अष्टाक्षरी
उंच वाऱ्याचा भोवरा
म्हणे तया वावटळ
छोट्या, मोठ्या वादळांशी
व्हावे लढण्या प्रबळ
शक्तिशाली वावटळ
करे उध्वस्त संसार
झाले होत्याचे नव्हते
पुन्हा सावरण्या तयार
मनी सतत असते
विचारांची वावटळ
नाम प्रभुचे मुखात
पहा शमेल वादळ
वावटळ येता दारी
मन ठेवावे निर्भय
दोन हात करताच
मिळे सर्वांना अभय
वावटळ येणे,जाणे
जीवनाचा एक भाग
मनी सकारात्मकता
ठेवुनिया सदा वाग
— रचना : डॉ दक्षा पंडित. सँनडियागो, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800