‘येस, आय कॅन फाऊंडेशन’ ही एक स्वयंसेवी संस्था आहे. संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.
संस्थेने नुकतेच वृध्द तृतीयपंथी व्यक्तींच्या देखभालीसाठी काळजी वाहक म्हणून स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या उपक्रमात वृध्द तृतीयपंथी व्यक्तींच्या देखभालीसाठी खुद्द तृतीयपंथी तरुण व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेला तरुण तृतीयपंथीयांना वृद्ध तृतीयपंथीयांची काळजी घेण्यासाठी सक्षम करावयाचे आहे. जेणेकरून त्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांची सेवा करून त्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतील.
या संस्थेला भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. संस्थेला संवेदनशील नागरिकांकडून पुढील प्रमाणे मदतीची अपेक्षा आहे.
1- ज्येष्ठ नागरिकांची दररोज काही तास काळजीसाठी घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.
2- संस्थेच्या तृतीयपंथी स्वयंसेवकांना सेवेची संधी द्या.
3- सुरुवातीला आपण प्रयोग म्हणून एका दिवसासाठी देखील संस्थेशी संपर्क साधू शकता.
4- आपण ज्येष्ठ नागरिक असल्यास संस्थेला सेवेची संधी द्या जेणेकरून संस्था काही तासांसाठी प्रशिक्षित तृतीय पंथी काळजी वाहक आपल्याकडे पाठवू शकेन. तुमच्या वतीने संस्थाच त्यांना पैसे देईल.

या उपक्रमाविषयी बोलताना, सामाजिक कार्यकर्ते श्री किरण भावे म्हणतात, “हा पाथ ब्रेकिंग उपक्रम आहे. आपल्या समाजबांधवांकडून यांना स्वीकारले गेले पाहिजे. यासाठी त्यांना विविध कौशल्ये शिकवून रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्यांचा उपजीविकेचा प्रश्न सुटेल आणि उपेक्षित म्हणून नाईलाजाने त्यांना करावा लागत असलेला संघर्षही संपुष्टात येईल.
आपल्यातील सहृदयी व्यवसायिकांना आवाहन आहे की त्यांना सामावून घेता येईल का ते पाहावे.
कोणत्याही उपेक्षिताना सहानुभूती नको असते.तर त्यांना फक्त इतरांची मनापासून स्वीकृती हवी असतें. इतर कोणत्याही बाबतीत ते सामान्यांपेक्षा कमी नसतात. उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.”
चला तर, सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी
संस्थेला मदतीचा हात देऊ या !
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
तृतीय पंथीसाठीचा उपक्रम फारच स्तूत्य आहे.माझ्या गावातल्या तृतीय पंथीयांंने गावातल्या गरीब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करून त्यांना पदवी पर्यंंत शिक्षण दिले.परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी S.SC.च्या परीक्षेसाठी त्यांच्या घरात ठेवण्याची,जेवणाची व्यवस्था केली होती.