Home बातम्या विद्यार्थ्यांनी मानसिक क्षमता वाढवावी – देवेंद्र भुजबळ

विद्यार्थ्यांनी मानसिक क्षमता वाढवावी – देवेंद्र भुजबळ

0

स्पर्धा परीक्षा असो की जगण्यातील लहान मोठ्या समस्या, त्यांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिक क्षमता विकसित करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी नुकतेच केले. अकोला येथील प्रसिद्ध बाबुजी देशमुख वाचनालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, केवळ सरकारी खुर्चीत बसणे हे तुमचे ध्येय नसावे तर त्या खुर्चीचे उत्तम काम करणे व पदाचा मूळ हेतू साध्य करणे हा तुमचा प्रमुख उद्देश असावा.

करियर म्हणजे प्रगतीशील जीवन असावे, विशिष्ट नोकरी नसावी. यावेळी विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देउन त्यांचे समाधान श्री भुजबळ यांनी केले.

या प्रसंगी वाचनालयाचे सचिव श्री अनुराग मिश्रा व कार्यकारिणीचे सदस्य प्रा.डॉ.मोहन खडसे उपस्थित होते.

प्रारंभी श्री मिश्र यांनी वाचनालयाच्या वतीने श्री देवेंद्र भुजबळ यांचे स्वागत करुन त्यांचा विद्यार्थाना परिचय करुन दिला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. खडसे यांनी केले. या संवाद कार्यक्रमात शेकडो विद्यार्थांसह, चित्रकार श्री किशोर विभूते उपस्थित होते.

प्रारंभी श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले, लोकप्रिय “समाजभूषण” पुस्तक श्री मिश्रा व डॉ खडसे यांना भेट दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश टेके, सतिष डगवाले, जुगलकिशोर सिरसाट, नितिन कदम, सुस्वप्निल ताथोड, सुनिल मिश्रा यांनी अथक परिश्रम घेतले.

– टीम एनएसटी. 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version