Tuesday, September 16, 2025
Homeबातम्याविद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा

महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयीन (सर्व शाखा) विद्यार्थ्यांसाठी हुंडाविरोधी चळवळ, मुंबई  या संस्थेतर्फे
पुढील विषयांवर निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेचे विषय :
(१) कोविड-१९ महामारीने काय शिकवले ?
(२) सोशल मीडिया : शाप की वरदान
(३) २१ व्या शतकात धर्माचे स्थान.

शब्द मर्यादा : १००० शब्द.
भाषा विकल्प : मराठी, हिंदी, इंग्रजी.

निबंध सुवाच्च अक्षरात अथवा टंकलिखित असावा. कागदाच्या एकाच बाजूला लिहावे, दोन्ही बाजूंवर लिहू नये. निबंध ईमेलवर स्वीकारले जाणार नाहीत.

पारितोषिके :
स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाला “रोशनलाल तलवार ट्रॉफी” दिली जाईल व विजेत्या विद्यार्थ्याला रु. १५००/- रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र दिले जाईल.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या निबंधांना अनुक्रमे  रु.१०००/- व रु.५००/– ची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे.

तसेच पुढील चार ते दहा क्रमांकांच्या निबंधांना उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रे युवा दिना निमित्ताने १२ जानेवारी २०२२ रोजी देण्यात येतील.

विद्यार्थ्यांनी निबंधाच्या शेवटी स्वतःचे नांव, मोबाईल क्रमांक व ईमेल लिहावा.

निबंध परीक्षणासाठी तज्ञ परीक्षक नेमले जातील. परीक्षकांच्या निकालाला कोठेही आव्हान देता येणार नाही. सहभागी महाविद्यालयांना ईमेलने व पोस्टाने निकाल पाठवण्यात येईल.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत खालील पत्त्यावर पाठवलेले अधिकृत निबंधच फक्त स्पर्धेसाठी स्विकारले जातील. वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांनी निबंध पाठवू नयेत.

निबंध स्विकारण्याची अंतिम तारीख –
३० डिसेम्बर २०२१.

अधिक माहितीसाठी संपर्क :
आशा कुलकर्णी, महासचिव-
हुंडाविरोधी चळवळ, मुंबई ४/५० विष्णूप्रसाद ‘बी’ सोसायटी, शहाजी राजे मार्ग, पार्ले बिस्कीट फॅक्टरीजवळ, विलेपार्ले (पूर्व)
मुंबई – ४०००५७. भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२. दूरध्वनी : ०२२-२६८३६८३४.

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments