अज्ञानाच्या भाऊगर्दीत अंधश्रद्धा
श्रद्धेने पसरली
विज्ञानाच्या युगातही पाय
रोवून बसली
विज्ञानाची पेटवू मशाल..
डबल पैशाच्या लोभापायी
शेती विकली
बुध्दी असूनही अक्कल
गहाण ठेवली
विज्ञानाची पेटवू मशाल..
सुशिक्षित असूनही अडाणी
माणसे झाली
भोंदूगिरी बाबांच्या आहारी
एवढी गेली
विज्ञानाची पेटवू मशाल..
कासेच्या भांड्यापायी लाखाची
दौलत बाबाला गेली
स्वत:च्या घरावर तुळशीपत्र
नोकरदाराने ठेवली
विज्ञानाची पेटवू मशाल..
भक्तिच्या ओघात विज्ञानाला
मुठमाती दिली
विज्ञानाची कास धरूनी
अंधश्रद्धेला देऊ तिलांजली
विज्ञानाची पेटवू मशाल..

— रचना : अशोक घोडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800