अष्टाक्षरी…
आयुष्याच्या वाटेवर
वेदनेची भेट होते
जीवनाचा मोठा भाग
वेदनाच ही व्यापते…१
शारिरीक त्रास, इजा
करी जखम तनाला
मानसिक आघाताने
खोल जखम मनाला…२
वेदनेत कधीकधी
सुख लपले असते
प्रसवाच्या वेदनांना
दु:ख माहित नसते…३
विरहाच्या वेदनेत
लपलेले असे दु:ख
विसरून सारे काही
शोधायचे मात्र सुख…४
दुसऱ्यांच्या वेदनेचा
करू आपण विचार
मदतीचा हात देवू
हाच असावा आचार…५
वेदनेच्या बरोबर
आपल्याला लढायचे
यातनेला हरवून
प्रवासात जिंकायचे…६
— रचना : डाँ दक्षा पंडित.
सँनडिआगो, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800