Wednesday, September 10, 2025
Homeयशकथाविक्रमी जलतरणपटू जयंत

विक्रमी जलतरणपटू जयंत

नागपूरच्या 20 वर्षीय आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याने नुकतेच युनायटेड किंग्डम मधील नॉर्दन आयर्लंड येथील दोनागडी बंदराजवळील नॉर्थ अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनलमध्ये पहाटे 6 वाजून 31 मिनिटांनी सूर मारून नॉर्थ चॅनेल पोहण्याच्या धाडसी अभियानाला प्रारंभ केला.

त्याने हे अंतर आपल्या टीम सोबत 14 तास 39 मिनिटांमध्ये पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे आशिया खंडातील अशी ही पहिली रिले टीम ठरली आहे.

आयरिश लॉंग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशन (ILDSA) नुसार नॉर्थ चॅनेल ही जगातील सात समुद्रापैकी एक सगळ्यात कठीण अशी समजल्या जाणारी खाडी आहे. तिचे अंतर 34.4 किलोमीटर (21.4 माईल) असले तरी प्रत्यक्षात स्वीमरला 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पोहून पार करावे लागते. अतिशय थंड वातावरण 12, सेल्सिअस डिग्री पासून ते 15 सेल्सिअस डिग्री पाण्याचे तापमान असते. त्यासोबतच अत्यंत वेगाने वाहणारे वारे, समुद्रातील जेलीफिश ही अतिशय कॉमन असतात. त्यासोबतच नाटोरीयन सी लॉयन व अनेक जलचर प्राण्यांचा अडथळा या जलतरणपटूंना पार करावा लागतो.

गत तीन दिवसापासून योग्य अशा वातावरणाची आम्ही वाट पाहत होतो. इन्फिनिटी चॅनल स्विमिंग च्या श्रीमती जॅकलीन यांनी दिनांक 20 तारखेला सप्टेंबरला पहाटे पाच वाजता आम्हाला स्टार्टिंग पॉईंट वर उपस्थित राहण्यासाठी सांगितले. त्यानुसार आम्ही उपस्थित झालो. परंतु अतिशय वेगाने वाहणारे वारे यामुळे आम्हाला सुरुवात करतानाच योग्य वेळेची दीड तास वाट पहावी लागली. समुद्रातील बारा ते पंधरा सेल्सिअस डिग्री च्या थंड पाण्यात पोहणे त्यासोबतच अतिशय वेगाने वाहणारे थंड वारे, समुद्रातील जेलीफिश चा सामना करणे हे माझ्यासाठी अतिशय नवीन होते, त्याला मी यशस्वीपणे शह देऊन शकलो हा विक्रम करू शकलो, याचा मला आनंद होत आहे. या विक्रमामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील ओपन वॉटर युवा जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

या सागरी साहसी धाडसी मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील शेवटच्या चार तासांमध्ये वातावरणात अचानक बदल झाला.
वादळासारखे वारे वाहू लागले. त्यामुळे प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. अंधारही पडायला सुरुवात झाली होती, माझ्यासाठी हा जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग होता. परंतु अशा या बिकट परिस्थितीचा ही सामना करून मी ही मोहीम पूर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे. प्रत्यक्षात नॉर्थ चॅनेल पोहण्याचा निर्धार मी गेल्या दोन वर्षांपूर्वीच केल्या होता. मी, माझी आई व माझे वडील आमच्या तिघांचीही विमानाची तिकिटे काढली होती. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. त्यातच कोरोनामुळे माझ्या आई चे दुःखद निधन झाले. त्यामुळे मी हा प्रयत्न करण्याचे सोडले होते. परंतु माझ्या वडिलांनी, कुटुंबियांनी मला धीर दिला. माझ्या आईच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासोबत होता त्यामुळेच त्यामुळे मी ही धाडसी सागरी मोहीम पूर्ण करू शकलो.

युनायटेड किंगडम येथील वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या बदलाचा त्याचप्रमाणे थंड पाण्याचा सराव करण्यासाठी मी गत पंधरा दिवसापासून माझे प्रशिक्षक असलेले वडील डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्दन आयर्लंड येथे सराव प्रारंभ केला होता. माझा कठीण सराव हे अभियान पूर्ण करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरला असे जयंत पुढे म्हणाला.

मुंबई येथील मूळचे नागपूरचे असलेले श्री प्रबोध हळदे व नागपूर येथील हळदे परिवार यांनी माझे मनोबल वृद्धिंगत केले तसेच माझ्या सर्व चहात्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्वांचा आभारी असल्याचे जयंत ने सांगितले.

वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन (WOWSA) ने निर्धारित केलेल्या सात सागरातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या नॉर्थ चॅनल पोहण्याच्या जयंत च्या रिले टीम मध्ये मध्य प्रदेश पश्चिम, बंगाल, आसाम, हरियाणा व तामिळनाडू येथील एकूण सहा जलतरणपटूंचा समावेश होता .

जयंत हा 4 महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट चा कॅडेट असून नागपूर येथील ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मध्ये बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग, डॉल्फिन स्विमिंग क्लब, एक्वा वॉयज तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्यांचे व चाहत्यांचे डॉ. दुबळे यांनी आभार मानले .

जयंत ने यापूर्वी वेस्ट बंगाल येथील जगातील सर्वात लांब पल्ल्याची 81 किलोमीटर अंतराची जलतरण स्पर्धा बारा तास 29 मिनिटांमध्ये पोहून यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. तसेच गुजरात येथील 35 किलोमीटर अंतराची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई व गोवा येथील 140 किलोमीटर अंतराचे स्टेजेस सी स्विमिंग अभियान पूर्ण केलेले आहे. गतवर्षी श्रीलंका व इंडिया या दरम्यान ची PALK STRAIT नऊ तास वीस मिनिटांमध्ये पाहून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान जलतरणपटू बनण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. जयंत च्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आलेली आहे.

जयंतच्या या धाडसी सागरी मोहिमे करिता आयरिश लॉन्ग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशनचे ऑबजरवर श्रीमती जेन ह्या होत्या. जयंत च्या सुरक्षे करिता सुसज्ज असलेली इंफिनिटी चॅनल स्विमिंग, नॉर्दन आयर्लंड ची अनंत्या ही बोट होती. बोट चे पायलट / स्किपर श्री पॅड्रिक हे होते. जयंत ने नॉर्थ चॅनल पार केल्यानंतर नॉर्दन आयर्लंड येथील जेनिफर व जेफ यांनी ज्यांचे अभिनंदन केले. जयंत ने आपल्या या धाडसी सागरी जलतरण मोहिमेद्वारे ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व ग्लोबल वार्मिंग बाबतही जनजागृतीचा संदेश दिला. जयंत ने या अभियानासाठी आपला जलतरणाचा सराव मुंबई जुहू बीच येथील भारतातील पहिल्या समुद्री जलतरण प्रशिक्षण केंद्र तसेच नागपूर येथील एम. एस. डी. स्कूल, ललिता पब्लिक स्कूल, ईस्टर्न स्पोर्ट्स क्लब, महानगरपालिका व एन. आय. टी. चा स्विमिंग पूल तसेच अंबाझरी तलाव येथे डॉ जयप्रकाश दुबळे व डॉ. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता.

युनायटेड किंगडम येथील नॉर्थ चॅनल पोहोण्या च्या विक्रमा बद्दल राज्यातून तसेच संपूर्ण भारतातून जयंत वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !