुम्ही आमच्यासाठी गाण्यांवर लिहून आम्हाला त्या गाण्यांचा स्वाद देताय हे खूप चांगले काम करताय.
– मेघना साने.
संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले संजीवनी मराठे यांचे हे गीत व माणिक वर्मा यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गायलेल्या गाण्याची निवड करुन आपण आम्हाला जुन्या जमान्यात घेऊन गेलात. गाणं व आपण रसग्रहण दोन्ही उत्तम.
– विवेक भावे
‘बातमीदारी करताना’ ( २९ )
Uttam lekh
Aajchya tarun batmidarana margdarshak.
– रेश्मा भुजबळ
किरण ठाकूर यांनी मृत्यु या शब्दाचे अनेक समानार्थी माहित असलेले, विस्मरणात गेलेले, बोली भाषेतले, ग्रामीण असे अनेक शब्दांची जंत्री देउन लेख फारच माहितीपूर्ण, मनोरंजक केलाय.
मराठी भाषेची समृद्धी थक्क करणारी.
– राधिका भांडारकर
‘लालबत्ती’ ( २४ )
बहुत ही उम्दा कहानी जन्नत हार्दिक बधाई
अभिनंदन 🌷 🌷 🌷 🌷
अध्यक्ष महात्मा गांधी साहित्य मंच गांधीनगर
– डॉ गुलाबचंद पटेल.
जन्नत…अत्यंत ह्रदय पिळवटून टाकणारी कथा..
राणीचा प्रत्येक शब्द जणू अश्रुत भिजवलेला वाटतो…
– राधिका भांडारकर
प्रेरणा
वाह मस्त
– दीपाली दातार
“ओठावरलं गाणं”
खूप छान रसग्रहण.
– सुमेधा साठे
🌹जगू या प्रेमाने 🌹
जगण्याची सुंदर परिभाषा आपण मांडली.
धन्यवाद
– अशोक साबळे. Ex Indian Navy.
छायाचित्रकार नितीन सोनावणे झाले विद्यावाचस्पती सुंदर लेख 👌🏻👌🏻👌🏻
– सौ मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
“सखी” कविता वाचली.वाटलं मैत्रीण असावी !
सहसा मासिक पाळी हा मोकळेपणी बोलण्याचा विषय नाही, असं वाटायचं. पण डॉ वर्षा भाबल यानी अवघड विषय सोपा केला.
कविता रूपांत छान वर्णनं केले. नातीना समजून सांगणे सोपं झालं.
– सुरेखा तिवाटणे.. पुणे.
श्री नितीन सोनवणे सर यांचे अभिनंदन.
– प्रसाद माळी. नवी दिल्ली.
रेडिओच्या आठवणीने जून्या आठवणींना उजाळा मिळाला. सारीच सदरे छान. महाराष्ट्राच्या संताच्या, भूमित संत साहित्य संमेलन, तेही महालक्ष्मीच्या प्रांगणात किती छान 🌹🌹🙏
– आशा दळवी, फलटण सातारा
डॉ. नितीन सोनावणे यांच्यावरील लेख वाचला. आवडला. त्यांनी पीएचडीसाठी निवडलेला विषय या क्षेत्रातील काम करणा-यांसाठी नेत्रदिपक ठरणार आहे. भुजबळ सरांमुळे वेगळे काम करणाऱ्या, अज्ञातात असणाऱ्या व्यक्ती माहिती होतात. धन्यवाद सर.
– अंजु निमसरकर. नवी दिल्ली.
प्रत्येकाने आपल्या वर्षभरातील आपल्या कर्मांचा, (चांगल्या वाईट), लेखाजोखा स्वतःच्या मनात तयार करण्यासाठी हा दिवस ठरवून ठेवून त्यानुसार सद् गुण/दुर्गुणांचा जमाखर्च तयार ठेवला तर आगामी आयुष्यात पुढील पापपुण्याचं अंदाजपत्रक नीट आखता येईल, हा धडा ओमप्रकाशनी आपल्याला गिरवायला दिला त्याबद्दल त्यांना आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी देवेंद्रजींना धन्यवाद.🙏🏻
– वीणा गावडे. निवृत्त वरिष्ठ सहाय्यक संचालक
माहिती विभाग, मंत्रालय. मुंबई
क्रांतिकारकांच्या कथा प्रेरणादायी आहेत. ज्या पध्दतीने लेखिका वर्णन करतात त्या वेळचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते👍🏻
– प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
क्रांतीतीकारकांची कथा: चंद्रशेखर, आवडली.
– शेखर भडसावळे. नेरळ
दि.२.४.२२ रोजीच्या आपल्या पोर्टलवरील मला भावलेले लेख-
– औरंगाबाद येथे जिल्हा प्रसिध्दी अधिकारी म्हणून कार्य केलेल्या शेषराव चव्हाण यांच्या दोन आठवणी साक्षात ते क्षण पुढे उभे करतात. एकतर खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झोपमोड करूनही त्यांची प्रशंसा त्यांनी मिळवलीच. त्याचे कारणही तसेच होते. स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या बळकटीकरणात महत्वाची भूमिका बजावणा-या बळवंतराय मेहता यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. आणि या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांचा संदेशही त्यांनी मिळवला.या घटनेमुळे ते मुख्यमंत्र्यांचे एक विश्वासू अधिकारी म्हणून गणले गेले.
