भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मिशन आय ए एस व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या निबंध स्पर्धेचा विषय “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य” असा आहे.
या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व स्पर्धा परीक्षेचे एक पुस्तक मिशन आय ए एस तर्फे भेट देण्यात येईल.
निबंधासाठी शब्दमर्यादा हजार शब्दांची असून स्पर्धकांनी निबंधावर आपले पूर्ण नाव, शाळेचे/ महाविद्यालयाचे नाव, आपला पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर लिहिणे गरजेचे आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी परिसरामध्ये असलेल्या बजाज नगरातील कस्तुरबा भवनमध्ये होईल.
या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोस्टाने, आपले निबंध दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत,
श्री सुनील पाटील, सचिव, गांधी स्मारक निधी 349 कस्तुरबा भवन बजाज नगर, नागपुर -10
या पत्त्यावर पाठवावे .
विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन या स्पर्धेचे संयोजक व मिशन आयएएसचे संचालक प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे .
– देवेंद्र भुजबळ. 9869484800