Home बातम्या वाचनीय लोकराज्य

वाचनीय लोकराज्य

0

लोकराज्य/जुलै-२०२१ : संग्राह्य अंक
“संवर्धन वनांचे, वचन महाराष्ट्राचे”
“श्रीचक्रधरस्वामी अवतारकार्य

महाराष्ट्र शासनाच्या
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘लोकराज्य’ मासिकाचा जुलै महिन्याचा अंक नुकताच प्रकाशित झाला आहे. वनमहोत्सव व वनीकरण कार्यक्रमाबाबतची माहिती देणारा विशेष लेख तसेच अहिंसा आणि लोककल्याण या तत्त्वांचा जागर करणाऱ्या श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतारकार्याला ८०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, नव्या पिढीने त्यांचे तत्त्वज्ञान समजून घ्यावे, यासाठी विशेष लेखांचा स्वतंत्र विभाग हे या अंकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

या अंकात पर्यावरणाच्या विविध योजना, कोरोनामुक्त गाव मोहिम, बीडचा पिकविम्याचा पॅटर्न, कुलाळवाडीची वैशिष्ट्यपूर्ण शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना इत्यादी माहितीपूर्ण लेखांचा तसेच ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या यशकथांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच महत्त्वपूर्ण घडामोडी व मंत्रिमंडळ निर्णयांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे.

हा अंक संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. अंक वाचण्यासाठी वा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://mahasamvad.in/?p=44127#dearflip-df_44122/1/

प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे व संग्रही ठेवला पाहिजे, असा हा विशेषांक आहे.

– टीम एनएसटी 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version