अशीच एक आठवण त्यांनी सांगितली.भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याशी त्यांची भेट. एक नाजूक प्रसंगातून त्यांनी शोधलेले उत्तर हा एक चांगला प्रशासकीय कौशल्याचा नमुना आहे.
– प्रिया मोडक यांचा लेख ‘२ जावांचा कलात्मक
उपक्रम’ माहितीपूर्ण आणि तितकाच उपयुक्त आहे.
कोरोनाने ऑनलाईन व्यवहाराच्या संख्येत वाढ झाली. मात्र त्यापूर्वीच नवी मुंबईतील ऋचा राज्याध्यक्ष आणि राजश्री राज्याध्यक्ष या दोन जावांनी मिळून एक बहुउद्देशीय बेबसाईट तयार केली. जगातील हजारो कलाकारांची माहिती असलेल्या या बेबसाईट मधून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करणे शक्य झाले.याबरोबरच अनेक कलांचे प्रशिक्षणही या बेबसाईटवर उपलब्ध आहे. एका अर्थाने ऑनलाईन विश्वाचे दारच या जावांनी ( नव्हे भगीनींनी) उघडले आहे. त्यामुळे हा लेख जितका वाचनीय आहे,तितकाच उपयोगी आहे.एका अर्थाने हे ‘कल्चरल एक्स्टेंशन’ आहे.
– प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे.
नमस्कार🙏🙏
आजची सर्वच सदरे सुंदर आहेत. शेषराव चव्हाण या लेखातील वंसराव व लालबहादूर शात्री दोघेही महानचं होते. शात्रिजींनचं, जय जवान, जयकिसान, हे ब्रिद वाक्य आजूनही शासनाने, अमलात आणलेल दिसत नाही. असो…
लीना फाटक यांची, मानवतेची गुढी मनाला भावल, गुढीपाडव्या विषयी सर्वांनी सुंदर लिहिले आहे.
सर्व कविता सुंदर, नववर्षाच्या स्वागत बरोबर एकतेचाही संदेश कवितांमधून दिसून आला
🙏🙏आशा दळवी फलटण सातारा 💐🎊
रेडिओच्या आठवणीने जून्या आठवणींना उजाळा मिळाला. सारीच सदरे छान. महाराष्ट्राच्या संताच्या, भूमित संत साहित्य संमेलन, तेही महालक्ष्मीच्या प्रांगणात किती छान 🌹🌹🙏
– आशा दळवी, फलटण. सातारा
नेदरलँडच्या शलाका कुलकर्णी यांचा “कॉज ऑफ सफरींग इज लॅक ऑफ लव्ह” हे शीर्षकच पुर्ण अर्थबोध करणारं आहे. आपलं जीवन सहजपणे जगलो तर जीवन सुखप्रद नक्की होतं. पण कौटुंबिक बंधने, सामाजिक बंधने, आर्थिक बंधने, देश,काल, स्थळ, व्यक्ती, घटना,प्रसंग,वय, शिक्षण, वैयक्तिक धारणा, संस्कार इ अनेक प्रकारच्या बंधनात अडकत गेल्याने,आपण आपणाला जखडून ठेवतो आणि आपलं सहज सोपं जीवन अवघड करून टाकतो. जखडलेल्या अवस्थेत सर्वत्र वावरतांना ना आपणाला ईतरांच प्रेम घेता येतं ना कुणावरही प्रेम करता येतं. प्रेम, दया, माया, क्षमा, शांती, संतुष्टी हे गुण प्रत्यक्ष देवाचे ओतप्रोत वरदान आपणाला अत्यंत, लाभदायी असतात. म्हणुनच दु:खाच मुळ, प्रेमाच्या अभावात दडलेले असते. ईट इज व्हेरी इझी टु बी डिफिकल्ट, बट ईट इज व्हेरी डिफिकल्ट टु बी इझी अशीच स्थिती बहुजनांची असते आणि प्रेमाचा अव्हेर केल्याने सुख दुरावते आणि दु:ख पदरी पडते. शीर्षकाची सर्व रहस्य उघड होते.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता, मुंबई दूरदर्शन. मुंबई.
लिनाताई,
अतिशय सुंदर लेख मंदा ला अर्पण केलात त्यावरून तुमची मैत्री किती सुंदर होती ह्याची कल्पना आली.
पहिलं लिखाण बालपणाकडे घेऊन गेलं. असच वातावरण होतं तेव्हा. आता मुलांना काहीच महत्त्व वाटत नाही.
मानवतेची गुढी ही कल्पना तर फारच आवडली. पूर्ण लेख अगदी आदर्श ठेवावा असा झालाय..
– सुनंदा पानसे. पुणे