Monday, February 16, 2026
Homeसाहित्यवेड्या स्रिया…

वेड्या स्रिया…

वेड्या कशा या स्रिया का जीव टाकतात
मोडला कणा तरी ही संसार रेटतात ..

आभाळ फाटलेले तरी शिवतात ह्या वेड्या
शक्ती अशी अफाट कोठून आणतात…

चिंध्या जरी मिळाल्या शिवतात गोधडी त्या
उपजत त्या शहाण्या का बरे असतात..?

नसली जरी हो साथ कंबर कसतात
तापली जरी ती माती त्या चूल बांधतात…

तापून लालबुंद तव्यावरीही हात
खुशाल मनमुक्त भाकरी ही थापतात…

मांड्यापरी तिंबून करतात मऊसुत
खापर तापलेले मांडे ही रांधतात…

हरवाल कसे हो सांगा त्या मल्ल संसारात
रेटून नेतातच केला जरी हो घात …

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा. सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11