अगदी रोज भेटणारे बाळ आज तीन वर्षांचे झालेही हे खरंच वाटत नाही. तसेच आज न्युज स्टोरी टुडे वेबपोर्टल ला तीन वर्षे पूर्ण झाली. श्री.देवेंद्र भाऊजी व सौ.अलका ताई व आमची लाडकी देवश्री ह्यांच्या सुंदर विचारांचा सुंदर संगम म्हणजे
न्यूज स्टोरी टुडे हे वेबपोर्टल होय.
विषेश म्हणजे हे तिघेही अतिशय सुंदर लिखाण करतात. पण स्वतःचे पोर्टल असुनही ते दुसऱ्या लेखक, कवींना आधी प्राधान्य देतात.
आमच्या सारख्या निवोदित कवी, लेखकांना तुम्ही अजून खूप छान लिखाण करू शकतात हे सांगुन प्रोत्साहन देतात. हे पोर्टल मला ह्यामुळेच जास्त आवडते.
ह्या पोर्टलवर खुप वेगवेगळ्या विषयांवर वाचन करायला मिळते. ह्या वर कुठलीही गुन्हेगारी, राजकीय विषयक पोस्ट नसते.
जगातील ८६ देशा मध्ये हे पोर्टल वाचले जाते, ही किती अभिमानाची गोष्ट आहे ! त्यामुळेच ह्या पोर्टल वर आपले लिखाण प्रसिद्ध होते ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
आता मध्ये काही दिवस पोर्टल बंद होते, तेव्हा अगदी आपले जवळचे कोणीतरी आपल्याला भेटत नाहीये असे वाटले.
सौ.अलका ताई व श्री.देवेंद्र भाऊजी व देवश्री यांना पोर्टल च्या तिसऱ्या वाढदिवसाच्या कोटी कोटी अगणित अगणित हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. आपले पोर्टल असेच छान प्रगती पथावर राहो व आज ८६ असलेला अंक उद्या ज्या ज्या देशात मराठी माणूस आहे त्या असंख्य देशात पोहोचो ही मनापासून सदिच्छा
पोर्टलबदल काय बोलु मी
शब्द माझे पडतील कमी !!
कवीची कविता
लेखकांचे सुंदर लेख !!
प्रवास वर्णन
घडवते आम्हाला
घर बसल्या पर्यटन !!
विविधतेने नटलेल्या
विविध लोकांच्या मुलाखती !!
असा कुठलाही
विषय नाही
जो पोर्टल वर
आला नाही !!
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल
हे अनोखे गुणी अपत्य
पालक त्यांचे सुजाण
श्री.देवेंद्र जी व सौ.अलका भुजबळ !!
नांवातच ज्यांच्या आहे बळ
म्हणूनच लेखात असते त्यांच्या समाजापती तळमळ !!
देवश्री च्या साथीने
उंच उंच देश विदेशात पोहचो
ह्याची कीर्ती !!
सगळ्या न्युज स्टोरी टुडे परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

— लेखन : सौ.मंदा शेटे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800