यिन तर्फे आयोजित शाडो कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिवेशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नुकतेच
पार पडले. या अधिवेशनात राज्याचे मंत्रिमंडळ तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष सहभागी झाले होते.
या अधिवेशनासाठी जालना येथील कुमारी विशाखा पट्टे हीची निवड झाली होती. विशाखा ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा रंगवली. सोबतच या अधिवेशनात विरोधीपक्ष नेते म्हणून आपली कामगिरी गाजवली.
या अधिवेशनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, स्त्री पुरुष समानता आणि स्त्री उद्योजकते विषयी विविध ठराव मांडल्या गेले. शेवटच्या दिवशी या मंत्रिमंडळाने लाल किल्ला, संसद भवन आणि राष्ट्रपती भवन या ठिकाणी भेटी देऊन तेथील कामकाज समजावून घेतले.
हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे गितांजली देवकर यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800