विज्ञानाची गरूड भरारी,
विज्ञानाचा गर्व,
अध्यात्म्याने एकरूपता,
सहज घडते सर्व,
प्रगतीसाठी रोज नवनवे,
प्रयोग हवेत कराया,
अध्यात्म्याने तेज वाढते,
शांती मिळते लिलया,
विज्ञानाने भौतिक सुखे,
वेळ नी श्रम वाचविती,
अध्यात्म्याने आत्म जागृती,
नवीन येते प्रचीती,
विज्ञानाने बाह्य सुख ते,
मिळते अपरंपार,
समाधान, शांती मिळाया,
अध्यात्मच आधार,
विज्ञानाचे पाय लावूनी,
ध्येय ठेवूनी धावा,
वृतीतून अन कृतीतून,
अध्यात्मच जागवा..!!!

– रचना : हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800