भारत सरकारच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (NCRA) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्य़ातील खोडद येथे जगप्रसिद्ध जी.एम. आर.टी. (Giant Metrewave Radio Telescope) प्रकल्प उभारला आहे. इथे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक दुर्बीण आहे.

बदलापूरच्या आदर्श विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी नुकतीच या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रकल्पाच्या यांत्रिक विभागातील तांत्रिक अधिकारी श्री. प्रभाकर कासार यांनी विद्यार्थ्यांना जी.एम.आर.टी. प्रकल्पाची रचना, उभारणी, त्यात वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याद्वारे चालणारे खगोलशास्त्रीय संशोधन याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, या क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाच्या विविध संधींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये विद्यान, तंत्रद्यानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात विद्याननिष्ठ दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी इतरही शाळांनी आदर्श विद्यालयाचा आदर्श आपल्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
