Sunday, March 16, 2025
Homeबातम्याविद्यार्थ्यांनो, 'स्व' ओळखा! डॉ प्रेमानंद रामाणी

विद्यार्थ्यांनो, ‘स्व’ ओळखा! डॉ प्रेमानंद रामाणी

महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. “‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे, ’’स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले.

नव्वद टक्क्याहून ज्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करताना हा विचार मनात कायम स्वरूपी रुजवला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय न्यूरो स्पायन सर्जन डॉ प्रेमानंद रामाणी यांनी काढले. श्री शांता सिद्धी ट्रस्टच्या वतीने दादर येथे संस्थेच्या www.shantasiddhicharitabletrust.com या वेबसाईटचे उदघाटन आणि इयत्ता दहावीमध्ये उत्तम मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, डाइव्हिंग या ऑलम्पिक या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकाराचे पंच श्री मयूर व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ रामाणी पुढे म्हणाले की, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यारणा, ध्यान आणि समाधी ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार होते. व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत.

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.

तर रवींद्र मालुसरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी-बारावीचे सर्वोच्च मार्कांचे यश म्हणजे आई -वडिलांची लादलेली आकांक्षा पूर्ण करण्याचे यश. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या आयुष्यात आपली स्वतःची वाट निवडायला हवी. का, कशासाठी, कुठपर्यंत पोहोचण्यासाठी असे प्रश्न मनात धरून विशिष्ट ध्येय ठेऊन आपण निवडलेला मार्ग आनंद, यश, कीर्ती आणि पैसे देतो. तंत्रज्ञानाच्या शतकात वावरताना स्वतःचा चेहरा ओळख म्हणजे तुमच्या गुणवत्तेला न्याय दिल्यासारखे होईल.

श्री मयूर व्यास याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एकातरी क्रीडाप्रकारात विद्यार्थ्याने मैदानात उतरायला हवे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यवाह भूषण जाक यांनी केले.
सोहम मोये, सिया मोये, वेदांत पराग व्होरा, महालक्ष्मी श्रीधर शानबाग, रुजूला भाटकर, श्रावणी जोशी, रीती करण रावत, साची जवाहर खांडेपारकर, आषिता आरोसकर या ९२% हुन अधिक मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. किशोर कुलकर्णी, संजय दिवाडकर, जयंत गायतोंडे, विनायक पंडीत, संजय कुलकर्णी, सतीश दाभोळकर, दीपक देसाई इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला हजर होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीचा सुंदर उपक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments