विश्व कल्याणाचा प्रथम संदेश देणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली, यांचा आज जन्मदिवस. श्रीमद भगवत गीता सांगणारे जगद्गुरू श्रीकृष्ण यांचाही आज जन्म दिवस आहे हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
सर्व सामान्यांना समजेल अशा शब्दात सोप्या मराठीत माउलींनी भगवत गीतेचे ज्ञानेश्वरीच्या रूपाने निरुपण केले.
अलीकडे जागतिक एकात्मता, जागतिकीकरण इत्यादी संकल्पना प्रामुख्याने पुढे येत आहेत. त्याची आज नितांत गरजही आहे. जगाच्या पाठीवर विविध देशांत, विविध धर्म, जातीत, प्रांतात अलीकडे प्रचंड संघर्ष होत आहे. हे संघर्ष जर असेच सुरु राहिले तर मानव जातीचे अकल्याणच होईल.
परंतु ७५० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी हे विश्वची माझे घर असे सांगितले आहे. त्यांनी लिहिलेले पसायदान म्हणजे विश्व कल्याणाचा मंत्रच आहे. एक सुश्राव्य काव्य आणि तत्वज्ञान यांचा मधुर संगम म्हणजे पसायदान.
माउलींनी केवल मानव कल्याणाचाच मंत्र दिलेला नाही, तर या विश्वात जे जे आहे त्यांच्या कल्याणाचा विचार केला आहे.

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||
इतकी महान सन्कल्पना त्यांनी मांडली आहे.
म्हणून पसायदानाचा संदेश सर्व विश्वात, सर्व भाषात बिम्बवायला हवा. यासाठी माऊलींचा जन्म दिवस हा “विश्व कल्याण दिन” म्हणून साजरा करण्यात यावा अशी कल्पना विरार येथील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते श्री निरंजन राउत यांनी न्यूजस्टोरीटुडे च्या प्रतिनिधी पुढे मांडली आहे.

या कल्पनेला डॉक्टर हेमंत जोशी यांनी देखील समर्थन दिले असून जग भरातून या कल्पनेचे स्वागत झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
– लेखन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
मित्रांनो,
नमस्कार,
आज जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची जयंती आपण धुमधडाक्याने साजरी करतो आणि योगायोगाने विश्वधर्माची संकल्पना मांडणारी विभुती संत ज्ञानेश्वर माऊली यांचीही जयंती. एकाने कुरुक्षेत्रातील रणांगणात श्रीमद्भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण आणि याच भगवद्गीतेचे सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत रसग्रहण करून विश्वधर्माचे ज्ञानामृत पाजुन ” जो जे वांछील तो ते लाभोची संकल्पना मांडणारी माऊली यांच्या वैश्विक विचारांला काय तोड नाही ” या दोन्ही विभुतींच्या विचारांवर आधारित ” विश्वकल्याण दिवस ” साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे, ती उचितच आहे असे वाटते. अर्थात आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये “वसुधैव तु कुटूंबकम् ” वा ” हे विश्वची माझे घर ” ही फार मोठी अन् वैश्विक – सर्वव्यापी संकल्पना – विचार मांडले आहेत.
आज या विचाराला – संकल्पनेला Newsstorytoday मधून साद घातली आहे ती उचितच आहे , या विचाराचे स्वागतच होईल असा विश्वास व्यक्त करतो.
राजाराम जाधव,
छान विश्व प्रार्थना…
अतिशय स्तुत्य प्रस्ताव आहे👏 त्याची लवकरच पूर्ती होवो अशी त्या विश्वात्मक देवाचे चरणी प्रार्थना 🙏