वैदर्भीय महिला संस्थेच्या नागपूर येथील विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकतेच सात दिवसीय रासेयो निवासी शिबिराचे आयोजन अशोकवन प्रकल्प, वर्धा रोड, डोंगरगाव येथे करण्यात आले होते.
संस्थापिका सौ. सावित्रीताई रोकडे आणि प्राचार्य डॉ.एन.आर.दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात एकूण ७५ स्वयंसेविकांचे हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडले.
हे शिबीर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत ‘युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास’ या संकल्पनेवर आधारित होते. या शिबीराचा मुख्य उद्देश स्वयंसेविकांना माणूस म्हणून आणि सामाजिक परिवर्तनाच्या अभिकर्ता म्हणून विकसित करणे हा होता. स्वयंसेविकांना समाजासाठी, समाजात आणि समुदायासोबत काम करण्यास मदत करणारे उपक्रम आणि व्याख्याने यावर भर होता.
या स्वयंसेविकांना काही सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिक आणि राजकीय पैलूबद्दल शिक्षित करण्यासाठी विविध संवादात्मक सत्रे, कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि व्याख्याने आयोजित केली गेली.
प्रत्येक दिवसाची सुरुवात चिंतन, विविध संवादात्मक सत्रे, अतिथी व्याख्याने आणि क्षेत्रीय कार्याने झाली.
रासेयो शिबिराचे उद्घाटन ३ जानेवारी २०२३ रोजी माननीय अध्यक्षा श्रीमती सावित्री रोकडे आणि प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गट ग्रामपंचायत डोंगरगाव येथील सरपंच सौ. कल्पना कोराम आणि उपसरपंच सौ. रंजनाताई बोंद्रे उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाने स्वयंसेविकांना गावांच्या विकासासाठी जागृत होण्यास मदत झाली.
सर्व स्वयंसेविकांची वेगवेगळ्या समित्यांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेविकेला स्वतंत्र समित्या देण्यात आल्या. शिस्तपालन समिती, आदरातिथ्य समिती, दस्तऐवजीकरण समिती, स्वयंपाक समिती, स्टेज व्यवस्थापन आणि सांस्कृतिक समिती अशा विविध समित्या होत्या.
शिबिरात होणार्या सांस्कृतिक नृत्य, स्पर्धा, कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व स्वयंसेविकांनी तयारी सुरू केली. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता ठळकपणे मांडण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाताई आमटे हे विशेष अतिथी होते. दोघांनी स्वयंसेविकांना एन.एस.एस.चे महत्त्व आणि जीवनात निस्वार्थी राहणे किती महत्वपूर्ण आहे याविषयी मार्गदर्शन केले.
लिंगभेद, स्वच्छता, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, मतदार नोंदणी, शिक्षण आणि स्वच्छ भारत याबाबत घोषणाबाजी, फलक, बॅनर, पथनाट्य आदींद्वारे स्वयंसेविकांनी डोंगरगाव गावात रस्त्यावर उतरून जनजागृती केली. आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती या मूलभूत प्रश्नांबाबत गावकऱ्यांना अजूनही माहिती नाही. त्यामुळे अशा सामाजिक प्रश्नांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा मार्ग या रॅलीने मोकळा केला.
डोंगरगाव येथे स्वयंसेविकांनी शिक्षण आणि आरोग्य विषयक गाव सर्वेक्षण केले. स्वयंसेविकांची ऊर्जा परिवर्तनाच्या आगीसारखी बाहेर आली. सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला मर्यादा नाही. एकत्र काम केल्याने त्यांना संयम, सांघिक भावना आणि उपयुक्तता यासारखी समूह कौशल्ये शिकण्यास मदत झाली.
शिबीरात उद्धव साबळे, भारती साबळे, डॉ. सुशील मेश्राम, डॉ. नरेंद्र घरत यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबीराचे नेतृत्व डॉ.सिंगनजुडे यांनी प्रा. प्रणय दाते आणि प्रा. विशाल सोरते यांच्या विशेष सहकार्याने केले.
शिबीराचा समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित आणि प्रमुख पाहुणे डॉ. वसंत उकिनकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ.प्रशांत गुल्हाने, डॉ.मिलिंद गुल्हाने, डॉ.दीपक पवार, डॉ. दामोदर भेंडे, डॉ.लक्ष्मण गायकवाड, डॉ.दिपाली भावे, डॉ.शामकूरे, डॉ.विजया राऊत, प्रा. कोटांगळे, प्रा. चौधरी, प्रा. अग्रवाल, डॉ. मस्के, डॉ. तुळसकर, प्रा. तीतरे, राजेंद्र चोरे आणि नितीन चापले आदींनी हे शिबीर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800