विद्रोह मनातला
पेट घेऊन
परत बुजवणार आहे
AC तून पाहतील ते बातम्या
सामान्यांची गर्दी जमवणार आहे
पाऊस नाही, वीज नाही
काय फरक पडणार आहे
प्रदर्शन करून
दिवसभर तू
रात्री अंधारात जेवणार आहे
नव्या स्वप्नांचे नवे आश्वासन
देत, ते परत मत मागणार आहे
वारसा हक्क चालेल त्यांचा
तू मात्र,नारे बाजी करणार आहे
जरी वर्षभर करतोस कष्ट तू
तरी तूला,भाव कोण देणार आहे
सत्तेसाठी जातो वेळ त्यांचा सारा
तुझा विचार कोण करणार आहे
कधी कळेल का तुला
किती तू लाचार होणार आहे
पेटवून विद्रोह मनातला
कितीदा बुजवणार आहे
मिटवला जाईल धूर सारा
किती बस गाड्या जाळणार आहे
जाळून टाक भ्रष्टाचार सारा
जर मनातून पेट घेणार आहे
देण्यास अन्यायाच्या विरुद्ध लढा
कधी तू युद्धात उतरणार आहे
कोणासाठी नाही,
तुझ्या हक्कांसाठी
सांग ना कधी लढणार आहे ?

— रचना : पूनम सुलाने- सिंगल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800